एच आर, प्रोसेस आणि मी

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
16 Aug 2010 - 5:46 am

कॉसकोची वारी म्हणजे तशी म्हतली तर चंगळच असते. भरपूर रंगीबेरंगी गर्दी, हिरव्यागार भाज्या, रसरशीत फळं, मासे , चिकन, पोर्क सगळं मस्त हाताळायला मिळतं ते मिलतं वर नमुनेदेखील चापायला मिळतात. आमच्याकडे साधारण १५वड्याचं, महीनाभराचं सामान या वारीत आणलं जातं.
पण दिवाळीनंतर येतो शिमगा त्या न्यायाने कॉसकोच्या फेरीनंतर घरी आल्यावार एक-एक करत ते सामान गाडीतून उतरवायचं, नंतर जीना चढत चढत दारापर्यंत न्यायचं, तिथून पुढे फ्रीजपर्यंत नेऊन लावायचं म्हणजे जीव मेटाकुटीला येतो. ४-४ गॅलन दूध, अंडी,फळांचे भाजांचे टोप, मासे, चिकन, चिकन ब्रॉथ चे कॅन्स, केचप्स, सिरीअल्स एक ना दोन. अनंत खेपा कार ते घर कराव्या लागतात.
आता थोडी पार्श्वभूमी देते - परवा इंटर्व्ह्यू झाला त्यात एच आर नी प्रश्न केला - "ह्म्म तर मिस .... तुम्ही गेल्या प्रकल्पात कोणत्या प्रोसेसमध्ये सुधारणा घडवून आणलीत? आणि त्या सुधारणेचे फायदे लोकांना कसे पटवून दिलेत?"
आता असल्या प्रश्नांमुळे होतं काय प्रकल्पामधे माणूस फार प्रकाश पाडू नाही शकला तरी घरी दारी प्रकाश पाडायला जातो. नको तिथे असले प्रश्न आणि त्यंची उत्तरं इम्प्लिमेंट करू लागतो.
माझंही तेच झालं. यावेळी कॉसकोमधून बाहेर पडल्या पडल्या मी १ मोठ्ठा खोका घेतला. त्यात सगळं सामान भरलं, हो हो अगदी नीट रचलं. तोवर नवरा बिल देऊन आला होता. तो म्हणाला हे काय नवीन? मी म्हटलं - ही नवी प्रोसेस. आपण हा खोका आता डिकीत चढवायचा मग घरी दोघांनी एक-एक करत सामान नेण्यापेक्षा सरळ हा खोका उचलून न्यायचा. काम सोप्प! : ) रिमेंबर इफ वी मेक इट द क्रेडीट गोज टू मी. नवर्‍यानी त्या भल्या मोठ्ठ्या खोक्यावर नजर फिरवली आणि फक्त म्हणाला "इफ ...!!" मी हीअसल्या क्षुल्लक गोष्टींकडे विशेषतः नवर्‍याच्या दुर्लक्ष करायला सरावली आही आतापावेतो.
घरी आल्यावर झालं भलतच. तो खोका उचलता तर आला. पण नेताना अर्ध्या वाटेवर माझ्या पाठीत उसण भरली. जीन्यावर तो खोकातिरपा मी सोडून दिला आणि बटाटे इतस्ततः विखुरले. मागुन येणार्‍या गोर्‍या कुटुंबानी सहानुभूतीपूर्वक काही बटाटे उचलून दिले. नवर्‍याला एक एक करत शेवटी सर्व सामान न्यावं लागलं एवढच नाही तर मलाही उचलून न्यायची वेळ आली. आमच्या नको तिथे स्पष्ट्वक्त्या मुलीनी मुक्ताफळं उधळलीच - "आई प्रोसेसमधे सुधारणा करण्याआधी ती डुएबल आहे की नाही ते तरी पाहायचस." नवरा फक्त छद्मी हसला!
मी तर कानाला खडाच लावला - हे एच आर लोक पक्के डँबीस असतात. हायपोथेटीकल (काल्पनीक) समस्या देणं यांचं कामच असतं. परत एकाही एच आर वाल्याला सिरीयसली म्हणून घ्यायचं नाही.

