मांचुरियन आणि शेजवान !

मीनल's picture
मीनल in जनातलं, मनातलं
3 Apr 2008 - 5:43 am

मिपावरचा व्हेज मांचुरियन आणि शेजवान फ्राईड राईसचा भाग्यश्रीने पाठवलेला फोटो पाहून ह्या लेखाला प्रेरणा मिळाली.

चीनच्या उत्तरेकडला एक पदार्थ तर एक दक्षिणेकडचा.
म्हणजे दिल्ली राईस आणि सांबार यासारखा.

मंगोलिया हा चीनचा उत्तरेकडला भाग.मुख्यत्वे Noprth East side.मांचू हे तिथले रहिवाशी.
त्यांच्याशी संबंधित म्हणजे मांचुरिअन.म्हणजे मांचुरियन फूड ,कपडे ,कार्पेट्स्,बूट ,टोप्या वगैरे.
मांचुरियन झाले विशेषण.`इंडिअन` सारखे.
फार उत्तरेकडला भाग हा.तिथे हिवाळ्यात खूप खूप थंडी असते .त्यामुळे थंडीचा बचाव करण्यासाठी कच्च्या मांसाचे अन्न खाल्ले जाते.मांस कमी शिजवून क्रंची ठेवलेले असते .तसेच भाज्या ,फळे याचे उत्पादन कठिण.यामुळे ड्राय धान्य ,मासे ही अन्नात असतात.
तिथे स्प्रिंग सुंदर असतो.लांबच्या लांब हिरवळवर घोड्यावरून रपेट करता येते .नाच गाणी ,समारंभ ,सणवार गडद रंगित कपडे घालून अतिउत्साहात पार पडतात.
तिथे लोकरीच्या वस्तू म्हणजे कपडे ,कार्पेट्स अतिशय स्वस्त आणि वेगळ्या प्रकारची मिळतात.मुसलमान धर्मिय लोक बरेच आहेत तिथे.बोलायला मवाळ दिसले तरी काहीसे खूनशी असतात असे ऐकले.

सिचुआन हा चीन चा दक्षिणेकडला भाग किंवा प्रॉव्हिन्स .तिथले लोक चीनी.
त्याच्याशी संबंधित म्हणजे सिचुआन.भारतात त्यालाच शेजवान म्हणतात.
चीनी भाषे ते स चुआन आहे.स (उच्चार `त्च्स`) म्हणजे चार .चुआन म्हणजे नद्या.
अर्थातच हा प्रदेश Yangtze नदीच्या चार tributaries --Minjiang, Dadu, Wujiang , Jialing यांनी भौगोलिक रित्या संपन्न झाला आहे.तरीही तिथे गरिबी बरीच आहे.
या प्रदेशाचे मसालेदार अन्न जगप्रसिध्द आहे.
माझी मोलकरीण त्च्सचुआनची होती.कांदा,गाजर ,भोपळी मिरची किंवा इतरही भाज्या सुरीने झट्पट इतक्या इतक्या बारिक चिरायची की वाटायच यंत्राने कापल्या आहेत.
ती नूडल्स मस्त करायची. मऊसर नूडल्स भाज्याघालून चविष्ट लागायच्या.
I very much miss my maid here in USA.

चीनी पाकककृतीमधे जेवण शिजवण्यापेक्षा तयारीतच वेळ अधिक घालवतात.भाज्या ,मांस ,मासे बारिक चिरून ठेवायचे.
कांदा जवळ जवळ नाहीच वापरत.लसणाचा वापर जास्त.लाल मिरच्या ,मिरी सारखा उग्रवासाचा मसालाही घालतात.
एकदा का सर्व तयारी झाली की मोठ्या आगीवर भांड(कठई) ठेवायच आणि तेलात पटापटा परतून अन्न परतायच.चार ,पाच मिनिटात क्रंची अन्न तयार .
मग ते एका पसरट काचेच्या वाडग्यात घेऊन टेबलावर ठेवायच .सर्वांनी काडयांनी उचलून आपापल्या छोट्या बाउल्स मधे घेऊन भाताबरोबर खायच.
उदर भरण्याच्या यज्ञ कर्मात ताट ,वाट्या , पेले ,चमचे या उपकरणांची जरूरी नाही. फक्त हातची ३ बोट त्यात धरलेल्या २ काड्या .
अन्नाबरोबर पाणी पित नाही. वेगळा वेगळा चहा पितात. गरम सूप जेवणाच्या शेवटी.थंड पाणी प्यायल्यावर पोटातल्या अन्नातले ऑईल सॉलिडिफाय होते.कोलेस्ट्रॉल वाढते असे मानतात.

