काही मल्ल्याळी शब्दोच्चार

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in जनातलं, मनातलं
9 Aug 2010 - 1:07 am

***ही एक फोर्वडेड मेल आहे...मी फक्त भाषांतर केले आहे. गंमत म्हणून.
त्यात कोणाळाही दुखवण्याचा अथवा खिल्ली उडवण्याचा हेतु नाही. क्षमा असावी.

१) मल्ल्याळी माणसाच्या आयकरावरच्या tax ला काय म्हणतात ?
उ. इन्गम डैक्स

२) मल्ल्याळीज कुठे शिकतात ?
उ. कोळेज्ज

३) कामात असल्याचे मल्ल्याळी कसे सांगेल?
उ. ही इस वेरी बिस्सी

४) मल्ल्याळी विमानाचे तिकिट का घेतो?
उ. टू गो टू थुबाई,झिम्पळी टू मीट हिस अंकळ इन गेळ्फ.

५) मल्ल्याळी गल्फ ला का येतात?
उ. टू येर्न मणि

६)घराला आग लागल्यावर मल्ल्याळी न काय केलं?
उ. ही झिम्प्ळी जेम्ब्ड डौन द व्हिंडो

शब्दक्रीडाविनोदआस्वाद

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

9 Aug 2010 - 3:16 am | योगी९००

इतका कधी मल्ल्याळी माणसाच्या उच्चाराकडे लक्ष दिले नाही म्हणून कळले नाही..

बाकी मी सुद्धा कोल्हापुरीच..काही कोल्हापूरच्या माणसाच्या उच्चारावरचे विनोद चालतील..

फॉक्सफ्लडची मँगोलेडी, यू मी ब्रेड..

गौरीदिल्ली's picture

9 Aug 2010 - 10:21 am | गौरीदिल्ली

मल्ल्याळी शब्दोच्चार तुम्ही लिहिलेले वाचताना त्या ... मै हु ना मधल्या सतीश शहा च्या थून्की उडवून बोलण्याची आठवण झाली.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Aug 2010 - 11:32 am | llपुण्याचे पेशवेll

हम्म.
आमच्या ग्रुप मधे एक दाक्षिणात्य मुलगी होती. (आता नक्की कुठली होती हे माहीत नाही पण दाक्षिणात्य होती आणि मुलगी होती इतकेच पुरे.) ती बहुतेक वेळा इंग्रजीमधे बहुवचन करताना जिथे 'ज्' असा उच्चार केला जातो तिथेही 'स्' असाच उच्चार करायची. तर गंमत अशी झाली की आम्ही गेलो होतो गाडी रेंट करून फिरायला फ्लोरीडामधे. आणि या बाई नव्या नव्या गाडी शिकलेल्या, हौसेने गाडी चालवत होत्या प्रत्येक ठीकाणी. पण झाले असे की १-२ वेळ रेस्ट एरीया मधे गाडी थांबवली असताना या गाडीची किल्ली काढायला विसरल्या. मग पब्लिक चिडलं तिला अद्दल घडवायची असं ठरलं. पुढे आम्ही एका हॉटेलमधे थांबलो होतो. तिथे सगळ्यात शेवटी सगळं सामान गाडीतून काढून मी आणि या बाई शेवटी आलो. बाई दार लावून येते म्हटल्या आणि परत किल्ली विसरल्या. दुसरा एक मित्र ही किल्ली विसरेल असा विचार करून आला आणि हळूच किल्ली काढून गेला. मग दुसर्‍या दिवशी सकाळी निघताना गाडीपाशी आलो तर या बाईंना किल्ली मिळेना कारण ती मित्राने आधीच स्वतःच्या ताब्यात घेतली होती न कळत. मग या बाईंचा संशय माझ्यावर मला म्हणू लागल्या "गिव्ह मी कीस् ना! आय नो यू हॅव्ह टेकन इट येस्टर डे. बीकॉझ येस्टरडे नाईट वेन वी लेफ्ट फ्रॉम हीयर ओन्ली मी अ‍ॅन्ड यू वर देअर. सो यू मस्ट हॅट टेकन कीस येस्टरडे नाईट. प्लीस गिव्ह ना."
आयला इतकं ओशाळलो मी. एकतर बाई मला पब्लिकमधे किस दे असं सांगत आहेत. परत काल रात्री फक्त आम्ही शेवटी एकटे होतो पण मी काही तसं केलं नव्हतं. बाई म्हणतात की काल तूच घेतला असणार किस. म्हणजे त्यांना सुधा खात्री नाही रात्री किस कोणी घेतला. संशय माझ्यावर. बाकीचे मित्र माना फिरवून हसू लागले. मग एका मैत्रीणीच्या लक्षात आलं मग तिने सुधारून 'हू हॅव दोज कीज राईट नाव. प्लीज रिटर्न'.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