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

16 Aug 2010 - 6:09 am | विंजिनेर

घराला लिफ्ट नाहीये का?
एक मोठा खोका आणण्याच्या ऐवजी २ लहान खोकी आणता येतील.

सहज's picture

16 Aug 2010 - 12:03 pm | सहज

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Aug 2010 - 2:39 pm | llपुण्याचे पेशवेll

बरोब्बर. असल्या कार्टा अगदी उपयोगी असतात. आम्ही तर असल्या कार्टा घेऊन ट्रेनमधून जायचो. अपंग लोकांसाठीच्या लिफ्टमधून सहज नेता येतात या कार्टा.

हा हा हा!
यावर उपाय म्हणून आम्ही सहा सात वर्षांपूर्वी वर चित्रात असल्याप्रमाणे चारचाकी ;) आणली.
ती उघडून सरळ करताना काहीतरी बिनसले आणि एकदाही उघडता आली नाही. बरेच प्रयत्न केले.
एका ओळखीच्यांकडे कशी आहे ती बघूनही झाली. सगळे काही व्यवस्थित आहे पण मग मागे पडली ती पडलीच!
परवाच बेसमेंटात एका कोपर्‍यात दिसली. प्रयोगशील वृत्ती उफाळून आली पण मोह टाळला. ;)

सुनील's picture

16 Aug 2010 - 7:44 am | सुनील

हॅ हॅ हॅ

लेख छानच!

बाकी कॉस्को (किंवा सॅम्स क्लब) स्वस्त मिळते म्हणून भरमसाठ आणायचे आणि एक तृतियांश पदार्थ न वापरताच (तारीख संपल्यामुळे) फेकून द्यायचे! म्हणजे एकूण गोळाबेरीज सारखीच येते! (शिवाय कॉस्कोत वीसा कार्डदेखिल चालत नाही. म्हणजे रोख द्या!)

त्यापेक्षा बाजूचे सुपरमार्केट कित्ती कित्ती चांगले! (शिवाय तिथली टॅमी कित्ती गोड हसते नाही का?)

स्वानुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

Pain's picture

17 Aug 2010 - 1:24 am | Pain

तुम्ही असे फेकत असाल. बरेच लोक तसे करत नाहीत त्यामुळे तो एक चांगला पर्याय आहे. आणि तिथे विसा कार्ड चालते.

बाकी कॉस्को (किंवा सॅम्स क्लब) स्वस्त मिळते म्हणून भरमसाठ आणायचे आणि एक तृतियांश पदार्थ न वापरताच (तारीख संपल्यामुळे) फेकून द्यायचे! म्हणजे एकूण गोळाबेरीज सारखीच येते!
एकदम सहमत. मी केवळ गाडीत पेट्रोल भरायला जाते तिथे. आणि गेस्ट येणार असतील तर पेपर डिशेस आणि काही भाज्यांसाठी.

बहुगुणी's picture

18 Aug 2010 - 2:53 am | बहुगुणी

मी या अशा 'उत्साही अति-खरेदी आणि नंतर फेकणं' याला (बर्‍याच स्वानुभवानंतर) BIB-TIB principle असं नांव ठेवलं: Buy in Bulk -Throw in Bulk! (विशेषतः स्वस्त म्हणून ढीगाने फळं घ्यायची आणि आठवड्याभरात ४-६च खाऊन होईपर्यंत उरलेली खराब झाली म्हणून टाकून द्यायची, असं बरेचदा झालं...)

स्पंदना's picture

16 Aug 2010 - 7:47 am | स्पंदना

अग उसणीच काय झाल?
बाकि या ट्रॉलिज जर जिने चढायचे असतील तर कुच कामाच्या.
मी निम्म सामान जे खराब होणार नाही ते कार मध्येच ठेवते, दुसर्‍या दिवशी आणल तरी चालत.

