काही वैचारिक आजार

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
9 Aug 2010 - 3:47 pm

काही आजार शरीराचे;काही मनाचे तर काही दोन्ही चे मिळुन असे माहित होते. या पलिकडे जाऊन काही 'वैचारीक आजार' असतात असे एका संशोधनात सिद्ध झालं आहे म्हणे !(संशोधक जिवाच्या भितीने लपुन बसलाय) त्या संशोधनात काही तथ्य आहे असे आमच्याच काही मित्रमंडळीकडे पाहुन पटायला लागलंय.. :?

माझा एक मित्र आहे.त्याला वै.जुलाबाचा आजार आहे! कोणताही विषय त्याला ऐकू आला कि सुरु झालेच म्हणुन समजा ! नव्या रेसिप्यांपासुन अणुकरारापर्यंत कोणताही विषय याला'पचत'नाही.पोटात काही म्हणुन ठरत नाही! कितीही चांगलं याला द्या;अंगी काही लागत नाही.विचार,विषय कितीही जड असू द्या;याच्या कानातून आत शिरतो,काही क्षणात तोंडातून बाहेर्!तेही डोक्यात घाईघाईत झालेल्या प्रक्रियेसह! :NO

एक मैत्रिण याच्या विरुद्ध. वै.बद्धकोष्ठता आहे तिला.म्हणजे डोक्यात खूप असतं हो,बाहेर पडण्याची मारामार!!! चर्चा,विनोद्,चेष्टा असे पाचक ही काही परिणाम करत नाहीत्. एक चांगलं आहे हिचं..कुणीही तिच्यासमोर कितीही जड विषयावर बड्बडू श़कतों. नजिकच्या भविष्यकाळात तरी बाहेर काही पडणार नाही याची खात्री असते.

एकीला वै.अ‍ॅलर्जी आहे.पथ्यपाणी कडक!न चालणारा विषय निघाला कि पुरळ उठते. डोके ठणकायला लागते.खाज सुट्ल्याने ती वेडीपिशी होते!एक तर ती प्रचंड स्त्री मुक्तिवादी(दोन्ही) आहे. त्यामुळे कुठल्याही वयाच्या पुरुषांबद्द्ल चांगले बोलले की ही ताप चढल्यासारखी त्या जातीबद्द्ल'अन्याय..अत्त्याचार्.'.असे भाषण सुरू करते! तिच्या अशा आजाराला घाबरून मी तेंडुलकरचंही कौतूक तिच्यासमोर करत नाही. e:

काहींची अवस्था याहून वाईट. वै.बधिरता! कोणत्याही विषयाचा पोत्,स्पर्श यांना जाणवतच नाही. मग तो विषय दाहक असो की मोरपिशी..त्यांच्या कातडीवरचा केसही हलत नाही.सुखी जीव नाही!

हे झाले मोठे आजार.सर्दी पडश्या सारखे किरकोळ आजार आप्ल्यातुप्ल्याला पण होतातच की. म्हणजे बघा,एखाद्या विषयावर इथे खूप लोक पेटलेत असे दिसले की विषय कोणताही असो..मतांच्या शिंका येणारंच! :)

बाकी वैचारिक गतिमंदता,वै.स्थूलता,वै.कावीळ ही नावे तुमच्या कल्पनाशक्तीसाठी सप्रेम भेट :D

( अन्यत्र पूर्वप्रकाशित )

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

हा हा हा

बरेच थोर थोर चेहरे नजरेसमोर तरळुन गेले.

बेस्ट !

छोटा डॉन's picture

9 Aug 2010 - 4:18 pm | छोटा डॉन

>>बरेच थोर थोर चेहरे नजरेसमोर तरळुन गेले.

+१, हेच म्हणतो.
लेख एकदम कडक आणि टायमिंगमध्ये आहे ... ;)

( 'आंतरजालाची दशा' हे प्रदर्शन भरवायच्या विचारात असणारा ) डॉन्या ठाकरे

नितिन थत्ते's picture

9 Aug 2010 - 4:38 pm | नितिन थत्ते

असेच म्हणतो

छोटा डॉन's picture

9 Aug 2010 - 4:56 pm | छोटा डॉन

>>असेच म्हणतो

खरचं का काय ?

