हे माझे लिखाण नाही, संग्रह पण नाही, एका मित्राने काही वर्षापुर्वी एक ढकलपत्र पाठवले होते त्याचा अनुवाद आहे. आपण हे वाचलेही असेल. जर नियमात बसत नसेल तर उडवले तरी वाईट वाटणार नाही.
१) माझी पत्नी व मी आयुष्यात पंचवीस वर्षे सुखी होतो, नंतर आमचे लग्न झाले.
२) चांगली पत्नी नवर्याला नेहमी माफ करते, जेंव्हा ती चुक असते.
३) सुखी वैवाहीक आयुष्याचे गुपीत हे नेहमी गुपीतच रहाते.
४) भांडणानंतर पत्नी नवर्याला म्हणाली, " तुझ्याशी लग्न करताना मी मुर्ख होते." नवरा म्हणाला, " होय, प्रिये पण मी प्रेमात होतो, त्यामुळे दुर्लक्ष झाले."
५) मी माझ्या बायकोशी १८ महिन्यात बोललो नाही, मला तिच्या बोलण्यात अडथळा आणणे आवडत नाही.
६) पुरुष हा लग्नापर्यंत अपुर्ण असतो, लग्नानंतर संपुन जातो.
७) एका माणसाचे क्रेडीट कार्ड चोरीला गेले, पण त्याने तक्रार केली नाही कारण चोर त्याच्या बायकोपेक्षा कमी खर्च करत होता.
८) खरा आनंद काय असतो हे मला लग्नापर्यंत कळलेच नाही, पण नंतर उशीर झाला होता.
९) विचार करा, जर विवाह झाला नसता तर प्रत्येक पुरुषाला स्वतः मध्ये काहीच दोष नाहीत असेच वाटले असते.
तुर्तास येथेच थांबतो
प्रतिक्रिया
10 Aug 2010 - 12:29 pm | मनि२७
छान आहे..
पण एकाच बाजूचा विचार केलेला जाणवतोय.
10 Aug 2010 - 12:52 pm | दत्ता काळे
हे माझे लिखाण नाही, संग्रह पण नाही.
आप्पासाहेब हे नसते लिहीले तरी चालले असते, आम्ही नाही सांगणार तुमच्या मिसेसला.
10 Aug 2010 - 6:40 pm | विराट
वाचून डोळे पाणावले.......;-)
10 Aug 2010 - 8:05 pm | वेताळ
कारण हे सगळे लग्नानंतर वाचायला मिळाले ना.
10 Aug 2010 - 8:45 pm | मधुशाला
आता काही खरं नाही तुमचं... महिला आघाडी (स्त्री-मुक्ती शाखा) ला या धाग्याचा वास लागला की तुम्ही संपलात. :) :)
बाकी निष्कर्ष मनाला भिडले हो...
10 Aug 2010 - 9:21 pm | धकू
अफ्लातून ->
७) एका माणसाचे क्रेडीट कार्ड चोरीला गेले, पण त्याने तक्रार केली नाही कारण चोर त्याच्या बायकोपेक्षा कमी खर्च करत होता.