अनुभवींनी मार्गदर्शन करावे.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जे न देखे रवी...
1 Aug 2010 - 2:09 pm

आज आम्ही पण एक नंबर घेउन 'मैत्रीचा प्रस्ताव' मांडणार आहोत्,नकार येणार नाही............पण आलाच तर रात्री धुडगुस घालणार हे नक्की!
पण खरच असा धुडगुस नाही घालायचा आम्हाला,उगाच मित्रांना आज त्रास नको.मी ज्या व्यक्तीला आज मैत्रीसाठी विचारणार आहे,त्या व्यक्तीला मी फक्त ३-४ दीवसच भेटलो आहे(४ महीन्यांपुर्वी).आम्ही त्या दीवसांत खुप बोललो पण त्यांनंतर मी 'हीच्याशी जवळीक वाढ्वली तर परीक्षेत १२ वाजतील' म्हणुन तिच्याशी कायमचा संपर्क मोडुन टाकला.(संपर्क ठेवायला नंबर नव्हताच ती गोष्ट वेगळी!)
आज तिला मैत्रीसाठी विचारायच आहे.बोलण फोनवर होईल.'मी कोण' हे थोडक्यात सांगुन होईल.
पण सुरवात कशी व काय करावी??
व नंतर बोलण कस वाढवायच्,नक्की काय बोलायच?

काही सुचवाल का??

भयानकनाट्य

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

1 Aug 2010 - 2:11 pm | ऋषिकेश

ही कविता आहे का? (असुही शकते हल्ली कविता कशाही लिहिता येतात ;) )
लेखन "जे न देखे रवी"त बघुन गोंधळलो..

शानबा५१२'s picture

1 Aug 2010 - 2:47 pm | शानबा५१२

(बाहेर पाउस ठ्यो ठ्यो करत पडतोय आणि माझ्या दीलाची धडकन पण वाढते आहे.
माझ्या मनात काही चुकीच नाही मग कॉल करुन मैत्री करायला काय हरकत आहे,असा विचार मनात येतोय.)
मी विचार करतोय की मी पहीला यसयम्यस लिहतो,म्हणजे 'नकार'(नह्हीssss I can't take it)'वाचावा' लागेल व दु:ख डोळ्यातुन दीलात उतरेल,'कानातुन दीलात' हा मार्ग कठीण आहे.

असो..............आणि हो,नको ते वात्रट प्रतिसाद लिहु नका,मला आपला प्रतिसाद आवडला तर १०८ तिर्थक्षेत्र केल्याच पुण्य तुम्हाला लागेल,तेव्हा प्लीझ 'विचार करुन' मदत करा.

अप्पा जोगळेकर's picture

1 Aug 2010 - 2:50 pm | अप्पा जोगळेकर

तिने हा धागा पाहिला तर लटकशील हां.

राजेश घासकडवी's picture

1 Aug 2010 - 2:13 pm | राजेश घासकडवी

शानबाजी,

हे लेखन जे न देखे रवी ऐवजी जनातलं मनातलं मध्ये यावं असं नाही का वाटत?

राजेश

कविता विडंबनाच्या प्रतिक्षेत गुर्जी,

Nile's picture

1 Aug 2010 - 2:23 pm | Nile

=)) =))

गोगोल's picture

1 Aug 2010 - 2:13 pm | गोगोल

हेलो म्हणून सुरूवात करा.

अवलिया's picture

1 Aug 2010 - 2:14 pm | अवलिया

फोन नंबर आहे ना बरोबर?

माझं नाव ग्यानबा म्हणुन सुरुवात करा. पुढे काही बोलायला लागणारच नाही!

प्रकाश घाटपांडे's picture

1 Aug 2010 - 2:20 pm | प्रकाश घाटपांडे

पहिल्या छुट नीस्त हॅहॅहॅ करा
मैत्री न्हाई झाली तर शैत्री नक्की व्हईन.

काय पण बोला पण ते 'स्वयंपाक येतो का?' विचारु नका म्हणजे झालं ;)

अवलिया's picture

1 Aug 2010 - 2:26 pm | अवलिया

हा हा हा

अप्पा जोगळेकर's picture

1 Aug 2010 - 2:28 pm | अप्पा जोगळेकर

'स्वयंपाक येतो का?' विचारु नका म्हणजे झालं
+१.
मोदक येतात का हे तर अजिबात विचारु नकोस रे शानबा.