उसण बरी आहे. नवरा कधी कामाला येणार? आय मीन नवर्‍यानी सेवा केली :)
बरोबर ट्रॉलीज जीन्यांवर कुचकामी.

पोतं (बारदान) का नाही वापरलतं ? (ऊगाच आपली शंका!)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2010 - 11:38 am | परिकथेतील राजकुमार

परवा इंटर्व्ह्यू झाला त्यात एच आर नी प्रश्न केला - "ह्म्म तर मिस .... तुम्ही गेल्या प्रकल्पात कोणत्या प्रोसेसमध्ये सुधारणा घडवून आणलीत? आणि त्या सुधारणेचे फायदे लोकांना कसे पटवून दिलेत?"

यावेळी कॉसकोमधून बाहेर पडल्या पडल्या मी १ मोठ्ठा खोका घेतला. त्यात सगळं सामान भरलं, हो हो अगदी नीट रचलं. तोवर नवरा बिल देऊन आला होता.

ह्याचा काही ताळमेळ लागला नाही.

सर्रास सगळ्यांना मिस म्हणतात हो इंटर्व्हु मधे .... तुमाला बी लई चवकशा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Aug 2010 - 12:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

परा, Ms आणि Miss मधला फरक तुला माहित नाही वाट्टं!

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2010 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार

सर्रास सगळ्यांना मिस म्हणतात हो इंटर्व्हु मधे .... तुमाला बी लई चवकशा.

आता आम्ही कधी गेलो नाही इंटर्व्हुला आणि कधी घेतला पण नाही :( त्यामुळे कोणाला काय म्हणतात आम्हाला कसे कळणार ? पण पुरुषांना कशाला मिस म्हणायचे म्हणे ?

आजकाच्या लेखकांना शंका म्हणुन विचारलेल्या आवडत नाहीत.. छे !!!

परा, Ms आणि Miss मधला फरक तुला माहित नाही वाट्टं!

मी काय 'पराबाप्पा' आहे का ??

१) खोक्यांचा वापर ही costco ची पद्धत आहे, तुम्हाला सुचलेली कल्पना नव्हे!

( बाकी सगळ्या दुकानांमधे कॅरीबॅग्स / पेपरबॅग्स देतात तर costco मधे खोकी देतात*. देतात म्हणजे तिकडे पडलेली असतात, आपल्याला हवी ती आपणच घ्यायची)

२) तुम्ही नियमित जिमला जाता असे एका जुन्या लेखात नमूद केले आहे. असे असताना केवळ पंधरवड्याच्या खरेदीच्या अर्ध्या वजनाने पाठीत उसण भरणे चिंताजनक आहे. बहुदा उचलण्याची पद्धत चुकली असेल किंवा तसे नसेल तर डॉक्टरला भेटा.

इंटरनेटस्नेही's picture

17 Aug 2010 - 2:53 pm | इंटरनेटस्नेही

शुचिताई..

चांगला लेख. तुमच्या मुलीचे अपार कौतुक वाटते! ;)

वेदनयन's picture

18 Aug 2010 - 2:01 am | वेदनयन

खोका ही कॉसकोची स्पेशालिटी आहे. आमचे चिरंजिव नुसते खोकी आणायला जातात. घरी येऊन मग "चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" चालु होते.

आम्ही तिकडे फुकटचे सँपल हादडायला दर विकांताला जातो. आमची बायडी मन लावुन किराणा घेते (आम्ही दुसरे सामान (नुसतेच) बघतो).

फुकटचे सल्ले (कॉसकोचे HQ आमच्या इथुन जवळच आहे म्हणुन) -
१. कॉसकोत अमेक्स (व्हिसा नायतर नाय) चालते; आणी रिबेटसुद्धा चांगला मिळवता येतो.
२. दुध कॉसकोत महाग पडते
३. भाज्यासुद्धा (पालक सोडुन) सहसा कॉसकोत घेऊ नये
४. अंडी, चिकन आणी मासे चांगले मिळतात. फक्त वेळेवर संपवण्याची तयारी हवी.
५. इकडच्या कॉसकोत अलीकडे देसी वस्तु मिळायला लागल्यात (नानक पनीर, रसमलाई,समोसे, चिकन टिक्का मसाला, सोना मसुरी तांदुळ). रोटी व बासमती आधीच मिळायचे.