धमाल मुलगा's picture

9 Aug 2010 - 6:24 pm | धमाल मुलगा

आजि म्या ब्रम्ह पाहिले गा!

धन्य वाटले नेणिवांतुन जाणिवांमधील प्रवास पाहता. :D

- (डायकोझॅक्सिलिन) ध.

@ माया, ह्यासोबत आणखी एक प्रकार आहे, त्याला तर्कदुष्टता खरुज असं म्हणतात.

रोग लक्षणः वैचारिक बेचकी दिसली की प्रचंड खाज सुटते आणि पार रक्त निघेतो खाजवुन खाजवुन कंड शमवला जातो. :D

सविता's picture

9 Aug 2010 - 4:26 pm | सविता

माझ्या नजरेसमोर पण काही "आयडी" तरळुन गेले.... :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Aug 2010 - 4:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माया आता बाबी (बार्बी नव्हे!) असल्यामुळे तिला प्रतिसाद देणे भाग आहे. ;)

फटकेबाजी मस्तच जमली आहे.

तिच्या अशा आजाराला घाबरून मी तेंडुलकरचंही कौतूक तिच्यासमोर करत नाही.

=)) =))
खुर्चीवरून खाली पडायचीच बाकी होते ...

कोन्चे कोन्चे महानुभाव हायती हेच्यात डोले फिरले बगा आठवून्शिनी .

निखिल देशपांडे's picture

9 Aug 2010 - 7:18 pm | निखिल देशपांडे

सहीच
बरेच लोक आठवले...

कुणीही तिच्यासमोर कितीही जड विषयावर बड्बडू श़कतों. नजिकच्या भविष्यकाळात तरी बाहेर काही पडणार नाही याची खात्री असते.
==))

ईन्टरफेल's picture

9 Aug 2010 - 9:20 pm | ईन्टरफेल

किति जड बोलता हो तुमी

राजेश घासकडवी's picture

9 Aug 2010 - 9:57 pm | राजेश घासकडवी

कल्पना छान आहे. आजारांची वर्णनं आवडली. आम्ही वैचारिक हायपोकोंड्रियाक असल्यामुळे आम्हाला हे सर्वच रोग झालेले आहेत असं वाटलं.

वैचारिक रंगांधळेपणा - या आजारात काळ्या पांढऱ्याशिवाय दुसरे काही रंग, छटा दिसतच नाहीत. राखाडीदेखील नाही. एखाद्या सुंदर चित्राची काळी पांढरी, हाय कॉंट्रास्ट झेरॉक्स काढावी त्याप्रमाणे जग दिसतं. टोकाच्या भूमिकांशिवाय दुसऱ्या भूमिका घेताच येत नाहीत. आपले विचार बदलणं म्हणजे स्वतःशीच प्रतारणा असल्यामुळे विचारांवर ठाम राहाण्याचा आग्रहही असतो.

वैचारिक रेबीज - एखादं वेड लागलेलं कुत्रं चावल्याप्रमाणे पिसाळलेलं असणं हे या रोगाचं लक्षण असतं. ते दिसेल त्याचे वैचारिक चावे घेऊन वैचारिक लचके तोडायला टपलेले असतात. मग वैचारिक त्वचेबरोबरच व्यक्तिगत अंगालादेखील जखमा होतातच, पण आपण व्यक्तिगत चावा काही घेतला नाही असं ते ठासून म्हणतात. त्यातले काही मधूनमधून सॉरी बरका वगैरे म्हणून पाणी मागण्याचा प्रयत्न करतात. हा रोग प्राणघातक ठरू शकतो. मुळात वरचा रंगांधळेपणा असणाऱ्या व्यक्तीला तो झाला तर रोगी दगावण्याची शक्यता खूपच अधिक असते.