9 Aug 2010 - 12:46 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

... किज च्या ठिकाणी कीस.....
ज किंवा झ च्या ऐवजी स वापरतात. बिझी-बिस्सी
एका मल्लु टॅक्सी वाल्यानी तर जाम पकवले होते मला. मला जायचे होते safe zone ला. ह्याला एक तर तो पत्ता माहिति नव्हता.आणि दिसेल त्या माणसांना हा विचारतो "सैफ सोन" मलूम है क्या?
आणखी एक म्हणजे ल च्या ठिकाणी ळ्....बर्‍याचदा. यू आर ळेट्ट!
quick gun murugan नावाचा धम्माल विनोदी मूव्ही पाहीला असशिल ना! नसेल तर पहा!लई भारी...

सहज's picture

10 Aug 2010 - 7:54 am | सहज

पुपे हा हा हा!

आशु जोग's picture

13 May 2012 - 10:52 pm | आशु जोग

पेशवे

येवढा का हो खाता भाव किस द्यायला
त्यांना गरज होती त्याची

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Aug 2010 - 1:01 pm | बिपिन कार्यकर्ते

गोड = गॉड,
अंगळ = अंकल,
झेड = इझेड

इन्द्र्राज पवार's picture

9 Aug 2010 - 1:11 pm | इन्द्र्राज पवार

"त्यात कोणालाही दुखवण्याचा अथवा खिल्ली उडवण्याचा हेतु नाही. क्षमा असावी."
जाईताई यांनी सुरुवातीलाच हे प्रकटन दिले असल्याने तसल्या "फॉरवर्डेड मेल" ना गंभीरपणे घेण्याची गरज नाही. अन्यथा उच्चारांच्या अशा विविध छ्टा काढणे म्हणजे दुधारी शस्त्र आहे.

प्रत्यक्षात "मल्याळी" तरूण्/तरूणी अन्य भाषिकांप्रमाणेच कष्टाळू, विद्याउपासक आहेत. केरळच्या थ्रिसूर जिल्ह्यातील रवि मेनन नावाचा माझा मल्याळी मित्र दिल्लीत सरकारी खात्यात चांगल्या हुद्द्यावर आहे. इंग्रजीवरील प्रभुत्व तर सोडाच पण हिंदी, उर्दु, हरियाणवी आणि बंगाली या भाषेवर त्याने इतकी हुकुमत मिळविली आहे की यातील उर्दुमधुन तर तो लिखाणही करू शकतो. रूममध्ये मी आणि नागपूरकडील आणखीन एक मित्र मराठीतून बोलायला लागलो तर हा रवि अगदी कान देऊन मराठी आणि उच्चाराची ढब पकडायचा (कॉम्प्युटरवर काही काम चुकले तर आम्हा दोघांना चिडविण्यासाठी हसतहसत "च्यामारी" म्हणायलादेखील शिकला) आणि मराठी शिकता शिकता आम्हाला कामचलावू मल्याळी आणि तुळू भाषाही शिकवली. अशा या "मल्याळी" गुरुमुळे मी केरळ आणि तामिळनाडुमध्ये इंग्रजी/हिंदी भाषा न वापरता प्रवास करू शकतो.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

9 Aug 2010 - 1:21 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

अहो हे माहित आहे... पण इथे आमच्याकडे हा वर्ग खुप जास्त जवळुन पहायला rather ऐकायला मिळतो.
आणि जाणवण्या इतपत फरक त्यांच्या उच्चारांमध्ये असतो..
आणि म्हटल्याप्रमाणे हा गमतीचा भाग आहे...