आता परा पुन्हा वैतागणार अमेरिका-पुराणावर :)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Aug 2010 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार

आता परा पुन्हा वैतागणार अमेरिका-पुराणावर

=)) =))

आम्ही अमेरिकेवर वैतागत नाही हो ;) तसेही आख्खे जग त्यांच्यावर वैतागले तरी ते फाट्यावर मारुन मोकळे होतात.

आम्ही वैतागतो ते :- १) आमचे लै भारी अमेरीकन मित्र / मैत्रिण / शेजारी २) आमचे अमेरीकेतले लै भारी अनुभव असल्या टाईपच्या धाग्यांवर. मुळात हे सगळे जाणुन घ्यायला हरकत काहिच नाहीये, पण हे लिहिणारे काही काही लोक आपण आता कसे अमेरीकाळले आहोत, आमचे स्टँडर्ड कस हाय आहे आणि इथे सगळे कसे गुडी गुडी आहे ते दाखवायचा वृथा प्रयत्न करतात ना तेंव्हा मग उगीच डोक्यात जातात.

बाकी बर्‍याचदा जायचे आहे पण जाता येत नाही, म्हणुन गेलेल्यांच्या नावाने जे खडे फोडतात त्यांच्यातलेच आम्ही एक आहोत हे आमचे स्पष्ट मत आहे ;)

पर्‍याचा अमेरिकेवरील खरा राग त्याला झेंड्याची चड्डी घालायला मिळत नाही म्हणुन आहे.

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 8:56 pm | राजेश घासकडवी

पाठव की परासाठी एक चटेपटेरी अमेरिकन झेंड्याची चड्डी. हां, पण दोषमुक्त असेल तरच...

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Aug 2010 - 11:15 pm | बिपिन कार्यकर्ते

बाकी बर्‍याचदा जायचे आहे पण जाता येत नाही, म्हणुन गेलेल्यांच्या नावाने जे खडे फोडतात त्यांच्यातलेच आम्ही एक आहोत हे आमचे स्पष्ट मत आहे

पर्‍या मेल्या, एकदाच जायचे असते तर केले असते हो मी तुला स्पॉन्सर, पण तू बर्‍याचदा जायचे म्हणतोयस... ते नाही जमणार. त्यामुळे स्पॉन्सरशिप कॅन्सल.

शिल्पा ब's picture

18 Aug 2010 - 10:45 am | शिल्पा ब

कॉस्कोत किचन आणि बाथ टिशू, साबण, चिप्स, फ्रोझन पदार्थ, साखर, तांदूळ, सीरिअल, आणि बऱ्याच गृहुपयोगी वस्तू मिळतात त्या आणाव्या...बरेच पैसे वाचतात...अगदी पेरिशेबल वस्तू जर संपणार नसतील तर अजिबात आणू नयेत...वाया जातात...आपण खाऊन खाऊन कितीक खाणार...(अपवाद असतीलच).

अर्धवट's picture

18 Aug 2010 - 11:24 am | अर्धवट

परा कॉलींग परा..

आम्ही पूर्वी जायचो कॉस्कोत आता नविन टाउनमध्ये आल्यावर बीजेज् जवळ पडते म्हणून जाते.
एकदा खरच हिशोब घातला कि स्वस्त पडते काय? त्यांची कूपने घेउन जायला मी बरेचदा विसरायचे.
आजकाल लक्षात राहते. या दुकानांचे फायदे मिळण्यासाठी फ्यॅमिली साइझ मोठा (संख्येने) हवा. आमच्यासाठी ही मेंबरशीप असल्यानसल्याने फारसा फरक पडत नाही असा प्रकार आहे. एक फायदा आहे कि बर्‍याच गोष्टी ढिगाने आल्या कि ग्रोसरीत जाताना लिस्टमध्ये त्या नसतात व कमी पिशव्या भरून सामान आणता येते. एकदा मुलांची डायपरे सुटली कि या दुकानांमधला आयांचा इंटरेस्ट संपतो असे मलातरी वाटते. आम्ही शाकाहारी असल्याने भाज्याच एक दोनवेळा खूप आणल्या गेल्या आणि वाया गेल्या. आता नाही आणत. फळेही अतोनात मिळतात ती वाया जातात.
बीजे मधले अर्थ्स प्राईड कि अश्याच ब्रँड्चे दूध चांगले असते, कांदे, टोम्याटो, लसूण, पाण्याच्या बाटल्या (गाडीपुरत्या), कागदी सामान, साबण, काही क्रिमे, बटर्,साखर, भांडी व कपड्यांचे साबण एवढेच आणले जाते.

