मला आवडलेली कविता

प्रगती's picture
प्रगती in जे न देखे रवी...
3 Apr 2008 - 5:33 pm

उडत्या पाख्ररांना
परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरटयाचे काय आहे
बांधता येईल केव्हाही
नजरेत सदा क्षिति़ज्यांच्याही
पलिकडे झेप घेण्याची
जिद्द असावी.

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

3 Apr 2008 - 5:56 pm | मनस्वी

किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झरे वाहती
पानोपानी फुले बहरती
स्वप्नी आले काही
स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई
किलबिल किलबिल पक्षी बोलती ऽऽ
===================
ससा तो ससा तो कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लावीली
वेगेवेगे धाउ नि डोंगरावर जाउ
ही शर्यत रे आपुली
===================
कविता म्हटल्यावर मला एकदम माझी बालवाडीच आठवली.
बाकी पाठ्यपुस्तकात कुसुमाग्रज, पाडगांवकर, शांता शेळके, बहिणाबाई इ.च्या पण उत्तमोत्तम कविता होत्या.

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2008 - 11:52 am | पिवळा डांबिस

:))

कोणी तरी माझ्या आवडत्या पण स॑ग्रहात नसलेल्या कविता पाठवाल का?
तेव्हा एक कर ... नारायण सुर्वे
कणा ... कुसुमाग्र्ज.

(आगाऊ) धन्यवाद.
ललितप्रेमी सोम.

मानस's picture

5 Apr 2008 - 12:14 pm | मानस

ओळखलत का सर मला ? पावसात आला कोणी..
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी…

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून..
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून…
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली..
मोकळया हाती जाईल कशी बायको फक्त वाचली…
भिंत खचली , चूल विझली, होते न्हवते नेले..
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले…

कारभारणीला घेउन संगे, सर आता लढतो आहे..
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे…
खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला..
पैसे नकोत सर, पण जरा एकटेपणा वाटला…
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..
पाठिवरती हात ठेऊन नुसते 'लढ' म्हणा ...…

पंकज's picture

5 Apr 2008 - 12:45 pm | पंकज

तेंव्हा एक कर !

जेंव्हा मी अस्तित्वाच्या पोकळीत नसेन
तेंव्हा एक कर
तू निःशंक मनाने डोळे पूस
ठीकच आहे, चार दिवस धपापेल जीव गदगदेल!
उतू जाणारे हुंदके आवर
कढ आवर, नवे हिरवे चुडे भर
उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नको!
खुशाल; खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर
मला स्मरून कर,
हवे तर विस्मरून कर!

- नारायण सुर्वे.

मदनबाण's picture

5 Apr 2008 - 5:12 pm | मदनबाण

नजरेत सदा क्षिति़ज्यांच्याही
पलिकडे झेप घेण्याची
जिद्द असावी.

मस्तच !!!!!

मि.पा वर तुझे स्वागत.....

(तात्याबा महारांजाच्या पंथातील नवीन वारकरी)
मदनबाण

विद्याधर३१'s picture

5 Apr 2008 - 8:28 pm | विद्याधर३१

धीवर पक्ष्यावर असलेली ही कविता अम्हि शाळेत मोठ्मोठ्याने म्हणत असु.....

विद्याधर

सोम's picture

7 Apr 2008 - 11:43 am | सोम

माझ्या आवडत्या कविता पाठविल्याबद्दल...धन्यवाद.

नसनखवडी's picture

7 Apr 2008 - 11:54 am | नसनखवडी

घरटयाचे काय आहे
बांधता येईल केव्हाही

असे प्रत्यक्शात होते का?

प्रियाली