प्रेरणा... मोगरा... आणि आमचे परममित्र .. होय तोच तो ... निवासी लांडगा ;)
आज भल्या दुपारी ,
कुठुन हा घागरा कडमडला.
कॅफेमध्येच डोळ्यासमोर ,
तुझा मुखडा सुर्यासारखा अवतरला.
मग त्या सोनेरी किरणात ,
मी सर्वांगी न्हाऊन निघालो.
तुझ्या मदहोश हसण्यामध्ये ,
नकळत स्वत:ला हरवुन गेलो.
जेंव्हा पुर्ण जाग आली ,
माझ्या गालावर खुलली होती लाली.
खरं सांग बये ,
ही करामत आपोआप झाली ,
की दुपादुपारी तुझ्या हातांनी ,
बिन तोड गोलंदाजी केली .
प्रतिक्रिया
2 Aug 2010 - 6:04 pm | केशवसुमार
अवलिया शेठ,
परा च्यान बघतुया नव टारगट सॉरी टारगेट धरलया. ..
बाकी चालू दे..
(वाचक)केशवसुमार
2 Aug 2010 - 6:07 pm | छोटा डॉन
मस्त कविता ...
तसेही तुमची प्रेरणा असलेले मित्र लाल झालेले गाल आणि निळे-काळे पडलेले डोळे ह्या अवतारात अज्जिबात चांगले दिसत नाहीत. ;)
2 Aug 2010 - 6:15 pm | बिपिन कार्यकर्ते
ओह्ह्ह्ह!!! आत्ता कळले, परवा आमचा एक मित्र डेंटिस्टकडे गेलो होतो म्हणून गाल सुजलाय असं का सांगत होता ते...
खुद के साथ बातां: या नानाला च्यायला सगळ्या आतल्या बातम्या बरोब्बर ठाऊक असतात.
2 Aug 2010 - 6:19 pm | चतुरंग
म्हणून ती प्रतिक्रिया आली होती होय 'निवासी लांडगा' म्हणून? ;)
(खुद के साथ बातां : रंगा, बिकानं परस्पर तुझा 'खुद के साथ बातां' ट्रेडमार्क वापरायला सुरुवात केलेई दिसते! :?)
(अनिवासी)चतुरंग
2 Aug 2010 - 6:22 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
च्यायला =)) =)) पार ठरवुन बाजार उठवतात !!
2 Aug 2010 - 6:55 pm | मेघवेडा
हा हा हा!
दिलीपकुमारांचा मोगरा तसाच उरला की या अमरीशपुरींच्या घागर्यापुढे! =)) =))
2 Aug 2010 - 7:19 pm | प्रभो
=)) =)) =))
2 Aug 2010 - 9:21 pm | मस्त कलंदर
अच्छा.... हा घागरा होय?? मला वाटले अंदाज अपना अपना मध्ये आमिर खान म्हणतो तो, "गोगोजी, आपका घागरा!!!"
चालू द्या...
(निवासी)
2 Aug 2010 - 10:15 pm | असुर
"कॅफेमध्येच डोळ्यासमोर ,
तुझा मुखडा सुर्यासारखा अवतरला"
यातला 'कॅफे', 'कॉफी'वाला की 'इंटरनेट' वाला हे कळलं तर जास्त मजा येईल!
-असुर
2 Aug 2010 - 10:46 pm | श्रावण मोडक
आज मला सुजाता मस्तानीच्या एरियात सारखं दोस्त दोस्त ना रहा... ऐकू येत होतं. कारण आत्ता कळालं.