चिनी चहाबद्दल नंतर लिहेन.

पाकक्रियामाहिती

प्रतिक्रिया

प्राजु's picture

3 Apr 2008 - 5:50 am | प्राजु

अतिशय माहितीपूर्ण लेख.
शेजवान आणि मांच्युरियन हे शब्द असे आलेले आहेत पदार्थामध्ये हे माहितीच नव्हते. धन्यवाद मीनल..
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2008 - 7:24 am | पिवळा डांबिस

एक शंका,
कांदा जवळ जवळ नाहीच वापरत.लसणाचा वापर जास्त.
असं तुम्ही म्हणता. खरंहि असेल ते! पण भारतातील (गढवाली लोकांनी चायनीज बनून बनवलेल्या) चायनीज फूडमध्ये व अमेरिकन सिचुआन चायनीज फूडमध्येही कांदा मुबलक वापरलेला दिसतो. हे ऍडॅप्टेशन आहे की काय?

अधिक माहितीच्या अपेक्षेत...
इफ डांबिस कॅन कुक...
सो कॅन यू....

मीनल's picture

3 Apr 2008 - 6:39 pm | मीनल

हो. चीनी कांदा फार कमी वापरतात.
पण आपली पाककृती .हवी तशी बदल करावी.आपल्या जिभेला रूचेल तशी .
ती ऑथेंटिक नाही हे ही खरे.

ऑथेंटिक चायनीज कोणी परदेशी खाऊ शकत नाही.विश्वास ठेवा हे खरे आहे.
चीन मधे ही ऑथेंटिक चायनीजची टेस्ट डेव्हलप व्हायला बराच वेळ जातो.
नॉन्वव्हेज तर त्याहून बिकट!
आम्ही चायनीज पण फॉरेनर्ससाठी असलेल्या ठिकावी जात होतो जेवायला.
फक्त तिथेच व्हेज फूड मिळते .म्हणजे अंड ,कुठलाही प्राणी ,पक्षी अन्नात नको हे स्पष्ट केले तरच.

परदेशातील चायनीज पदार्थ तिथल्या लोकांना आवडतील असे बनवावे लागतात.त्यांच्या अन्नप्रकारांचा ,मसाल्यांचा अभ्यास करून.
नाहीतरे दुस-या दिवशी रेस्टॉरंट बंद करायची पाळी येईल.

ऑथेंटिक चायनीज वर ही लिहिण्यासारख्रे खूप आहे.ते प्रकार ,मसाले ,विविधता.

मीनल.

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2008 - 9:45 pm | पिवळा डांबिस

अधिक माहितीबद्द्ल आभारी आहे, मीनलताई!
बाकी,
ऑथेंटिक चायनीज कोणी परदेशी खाऊ शकत नाही.विश्वास ठेवा हे खरे आहे.
चीन मधे ही ऑथेंटिक चायनीजची टेस्ट डेव्हलप व्हायला बराच वेळ जातो.
नॉन्वव्हेज तर त्याहून बिकट!
आमचा पूर्ण विश्वास आहे! अहो मांसाहार करण्यात आमच्या कैक पिढ्या गेल्या पण ऑफिसातील चिनी सहकार्‍यांनी नुसता त्यांचा जेवणाचा डबा उघडला तरी आमच्या पोटात ढवळून येतं!!:))

मीनल's picture

4 Apr 2008 - 4:38 am | मीनल

जेवणाचा डब्याचा असा वास .तर ते खाल्ल्यावर तोंडाचा काय असेल?

माझ्या नव-याच्या ऑफिसमधले सर्व चीनी पेस्ट्,ब्रश घेऊन यायचे.ते ही मग मधे.
लंच टाईम झाल्यानंतर सर्व बेसिन्स ऑक्युपाईड असायची.
पण हे ब्रश करायचे मॅनर्स फक्त इंटर नॅशनल कंपनीतच बर का?

