बलिदान ----भग १ ---जयनीत दिक्षित

जयनीत's picture
जयनीत in जनातलं, मनातलं
13 Aug 2010 - 4:34 pm

७-८ सैनीक शिस्तीत रान्गेत उभे,मराठा सैनिकान्चा पेहराव,
एक दारवान विन्गेतुन आत येतो.
दारवान्-आलेत मालक आलेत.
सर्व सैनीक ताठ उभे राहतात.
(एक माणुस -माणिकराव-वय ४० च्या जवळ्पास आत येतो,सोबत एक म्हातारा सैनीक-सम्भा- .माणिकराव सर्वानकडे एकवार बघतात.)
माणिकराव- बसा बाहेर आरामात जरावेळ्,सम्भाजी राव तुम्हाला बकी सर्व समजउन सान्ग्तीलच.मीही येतोच अन बोलतो मग तुमच्याशी.(एका सैनीका कडे बघुन)अरे ह्या वेळी तु ही आलास तर बर झाल.या आता.सर्व सैनीक रान्गेत बाहेर जातात.
(स्टेज वर आन्धार.)

(स्टेजवर प्रकाश.)
माणिकराव गादी वर बसलेत काडी ने दात कोरताहेत ,बाजुला म्हातारा नोकर सम्भा उभा.
माणिकराव- सम्भाजी बाहेर भर्ती साठी जी पोर बसलीत त्यात रायभान नावाचा पोरगा आहे जरा त्याला आत पाठ्वा बर.
(सम्भा जातो परत येतो सोबत मागच्याच द्रुश्यातला तरुण मुलगा सम्भाजी त्यालाआत सोडतो अन परत जातो.)
माणिकराव - ये,रायभान ये,कसा आहेस.
रायभान्-सर्व मजेत आहे मामा.
माणिकरा॑व्-अन घरी कस काय आहे.
रायभान्-सर्व काही ठीक.
माणिकराव्-अन आमच्या ताइ बाइ काय म्हणतात?
रायभान -चान्गली आहे मामा.
माणिकराव्-मी कधी पासुन म्हणतोय तीला कि पाठव तुझ्या पोराला माझ्या कडे,माझ्या हाता खाली राहील तर भलच करील मी त्याच,पण आइ ती आइच ती सुखा सुखी थोडीच पाठवायची पोराला मोहीमे वर.
रायभान -हो मामा, ती तर तयारच नव्हती ती खुप रडली ,भान्ड्ली पण ह्या वेळी मी काहीच ऐकल नाही ती च.
माणिकराव -हो रे बेटा कळतय मला सर्व माझी ही आइ आशीच होती.पण मी ही घरुन नीघुन आलो,अन झालो भर्ती सान्ग काय वाइट झालय माझ?अरे माणस काय फक्त लढाइत मरतात्,मझ्या मागे किती तरी माणस अशीच रोगराइत गेलीत फुका फुकी आज ना उद्या सगळे मरणारच पण लढाइतल्या मरणाला शा॑न असते, मराठ्याची. ong>

नाट्य