(नाचत नाचत येई परा)

अवलिया's picture
अवलिया in जे न देखे रवी...
12 Aug 2010 - 2:42 pm

नाचत नाचत येई परा
आला फुफाटा निराशा विसरा ||धृ||

सँडल वाजता टकटक टकटक
झोत ब्याटरीचे पहाती सरसून
स्टुल देई दाखवत कोपरा
नाचत नाचत येई परा ||१||

क्याफे अवघा स्वर्ग होईल
स्वप्न कालचे सत्य होईल
आनंदूनी घेई हलकेच वारा
नाचत नाचत येई परा ||२||

लयीत पावले तिची पाहुनी
हळुच बघे मान वाकउनी
सुर हलका धरुनी हाकारा
नाचत नाचत येई परा ||३||

भयानकमौजमजा

प्रतिक्रिया

दिपक's picture

12 Aug 2010 - 2:48 pm | दिपक

;-)

पाषाणभेद's picture

12 Aug 2010 - 2:55 pm | पाषाणभेद

:-)

नाव वाचून मृत्युंजयबद्दल काही असेल असे वाटले.