एखाद्या चीनी कंपनीत तोंडाची दुर्गंधी कॉमन असावी.
मा़झा नवरा म्हणायचा ,`` त्यांच्यात स्पर्धा असेल.तेरा बास मेरे बास से बूरा कैसा?``

मीनल.

सर्किट's picture

4 Apr 2008 - 6:52 am | सर्किट (not verified)

एखाद्या चीनी कंपनीत तोंडाची दुर्गंधी कॉमन असावी.
मा़झा नवरा म्हणायचा ,`` त्यांच्यात स्पर्धा असेल.तेरा बास मेरे बास से बूरा कैसा?``

आणि तिबेटविषयी त्याचे काय मत होते ?

ह्य निर्घृण चिन्यांविषयी अधिक वाचायला आवडेल.

- (अचिनी) सर्किट लामा

प्रभाकर पेठकर's picture

3 Apr 2008 - 11:11 pm | प्रभाकर पेठकर

ऑथेंटिक चायनीज वर ही लिहिण्यासारख्रे खूप आहे.ते प्रकार ,मसाले ,विविधता.

अरे व्वा... लिहा..लिहा. वाचक उतावळे आहेत.

विसोबा खेचर's picture

3 Apr 2008 - 9:50 am | विसोबा खेचर

छोटेखानी परंतु छान लेख आहे..

आपण चांगलं लिहिता, अजूनही थोडं मनमोकळ, दिलखुलास आणि भरभरून लिहू शकाल असा विश्वास आहे..

चिनी चहाची वाट पाहतो आहे...

तात्या.

भाग्यश्री's picture

3 Apr 2008 - 11:01 am | भाग्यश्री

वा.. मस्त झाला लेख... अधिक तपशीलात इथे लेखच टाकलात ते बरं केलंत...
शेजवानची उत्पत्ती कुठेतरी वाचली होती, पण मांचुरीयन बद्दल माहीती नवीनच...
धन्यवाद लेख लिहील्याबद्दल.. माझ्या त्या छायाचित्रावरून प्रेरणा मिळाली म्हणताय, मग अजुन वेगवेगळे फोटोज टाकते.. म्हणजे आम्हाला असे लेख वाचायला मिळतील..

मदनबाण's picture

3 Apr 2008 - 11:52 am | मदनबाण

सर्वांनी काडयांनी उचलून आपापल्या छोट्या बाउल्स मधे घेऊन भाताबरोबर खायच.
चामारी हे चायनीज लोक भात काड्यांनी खातात,त्यांचे इटींग स्किल मानाला हवे.

आपल्या इथेही गल्लोगल्ली चायनीज च्या गाड्या पाह्यला मिळतात,मी असेही ऐकले आहे की यात वापरला जाणारा कुठला तरी सॉस हा शरीराला अपायकारक असतो.
(अवांतरः-- आमच्या ऑफिस मधे जर कोणी चायनीज व्हिजीटर आलेला दिसला तर आम्ही म्हणतो मांच्युरियन आले वाटत कामधंध्याला.)

(आपला मदन ली बाण)

मीनल's picture

3 Apr 2008 - 7:09 pm | मीनल

चीनी भात ठिकळा ठिकळाचा असतो.थोडासा चिकट.
बासमतीचा भात केला तर एक एक शित वेचून वेचून खाऊन संपेपर्यंत पुन्हा जेवायची वेळ होईल.

चॉपस्टिक्सने अन्न उचलायच आणि न सांडता ते अचूक तोंडात घालायचे हे आपल्याला दिव्य वाटत असल तरी तिथेली चिल्ली पिल्ली पोरं चॉपस्टिक्सने अन्न अगदी पोटभर खातात.चांगली टगी असतात. गोरी ,गुब-या गालांची जाडी ,बारीक डोळ्यांची.

मी सर्व प्रथेम चॉपस्टिक्सने एका वाटीतले दाणे उचलून दुस-या शेजारच्या वाटीत घालायचे ही प्रॅक्टिस केली.
मग वाटी पासून ते तोंडापर्यंत अन्नाचा प्रवास .
तिथे आपले चमचे खास मागून घ्यावे लागतात. काही ठिकाणी सूपच्या चमच्यानेही जेवाव लागत चॉपस्टिक्सने येत नसेल तर.आपले चमचे मिळत नाहीत .

मीनल.

