" बघ तुला माझी आठवण येते का ? "

सुहास..'s picture
सुहास.. in जे न देखे रवी...
9 Aug 2010 - 2:20 pm

" बेधुंद कोसळण्यार्‍या पावसात "
" भिजुन परतल्यावर "
" आरशासमोर ओलेचिंब "
" त्वचेशी एकसंध झालेले "
" कपडे बदलताना "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "

" चिमण्या परतण्याच्या शांत सांजवेळी "
" वाफाळलेल्या चहाचा "
" सुंगध श्वासात शिरत असताना "
" उबदार रात्रीची हलकीशी "
" चाहुल लागत असताना "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "

" किचनमध्ये काळ्या मसाल्याची "
" वांग्याची भाजी बनविताना "
" नाजुक चिमटीत धरुन "
" मिठाचा हात फिरवताना "
" तर्जनीतल्या अंगठीकडे पाहुन "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "

" पहाटे पहाटे अंथरुणात "
" हवेत मंद-मंद गारवा पसरल्यावर "
" अंगावरचं पाघंरुण शोधताना "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "

" स्कुटीवर येता-जाता "
" मंद सर कोसळत असताना "
" त्या तुरळक रहदारीच्या "
" ऊंबराच्या झाडाखाली "
" वडा-पावच्या गाडीवर "
" ऊडदाची भजी पाहुन "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "

" शेवटी केली कविता "
" तुझ्यासाठी अन"
" केली तुला अर्पण "
" वाचता-वाचता हलकसं "
" हळव होताना "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "

प्रेरणा : कुठेतरी वाचलेले "तुला माझी आठवण येते का "

शृंगारमुक्तक

प्रतिक्रिया

गणपा's picture

9 Aug 2010 - 2:42 pm | गणपा

सुहास आवडली रे :)

श्रावण मोडक's picture

9 Aug 2010 - 2:45 pm | श्रावण मोडक

याला काय झालंय? बंगळूरमध्ये लटकल्याचा विरह म्हणायचा का हा?
पुलेशु.

'लटकल्याचा' हा शब्द काळजाला भिडला... :)

निरन्जन वहालेकर's picture

9 Aug 2010 - 2:53 pm | निरन्जन वहालेकर

छान ! आवडली ! सून्दर मनोगत ! ! !

आप्पा's picture

9 Aug 2010 - 3:38 pm | आप्पा

एक छान विरह कविता

चिरोटा's picture

9 Aug 2010 - 3:44 pm | चिरोटा

आवडली कविता.

ज्ञानेश...'s picture

9 Aug 2010 - 3:47 pm | ज्ञानेश...

कविता छान,

"पण"
"इतकी"
"अवतरणे"
"कशासाठी"
"हे"
"कळले"
"नाही !"

रश्मि दाते's picture

9 Aug 2010 - 5:04 pm | रश्मि दाते

मस्त जमली आहे,अगदी काळया मसाल्याच्या वागीच जणु

प्रसन्न केसकर's picture

9 Aug 2010 - 5:08 pm | प्रसन्न केसकर

: )

" किचनमध्ये काळ्या मसाल्याची "
" वांग्याची भाजी बनविताना "
" नाजुक चिमटीत धरुन "
" मिठाचा हात फिरवताना "

कविता छान, पण तुझे हल्ली काही खरे दिसत नाही
कवितेत " " काय , अन पाकृ मध्ये !! काय
हम्म्म, तू खरंच तिला miss करतो आहेस तर ..

धमाल मुलगा's picture

9 Aug 2010 - 7:03 pm | धमाल मुलगा

कुणीतरी ह्याला इनलॅकमध्ये अ‍ॅडमिट करा रे...केस गंभीर आहे, एक्सपर्ट डॉक्टरच्या ताब्यात द्या लवकर. ;)

प्रसन्न केसकर's picture

9 Aug 2010 - 7:20 pm | प्रसन्न केसकर

एकाच डॉक्टरला इलाज करता येईल.
: )

धमाल मुलगा's picture

9 Aug 2010 - 7:25 pm | धमाल मुलगा

म्हणुन तर हो! ज्या डॉक्टरलाच फक्त इलाज जमेल त्याच डॉक्टरला आपण एक्स्पर्ट म्हणणार ना? ;)

निखिल देशपांडे's picture

9 Aug 2010 - 7:32 pm | निखिल देशपांडे

एकाच डॉक्टरला इलाज करता येईल.
+१ सहमत
कविता भारी जमली.. सुहासराव

सहज's picture

10 Aug 2010 - 7:14 am | सहज

सुहास सहा कडवी आहेत म्हणजे किमान सहा जणींकडून उत्तर मागतोयस की काय ;-)

मुक्तसुनीत's picture

10 Aug 2010 - 8:03 am | मुक्तसुनीत

कविता आवडली. साध्या शब्दांमधूनसुद्धा हवा तो परिणाम साधणारी. :-)

गंगाधर मुटे's picture

11 Aug 2010 - 2:11 pm | गंगाधर मुटे

या कवितेची मात्र मला नेहमीच आठवन होत राहील.

पारिजात's picture

12 Aug 2010 - 12:24 pm | पारिजात

मनाला कुटेतरी स्पर्श करुन गेली..........!!!!!