इन्द्र्राज पवार's picture

9 Aug 2010 - 3:37 pm | इन्द्र्राज पवार

आणि म्हटल्याप्रमाणे हा गमतीचा भाग आहे...

राईट. आणि मी तसं सुरुवातीलाच म्हटलं आहेच. फक्त मल्याळींच्या "ग्रास्पिंग पॉवर" ची आठवण आली म्हणून थोड्या विस्ताराने प्रतिसाद दिला. फर्गेट इट !

मनि२७'s picture

9 Aug 2010 - 1:57 pm | मनि२७

कोल्हापुरी लोकांच्या पण गमती आम्हाला चालतील........
:-)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

9 Aug 2010 - 2:32 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

कोल्हापुरी मधले काही उच्चार्.....मजेदार असतात..
जसे कि L M N S Z..... they say यल्,यम्,यन्,यस,
ग्रामिण भागात जाल ना तर खरच मज्जा येइल तुम्हाला!
इंग्लिश तर दूरच... पण शुद्ध मराठीची सुधा वाट लागलेली असते,पण तरिहि तो ग्रामिण तडका लई भारी वाटतो..
मला आठवतील ना तश्या अजुन सांगत जाईन ....
हं.. story - ष्टोरी...ष्टाईल्...ष्ट्यांप (stamp)
मराठी चे अपभ्रंश : आंबे,वडे,पेढे, असे एकारांती शब्द असतील ना तर ते अ कारांती बनतात जसे... आंबं,वडं,पेडं
आणि suffix आणि prefix ह्या मस्त चरचरीत शिव्या असतातच्.... खमंग शिव्या अश्या तोंडात असतात ना की बास!
आहे कि नाही गम्मत!
एक धागाच टाकते ना पुर्ण अस्सल कोल्हापुरीत!

पुणेरी उच्चार पण मजेशीर आहेत काही बाबतीत- जसे:

"a b c d....i J k l..." हे मात्र डोक्यात जातं. "J" चा उच्चार बर्‍याच ठिकाणी "z" सारखा करतात, उदा. ज़े एम् रोड. ही प्रवृत्ती मराठी उच्चारांत लै आढळते, उदा. "तुम्ही ज़े सांगताय ते चूक आहे", "आय आय टी ज़े ई ई", ज़ास्त, महाज़न, इ.इ. बरीच उदाहरणे देता येतील. ज च्या जागी ज़ वापरणे हे पुणेरी (पर्यायाने कोंकणस्थ) बोलीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.

चौकटराजा's picture

11 May 2012 - 8:16 am | चौकटराजा

धागा मल्याळी उच्चारांचा आहे पुण्यावर काय सरकून रायले आपन ! काय प्रोळम आहे ?

जाई यांनी कोल्हापुरी बोलीतील विशिष्ट उच्चार सांगितले तर मी ओघाने पुणेरी बोलीचे काही उच्चार सांगितले.

तरीच म्हटले अजून प्रतिसाद आला का नाही बरे? पुण्याबद्दलच्या कुठल्याही क्षुल्लक गोष्टीवर डिफेन्सिव्ह प्रतिसाद दिल्याशिवाय चैन नाय का वो पडत आँ?

चौकटराजा's picture

11 May 2012 - 5:33 pm | चौकटराजा

त्यानीच त्यांचा धागा मोडला म्हणजे गंप्ळीट प्रोळम (complete problem )आहे .

त्याला खिलाडूवृत्ती म्हणतात, प्रोळम नाही. खिलाडुवृत्तीला प्रोळम म्हणणे म्हणजे गंप्ळीट प्रोळम आहे.