मीनल's picture

4 Apr 2008 - 4:11 am | मीनल

चीनी पदार्थात विशेषतः आपण हॉटेल्स मधे खातो त्या पदार्थात टेस्ट वाढवण्यासाठी सोय सॉस घालतात.त्यात सोडिअम जासत असते .ते शरिराला अपायकारक असते असे डॉक्टर्स म्हणतात.

माझ्या मुलाचा एक मित्र घरी आला होता.
मला येणारा एक नॉनव्हेज (मी मानते की अंड शाकाहारी नाही.कोंबड्यांना शाकाहारी अन्न दिलेले असले तरी त्यांची अंडी ही शाकाहारी नाहीत्.)म्हणजे अंड्याच ऑमलेट.ते मी त्याला करून दिले .ते त्याने सोय सॉसबरोबर खाल्ले.
वर म्हणाला ,`` You know Mrs .Gadre ,I never knew that Indian style egg omlet tastes so great with Chinese soy sauce.Thank you.``

मी पण उत्तर दिले ,``Welcome.It`s omlet that made soy sauce taste so great.That also Indian style omlet.``

नूडल्स मधे ही सोय सॉस घातले की चांगले लागते.चीन मधे सोय सोस चे अनेक प्रकार मिळतात.मी अनेक बाटल्या आणल्या .ऍक मनाजोगी मिळेल तर शप्पथ!
माझी मोलकरीण मात्र खूष असायची.
मग मी भारतातून मॅगी सोय सॉस न्यायला लागले चीन ला परतताना.

मीनल.

प्रभाकर पेठकर's picture

3 Apr 2008 - 2:50 pm | प्रभाकर पेठकर

मीनल,

बरीच माहिती पुरवली आहे. मंच्युरिअन आणि शेझवान ह्या पाक पद्धती त्या-त्या प्रदेशांच्या नावावरून आल्या आहेत एवढे माहीत होते पण अगदी दिल्ली राईस आणि सांबार इतके परस्पर विरोधी असेल असे वाटले नव्हते. पण तरीही, मंच्युरिअन आणि शेझवान, दोन्हींचा स्वाद एकत्रीत पणे घेतानाही खाद्यानंदात बाधा येत नाही. दिल्ली राईस आणि सांबाराचे मात्र तसे नाही. इथे विविधतेत फक्त 'विविधताच' दिसते.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Apr 2008 - 3:41 am | llपुण्याचे पेशवेll

तसे चायनीज खाणे मला फार आवडते आणि जर ते कळकट गाडीवरील असेल तर 'सोन्याहूनही पिवळे'. पण मध्यंतरी मी न्यू यॉर्कच्या 'चायना टाऊन' नामक भागात जेवायला गेलो होतो आमच्या चिनी वंशाच्या क्लायंट बरोबर. तिथे जेवायचे सोडा पण नुसते बसायचेही कष्ट घेववत नव्हते. इतका डोक्यात जाणारा वास. अरेरेरेरे.
अहो भाग्यश्रीने पाठवलेल्या चित्रातील राईस आणि माँचुरीयन पाहून इतके पाणी सुटले ना तोंडाला काय सांगू. अहाहा..
मीनलताई इतक्या सुंदर माहीती बद्दल धन्यवाद.
पुण्याचे पेशवे

नंदन's picture

4 Apr 2008 - 6:35 am | नंदन

माहितीपूर्ण लेख. चिनी चहा आणि ऑथेंटिक चिनी जेवणाबद्दल वाचायला आवडेल. डिम सम हा प्रकार ऑथेंटिक चायनीज मध्ये मोडतो का?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सर्किट's picture

4 Apr 2008 - 7:01 am | सर्किट (not verified)

भारतातल्या तिबेटी लोकांनी भारतीयांना आवडते, म्हणून छोट्य चोट्या गाड्यांतून चिनी जेवण विक्णे सुरू केले, कांदा लसूण टाकून.

चिनी युदधापासून निर्लज्ज भारतीय काहीही शिक्लेले नाहीयेत, ह्याचाच हा प्रत्यय, ठिक्ठिकणी येतो.

भारताच्या अरुणाचल प्रदेशातील ५० टक्के भाग चिन्यांनी काबीज केलेला आहे.

पण भारतातील अनेक लोक अद्याप जाताहेत, चिनी सरकारी आय टी कंपन्यांत काम करायला..

