मी , ती आणी चटणी-भाकरी

अविनाश पालकर's picture
अविनाश पालकर in जनातलं, मनातलं
13 Aug 2010 - 3:03 pm

माझ्या दुमजली ऑफिसच्या गच्चीवरुन आमचा ग्रुप खाली पाहत होता .
शेजारच्या कंपांउंड मध्ये काहीतरी बांधकाम चालु होते.त्यातील मजुर जेवन करत होते.
चटनी, बाजरीची भाकरी व बरेच मराठ मोळे पदार्थ असावेत.तत्पुवी आमचेही प्रत्येकी पन्नास रुपये देउन कंपनीच्या केफेटेरीयामध्ये जेवन झाले होते , ज्यामध्ये फक्त मिठालाच अशी चव होती जीला आपण ठळक विशेषण देउ शकू.
मेसच्या जेवनाला वैतागलेली ग्रूपमधील एक मुलगी मजूरांकडे पाहत म्हणाली ,

" काय मज्जा ए कि नई या लोकांची , चट्नी , भाकरी , किती मजा येत असेल रोज रोज चट्नी , भाकरी खायला ! "
आम्ही ऐकत होतो .मुलगी शिव्या जरी देत असली तरी आम्ही ऐकतोच!! आता तर ती किरकोळ काहीतरी बोलत होती.
"मला तर बाई वैताग आलाय चपाती , पनीर , गुलाबजाम खाऊन !!"

मुलगी जवळपास सेरियसली बोलायला लागली होती.

मुलगी अशी विनाकारण सेरियस झाली की खुप मजा वाट्ते.

आपल्याबद्द्ल असेल (सेरियस!) तर विचारायलाच नको.

"या आयटी चाच वैताग आलाय , त्या मजुरांची बघा किती मजा !!"

आणखी एकदोघाने हो ला हो दिला.

माणसाने व्हावे तर मजुर नाही तर काहीच नाही असे काही त्यांनी बोलायच्या अगोदर मी त्यांना दिवास्वप्नातुन जागं केलं ,
" कसली मजा?" , इतक्या वेळ रामायण ऐकून रामाची सिता कोण या पेक्शा क्शूद्र प्रश्न मी केला.

" अरे कसली मजा काय म्हणतो चट्नी , भाजी , भाकरी आणि तेही रोज !!! " - ती मुलगी.

" मग आणखी काय खाणार ते?" - आता मी थोडा सेरियस झालो.

" ......अंअं ...अंअं " , मुलगी गोंधळली(हीहीही!!!!), माझ्यामुळे!!!.

" पनीर, चपाती , जामुन? अगं आयटीत नाहीत ते , चट्नी , भाजी , भाकरी च्या वर काही परवडत नसतं त्यांना ! आणी तुम्ही पार आयटी पीपल पेक्शा मजूरांची मजा असं कसं म्हणता , मजा नसली येत तरी तेच खावे लागते उलट चट्नी भाकरी खाताना ते जे खाण्याची स्व्प्न पाहतात ते आपण रोज खातो आणि आपण मिष्टान्न खाताना आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. इतकेच नव्हे तर त्यांचे जगणे आपल्यापे़क्शा मजेचे वाटते रादर आपण ठरवुन तसे जगु शकतो पण ते पराकष्ठा करुणही आपल्या सारखे जगू शकत नाहीत. आप्ल्याला त्यांचा हेवा वाट्णे हा तर पांढरपेशीपणा झाला!" , मी अक्कल पाजळली .

तोपर्यन्त लंच ब्रेक संपला . मी बोललेले गम्मत म्हनुन सोडुन सगळे डेस्कवर गेले.
यांच्या मेंदुपर्यंत जाईल असे मेनेजरच बोलू शकतो , मी बोलणारा कोण ?????

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

13 Aug 2010 - 4:58 pm | गांधीवादी

>> यांच्या मेंदुपर्यंत जाईल असे मेनेजरच बोलू शकतो , मी बोलणारा कोण ?????
मला पण कोणीतरी मेनेजर करा हो. एकेकाच्या मेंदूत घुसूनच बोलतो मग.

बाकी लेख एकदम खुसखुशीत.

वेताळ's picture

13 Aug 2010 - 8:22 pm | वेताळ

वेळ मिळाला तर चटणी भाकरीची पाकृ टाका,अगदी फोटो सकट.