चौकटराजा's picture

11 May 2012 - 7:15 pm | चौकटराजा

मिपावर पटकन गैरसमज कसा करून घेतला जातो याचा आपली प्रतिक्रिया उत्तम नमुना आहे. मी माझे दोनही प्रतिसाद केवळ प्रोळम
आणि गंप्ळीट या शब्दांसाठी दिलेले आहेत. आपण दोन्ही वेळेस त्यातून् भलताच अर्थ काढलेला आहे .कारण धागाच मुळात गंमती जमतीचा
असल्याने पुणेकराला तुम्ही नावे ठवलीत काय व ना काय फरक पडत नाही तीच गोष्ट त्यानी धागा दुसरीकडेच नेला या माझ्या म्हणण्याची.कारण गंमतीचा धागा भरकटला तरी चालतोच. तसे गंभीर धाग्याचा पार राडा करणारे एथे काय कमी आहेत का ?

बॅटमॅन's picture

11 May 2012 - 9:06 pm | बॅटमॅन

मग ढीग आहे ;), गैरसमज मागे घेतला, सॉरी :)

मी-सौरभ's picture

9 Aug 2010 - 8:12 pm | मी-सौरभ

पु. ले. शु.

धमाल मुलगा's picture

9 Aug 2010 - 9:04 pm | धमाल मुलगा

आमच्या कोण्या एका गरीब काळी एका हापिसात आम्ही काम करायचो तिथे रिसेप्शनिस्ट कम फोन ऑपरेटर कम आणखी काय काय अशा एक दाक्षिणात्य काकू होत्या.
आमचा बॉस दुबईला गेला होता आणि कोणाचासा फोन आला. ह्या काकूंनी उत्तर दिलं, 'ओ थुबाई गयेलाय!'
आरारारा...त्यांना इतकं छळलं आम्ही सगळ्यांनी..म्हणलं बाबा काय डॉन आहे का? तुम्ही काय कोणत्या भाईकडं रिसेप्शनिस्ट होता का...एक ना दोन....

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

9 Aug 2010 - 9:25 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

हिहाहा..
आत्ताच एका मल्लू गिटार शिकवणार्‍या मोर्‍याला भेटुन आले.
त्यानी अजुन ज्ञानात भर टाकली.
यीफ यु णो म्युसिक सो वेल यु मस्ट प्रॅक्टिस.
माय ओण सन नोस इट वेरी वेल्ल बट वेरी लेसी.!

धमाल मुलगा's picture

9 Aug 2010 - 9:44 pm | धमाल मुलगा

बरं आणखी एक प्रकार, आता तो मल्याळी लोकांचा की तामिळ ते नाही ठाऊक, पण बर्‍याचदा वाक्यांची सुरुवात "म्च्चं! आय्य टेल यु..."अशी करतात. ते सुरुवातीचं मच्चाक ऐकुन ऐकुन इतका वीट येतो की बस. :D

नितिन थत्ते's picture

10 Aug 2010 - 7:27 am | नितिन थत्ते

ते तामीळ.

"कसं कळत नाही तुला !!!" असे दर्शवण्यासाठी तो मच्चाक आवाज असतो.

धमाल मुलगा's picture

10 Aug 2010 - 8:42 pm | धमाल मुलगा

अहो, पण दर एक वाक्याआड? मराठीत किंवा हिंदीत तो मच्चाक 'कसं कळत नाही तुला.." ह्या अर्थानं असतो ते ठाऊक आहे. पण हे म्हणजे "मच्चाक्क! हाव आर्यु तंबी?" आता ह्यात मच्चाक कशाला?

तामीळ लोकांच माहित नाही पण दुबईला असताना बरेच श्रिलंकन मित्र होते ते नेहमी माच्चा, मच्चं म्हणायचे.
त्याचा अर्थ विचारल्यावर त्यांनी ब्रदर ( म्हणजेच आपल भौ ;) ) आसा सांगीतला. :)

धमाल मुलगा's picture

10 Aug 2010 - 9:01 pm | धमाल मुलगा

माझ्या एका तेलुगु मित्रानं सांगितलं होतं की ते 'मच्ची' असं आहे आणि त्याचा अर्थ मेव्हणा (आपल्याकडं गावाकडं जसं दाजी म्हणतात तसं) आहे. खरंखोटं मुरुगन जाणे.