अप्पा जोगळेकर's picture

1 Aug 2010 - 2:25 pm | अप्पा जोगळेकर

लगे रहो शानबा. नंबर का नाही घेतलास? ३-४ महिने खूप मोठा टाइमस्पॅन आहे आणि हल्ली काँपीटीशन खूप असते. स्पर्धेचं युग आहे. आता तरी घेव नंबर. चांगल्या उपक्रमासाठी माझ्याकडून शुभेच्छा.
आपुण बी जाळं टाकून बसलूया पण मासाच घावंना.

शानबा५१२'s picture

1 Aug 2010 - 2:52 pm | शानबा५१२

अप्पा,तु काय बी बोलुन घाबरवु नको.त्य यका गोष्टीची मला भ्या वाटती की तिचा बायफ्रेंड हाय की नाय त!!

आन कोन अस्ला बी तर आमी पायजे तवा 'राम राम' करायला तयार असु.

पाषाणभेद's picture

1 Aug 2010 - 2:33 pm | पाषाणभेद

काही हरकत नाही लेख चुकीच्या जागी आला तरी. तुमच्या मनात आज तर त्या व्यक्ती प्रती काव्यात्मक भाव आहेत तेच या ठिकाणी लेख असण्याचे कारण होवू शकते.
डायरेक बोलण्याईतके बेसीक बोलणे आधी झाले असल्यास पुढे जायला काही हरकत नाही. बिनधास्त विचारून टाका. काय सांगावे तिलाही तुम्हीच आधी विचारावे असे वाटत असेल?
बोलून टाका नाहीतर गाडी सुटून जायची अन मग जन्मभर स्टँडावर सार्वजनीक बसने फिरावे लागायचे.
आजचा दिवस तर साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस. बेस्ट ऑफ लक.

अनुप्रिया's picture

1 Aug 2010 - 6:56 pm | अनुप्रिया

=)) + =))

नितिन थत्ते's picture

1 Aug 2010 - 9:39 pm | नितिन थत्ते

मज्यशि मय्त रि क्रनार क?

असे विचारा.

विनायक प्रभू's picture

1 Aug 2010 - 10:11 pm | विनायक प्रभू

आहे बॉ तुमची.
अहो लोकांना कुठे बोलवताय मार्गदर्शनाला.
तुमचा तुम्ही शोधा.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

1 Aug 2010 - 11:42 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

.... काय त्रास देतात ना लोक?..
शानबा मला आधी सांगा कि तुम्हाला फक्त मैत्री अपेक्षित आहे कि मैत्रीतुन प्रेमाकडे जायचे आहे?
१) मैत्री २) मैत्रीतुन प्रेमाकडे

सोल्युशन क्र. १ : मैत्री
...जर तुमचा उद्देश फक्त मैत्री असेल तर.... तुम्हाला इतकी भीड मनात ठेवायची गरज नाहीये. तुमच्या आणि तिच्या कॉमन आवडीच्या विषयापासुन बोलायला सुरु करा...म्हणजे एखादं पुस्तक्,...एखादं गाणं..... तुम्ही अमुक गाणं ऐकलं आहे का..किंवा एखादं पुस्तक वाचलय का?....पिक्चर ... हे पाहिलय का? वगैरे वगैरे. पण कॄपा करुन " मला फ्रेंडशिप देणार का?" असे मात्र विचारु नका. आमच्या कोल्हापुरात विचारतात असे...इतक्या वर्षात मला अजुन कळलेलं नाहिये फ्रेंडशिप देतात कशी? अरे? ती काय भांडंभर साखर आहे का.. हो देते की म्हणायला! काय्य्च्य्या काय....! असो.
जर तुमचा संवाद तुम्हाला अपेक्षित असेल तसा फुलत गेला....तर तुम्हाला वेगळं काही विचारायची गरजच काय?
...आणि जर नाही वाढला संवाद्....तर तुम्हाला तुमचे उत्तर आपोआपच मिळेल.

सोल्युशन क्र. २ : मैत्रीतूम प्रेमाकडे
....वरील प्रमाणे...तुमच्या अपेक्षेप्रमाणे जर मैत्री झाली..... थोडा काळ जाऊ दे...मग तुम्ही विचारु शकता ना....कि आपले विचार्..आवडी-निवडी जुळतात्...मला तुला अजुन जाणुन घ्यायला आवडेल इ.इ.इ.

पण असे स्क्रिप्ट वाचल्यासारखे नका विचारु.