१. गॅस/पेट्रोल (गॅलनला सुमारे १०-१५ सें कमी. दुकानांची वार्षिक फी आम्ही २-३ महिन्यांतच भरून काढतो.)
२. कपडे आणि भांडी धुण्याचा डिशवॉशर साबण
३. बल्ब
४. टूथपेस्ट, टॉयलेट पेपर, बॉडी क्रिम, साबण
५. पेपर प्रॉडक्ट्स - कप, चमचे-काटे-सुर्‍या, डिश वगैरे
६. पाण्याच्या बाटल्या, केचप
७. कोल्डड्रिंक्सचे कॅन किंवा लहान बाटल्या

आणि इतर अशाच वस्तू ज्या आपण घरात साठवून ठेवू शकतो.

पाहुणे येणार असतील किंवा पार्टी असेल तर -

भाज्या, फळे, कांदे-बटाटे, फ्रोझन फूड वगैरे.

सॅम्स किंवा कॉस्कोमधून आणलेली कोणतीही गोष्ट वाया गेल्याचे मला आठवत नाही. असो.

रेवती's picture

18 Aug 2010 - 11:20 pm | रेवती

अरे हाँ!
गाडीचे पेट्रोल विसरलेच!
ते ५ सेंटने तरी कमी असते.
मी दोनदाच तिथे भरले आहे कारण तिकडे जायला १० मिनिटे ड्राइव्ह करावे लागते.

चित्रा's picture

19 Aug 2010 - 12:48 am | चित्रा

असेच म्हणते.

बरीच वर्षे आमच्याकडे एवढे सामान ठेवायला जागाच (फ्रीज, स्टोरेज) नव्हती, त्यात कॉस्को आणि बीजेज सारखी दुकाने लांब असल्यामुळे ड्राईव करून तिथे जायचे, आणि एवढे मोठे बॉक्स, मोठाल्या बाटल्या असे सगळे सामान घरी आणून कोठे ठेवायचे हा मोठाच प्रश्न असल्याने विशेष कधी गेलो नाही. आता कधीतरी चक्कर टाकेन, पण बहुदा कायम सामान आणेनच असे नाही.

बाकी शुचि, लेख छान आहे. प्रोसेस सुधारता मात्र येईल. :)

पिवळा डांबिस's picture

18 Aug 2010 - 11:31 pm | पिवळा डांबिस

आणि एक गोष्ट राहिली....
शिवास रीगल!!!!!
$२४ ला १ लिटरची बाटली (आमच्या इथल्या कॉस्कोत!!)

कॉस्कोवालेका जबाब नही!!!
:)

प्रभो's picture

19 Aug 2010 - 12:06 am | प्रभो

लिटर का ७५० मिली????

प्रियाली's picture

19 Aug 2010 - 12:04 am | प्रियाली

ते शिवासरिगल आमच्या घरी फारसे आचमन/ प्राशन केले जात नसल्याने यादीत नाही पण वाईन असते त्यामुळे मद्याची जोडणी करू पण लिटरमध्ये??

मिसळभोक्ता's picture

19 Aug 2010 - 12:05 am | मिसळभोक्ता

२४ डोलर = १ लिटर !

१८ डोलर = ६५० मिली !

३६ डोलर = १.८ लिटर !

