नको ते सल्ले हवेत.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
20 Aug 2010 - 12:05 am

नमस्कार्,नमस्कार...........

माझ्या लेखांची काही दीवसांपासुन फार चिरफाड होत आहे.५ फुटात पोहणारे,पकवे हॅकर,पकाउ विडंबन करणारे काही लोक कारणीभुत आहेत,त्यांना एकच सांगेन की हा विरोध म्हणजे आमच्या प्रगतीच्या मार्गातील अपेक्षित अडथळे आहेत.महात्मा फुलेंना दगडे मारणारे होतेच की.

असो,तर आज आम्ही काहीतरी (नेहमीसारखेच) क्रांतीकारक्,मार्गदर्शनपर लिहणार आहोत..
मला एक scrap आला,मी तीन-चार महीन्यांपुर्वी जो एक प्रतिसद पाठवला होता,त्याचे उत्तर होते ते.त्यात मी तुला contact वगैरे सारखे फालतु लिहले होते.मला ती व्यक्ती लगेच contact करेल अस काहीतरी करायचे आहे.
ती व्यक्ती आमची लहनपणीची मैत्रीण.कुठे,कस ते लिहले तर आमचे लहानपणीचे मित्र,जे ई.जालावर सारखे झक मारत असतात,ते आमच्य नावाने बोटे मोडतील...........असो.तर ह्या मैत्रीणीचे नावच मला एवढे आवडते की काय सांगु.तिलाही आम्ही खुप आवडायचो.तसे आम्ही मुळातच हुशार व.......................असो.
तर आम्ही कधी ग्रुपमधे बसलेलो असताना,तिच्याशी नजर मिळाली की ती मस्त हसुन दाखवायची.मग माझ्या डोळ्यासमोर दाट धुकं पसरायचे व मला आम्ही दोघे कुठेतरी हातात हात घालुन बसलेले दीसायचो.पण मी कधी तिला सांगितले नाही..........परत असो.आज believe it or not तिचा प्रतिसाद म्हणजे मला तिचे म्हणने तब्बल ८-९ वर्षांनी त्या keyboardच्या मदतीने लिहलेल्या त्या चार ओळीत कळले.तिने मला आठवले,हा हा what a feeling!!

तर मला त्या scrapला असे उत्तर द्यायचे आहे की,की तिने माझा फोन नंबर मागितलाच पाहीजे.मी १००% टक्के खोटे बोलायलाही तयार आहे.कदाचित तेच करणार आहे,पण एकदम sure shot काहीतरी सुचत नाहीये.
अजुन काय बोलु व्हा सुरु!

नोंद : लेख जरा जास्तच फालतु झाला आहे,मिपा संपादकांनी थोडा धीर धरावा,कींवा लेख संपादीत करावा पण आम्हाला उत्तर मिळेपर्यंत लेख ईथे ठेवावा.

इतिहाससल्ला

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

20 Aug 2010 - 12:08 am | चतुरंग

बुधवार-गुरुवार हेच वार असतात हे माहीत नव्हते! ;)
(अधिक माहितीसाठी पुपेंना भेटा अथवा लिहा! ;) )

(घातवार)चतुरंग

अनामिक's picture

20 Aug 2010 - 1:03 am | अनामिक

हा हा हा... चांगलाच टोला मारलाय!

शानबा५१२'s picture

20 Aug 2010 - 12:11 am | शानबा५१२

ह्या आधी मी जे फोनवर मैत्री करण्याबद्दल बोललो होतो,त्याबाबतीत एवढेच सांगेन की आम्ही तिला काहीच बोलु शकलो नाही,कारण तिला संपर्कच केला नाही.तिला ज्या अडचणींना तोंड द्याव लागत आहे,त्यात मी तिला disturb करणे बरं दीसत नाही.
हे मी ह्यासाठी स्पष्ट करतोय की मी कधी खोटं काहीतरी लिहत नाही,ह्याची आपण नोंद घ्यावी.

शिल्पा ब's picture

20 Aug 2010 - 12:23 am | शिल्पा ब

<<<.महात्मा फुलेंना दगडे मारणारे होतेच की.

आधी एक अगाध प्रतीभावले ज्ञानोबा येऊन गेले आणि आता महात्मा फुले ... या आजच्या काळ्याकुट्ट जगात असे आशेचे किरण दिसले कि मन कसे भरू ssssss न येते..

बाकी तुम्ही नेमकी काय प्रगती करण्याची इच्छा करीत आहात ? अशा लेखांविषयी तर आपलाच आदर्श समोर आहे...आपले अजूनही काही गुण असतीलच तर त्याची वाच्चता व्हावी एवढीच इच्छा मनी धरून आहे..

परिकथेतील राजकुमार's picture

20 Aug 2010 - 10:58 am | परिकथेतील राजकुमार

आमच्या एका हिरव्या काकांच्या पुतण्याच्या मित्राला अगदी अस्साच अनुभव आला होता आणि हाच प्रश्न पडला होता. त्यानी त्या मुलीला सांगुन टाकले की आता तो मेंटली अगदी नॉर्मल आहे आणि पुरुषांकडे बघणे पण त्यानी बंद केले आहे. त्याला ह्या खर्‍या बोलण्याचा फायदा झाला. त्या मुलीनी त्याला नंबरच नाही तर घराचा पत्ता आणि तीचे आई वडिल कामाला कधी जातात ती वेळ पण दिली.

आपण ह्या अनुभवातुन काही घेउ शकता का पहा.

मृगनयनी's picture

20 Aug 2010 - 5:08 pm | मृगनयनी

प.रा....

___/\___

=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))

_________

प.रा. आज मिपावरच्या एका जुन्या सदस्याची (ज्याला मिपावरून "बैन" केलेले आहे...) ;) त्याची आठवण करून दिलीस्स!
=)) =)) =))
_____________________________

शानबा'ला प्रतिसाद देण्यासाठी जागा राखून ठेवत आहे...

_

कुणीही दगडं मारून जागेचा दुरुपयोग करू नये! आणि पर्यायाने "शान'बाचा" अपमान'ही करू नये! ;) ;)

सुहास..'s picture

20 Aug 2010 - 12:15 pm | सुहास..

१ ) http://flirtingtipsforguys.org/

२) http://onlineflirtingtips.com/ (कन्टेट थोडा अ‍ॅडल्ट आहे !!)

हॅप्पी प्लर्टींग !!

अवांतर : बाकी हे सर्व बेसीक्स मध्येच असाव लागत ...कबुतराला गरुडाचे पंख लावुन ऊंचावर ऊडविता येत नाही ..

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Aug 2010 - 2:41 pm | llपुण्याचे पेशवेll

कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतील पण गगनभरारी मारण्याची इच्छा रक्तातच असावी लागते कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
-व पु काळे

सुहाशा असे वाक्य आहे ते.