वैचारिक खुजेपणा - लहानपणी सत्वयुक्त वैचारिक पोषण न झाल्याने हा रोग उद्भवतो. उंची वाढतच नाही. अशांना बहुतेक सामान्य लोक सहानुभूतीने वागवतात. मात्र काही जण टपल्या मारून जातात. मात्र अशांना रेबीज झालेला असलं तर इतरांना ते धोकादायक असतं. भलत्या ठिकाणी चावू शकतात. व कमी उंचीमुळे सहज सटकून जातात. त्यांना पकडायचं तर त्यांच्या पातळीवर उतरावं लागतं.

वैचारिक लंबूपणा - या उलट या रोगात उंची भरमसाठ वाढते. कुठल्यातरी ग्रंथी स्रवायच्या योग्य वेळी थांबल्या नाहीत की हा रोग होतो. उंची इतकी वाढते की साध्या दरवाजांतून जाताना खूप वाकून जावं लागतं. ते करण्याचं अवधान ठेवलं नाही की वैचारिक टाळकं सडकतं. आणि मग सामान्यांचं जग ही एक डोकेदुखीच वाटत राहाते.

वैचारिक अॅसिडिटी - ही बहुतांश लोकांना केव्हा ना केव्हा होतेच, पण काहींच्या प्रकृतीचा तीकडे कल असतो. अतिरेकी (दुसऱ्याचे चांगले) खाल्ल्यामुळे ही होते. ही वैचारिक जळजळ करपट ढेकरांसारखी बाहेर पडते. 'इनो घ्या' म्हटल्याने ती कमी होण्याऐवजी वाढते. काही उदार, पण आगाऊ लोकं लोकांना मुद्दाम आपल्याकडचं खायला घालून ती जळजळ वाढवतात. त्यांना कुठचा वैचारिक रोग असतो याचा शोध घेणं चालू आहे.

आता थांबतो.

धमाल मुलगा's picture

9 Aug 2010 - 10:07 pm | धमाल मुलगा

बाब्बोय ;)

पण गुर्जी, ह्यात एक राहिलंच की.. वैचारिक विघ्नसंतोषीपणा. ;)

लेखापेक्षा हा प्रतिसाद सरस उतरलाय !
साष्टांग दंडवत !!!! :)

बेसनलाडू's picture

9 Aug 2010 - 11:47 pm | बेसनलाडू

लेख आणि वरील प्रतिसाद दोन्ही फारच वैचारीक आहेत. दोन्ही आवडले.
(विचारवंत)बेसनलाडू

शिल्पा ब's picture

9 Aug 2010 - 11:58 pm | शिल्पा ब

आम्हाला वैचारिक एलर्जी असल्यामुळे लेख आणि प्रतिसाद दोन्ही काही कळले नाही.

Maharani's picture

6 Feb 2015 - 2:32 pm | Maharani

एक नंबर*lol* *LOL* :-))

अजया's picture

6 Feb 2015 - 2:41 pm | अजया

काही नवे चेहेरे आठवुन राॅफलल्या गेले आहे *ROFL*

सविता००१'s picture

6 Feb 2015 - 2:48 pm | सविता००१

:)

वैचारिक गळवे ठसठसणे हा रोग राहिलाय वाटतं.

-बॅटमॅन आणि आर्य गळूमोचक मंडळाचे कार्यकर्ते.

वैचारिक डायबेटिस-या रोगाच्या लोकाना काहीच गोड चालत नाही.त्यामुळे ते कडवट प्रतिसाद प्रसवत असतात.
त्याच्याउलट वैचारिक जिलेबिया -या रोगाने पीडित लोक सतत गोड प्रतिसाद देतात.अय्या कित्ती चान!अाणि त्याना रोज गोग्गोड कविता होतात.

हो पण या दोहोंपलीकडे गळवांचा रोग आहे. काही झाले की त्यांची गळवे ठसठसून त्यांतून प्रतिसादाचे पू बाहेर येतात. (ईईईई!)

