या चर्चेतील मुद्दे वाचले
मुलतः कोणत्याही थोर व्यक्तीच्या बद्दल कुणाही सोम्यागोम्याने काहीही माहीती द्यावी कुणाही लंपट लेखकाने काहीही लिहावे अन शासनाने अशा लिखानावर बंदी आणली असता कुणाही येरागबाळ्याने न्यायालयात याचिका दाखल करावी की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे? हे कितपत योग्य आहे? आपल्या पैकी कितीतरी जण न्याय व्यवस्थेच्या या अन्यायी निर्णयाचे समर्थन करतांना दिसतात तेंव्हा न्यायाची चाड आपणाला आहे काय? हा प्रश्न निर्माण होतो. सावरकरांचे वाक्य अंदमान तुरुंगातुन हटविले तेंव्हा आक्रोश करनारे आपण आज शिवरायांच्या विरोधातील निकालाचे समर्थन करतांना आपले मन बुद्धी संस्कार गहाण टाकुन तर बोलत नाही आहोत ना........?
कुणा स्त्रीच्या चारित्र्यावर चिखलफेक करणार्याला कसले आले अभिव्यक्ती स्वातंत्र्य?
निषेध त्या न्याय व्यवस्थेचा अन त्या अन्यायी व्यवस्थेचे समर्थन करणारांचा....
प्रतिक्रिया
21 Jul 2010 - 6:25 pm | परिकथेतील राजकुमार
वा मस्त ! निषेध एकदम आवडला.
येउद्या अजुन असेच निषेध.
©º°¨¨°º© परालिया ©º°¨¨°º©
आमचे राज्य
21 Jul 2010 - 6:33 pm | llपुण्याचे पेशवेll
“It is always more difficult to fight against faith than against knowledge.”
हे सुप्रसिद्ध वाक्य आठवून गेले. बाकी धागा प्रवर्तकाशी अंशतः सहमत.
पण "आपले मन बुद्धी संस्कार गहाण टाकुन तर बोलत नाही आहोत ना........?" अशी वाक्यं प्रस्तुत धागाप्रवर्तकाच्या लेखात शोभत नाहीत असे वाटते.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
21 Jul 2010 - 6:35 pm | परिकथेतील राजकुमार
-१ असहमत आहे.
उलट ह्या वाक्याने लेखाला आणि त्यातील निषेधाला एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
21 Jul 2010 - 11:23 pm | अशोक पतिल
अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे काय ?
स्वातंत्र्य हे स्खलनाचे स्वातंत्र्यच असते. 'एखादे स्वातंत्र्य देणे' म्हणजे 'देणार्याला न आवडणारा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे' असेच असते.
रस्त्याने जाताना डाव्या बाजुने चलायचे , हा झाला नियम.
मधोमध चलायचे , हे झाले अभिव्यक्ति स्वातंत्र्य !
परिणाम ???????
24 Jul 2010 - 2:21 am | हुप्प्या
चालणे वा वाहन चालवणे हा घटनादत्त मूलभूत अधिकार आहे का? लेखनात वा अन्य अभिव्यक्तीमधे हे डावे आणि ते उजवे आणि आणि ते तिसरे मधोमध असले ढोबळ वर्गीकरण शक्य आहे का? आणि त्यात अमके चूक आणि अमके नाही असे ठरवणे इतके सहज शक्य आहे का? मला वाटत नाही.
वाहतूकीचे नियम आणि अभिव्यक्तीचे नियम ह्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. सरकारने पैसा देऊन रस्ते बांधलेले आहेत. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना उपयोग व्हावा म्हणून हे नियम आहेत. पुस्तकाचे तसे नाही. खाजगी पैसा वापरुन प्रकाशित केलेले पुस्तक ह्यावर किती नियम लागू करायचे ह्यावर मर्यादा आहेत. निदान प्रगत समाजात तरी त्या असतात. हुकुमशाही, धर्माधिष्टित सरकारे इथे अशा बंधनांना मर्यादा नसतात. पण भारतात अशी सरकारे यावीत असे कुणाला फार वाटत नसेल अशी आशा करतो.
22 Jul 2010 - 1:45 am | पंगा
प्रस्तुत चर्चाप्रस्तावात उल्लेखिलेली 'जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी' ही चर्चा आता नष्ट करण्यात आलेली आहे, असे दिसते.