आणि वरून त्यांची तारीफ करणारे लेखही लिहिताहेत..

जियो !!

चीन मधील कुटुंबांना एका पेक्षा जास्त मुले व्हायला लगली, की दोनच ऑप्शन्स असतात. गर्भपात, किंवा चीन सोडून जाणे.

अशा सरकारचे, तेथील संस्कृतीचे, तिथल्या अन्नाचे कौतुक करणे सोडा.

मी चिनी खाणे सोडले आहे, तुम्ही कधी सोडणार ?

- दलाई सर्किट लामा

मीनल's picture

4 Apr 2008 - 7:02 am | मीनल

डिम सम हा अगदी पारंपारिक चीनी पदार्थ.त्याला बाव झ (Bao Zi )म्हणतात.
बाव म्हणजे बांधणे. Zi = `झ` (झी नाही )म्हणजे वस्तू (thing).
प्रत्येक सणाला केलाच जातो.
डिम सम म्हणजे बारिक चिरलेल्या भाज्या ,मांस /मासे ,तिळाच तेल ,मिठ,मिरची यांचे सारण भरलेला मोदक.
http://en.wikipedia.org/wiki/Baozi

Jiao Zi -तांदूळाच्या पिठीची लहान पुरी लाटून त्यात सारण भरायचे.
पुरी फोल्ड करायची ,करंजी सारखी दुमड घालायची ,पाण्यात टाकून उकडायची.नंतर पाण्यातून काढून खायची.पाणीही थोडेसे घ्यायच बुडवून खायला.
त्याला (Jiao Zi ) जाव झ म्हणतात.Jiao म्हणजे ट्रॅप करणे.म्हणजे बांधणेच समजा ना.
http://en.wikipedia.org/wiki/Jiaozi

करून पहा.वाईट लागत नाही.पण मोदकाची /करंजीची चव जावज /बावजला नाही.

मीनल.

मदनबाण's picture

4 Apr 2008 - 7:25 am | मदनबाण

चिनी युदधापासून निर्लज्ज भारतीय काहीही शिक्लेले नाहीयेत, ह्याचाच हा प्रत्यय, ठिक्ठिकणी येतो.
हे मात्र ख्ररे आहे,अजुन सुद्धा हिंदी चीनी भाई भाई चे गोडवे गावे वाटतात म्हणजे लाचारीची परिसीमाच आहे.अरे हा कुठला भाई जो दुसर्‍या भावाचीच XXमारायला धजावतो आहे.

तिबेट तर केव्हाच गेला, काही दिवसांनी नेपाळ ही जाईल्,मग भुतान.....

भारताच्या अरुणाचल प्रदेशातील ५० टक्के भाग चिन्यांनी काबीज केलेला आहे.
५०% काय पण १००% गेला तरी आमचे हे भोसमारीचे नेते लोक म्हणतील नकाशात दाखवल्या प्रमाणे तो भु-भाग आमचा आहे.आमचा कधी हातुन गेल्या नंतर ?????

चीन मधील कुटुंबांना एका पेक्षा जास्त मुले व्हायला लगली, की दोनच ऑप्शन्स असतात. गर्भपात, किंवा चीन सोडून जाणे.
नाहीतर आपल्या इथ लालु सारखे लोक अख्खी क्रिकेट ची टीम उभी करतात्.(राबडी देवी प्रसन्न)

(कट्टर हिंदूस्थानी)
मदनबाण

मीनल's picture

4 Apr 2008 - 7:27 am | मीनल

खर आहे .
मीनल.

सर्किट's picture

4 Apr 2008 - 8:26 am | सर्किट (not verified)

खरं काय आहे ?

चीनी सरकारने आजवर घडवलेले कोट्यावधी गर्भपात ?

सुदान मधील लाखो बलात्कार ?

तिबेटातील हजारो शांततावादी बौद्ध धर्मगुरूंची हत्या ?

उझगुर राष्ट्रांतील शेकडो निरपराध मुस्लिमांची अतिरेकी असल्याच्या आरोपावरून हत्या ?

स्वदेशी नागरीकांची फक्त पॉलिटब्युरोच्या डॉलर्स मुळे आर्थिक अडवणूक ?

काय, सत्य काय आहे ?

- (सत्यान्वेषी) सर्किट