'ती' इतकी सुंदर की,
अप्सराही तिच्याकडुन beauty tips घेते.
'तिला' पाहून
नदी ही स्वतःभोवती गिरकी घेते.
'तिच्या ' गालावरची खळी पाहून
फुलपाखरेही हळूच लाजतात.
'तिचा' स्पर्श झाल्यावर
गुलाब अधिकचं लाल होतात.
'ती' इतकी कोमल की,
मोरपीसं 'तिला' काट्यासारखे रुततात.
'तिचे नयनरुपी तारे बघितल्यावर
आकाशातले झगमगाटही फिके पडतात.
'तिच्या' चेहर्यावरची बट पाहतांना
वाराही वाहता-वाहता स्तब्ध होऊन जातो.
'तिचे' प्रतिबिंब बघितल्यावर
चंद्रही हलकेचं 'तिची' द्रुष्ट काढतो.
निसर्गाप्रमाणे मी ही
एकदिवस 'तिला' भेटलो.
'तिचं' निस्सिम सौंदर्य बघून
अ़क्षरशः 'तिच्या' प्रेमात पडलो.
'तिचं 'काळजी घेणारं मन बघून
माझं 'तिच्यावरचं' प्रेम वाढतचं गेलं.
'तिच्या' मनाचा साधेपणा पाहून
प्रेमाचं नातं अधिकचं द्रुढ झालं.
एकदिवस..... 'तिच्यावर' एकतर्फी प्रेम करणार्याने
'तिच्या' चेहर्यावर acid टाकले.
'तिचा'चेहरा, 'तिचं' सौंदर्य,
पार विद्रुप करुन टाकले.
पण तरीही........
मी 'तिच्यावर' तितकचं प्रेम करतो.
पूर्वीप्रमाणे आताही
'तिच्यावर' जीव ओवाळून टाकतो.
आयुष्यात आलेल्या संकटांमुळे
प्रेम कधी कमी होतं का?
आपल्या माणसाला काही झाले
तर कुणी साथ सोडून जातं का?
प्रतिक्रिया
4 Aug 2010 - 11:01 pm | दत्ता काळे
तुमच्या कवितेतून 'तिच्यावरचे' प्रेम ओसंडून वहाते आहे.
मात्र खटकले असे कि अश्या भावना व्यक्त करणार्या 'भावुक 'कवीचा ( म्हणजे तुमचा ) आयडी मात्र स्वभावप्रकृतीला साजेसा वाटत नाही.