त्या चर्चेत नष्ट करण्यासारखे असे मला तरी काही वाटले नाही, उलट ती चर्चा एकंदरीत उद्बोधक वाटली, एवढेच माझे मत या निमित्ताने नमूद करू इच्छितो.
धन्यवाद.
- पंडित गागाभट्ट.
धागा अप्रकाशित का झाला यासाठी दुसरी चर्चा मिसळपावावर असताना या धाग्यात उहापोह नको म्हणून खालील काही प्रतिसाद संपादित केले आहेत.
22 Jul 2010 - 4:24 pm | क्रेमर
ती चर्चा वाचनमात्र केली आहे. संपादकांनी श्री जंतू यांचा धागा उडवला असे लक्षात येत आहे. संपादकांच्या या निर्णयाचा निषेध. निषेध नोंदवण्यासाठी इतरत्र जागा न सापडल्याने निषेध येथे नोंदवत आहे.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.
22 Jul 2010 - 2:38 am | उमराणी सरकार
खल्लास
उमराणी सरकार
22 Jul 2010 - 7:16 am | डॉ.श्रीराम दिवटे
अभिव्यक्त झाल्याशिवाय खदखदीचा उद्रेक कसा करायचा?
*************************************
माझं पुस्तक, माझा ब्लॉग.
22 Jul 2010 - 11:42 am | मैत्र
मुलतः कोणत्याही थोर व्यक्तीच्या बद्दल कुणाही सोम्यागोम्याने काहीही माहीती द्यावी कुणाही लंपट लेखकाने काहीही लिहावे अन शासनाने अशा लिखानावर बंदी आणली असता कुणाही येरागबाळ्याने न्यायालयात याचिका दाखल करावी की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे? हे कितपत योग्य आहे?
--
अतिशय मान्य आहे. आणि मूळ चर्चेतही मान्य केले होते.
पण जसे तिथे म्हटले तेच इथे -->
आम्हा घरी धन - तुम्ही वर लिहिलेले हेच मोजमाप /अॅप्रोच (मराठी शब्द?) ब्रिगेडच्या समर्थ रामदास / संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दलच्या लिखाणालाही लावायला हवे. याही थोर व्यक्ती होत्या. दादोजी कोंडदेव हे काही इतक्या थोर व्यक्तींच्या रांगेत नाहीत. पण किमान ते महाराजांचे / शहाजीराजांचे निष्ठावंत सेवक म्हणून तरी आदराला पात्र आहेत. आणि याबाबत कुठल्याही इतिहासकारांचे दुमत नाही.
मग या सर्वांबद्दलचे गलिच्छ आणि अत्यंत उद्दामपणे मांडलेले लेखन हे लेनच्या एका पानाइतके किंबहुना जास्तच बंदी घालण्यायोग्य आणि निषेधार्ह आहे. त्याने माफी तरी मागितली भावना दुखावण्याचा हेतू नव्हता सांगून. इथे तर उलट प्रकार आहे.
अर्थात हे लेनचे समर्थन अजिबात नव्हे. महाराजांबद्दल अंदाजे किंवा फारशा माहीत नसलेल्या (या चर्चेपूर्वी मी हा 'विनोद' कधीही पुण्यात पेठेत किंवा कुठेही ऐकला नव्हता) गोष्टी इतक्या कॅज्युअली ऑक्सफर्ड प्रेस च्या पुस्तकात लिहिण्याचा निषेध करून बंदी घातलीच पाहिजे.
22 Jul 2010 - 12:17 pm | Dipankar
+१
संभाजी ब्रिगेड्च्या गलिच्छ लिखाणाला ही चाप लावा
शिवरायांविरुद्ध गलिच्छ लिहीणार्या लेनचा निषेध, तसेच तशीच गलिच्छ भाषा वापरणार्या ब्रिगेड्चाही निषेध
22 Jul 2010 - 3:03 pm | आम्हाघरीधन
अंशतः आपल्याशी सहमत आहे..
परंतु कुणा परदेशी व्यक्तीच्या माध्यमातुन संभाजी ब्रिगेड्ने असले भलते सलते उद्योग केलेले नाहीत... वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातुन याची बदनामी कर त्याची बदनामी कर... पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य (कि स्वैराचार) नावाने गळा फाडुन ओरडणे...
