interview ला जाणार आहे,सल्ले हवेत.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
15 Aug 2010 - 11:05 am

नमस्कार्,नमस्कार.......

आताच वहीदाच्या एका खरडीला उत्तर देताना,मी लिहले.......

अरे मी उद्या एका MNC मधे interview ला जाणार आहे.
ते personal की काय ते प्रश्न,कोणते अपेक्षित आहेत व काय उत्तरं द्यायची जरा थोडक्यात सांगशिल का?
मला ह्यावर एक लेख लिहायचा आहे.ईथे professional लोकं फार आहेत,मदत होईल.
(जॉब मलाच मिळणार आहे)

पण ती गैरहजर आहे,मला जलद व योग्य प्रतिसाद हवेत.
आता जास्त काही बोलत नाही.होउ द्या सुरु!!

आणि हो,सर्वांना आज जो आहे त्या दीनाच्या शुभेच्छा!

धोरणविचार

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

15 Aug 2010 - 11:14 am | अप्पा जोगळेकर

टेक्निकल राउअंड क्रॅक केली असशील तर जनरल प्रश्न विचारतील. व्हेअर डू यु सी युवरसेल्फ आफ्टर फाईव्ह इयर्स ? ( मी एकदा या प्रश्नाला 'इन सम अदर बेटर कंपनी' असे उत्तर दिले होते. अर्थात त्या जॉबची गरज नसेल तरच असा माज करावा.) किंवा व्हाय यू वॉन्ट टू लीव्ह युवर करन्ट जॉब ? व्हाय यु वॉन्ट टू जॉईन धिस कम्पनी असले फालतू प्रश्न विचारतात. दुसर्‍याला त्रास देणं हे एकच काम एचआर चे लोक करु शकतात. या असल्या प्रश्नांची तयारी करु नये. ऐनवेळेला जे सुचेल ते उत्तर द्यावे असे माझे मत आहे.

- एका भंपक एमएनसीचा एम्प्लॉयी

शानबा५१२'s picture

15 Aug 2010 - 11:29 am | शानबा५१२

मी दुस-या window मधे
/THIN LAYER C.
/Liquid C.
/Ion C.
/Mass Spectroscopy

/GC MS
/HPLC
/UHPLC

/WORKING/PRINCIPLE
/COLUMN/DETAILS FOR VARIOUS C. SYSTEMS

ह्याची तयारी करत आहे,म्हणुन बोललो ईतर बाबतीत ईथे काहीतरी सल्ले मिळतील,पण नाही,ह्या लोकांना,मी करतो तशी,ईतरांना मदत करायची सवयच नाही!

ह्याची तयारी करत आहे,म्हणुन बोललो ईतर बाबतीत ईथे काहीतरी सल्ले मिळतील,पण नाही,ह्या लोकांना,मी करतो तशी,ईतरांना मदत करायची सवयच नाही!

इथे कोणी रसायनशास्त्राचाचा तज्ञ नसेल अशी प्राथमिक शक्यता तुम्ही विचारात घेतलेली दिसत नाही.
घाईने निष्कर्ष काढून मोकळे झालात.

शानबा५१२'s picture

15 Aug 2010 - 12:07 pm | शानबा५१२

सरजी,मला रसायनशास्त्राचे प्रश्न विचारयची पाळी आता तरी येत नाही.
मला 'कोणते personal प्रश्न विचारले जातील्,अपेक्षित उत्तर काय असावे' हे विचारायचे आहे.
जस पगाराबद्दल विचारल तर् नक्की काय बोलयचं वगैरे.............नेटवर फार रद्दड उत्तरे दीली आहेत.

Pain's picture

15 Aug 2010 - 12:39 pm | Pain

मी दुस-या window मधे
/THIN LAYER C.
/Liquid C.
/Ion C.
/Mass Spectroscopy

/GC MS
/HPLC
/UHPLC

/WORKING/PRINCIPLE
/COLUMN/DETAILS FOR VARIOUS C. SYSTEMS

ह्याची तयारी करत आहे,म्हणुन बोललो

यामुळे गैरसमज होतो.

पर्सनल इंटरव्हूवर इंटरनेटवर पुष्कळ माहिती उपलब्ध आहे.

मला तर वाटतं आपण सारे भारतीयच दीन आहोत.

(दीन दीन) भीडस्त.

चावटमेला's picture

15 Aug 2010 - 1:09 pm | चावटमेला

माझ्या मते पर्सनल interview हाच मूळात एक भंपक प्रकार आहे. HR लोक वर सांगितल्याप्रमाणे काही फालतू प्रश्न विचारतात आणि बोअर करत बसतात. ह्या interview चा मुख्य आणि एकमात्र उद्देश हा तुम्हाला कमीत कमी पगार ऑफर करुन पटविणे असते. बाकीच्या प्रश्नांची काही एक तयारी करायची आवश्यकता नाही. मी तर म्हणेन जशी सुचतील तशी उत्तरे द्या, नंतर त्या HR ला त्या interview मधील तुम्ही सांगितलेल्या पगाराच्या अपेक्षित आकड्याशिवाय एक शब्दही लक्षात राहणार नाही.

