साहित्यसंपदा.कॉम

अभिमोहित's picture
अभिमोहित in जनातलं, मनातलं
1 Aug 2010 - 10:00 am

"आजच्या पिढीला वाचण्याची सवयच नाही" हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. पण त्यांना वाचायला आवडतील अशी पुस्तके वाचकांपर्यंत पोहचवणारी प्रभावी यंत्रणाच आज आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यातच वाचनालयांची स्थितीही म्हणावी तशी समाधानकारक नाही. आपल्याला हव्या त्या पुस्तकांसाठी दिवसेंदिवस वाट बघावी लागते. चोवीस तास ऑनलाईन असणारे, पुस्तकांवरही तितकेच प्रेम करतात, पण आपल्याला पाहिजे असलेल्या पुस्तकासाठी असे दिवसेंदिवस वाट पहाणे त्याना पटत नाही. वाचायची इच्छा असुनही या तरुण वाचकांपर्यंत पुस्तक पोहचतच नाही. पुस्तकं त्यांच्या टप्यात आली तर वाचन संस्कृती अजुन वाढेल.
आपली कितीतरी मराठी मंडळी नोकरी धंद्याच्या निमित्ताने महाराष्ट्रा बाहेर व भारताबाहेर राहतात. त्यांना वाचनालयाच्या स्वरुपात खूप पुस्तकं वाचावयास मिळत नाहीत.
हे ओळखुनच औरंगाबादच्या फ़झीसॉफ़्ट सॉफ़्टवेअर्स ह्या कंपनीने "साहित्यसंपदा.कॉम" ही पहिली-वहिली "ऑनलाईन लायब्ररी" सुरु केली आहे. "साहित्यसंपदा.कॉम" मध्ये वाचकांना विविध भाषांतील पुस्तके ई-वाचनालयाच्या स्वरुपात वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जसे आपण वाचनालयात जाऊन वाचण्यासाठी पुस्तक घेऊन येतो त्याचप्रकारे या ई-वाचनालयात घरबसल्या आपल्या आवडीची पुस्तके निवडून वाचता येणार आहेत. तसेच या वाचनालयाचे दर ही अत्यंत अल्प ठेवण्यात आले आहेत. तसेच यामधे ऑनलाईन पुस्तक खरेदीचीही सोय आहे. पैसे भरण्यासाठी "ई-पेमेंट" ची सुविधा आहे. वाचकांना प्रिपेड सारखे २००, ५००, १००० इ. रुपये भरुन मेंबर होता येते. दर महिना रु. ३० इतके कमी शुल्क फी स्वरुपात वळते केले जातात. तसेच पुस्तक वाचण्यासाठी निवडल्यावर, वाचण्याची किंमत रु. ३/४/५/७/८/१० इ. वळती केली जाते. वाचकाला आपले अकाऊंट बघता येते.
ह्या वेबसाईटचे उद़्घाटन दि. १ मार्च २०१० रोजी पुणे येथे डॉ. अनील अवचट यांच्या हस्ते झाले. साहित्यसंमेलनाच्या दिवशी दि. २६ मार्च २०१० पासुन ही वेबसाईट वाचकांच्या सेवेत सुरु झाली आहे. वाचकांचाही याला अतिशय चांगला प्रतिसाद लाभला आहे. सभासद संख्येने शतक पार केले आहे.
या संकल्पनेला लेखकांचा अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अनेक नामवंत लेखकांची पुस्तके उपलब्ध केली आहेत तसेच अनेक नामांकित पुस्तके यावर उपलब्ध करण्याचे काम अविरत चालु राहणार आहे. वाचकांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी या वेबसाईट चे मेंबर व्हावे अशी विनंती साहित्यसंपदा चमु ने केली आहे.
यामधे ना.सी.फडके, मृणालिनी जोगळेकर, भालचंद्र नेमाडे, बाबा भांड , ना.धो. महानोर, रा.रं बोराडे, माधुरी शानभाग, अनुराधा वैद्य, रेखा बैजल, छाया महाजन, भा.द. खेर, राजेंद्र खेर, सविता भावे, चंद्रकुमार नलगे, राजीव तांबे, वि. आ. बुवा, विजया वाड, चंद्रकांत महामिने, अनंत मनोहर, मधुकर धर्मापुरीकर, संध्या रानडे, मंदाकिनी भारद्वाज, योगिनी वेंगुर्लेकर, अनंत उमरीकर, प्रमोदिनी वडके इ. अनेक लेखकांची पुस्तके आहेत.
अतिशय आगळ्यावेगळे वैशिष्ट्य या वेबसाईटमध्ये हे आहे कि यात वाचनाच्या किंमतीचा पन्नास टक्के भाग लेखकांनाही दिला जातो. लेखकांना आपली पुस्तके कोण वाचतो आहे हे बघता येते, तसेच अकाऊंट ही बघता येते.

साहित्यिकबातमी

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

1 Aug 2010 - 10:18 am | प्रकाश घाटपांडे

साहित्यसंपदा डॊट कॊम चा परिचय भुर्जपत्र ते वेबपेज कार्यक्रमात झाला.

निखिल देशपांडे's picture

1 Aug 2010 - 12:51 pm | निखिल देशपांडे

साईट वापरतो आहे..
पण काही मुख्य न आवडलेल्या गोष्टी
१) साईटचा यु आय फारच रॉ आहे...
२) लॉगिन enter कि प्रेस ने होत नाही.
३) एकदा पेमेंट झाल्यावर माझे अकाउंट अप्रुव व्हायला जवळ्पास आठ दिवसांचा कालावधी लागला.

असो जसे सुचेल तशी सुचनेत भर घालेल

अभिमोहित's picture

1 Aug 2010 - 4:58 pm | अभिमोहित

निखिल,

तुमच्या सुचनांबद्दल धन्यवाद. आम्ही नक्कीच सुधारणा करु. पण आतापर्यंत तुम्ही फक्त १ च पुस्तक वाचले आहे.
तुमचे पेमेंट आम्हाला १४/५ ला मिळाले. त्यानंतर १७/५ ते अप्रुव झाले. २ दिवस उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहोत.

अप्पा जोगळेकर's picture

1 Aug 2010 - 5:19 pm | अप्पा जोगळेकर

ही झैरात दिल्याबद्दल मिपा व्यवस्थापनाला पैसे द्यावे लागले का?