ज्या रामदासांना इतिहासकार आजवर शिवरायांचे गुरु म्हणुन सांगत आलेत महाराष्ट्र धर्माचे प्रवर्तक म्हणुन सांगत आलात तसे ते नव्हते याचे पुरावे उपल्ब्ध आहेत... त्यांना जो परळिचा किल्ला शिवरायांनी दिला असे आजवर सांगत आलेत, प्रत्यक्षात तो आदिलशाहीत होता हे सोयीस्कररित्या लपविले जाते...
सत्य सांगितले तर कुठे चुकले?
22 Jul 2010 - 3:23 pm | परिकथेतील राजकुमार
ह्याचे पुरावे बघायला / वाचायला आवडतील.
आपण ज्याअर्थी इतक्या ठामपणे हे विधान करत आहात त्या अर्थी आपण पुराव्यानीशीच बोलत असणार, तरी कृपया हे पुरावे इथे आम्हाला उपलब्ध करुन द्यावेतच.
पुरावे न दिले गेल्यास कृपया संपादकांनी हे विधान लेखाकास मागे घेण्यास लावावे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Jul 2010 - 3:26 pm | आम्हाघरीधन
अंशतः आपल्याशी सहमत आहे..
परंतु कुणा परदेशी व्यक्तीच्या माध्यमातुन संभाजी ब्रिगेड्ने असले भलते सलते उद्योग केलेले नाहीत... वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातुन याची बदनामी कर त्याची बदनामी कर... पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य (कि स्वैराचार) नावाने गळा फाडुन ओरडणे...
ज्या रामदासांना इतिहासकार आजवर शिवरायांचे गुरु म्हणुन सांगत आलेत महाराष्ट्र धर्माचे प्रवर्तक म्हणुन सांगत आलात तसे ते नव्हते याचे पुरावे उपल्ब्ध आहेत... त्यांना जो परळिचा किल्ला शिवरायांनी दिला असे आजवर सांगत आलेत, प्रत्यक्षात तो आदिलशाहीत होता हे सोयीस्कररित्या लपविले जाते...
रामदासांची अन शिवरायांची प्रथम भेट १६७४ ला झाली होती तर स्वराज्याची प्रेरणा त्यांनी कशी दिली होती ?
समजा शिवरायांनी वयाच्या ४४ व्या वर्षी (राज्याभिषेक समारोहप्रसंगी) रामदासांकडुन प्रेरणा घेतली असे मान्य केले तर त्यांची स्वराज्याची धडपड १६ व्या वर्षापासुन सुरु होती ती कुणाच्या प्रेरणेने?
आता हे सत्य सांगितले तर कुठे चुकले?
राहता राहिला प्रश्न निषेधाचा...तुम्ही आहातच करायला निषेध.. आम्ही म्हणतो निषेध निषेध तुमच्या मागे मागे...
22 Jul 2010 - 3:33 pm | परिकथेतील राजकुमार
आपण चाफळची सनद* वाचली आहे का ?
श. 1601-2 सु. 1080-81 इ. स. 1679-80
चरणरज शिवाजी राजे यानी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे, मजवर कृपा करूनु सनाथ केली कीं, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुनु, धर्मस्थापना, देव ब्राह्मणांची सेवा, प्रजेची पीडा दूर करून पाळणा रक्षण करावें. हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा. तुम्ही जें मनीं धराल तें श्री सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा; विपुल द्रव्य करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऎशीं स्थळें दुर्घट करावी; ऎसें जें जें मनीं धरलें तें तें स्वामीनीं आशीर्वादप्रतापें पूर्ण केलें. या उपरी राज्य संपादिलें. तें चरणीं अर्पण करुनु सर्वकाळ सेवा घडावी ऎसा विचार मनीं आणिला तेव्हां आज्ञा झाली कीं, तुम्हास पूर्वी धर्म सांगितलें तेच करावे. तीच सेवा होय. ऎसे आज्ञापिले. यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें श्रीची स्थापना कोठे तरी होउनु सांप्रदाय शिष्य व भक्ति दिगंत विस्तीर्ण घडावी ऎशी प्रार्थना केली. तेही आसमंतात गिरीगव्हारी वास करुनु चाफळी श्रीची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंतविस्तिर्णता घडली."
(शिवकालीन पत्रसार संग्रह 2237)
स्त्रोत :- आंतरजाल
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Jul 2010 - 3:45 pm | आम्हाघरीधन
या सनदेत किती तरी मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केलेली आहे. राधामाधवविलासचंपू, शिवभारत, जेधे शकावली आदी समकालीन ग्रंथांमधे कुठेही त्यांचा उल्लेख नाही विशेष!!! जरा तपासुन पहा!!
