ग्रंथस्नेह : मराठी पुस्तकांचे घरपोच पुस्तकसेवा देणारे वाचनालय

सुप्रिया म्हात्रे's picture
सुप्रिया म्हात्रे in जनातलं, मनातलं
11 Aug 2010 - 5:00 pm

ग्रंथस्नेह वाचनालय

ग्रंथस्नेह हे सीएसटी ते डोंबिवली(पूर्व विभाग), सीएसटी ते बेलापूर(हार्बर विभाग), चर्चगेट ते बोरीवली(पश्चिम विभाग) ह्यांदरम्यान कोणत्याही पत्त्यावर कार्यालयात किंवा घरी अशी घरपोच पुस्तकसेवा देणारे वाचनालय आहे.

वाचनालयाचा पत्ता- एफ-५-१, स. गो. बर्वेनगर, मुक्ताबाई रुग्णालयाजवळ, घाटकोपर (पश्चिम) , मुंबई ४०००८४ असा आहे.

वाचनालयात दूरध्वनी ९८६९०२४०६१ किंवा इ-मेलद्वारे granthasneh@gmail.com पुस्तक नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. येथे सर्वप्रकारच्या वयोगटासाठी पुस्तके उपलब्ध आहेत. घरी किंवा ऑफिसमध्ये थोडक्यात वाचक सांगतील त्या पत्यावर त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून देण्याची व्यवस्था येथे केली जाते. महिन्याला ६ पुस्तके म्हणजेच दर १० दिवसांनी २ पुस्तके बदलण्याची सुविधा आहे. वाचनालयाची मासिक वर्गणी रुपये १२५ आहे आणि अनामत रक्कम रुपये ५०० आहे (वाचनालय बंद केल्यास सर्व रक्कम परत दिली जाईल). पुस्तके कुरियरने पाठविली जातात आणि कुरियरनेच पुस्तके परत देण्याची सुविधा केली जाते. अगदी सभासदनोंदणी देखील कुरियरनेच होते, तेवढ्यासाठीदेखील वाचकांना प्रत्यक्ष यावे लागत नाही.

वाचकांच्या सोयीने वाचनाचा छंद जोपासणे शक्य व्हावे ह्यासाठी “ग्रंथस्नेह”ने आवडीची पुस्तके उपलब्ध करून घेण्याची संधी देऊ केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात ही सेवा सुरू झाली आहे आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे.

मराठीतील वाचनीय अशा पुस्तकांचा संग्रह असलेले हे वाचनालय आम्ही (सुप्रिया म्हात्रे, लता पोपळे, स्वप्निल घरत) सुरू केले आहे.

प्रत्येक वाचनालयासाठी आर्थिक पाठबळ हे महत्त्वाचे असतेच. त्यामुळे स्वयंसेवी संस्था, पुस्तकप्रेमी वाचक, पुस्तक दानकर्ते ह्यांनी ह्या वाचनालयास पुस्तक किंवा आर्थिक स्वरूपात हातभार लावावा अशी आमची इच्छा आहे.

ग्रंथस्नेहचे संचालक असलेले आम्ही सर्वजण पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित असून वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहोत.

वाचकांना आपल्या कामाच्या वेळेनंतर ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची ने-आण करणे हे नेहमीच शक्य नसते अशावेळी आपल्या कार्यालयात किंवा घरात कोणी पुस्तके आणून देत असेल तर ते कोणाला आवडणार नाही? नेमकी हीच भन्नाट कल्पना ह्या वाचनालयाच्या स्थापनेमागे आहे.

वाचनाची आवड असणारे लोक आपल्या आवडीसाठी पुस्तक खरेदी करण्याची आणि कुठूनही मिळवून वाचण्याची तयारी नेहमीच दाखवत असतात. पण असे अनेक वाचक आहेत ज्यांना ह्या दोन्ही गोष्टी सहज शक्य होत नाहीत त्यांच्यासाठीच ग्रंथस्नेह वाचनालय सुरू झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वाचकांमार्फत येणार्‍या सूचना आणि पुस्तकांच्या मागणीनुसार संग्रहात उत्तरोत्तर भर पडत जाणार आहे.

ग्रंथस्नेहविषयीच्या अधिक माहितीसाठी granthasneh@gmail.com वर संपर्क साधावा किंवा ९९३०७३८१८५ / ९८६९०२४०६१ /९८३३१८५४२६ /९८१९४३५५७६ ह्या क्रमांकांवर संवाद साधावा ही विनंती.

वाङ्मयबातमी

प्रतिक्रिया

डॉ.श्रीराम दिवटे's picture

12 Aug 2010 - 7:07 am | डॉ.श्रीराम दिवटे

अगदी स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या वाचनयज्ञाच्या कार्यासाठी शुभेच्छा!

सुप्रिया म्हात्रे's picture

12 Aug 2010 - 9:03 am | सुप्रिया म्हात्रे

आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. आपल्या सर्व मराठी मित्र-मैत्रिणींना वाचनालयासंदर्भात माहिती द्यावी ही विनंती.