पगाराचा आकडा तुमच्या अपेक्षेपेक्षा अंमळ जास्तच सांगा म्हणजे व्यवस्थित negotiate करता येईल.
तुम्हाला job ची कितीही गरज असली तरी आपल्याला मुळीच गरज नाही असे भासवावे (नाहीतर HR लोक exploit करायला तयारच असतात)

interview साठी हार्दिक शुभेच्छा, job मिळाल्यानंतर पार्टी द्यायला विसरु नका राव :)

(१५ interviews चा अनुभव पाठीशी असलेला) चावटमेला

बेंगलोर एन्फोसिस मधील एचाअर मॅनेजर ने आपल्या बायकोचा सुपारी देऊन खुन घडवुन आणला. interview घेताना मानसिक संतुलन किती वाईट होते ह्याचे हे एक उदाहरण. तेव्हा interview देताना संभाळुन जा बाबा. आमच्या शुभेच्छा तुला.

सुहास..'s picture

15 Aug 2010 - 5:15 pm | सुहास..

मी बरेच दिवसात असा ईन्टर-व्ह्यु(मास्तरांची आठवण झाली.) दिला नाही , आमचे सहसा टेलिफोनिकच होतात, पहिले एच.आर, मग ईन्टरनल लिड.क्लाईंट आनी सरतेशेवटी एच-आर स्क्रिनींग, आणी फायनल म्हणजे पगार ठरविण्यासाठी ...आजकाल 'व्हिडीयो रेझ्युमे'ची सोय झाल्याने थोबाडाचे आधीच दर्शन होते. असो ...

काही टिप्स
१) शक्यतो जास्त स्टायलिश कपडे घालु नयेत. (मेन्स कॅरी कॉन्फिडन्स नॉट द क्लोथ्स ..जॉन अब्राहमच ऊदाहरण घ्या ..तो केवळ ,दोनच कलर,ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट, घालुन देखील,ईम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी कमी पडु देत नाही..बाकी ज्याची त्याची आवड !! )
२)पॅनल (एका पेक्षा जास्त लोक्स ) असेल तर, सर्वांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी.पॅनल मुद्दामुन कन्फुज करण्यासाठी असतो..एकाच्या प्रश्नाचे ऊत्तर संपविण्याआधीच दुसरा प्रश्न विचारतो अश्या वेळेस,दुसर्‍याला आदराने विनंती करावी की मला पहिल्या प्रश्नाचे ऊत्तर देऊ द्यात, मग ऊत्तर संपले की दुसर्‍याकडे वळावे , प्रश्न लक्षात असेल तर ठीक ,नसेल तर पुन्हा विचारून घ्यावे ...

हॅप्पी ईन्टरव्ह्यु !!
बेस्ट ऑफ लक !!

अवांतर : गुगलवर अश्या बाबतीत भरपुर मटेरियल असताना, ईथे धागा टाकण्याची गरज नव्हती ..बट व्हाटेव्हर

शानबा५१२'s picture

15 Aug 2010 - 6:28 pm | शानबा५१२

हो ह्या आधीच्या नोकरीसाठी जो ई. दीला त्यापुर्वी तेच नेटवरचे लेख वाचले होते.वाचण्याअधी बरा होतो,वाचल्यानंतर चेहरा कोमजुन गेला,कारण 'पगार' ह्या विषयावर दोन परस्परविरोधी लेख लिहले होते
मी कमी वेळ असल्याने जास्त शोध घेत बसलो नव्हतो.आणी तसाच भांबावल्यासारखा चेहरा घेउन ई. ला गेलो.

अधिक माहीती : त्या नोकरीला आम्ही एका महीन्यात फुटबॉल बनवल.

हाहाहाहा.. इंटरव्ह्यूला उत्तर कसे देऊ नये.. एक किस्सा..

कोणे एके काळी एक मुलगी एच डी एफ सी नामक बँकेत इंटरव्ह्युसाठी गेली.. तीन जण होते.. मुलाखत उत्तम चालली होती.. आपली नोकरी इथे पक्की आहे हे तिच्यासारख्या नवख्या मुलीलाही जाणवलं...

शेवटी एच आर वाल्याने विचारलं... तुला दोन वर्षांनी आमच्यापेक्षा मोठ्या बँकेने मोठ्या पगाराची नोकरी दिली तर तू काय करशील?

ती म्हणाली.. तुला पुढच्या महिन्यात chase manhattan बँकेने ऑफर दिली तर तू काय करशील.. आणि अचानक कॅबीन मध्ये ओक्वर्ड शांतता पसरली.. पुढच्याच क्षणी तिला, आपल्याला ही नोकरी मिळणार नसल्याचंही कळून चुकलं... आणि झालंही तसंच....

तर तात्पर्य हे की इंटरव्ह्यूला पर्सनल प्रश्नांची खरी उत्तरं जरूर द्यावीत; पण त्यांना आवडतील अशा भाषेत! :)

मिसळभोक्ता's picture

18 Aug 2010 - 3:50 am | मिसळभोक्ता

मला कुणी असे उत्तर दिले असते, तर मी तिला नक्कीच हायर केले असते. परफेक्ट !