22 Jul 2010 - 3:51 pm | llपुण्याचे पेशवेll
ओ राधामाधवविलासचंपू, शिवभारत, जेधे शकावली ही ब्राम्हणांनी लिहीलेली पुस्तके आहेत हो. ती चालतात का तुम्हाला? ब्रिगेडला विचारून या एकदा.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
22 Jul 2010 - 3:57 pm | आम्हाघरीधन
उतरलात जातीवर..... तसे तुमचे असे सहज उतरणे अपेक्षीतच होते ... :))
ओ राधामाधवविलासचंपू, शिवभारत, जेधे शकावली ही ब्राम्हणांनी लिहीलेली पुस्तके आहेत हो. ती चालतात का तुम्हाला? ब्रिगेडला विचारून या एकदा.
हो चालतात ना.... तुम्ही इतिहास लिहु शकलात कारण विद्यार्जनाचा अधिकार फक्त तुम्हाला होता...
इतिहास लिखान करतांना फक्त तुम्ही हवे तसे तुम्हाला सोयीस्कर लिहिलेत याला आमचा विरोध आहे...
तुमच्यात सगळेच गुण वाईट आहेत असे माझे मत निश्चितच नाही... पण दोष आहेत हे तुम्हाला दाखविले तर का वाईट वाटावे?
22 Jul 2010 - 4:04 pm | परिकथेतील राजकुमार
सगळ्यात आधी जातीवर कोण उतरले आणि पॄथ्वी निब्राम्हण करण्याची भाषा आधी कोणी केली हे तुम्हाला ठाउक नसेलच नाही का ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Jul 2010 - 4:13 pm | आम्हाघरीधन
सगळ्यात आधी जातीवर कोण उतरले आणि पॄथ्वी निब्राम्हण करण्याची भाषा आधी कोणी केली हे तुम्हाला ठाउक नसेलच नाही का ?
माझ्या लिखाणात कुठेही अश्या ठोकशाही भाषेचा वापर नाही.... असो... वरिल मत हे कुणाचे आहे यावर प्रकाश टाकाल काय?
22 Jul 2010 - 4:41 pm | llपुण्याचे पेशवेll
इतिहास लिखान करतांना फक्त तुम्ही हवे तसे तुम्हाला सोयीस्कर लिहिलेत याला आमचा विरोध आहे... .
हा हा हा. अहो अनेक मराठा (मराठी) सरदार पदरी असे चरित्र लिहू शकणारे लोक ठेऊन ही चरित्रे लिहून घेत असत हे माहित नाही का? मग ते ही दोषीच का? का ते इतके मूर्ख होते की काय लिहीले आहे हे वाचून न घेता सहमती देत?
तुमच्यात सगळेच गुण वाईट आहेत असे माझे मत निश्चितच नाही... पण दोष आहेत हे तुम्हाला दाखविले तर का वाईट वाटावे?
शिवरायांचे आठवावे रूप |
शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||१||
शिवरायांचे कैसे बोलणे |
शिवरायांचे कैसे चालाणे |
शिवरायांची सलगी देणे | कैसी असे ||२||
सकल सुखांचा केला त्याग |
म्हाणोनी साधिजे तो योग |
राज्य साधनाची लगबग | कैसी केली ||३||
याहुनी करावे विशेष |
तरीच म्हणवावे पुरूष |
या उपरी आता विशेष | काय लिहावे ||४||
शिवरायांसी आठवावे |
जीवित तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी उरावे | किर्तिरुपे ||५||
निश्च्यायाचा महामेरू |
बहुत जनांसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||६||
हे कोणी कोणास लिहीले आहे माहीत आहे काय? रामदासांनी संभाजी महाराजाना....
याहुनी करावे विशेष |
तरीच म्हणवावे पुरूष |
याचा अर्थ काय हे माहीत असेल तर त्या व्यक्तीचा अधिकार काय होता हे कळेल. या अधिकाराने संभाजी महाराजांना त्यांनी वरील वाक्यं पत्रात लिहीली आहेत. हे ही ध्यान्यात घ्यावे. संभाजी राजांच्याच नावाने तुमची ब्रिगेड आहे ना म्हणे.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
22 Jul 2010 - 5:01 pm | आम्हाघरीधन
हे कधी पत्र लिहिले हे सांगाल काय? म्हणजे कोणत्या घटनेच्या नंतर...
