व्हेज मान्चुरीअन ची बरीच चर्चा झालेली आहे. त्यामुळे मला सुद्धा ही रेसिपी द्यावीशी वाटली.
साहित्यः
मान्चुरीअन:
१ कप कोबी,गाजर्,फ्लॉवर् बारीक चिरून
१ च. बारीक चिरून हिरवी मिरची
१ च.चिरून लसूण
३ टे.स्पून मैदा
२ च. कॉर्नफ्लॉअर
१/२ टे.स्पून तेल
१/४ च. मिरपूड
१/४ च. अजिनोमोटो
१/४ च.व्हिनेगर
१/४ च. सोयासॉस
३/४ च. मीठ
वरील सर्व साहित्य एकत्र करून मान्चुरीअन तेलात तळून घेणे.
ग्रेव्ही: २ टे.स्पून कॉर्नफ्लॉअर
१ सपाट टे.स्पून सोयासॉस
१/२ च.अजिनोमोटो
२ च. साखर
१ च.मीठ
३/४ च. व्हिनेगर
१ सपाट च. चिलीसॉस
१टे.स्पून तेल
३/४ टे.स्पून हिरवी मिरची
१टे.स्पून लसूण
१.च्.चिरून आलं
१. ग्रेव्ही साठी प्रथम २ कप पाण्यात कॉर्नफ्लॉअर,सोयासॉस, अजिनोमोटो, साखर, मीठ्,व्हिनेगर, चिलीसॉस घालणे.
२.१ टे.स्पून तेलावर, हिरवीमिरची, लसूण, आलं परतणे वरील तयार पाणी (नं.१) घालून २ मि.उकळणे.
३.मान्चुरीअन घालून २ मि. उकळणे चवीनुसार मीठ घालणे. वरून कांदापात घालून फ्राईड राईस बरोबर सर्व्ह करणे.
प्रतिक्रिया
4 Apr 2008 - 3:15 pm | विसोबा खेचर
नेहमीप्रमाणेच सह्ही रेसिपी!
अजूनही आने दो!
आपला,
(दारूसोबत क्वचित प्रसंगी ड्राय व्हेज किंवा चिकन मांचुरियन खाणारा!) तात्या.
--
एरवी आपले चणेच बरे पडतात! :)
4 Apr 2008 - 7:29 pm | प्राजु
मला वाटलेच होते की यावेळी तू व्हेज मंच्युरियन ची रेसिपी देणार. मी वाटच बघत होते.
मस्त रेसिपी.
स्वाती, तू कोल्हापूरला कधी जाणार आहेस. नुकत्यात जाणार आहेस का? असशील तर सांग, मी आहेच तिथे, माझ्या लिष्ट मध्ये तुझ्याघरी येण्याचं ही लिहून ठवेन. :)))
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
4 Apr 2008 - 3:24 pm | मनस्वी
धन्यवाद स्वातीताई. छान रेसिपी दिलीत!
4 Apr 2008 - 4:03 pm | स्वाती दिनेश
खूप दिवसात केले नाही मांचुरियन.. आता करायलाच हवे..
मी थोडे से वेगळ्या प्रकारे करते.आलं मिरची लसणाची पेस्ट करते आणि फ्लॉवर घेत नाही.फक्त कोबी,गाजर घेते.
स्वाती
4 Apr 2008 - 11:24 pm | वरदा
पण ते अजिनोमोटो पोटाला चांगलं नाही म्हणतात ते खरं का?
5 Apr 2008 - 12:32 am | विसोबा खेचर
केव्हातरी ठीक आहे, परंतु वरचेवर आणि जास्त कलावधीकरता याचे सेवन खाल्यास ते पोटाच्या कर्करोगाचे एक महत्वाचे कारण ठरते, असे मेडिकल सायन्स सांगते!
तात्या.
5 Apr 2008 - 5:28 am | शैलेश दामले
उत्तम
तात्या,
भाज्या ऍवजी छोटे मक्यची कणस घातलीत तर तुम्हाला आणखी एक चखणा तयार करता येईल.
4 Oct 2011 - 5:56 pm | विजुभाऊ
झक्कास.