“ म्याच फिक्सिंग “

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
2 Aug 2010 - 1:09 pm


“ म्याच फिक्सिंग “

अजय होतो आजवर
हार नव्हती पाहिली,
पाहिली ती बारबार
इष्कात तुझिया पाहिली.

विजयांत स्वजनांच्या
अश्रू ढाळू ते आम्ही नव्हे,
हर्ष विजयाचा तुझा
हिराऊ तेहि आम्ही नव्हे.

जिंकण्याचा आनन्द तुजला
पराजित आम्ही ऎसे नसे,
पाहण्या सदैव विजयी तुला
“म्याच फिक्सिंग “ अमुचेच असे..

निरंजन वहाळेकर

शृंगारवीररसकविता

प्रतिक्रिया

पॅपिलॉन's picture

8 Aug 2010 - 6:15 pm | पॅपिलॉन

भाऊसाहेब पाटणकरांची कॉपी!