पिंपातला उंदीर's picture

6 Feb 2015 - 3:30 pm | पिंपातला उंदीर

*lol* *LOL* :-)) :)) =)) +))

अगदी अगदी!आणि या पू चे पण पुरोगामी आणि प्रतिगामी असे विचारजंतूवरुन ठरणारे प्रकार असतात असं मी पॅथाॅलाॅजीचा अभ्यास करताना वाचलंय.

बॅटमॅन's picture

6 Feb 2015 - 4:02 pm | बॅटमॅन

अगदी अगदी....

बाकी या केसमध्ये पॅथॉलॉजी = पॅथेटिकॉलॉजी.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2015 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन आणि आर्य गळूमोचक http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif मंडळाचे कार्यकर्ते.>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif वारलो रे वारलो..खाटुका! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

@काही झाले की त्यांची गळवे ठसठसून त्यांतून प्रतिसादाचे पू बाहेर येतात.>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

कविता१९७८'s picture

6 Feb 2015 - 2:54 pm | कविता१९७८

मस्त लेख

कपिलमुनी's picture

6 Feb 2015 - 3:31 pm | कपिलमुनी

वैचारीक जळजळ : हा रोग बर्‍याच ठिकाणी दिसतो !

प्रियाजी's picture

6 Feb 2015 - 3:35 pm | प्रियाजी

लेख आणि राजेश घासकडवी यांचा प्रतिसाद दोन्ही फ्फार आवडले. मला एवढे छान लिहिता येत नाही म्हणून जळजळ झाली.(ह. घ्या.)

जयन्त बा शिम्पि's picture

6 Feb 2015 - 4:23 pm | जयन्त बा शिम्पि

दुसर्‍यांच्या भानगडीत नाक खुपसणे हाही वैचारिक आजार आहेच ! !

सस्नेह's picture

6 Feb 2015 - 4:44 pm | सस्नेह

मस्त खुसखुशीत लेख !
बाकी वैचारिक सर्दी असा काही आजार आहे का हो ?
नाही, म्हंजे काही लोक्स आपले चिकट विचार सारखे ठ्यां ठ्यां करत पसरवीत असताना पाहिले आहेत ... +D

प्रीत-मोहर's picture

6 Feb 2015 - 4:50 pm | प्रीत-मोहर

=)) हा पण राहिला होता वाचायचा मितान

पैसा's picture

6 Feb 2015 - 5:02 pm | पैसा

लै भारी! पण तेव्हाचं मिपा असं नि तसं म्हणतात लोक तर इतक्या मस्त लेखाला जास्त प्रतिक्रिया का नहत्या ब्वा?

हाहा's picture

6 Feb 2015 - 6:43 pm | हाहा

मस्त जमलय वर्णन. एकदम खुसखुशीत :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Feb 2015 - 8:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

य लेखाला चांगले म्हटले तर लोक म्हणतील वै-डायबेटिस झालाय आणि त्याच्या खोड्या काढल्या तर म्हणतील की वै-अ‍ॅसिडिटी झालीय... त्यामुळे फक्त रोफलतो आहे...
 ,  ,

ज्योति अळवणी's picture

6 Feb 2015 - 11:33 pm | ज्योति अळवणी

अनेक आजार आणि त्यांचे वैचारिक connection मनात आले. बाकी लेख उत्तम आणि विषय ही छान.

वैचारिक दूषित ताप राहिलाच!पूर्वग्रहदूषित माणसाचे विचार ऐकण्यावाचण्याचा ताप!!हे लोक या दूषित तापाने पीडित असल्याने त्याच चष्म्यातून बघून दुसर्यावर शाब्दिक वार करत असतात हे या रोगाचे मुख्य लक्षण!!

स्पंदना's picture

7 Feb 2015 - 4:44 pm | स्पंदना

काय मुद्देसूद मांडणी आहे विचारांची.. ;)

नाखु's picture

9 Feb 2015 - 2:05 pm | नाखु

तितकाच समयोचीत आणि अचूक निदान करणारा !
मिपा २०१० इतकेच का जास्त (?)यावर भाष्य करण्यास असमर्थ, सुरवातीची ५ वर्षे वाचनमात्र अस्लेला
नाखु