शेवटचा पर्याय निवडावा.

सुनील's picture

19 Aug 2010 - 12:22 am | सुनील

वायनींनी ५-५ लिटरांची खोकी मिळतात तशी शिवास रिगलची का मिळत नाहीत? कुठे मिळतील?

स्कॉटलंडात, हे उत्तर अपेक्षित नाही!

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2010 - 12:57 am | मुक्तसुनीत

अहो मग पाच बाटल्या घ्या की ! ;-)

"मीट द पेरेंट्स" मधला तो ग्रोसरी स्टोअर मधला ड्वायलाक आठवला :

Greg : Thank you. Yes, okay. And what's your most expensive bottle of champagne?
Grocery Clerk : Mumm's. It's on sale for Fifteen bucks. .
Greg : Really? That's it? You don't have, like, a nice, like, or bottle of champagne?
Grocery Clerk : You can get a whole bunch of Mumm's.

पिवळा डांबिस's picture

19 Aug 2010 - 2:51 am | पिवळा डांबिस

@ प्रभो: लिटर का ७५० मिली
लीटर!! ७५० मिली $१९ला मिळते...
@ प्रियाली: वाईन असते त्यामुळे मद्याची जोडणी करू
होऊन जाऊ दे!!:)
@ प्रियाली: पण लिटरमध्ये?
वो क्या है की वो शिवास रिगल स्कॉटिश सायबका होनेके वास्ते "मिली"मेंच मिली| समझा करो ना "ली"!!!:)
@ मिभोकाका: $३६ = १.८ लीटर
अबबबब!! गरिबाला परवडत नाय हो इतकी एकदम घ्यायला ( आणि प्यायला!!!):)
@ मुसु: अहो मग पाच बाटल्या घ्या की एकदम!!
तुमी पिनार्‍यातले नाय वाटतं!!!:)
काय मुसुकाका तुम्ही!! कमाल करता!! अहो, पाच बाटल्या एकदम घ्यायला ते काय कैलास-जीवन आहे?:)
कोणत्याही साईझच्या असोत, बाटल्या फक्त दोनच घ्याव्या....
एक उत्तरसंध्येला सुमारे आठ वाजता मित्र-मंडळी पार्टीसाठी जमली की उघडायला....
आणि दुसरी मध्यरात्रीच्या सुमाराला लागते तेंव्हा.....
इतक्या रात्री कॉस्को बंद असतं म्हणून!!!
नॉट गुड टू ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह, यु नो!!!
:)

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2010 - 3:05 am | मुक्तसुनीत

संध्येचा विषय निघाल्यावर , एखाद्या दशग्रंथी पुरोहिताला साग्रसंगीत विधीची, त्याबद्दलच्या साधकबाधक आणि उद्बोधक चर्चेची खुमखुमी दवडता येणें प्रायः अशक्य आहे ! :-)

पिवळा डांबिस's picture

19 Aug 2010 - 3:12 am | पिवळा डांबिस

मग म्हणा तर,
"मम, आत्मना शृतीस्मृती..."
:)

मिसळभोक्ता's picture

19 Aug 2010 - 5:26 am | मिसळभोक्ता

अबबबब!! गरिबाला परवडत नाय हो इतकी एकदम घ्यायला ( आणि प्यायला!!!)

हॅ हॅ हॅ....

हिरवे डोळे
हिरवे खिसे
हिरवे गवत
हिरवेच दिसे

आणि गरीब ?

असो. प्यायला परवडत नसेल, तर दक्षिणेतल्या फक्त २-३ जणांचा कट्टा न करता, चांगला उत्तर-दक्षिण मिळून १०-१२ लोकांचा करावा.

सहज's picture

19 Aug 2010 - 5:47 am | सहज

>अबबबब!! गरिबाला परवडत नाय हो इतकी एकदम घ्यायला ( आणि प्यायला!!!)