सहज's picture

18 Aug 2010 - 7:17 am | सहज

खरे आहे. काही चुकले नव्हते त्या प्रतीप्रश्नात.

संभाव्य उत्तरे

१) जॉब सोडण्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट मधे काय लिहले आहे? त्या अटींचे पालन करीन.
२) दोन वर्षांनी मला मोठी बँक जॉब ऑफर करेल हा विश्वास माझ्यावर दाखवल्याबद्दल धन्यवाद. माझा एक प्रश्न हा आहे की चांगली संधी मिळेल तर मी जाउ नये म्हणून / टॅलेंट रिटेन करण्याकरता एच आरची नक्की काय पॉलिसी आहे? :-)

समांतर अवांतर - अ‍ॅरेंज्ड मॅरेजमधे, सुरवातीला मुले - मुली (त्यांचे पालक) एकमेकांना भेटून प्रश्न विचारतात त्यात असे प्रश्न व अशीच सडेतोड उत्तरे यांची देवाण घेवाण झाली पाहीजे. अश्या प्रश्नोत्तरांचा एक धागा निघाला पाहीजे. ज्यांचे अ‍ॅरेंज्ड मॅरेज झाले आहे / हे अश्या 'कांदेपोहे कार्यक्रमात' सहभागी झाले आहेत, कृपया त्यांनी अनुभव / अफलातुन विचारलेले प्रश्न लिहा. आपण त्याला मस्त उत्तरे शोधु. भावी पिढीला उपयुक्त दस्ताऐवज बनवुया. :-)

अर्धवट's picture

18 Aug 2010 - 8:08 am | अर्धवट

अबे असल्या बेभरवशाच्या डॉक्युमेंटेशनमधे वेळ घालवण्यापेक्षा अ‍ॅरेंज मॅरेज कसं करावंच लागणार नाही याच्या प्रयत्नात वेळ घालवा की रे..

नगरीनिरंजन's picture

18 Aug 2010 - 8:29 am | नगरीनिरंजन

आपल्या प्रतिसादात अ‍ॅरेंज हा शब्द अनावश्यक असल्याचा बहुतेक विवाहेच्चुक (सहजरावांकडून साभार उधार) लोकांचा दावा असण्याची शक्यता आहे.

सहज's picture

18 Aug 2010 - 8:38 am | सहज

अर्धवटराव - तुम्ही फिरोज खान, श्रीदेवी काय म्हणाले ऐकले नाही का हो?

शानबा५१२'s picture

15 Aug 2010 - 6:30 pm | शानबा५१२

नोकरी इथे पक्की आहे हे तिच्यासारख्या नवख्या मुलीलाही जाणवलं...

उद्या लयजनांचे राउंड होणार आहेत्,पण जिकनार आम्हीच!

पाषाणभेद's picture

15 Aug 2010 - 7:28 pm | पाषाणभेद

इंटरव्ह्यू घेणे हे ही एक शास्त्र आहे हे आताशा कधीच समजले जात नाही. रिझ्युमीत नसलेल्या टॉपीकवर हमखास प्रश्न विचारतात. बाकी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. यश मिळो अन नोकरी लागो.

शानबा interview ला जाण्यापूर्वी खरडवही बघ ... :-)
I just wish की एकदा तरी ती खव उघडून बघ ...
मी तुझ्या interview साठी तिथे बरेच काही खरडले आहे
All the best !!
~ वाहीदा

शानबा५१२'s picture

15 Aug 2010 - 9:53 pm | शानबा५१२

माहीती होत तु लिहशील म्हणुन पण आजच प्रतिसाद दीलास ते बरं झाल.

थॅन्क्स वहीदा!

प्रियाली's picture

18 Aug 2010 - 5:02 am | प्रियाली

हे व्हेअर डू यू सी युवरसेल्फ आफ्टर फाईव इयर्सचं गणित कसं केलं जातं? म्हणजे पाचच का? सर्व एचआरवाले हटकून पाचचाच आकडा का घेतात? पाच वर्षांआधी मनुष्य झटपट वर (वर म्हणजे वरच्या हुद्यावर.. स्वर्गवासी हा वरचा हुद्दा मानू नये) जाऊ शकत नाही याची खात्री त्यांना का वाटते? काहीजण व्हेअर डू यू सी युवरसेल्फ इन फाईव इयर्स असे विचारतात. त्यांच्या मनात नेमके कोणते गणित केलेले असते?

माझ्या मनात अशा प्रश्नांना वाईटसाईट उत्तरे देण्याचे खूप मनात येते.

१. आय डोन्ट लाइक गेसिंग गेम्स
२. आय विल बी राईट हियर आफ्टर फाईव्ह इयर्स; व्हॉट अबाऊट यू अँड धिस ऑर्गनायझेशन?
३. राईट हिअर! सेलेब्रेटींग द फिफ्थ अ‍ॅनिवर्सरी ऑफ यू आस्किंग मी धिस स्टुपिड क्वेश्चन