माझे बाबा
बंडू म्हणाला माझे बाबा ताकदवान
ऑफीसात सारे झुकवतात मान
राम म्हणाला माझे बाबा आहेत मस्त
४ डिश भेळपुरी करतात फस्त
शाम म्हणाला माझे बाबा करतात मस्ती
मातीमधली जिंकतात कुस्ती
खंडू म्हणाला माझे बाबा शेतकरी
शेतात जावून उसाला पाणी भरी
राणी म्हणाला माझे बाबा गॅरेजमधे जातात
स्कुटर कारचे ऑपरेशन करतात
चित्रा म्हणाली माझे बाबा डॉक्टर
पण नाटकात असतात अॅक्टर
सुंदर म्हणाला माझे बाबा आहेत बिल्डर
क्रिकेटमध्ये सर्वात बेस्ट फिल्डर
चिनू म्हणाला माझे बाबा शाळेत शिक्षक
लेख कविता नाटकांचे करतात परिक्षण
गणू रडत म्हणाला माझे बाबा आता नाहीत
ते काय होते मला नाही माहीत
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२५/०७/२०१०
प्रतिक्रिया
26 Jul 2010 - 9:52 am | शानबा५१२
अरे त्याला कोणी सांगितल पण नाही काय?
उगीचच रडतोय साला,काय कटकट आहे!!
26 Jul 2010 - 11:12 am | स्पंदना
चिंटु म्हणाला माझे बाबा पढवती वेद
मि.पा.वर असतात नाव त्यांचे पाषाणभेद.
(हलके घ्या)
27 Jul 2010 - 7:25 am | ओंकार
बालगीताचा शेवट फारच खराब केलात...
27 Jul 2010 - 8:58 am | पाषाणभेद
तेच तर... वेदना जाणवू द्यायची होती ती जाणवली एकदाची.