स्वतः मळ्यात उतरायचे आहे

कळस..'s picture
कळस.. in जनातलं, मनातलं
31 Jul 2010 - 7:57 pm

राम राम...

मंडळी........... लोकं गावाहून मुंबई ला जातात मी मुंबई हून गावाकडे आलोय
मिसळगावात प्रवेश दिल्याबद्दल सरपंचांचे आभार ..............

हे गाव फारच सुंदर आहे असे ऐकले आहे.
मराठमोठे मोकळे वातावरण, पाठांचे मळे, पद्यांच्या सरिता, खाद्यांच्या बागायती, गप्पांचा पारा , वैश्विक वारा..

सारे पहिले आहे आज आजमवयाचे आहे. स्वतः मळ्यात उतरायचे आहे. बस मायबापांना विनंती आहे थोडीशी सुपीक जमीन देऊन गरिबावर उपकार करावेत आणि मध्ये मध्ये थोड्या शाब्दिक खताची खुराक पुरवावी. आता गावकरी म्हटल्यावर शेजार धर्म आलाच. बाकी माझ मी भागवीन..

आपला नवीन मिसळगावकर

हे ठिकाणसद्भावना

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

31 Jul 2010 - 9:16 pm | नेत्रेश

या सुंदर गावाला अधीक सुंदर करण्यासाठी हातभार लावालच.... पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

आपला
गावकरी

शानबा५१२'s picture

31 Jul 2010 - 9:35 pm | शानबा५१२

मराठमोठे

म्हणजे मराठी लोक जास्त आहेत अस म्हणायच आहे का?
मला नवीन मराठी शब्दाची ओळख करुन दील्याबद्दल धन्यवाद.
पण ह्या गावात भांडखोर लोक खुप आहेत्,तेव्हा त्यांच्याशी वचावचा भांडायच्या तयारीत रहा.
आणि काही स्त्री द्वेष्ट्या लेखांवर प्रतिक्रीया देउ नका.

जय हींद्,जय बंगाल.

मृण्मयी दीक्षित's picture

1 Aug 2010 - 12:11 pm | मृण्मयी दीक्षित

खूप यत्न केल्या नंतर आता आपणही माझ्या प्रमाणेच नवीन सदस्य आहत काय ?

मृण्मयी दीक्षित's picture

1 Aug 2010 - 12:11 pm | मृण्मयी दीक्षित

खूप यत्न केल्या नंतर आता आपणही माझ्या प्रमाणेच नवीन सदस्य आहत काय ?