अहो पिडाकाका यांच्या म्हणण्याचा अर्थ हा की १.८ लिटरची बाटली घेउन बसायला, त्यांचा कोणी मित्र पोटर्‍या खाजवत नाही की एकच विषय घेउन पहाटे साडे पाच पर्यंत (पिडांच्या भाषेत येड्*व्या) चर्चा कोणी करत नाही.

परत खातापिताना समोर आहे ते संपवा, अर्धवट टाकू नका हे अस्सल मराठी संस्कार पाळायचे. मग १.८ लिटर पेक्षा १ लिटरच परवडते.

नंदन's picture

19 Aug 2010 - 6:45 am | नंदन

कोणत्याही साईझच्या असोत, बाटल्या फक्त दोनच घ्याव्या....
एक उत्तरसंध्येला सुमारे आठ वाजता मित्र-मंडळी पार्टीसाठी जमली की उघडायला....
आणि दुसरी मध्यरात्रीच्या सुमाराला लागते तेंव्हा.....
इतक्या रात्री कॉस्को बंद असतं म्हणून!!!

--- +१. तीच गोष्ट पोर्टची :)

मी-सौरभ's picture

19 Aug 2010 - 12:54 am | मी-सौरभ

कॉस्को
कॉस्को
कॉस्को
कॉस्को
कॉस्को
कॉस्को

जय कॉस्को
कॉस्को महान
कॉस्को झिंदाबाद...

चित्रा's picture

19 Aug 2010 - 12:56 am | चित्रा

अगदी - सगळीकडे झाले नाव कॉस्को, बीजेज चे! :)

शिल्पा ब's picture

19 Aug 2010 - 3:10 am | शिल्पा ब

हि बीजे काय भानगड आहे कोणी सांगेल का? ;)

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2010 - 3:23 am | मुक्तसुनीत
मिसळभोक्ता's picture

19 Aug 2010 - 5:22 am | मिसळभोक्ता

आम्हाला काहीतरी "वेगळेच" वाटले. अर्थात, तेही एक प्रकारचे होलसेलच आहे म्हणा.

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2010 - 5:32 am | मुक्तसुनीत

होलसेल नाही म्हणता येणार तुमच्या "वेगळे वाटण्याला". त्याच्या विरुद्धचेच वाटेल.

बीजेज = ईस्ट कोस्ट वरचे कॉस्को कींवा सेफवे सारखे किराणागार (किराणा सामानाचे आगार ;) ) मी ईस्ट कोस्ट ला असताना भारतात जाताना न्यायची चॉकलेट्स बीजे मधून न्यायचो.
(क्ष-रालेकर)बेसनलाडू
आपल्याकडेही आहे बीजेज, पण ती ब्रुअरी आहे. कुपर्टिनोत (डीअ‍ॅन्जा बुलवा). लई भारी जागा. खायलाप्यायला, टवाळक्या, मौजमजा .. शुक्रवार-शनिवार संध्याकाळ भारी असते ;)
(खुशालचेंडू)बेसनलाडू

मिसळभोक्ता's picture

19 Aug 2010 - 5:21 am | मिसळभोक्ता

ण ती ब्रुअरी आहे. कुपर्टिनोत (डीअ‍ॅन्जा बुलवा). लई भारी जागा. खायलाप्यायला, टवाळक्या,

ती ब्रुअरी नाही, बार आहे. त्यात अ‍ॅपलची जन्ता पडीक असते. २००० ते २००३ बीजेज मध्ये शुकशुकाट असायचा. आयपॉड चमकला, आणि बीजेज सुधारलं !

ब्रुअरी हवी असेल तर सॅन होजे डाउनटाऊन मधल्या गॉर्डन बीयर्शला पर्याय नाही.

विंजिनेर's picture

19 Aug 2010 - 8:21 am | विंजिनेर

असंच काय नाय.
डाउन टाऊन माउंटन व्ह्यु च्या व्हिया स्ट्रीट वरची टाईड हाऊस मायक्रो ब्रुअरी पण छान आहे. त्यातल्या त्यात ह्या उन्हाळ्याच्या दिवसात त्यांची डार्क किंवा अंबर बियर घश्याकडे बरी लागते. ताजा माल ! :)