22 Jul 2010 - 5:21 pm | llपुण्याचे पेशवेll
हे तुमच्या सारख्या इतिहासाच्या अभ्यासकाना ठाऊक नाही काय ? असो नसेल तर सांगतो... हे पत्र रामदास स्वामींनी संभाजी राजाना शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लिहीलेले पत्र आहे.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
22 Jul 2010 - 5:35 pm | Dipankar
http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/SATARA/places_Parali.html
हि लिन्क वाचा यात वरील घटनेचा उल्लेख आहे . ही शासकीय साईट आहे
22 Jul 2010 - 8:34 pm | आम्हाघरीधन
शंभुराजेंवर विषप्रयोग करणार्या अष्टप्रधान मंडळींना वाचविण्यासाठी लिहिलेले हे एक पत्र आहे... =)) शिवरायांच्या मॄत्युनंतरच... पण बर्याच कालावधीने जेंव्हा अष्टप्रधान मंडळींना शंभुराजेंनी ताब्यात घेतले होते... :)
त्यातील मजकुर नीट वाचला तर तुम्हाला नक्की कळेल... ;;)
22 Jul 2010 - 9:01 pm | Dipankar
कदाचित तुमचे मराठी आणी काव्यातील मराठी वेगळे असावे,
शिवस्तुतीतुनही तुम्हाला अष्टप्रधान मंडळींची वकीली (व त्यातुन ब्राम्हण्द्वेष साधणे हेच) दिसत असेल तर त्याला बिचारे रामदास काय करतील.
22 Jul 2010 - 4:26 pm | Dipankar
दोष आहेत हे तुम्हाला दाखविले तर का वाईट वाटावे?
हेच मी पण गलीच्छ भाषा वापरणार्या संभाजी ब्रिगेड ला विचारतो
22 Jul 2010 - 8:37 pm | आम्हाघरीधन
ब्रिगेडचे वय अवघे १५ वर्षाचे आहे त्यांची भाषा कदाचित तुम्ही म्हणता तशी बालीश असुही शकते.
पण तुम्हा लोकांची ज्ञान परंपरा ५००० वर्षे जुनी आहे तरी तुमची भाषाशैली टोकाची घसरते याचे मला नवल वाटते.... :O
22 Jul 2010 - 3:57 pm | आंबोळी
ती चालतात का तुम्हाला?
ओ पुपे... अहो जेव्हढ सोयीस्कर असत तेव्हढ चालत... तुमी नाही ते विचारत बसता बघा...
आंबोळी
22 Jul 2010 - 3:41 pm | आंबोळी
टाळ्या टाळ्या टाळ्या....
आरे याला एक आल्पेनलिवी द्या...
आंबोळी
22 Jul 2010 - 3:59 pm | मैत्र
हे सत्य असत्य ठरवण्याइतके संदर्भ ग्रंथ मी वाचले नाहीत. त्यामुळे त्यावर वाद घालू इच्छित नाही. तसे सनांचा आढावा घेतला तर संत तुकाराम आणि शिवाजी महाराजांच्या काळाचा किंवा भेटीचा मुद्दा होऊ शकतो. पण त्याचे समर्थन जेव्हा कोणी त्याला विशेष आक्षेप घेतलेला नाही आणि रामदासांचा आणि महाराजांचा संबंध नाही हे सांगणे नवलाचेच.
रामदासांची अन शिवरायांची प्रथम भेट १६७४ ला झाली होती तर स्वराज्याची प्रेरणा त्यांनी कशी दिली होती ?
- मला सन माहीत नाही. पण जर त्यांची भेट झाली इ. तुम्ही मान्य करता तर त्यांचा विचार घेतला, प्रभाव होता, सज्जन गडाच्या खर्चाची सोय महाराजांनी केली याला आक्षेप घेण्याचे आणि गलिच्छ भाषा वापरण्याचे कारण आणि समर्थन काय?
इतिहासाचा वाद इतिहासकारांना घालू देत. महाराजांच्या जन्मसालाचा झाला. त्यात सामान्यांना घालून इतके टोकाचे लेखन कशासाठी ?
त्यांना जो परळिचा किल्ला शिवरायांनी दिला असे आजवर सांगत आलेत, प्रत्यक्षात तो आदिलशाहीत होता हे सोयीस्कररित्या लपविले जाते... -- म्हणजे चक्क आदिलशहाने एका हिंदू संन्याशाला किल्ला दिला असे तुम्ही सांगताय का? उत्तम. याचा मात्र पुरावा जरूर द्यावा कारण यावर शाळेतला मुलगा पण विश्वास ठेवणार नाही.
