आई - माझं जग

चिंगुसविकॄतजोशी's picture
चिंगुसविकॄतजोशी in जे न देखे रवी...
14 Aug 2010 - 2:24 am

तुझ्या प्रेमळ स्पर्शाने
सारा आसमंत कवेत येतो.
आई, तुझ्या रागावण्याने
जणु देवचं माझ्यावर रुसतो.

तुझ्या कौतुकाच्या शाबासकीने
आनंदाला पारावर उरत नाही.
आई, तू उमेद दिल्यावर
अशक्य असं काहीचं राहतं नाही.

आई, तुझ्या कुशीत,
मला मायेची ऊब मिळते.
तू खेळ्वू लागल्यावर
संध्याकाळही हसून बघते.

तू गोष्ट सांगताना
तारेही गोष्ट ऐकायला येतात.
आई, तुझ्यासोबत असताना
भीतीचे 'राक्षस'ही मला घाबरतात.

तुझा प्रसन्न चेहरा बघुनचं
माझ्या दिवसाचा सूर्य उगवतो.
आई, तू नाराज असल्यावर
वाराही घोंगावण्यास घाबरतो.

मला महागडी खेळणी नको,
भरजरी कपडे नको.
हवा फक्त तुझा सहवास,
तू भरवलेला गरम भाताचा घास.

माझं जगं तुझ्यापासुन सुरु होतं,
अन् तुझ्यावरचं संपतं
तुझ्या उपकाराची फेड करतांना
सात जन्माचं जीवनही अपुरं पडतं.

शांतरसकविता

प्रतिक्रिया

अनुप बंगाली's picture

17 Aug 2010 - 10:27 am | अनुप बंगाली

खरच डोळ्यात पाणी आले , अप्रतिम झालिय कविता.

खुप सुन्दर

अनुप बंगाली's picture

17 Aug 2010 - 10:31 am | अनुप बंगाली

तुम्हि वडिलांना का विसरता ?????

त्यावर एखादि कविता जरुर करा....

चिंगुसविकॄतजोशी's picture

23 Aug 2010 - 12:55 pm | चिंगुसविकॄतजोशी

आपल्या 'वडील' विनंतीस मान देऊन मी 'बाप' ही कविता लिहली आहे मिपावर.
कशी वाटली ते कळवायला विसरू नका बर का!!!!
आणि आपले सल्ले स्वागतार्ह आहे. तेव्हा निसंकोचपणे सांगा.