पंगा's picture

10 Aug 2010 - 9:17 pm | पंगा

बर्‍याच तमिळभाषकांच्या तोंडून 'मच्चा' आणि 'मच्ची' दोन्ही ऐकलेले आहे. तेलुगूत नसावे. (तेलुगूभाषकांच्या तोंडून - तमिळभाषकांची खिल्ली उडवण्याच्या किंवा हेटाळणी करण्याच्या कारणाखेरीज - ऐकलेले नाही.)

मलयाळमभाषकांशी फारसा संबंध आला नाही. पण मलयाळममध्ये असा शब्दप्रयोग असण्याबद्दल साशंक आहे. माझ्या अपुर्‍या माहितीप्रमाणे हा खास तमिळ प्रयोग असावा. (आणि, नक्की खात्री नाही, पण बहुधा पुरुषांना उद्देशून असावा.)

प्रियाली's picture

10 Aug 2010 - 9:15 pm | प्रियाली

मराठीतला मेव्हणा हिंदीतला साला ना! ;) हळूच अपमानास्पद वापरण्याजोगा शब्द तर नव्हे.

बाकी, आम्ही मच्ची ऐकलं की आम्हाला मच्छी आठवते.

सुनील's picture

9 Aug 2010 - 9:48 pm | सुनील

बाकी काही म्हणा पण मल्लू मुली मात्र झक्कास हं!

आमोद शिंदे's picture

10 Aug 2010 - 12:23 am | आमोद शिंदे

हो...आर्थिक संकटात पडण्यापूर्वी तात्या काय लावायचे एकेक फोटो. गेले ते दिन गेले...

सहज's picture

10 Aug 2010 - 7:52 am | सहज

सुनीलशेठशी सहमत!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

10 Aug 2010 - 12:18 am | जाई अस्सल कोल्हापुरी

सुनिल दा,
जग चंद्रावर आणि पांडु डोंगरावर अशी काय म्हण बिण ऐकली आहे का हो तुम्ही?
...सारखं आपलं,,,मुली..मुली ..मुली
शोभतं का?

सुनील's picture

10 Aug 2010 - 12:45 am | सुनील

जाईतै,

ते चंद्र काय नि डोंगर काय, काही कळलं नाही! हां, एक गोष्ट नक्की. पंजाबणींचं भले नाव असेल, पण भारतात देखण्या मुली दोनच प्रांती - बंगाली आणि मल्लू!!!

मैत्र's picture

10 Aug 2010 - 5:35 pm | मैत्र

मंगलोर आणि आसपासचा भाग - सर्वात सुंदर मुली... काही तुलनाच होत नाही ...

कवितानागेश's picture

10 Aug 2010 - 8:00 am | कवितानागेश

भारतात देखण्या मुली दोनच प्रांती - बंगाली आणि मल्लू!
...दोन्ही प्रान्त 'कम्युनिस्ट' आहेत!
...काय कारण असावे बरे?
महाराष्ट्रात देखिल कम्युनिस्ट राजवट आलीच पाहीजे!!!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

10 Aug 2010 - 8:37 am | जाई अस्सल कोल्हापुरी

महाराष्ट्रात जर कम्युनिस्ट राजवट आली तर मराठी मुली पण देख्ण्या होतिल असा तर्क आहे का माउ ताई तुमचा? :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

10 Aug 2010 - 8:37 am | जाई अस्सल कोल्हापुरी

महाराष्ट्रात जर कम्युनिस्ट राजवट आली तर मराठी मुली पण देख्ण्या होतिल असा तर्क आहे का माउ ताई तुमचा? :)

" देखण्या मुली फक्त सदाशिवात असतात "

सौजन्य : श्री परिकथेतील राजकुमार ह्यांचा कॅफे

या उच्चार वैशिष्ट्यांप्रमाणे ईंग्रजी स्पेलिंग सुद्धा खास असतात दाक्षिणात्यांची..
जिथे आपल्याला H हवा असतो तिथे यांना तो नको असतो.. आणि आपल्याला नको तिथे नेमका असतो..
क ख ग घ त थ ट ठ ड ढ सगळे उलटेपालटे होतात :-)