संत ज्ञानेश्वरांबद्दल काय पुरावे आहेत बाराव्या / तेराव्या शतकातले?
इतके सगळे पुरावे आहेत तर इतकी घाणेरडी भाषा वापरण्याचे आणि वाट्टेल तसे लिहिण्याचे प्रयोजन काय?
22 Jul 2010 - 4:07 pm | आम्हाघरीधन
आदिलशहा म्हणजे एक सुल्तान होता त्याच्या पदरी केवळ मुस्लिम होते हे तुम्ही कशावरुन म्हणता... त्याचा एक सरदार अफजल्खान जो शिवरायांवर चालुन आला होता त्याचा वकिल कॄष्णा भास्कर कुळकर्णी, हो तोच ज्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला होता हा पण आदिलशाहीत कार्यरत होता... त्यामुळे रामदासांना ते केवळ हिंदु आहेत म्हणुन आदिलशहाने किल्ला दिला नसता हा तुमचा युक्तीवाद थिटा पडतो... :O :O
22 Jul 2010 - 4:12 pm | मैत्र
अहो कृष्णा भास्कर एक होता. जसे मागेही वाद घातला तसा की वकिली चिटणिशी हा पेशा होता. तुम्हीच म्हणालात की लिखाण फक्त ब्राम्हणांकडे होतं. त्यातले हे थोडे तिकडे होते.
एका हिंदू संन्याशाला एक किल्ला देण्याइतके कोणते राजे / आदिलशहा सहिष्णू होते काय? असं नाही की दर दिवशी कोठे देवळे पाडत हिंडत असतील पण म्हणून धर्म प्रसार करणार्या एका हिंदूला किल्ला कशाला देईल तो आदिलशाहा?
आणि कृष्णा भास्कर अफझलखानाचा वकील असण्याचा आणि आदिलशाहाने रामदासस्वामींना किल्ला देण्यासा परस्पर संबंध काय?
मी उलट सिद्ध का करावे? तुम्हीच मुद्दा मांडला आहे कोणाला माहीत नसलेला. तुम्हीच पुरावा द्या.
22 Jul 2010 - 4:10 pm | आम्हाघरीधन
इतके सगळे पुरावे आहेत तर इतकी घाणेरडी भाषा वापरण्याचे आणि वाट्टेल तसे लिहिण्याचे प्रयोजन काय?
माझ्या लिखाणात कुठे शिव्या आहेत का? किंवा घाणेरड्या भाषेत काही लिहिलेले आहे काय?
असल्यास संपादकांनी ते लिखाण संपादित करण्या पुर्वी निदर्शनास आणुन द्यावे.. :S
22 Jul 2010 - 4:21 pm | मैत्र
लेनच्या प्रक्षोभक लेखनाप्रमाणे ब्रिगेडच्या प्रक्षोभक लेखनावर आणि वाट्टेल तसे शिंतोडे उडवण्यावर बंदी घालावी हा मुद्दा आहे. त्याला तुम्ही उत्तर देत होतात. रामदास / ज्ञानेश्वर इ. बद्दल बोलत आहोत. म्हणजे तुम्हाला काय विषय आहे माहीत आहे.
मग ब्रिगेडचे गलिच्छ लेखन सोडून तुमच्या मिपावरच्या प्रतिक्रियांबद्दल का विचारताय?
प्रत्येक प्रश्नाची भलतीच उत्तरं देऊन विषय का बदलताय?
परत एकदा : ऐतिहासिक पुराव्यांबद्दल आक्षेप आहे तर त्याबद्दल त्यांना बोलू द्या. इतकी खराब भाषा थोर संतांबद्दल कशासाठी? त्यावर बंदी घालायला हवीच.
22 Jul 2010 - 4:28 pm | आम्हाघरीधन
ते लिखाण तुम्हाला गैर वाटत असेल तर तुम्ही करा ना बंदीची मागणी... मी कुठे तुम्हाला नाही म्हटले?
माझ्या लिखानात कुठे गैर शब्द आहेत का?
प्रतेकाचे आपले मत जरूर असते पण माझे ते चांगले अन दुसर्याचे तेवढे वाईट घाणेरडे असे म्हणने चुकिचे आहे.... आपण इतिहास नासवण्याचा प्रकार केलात म्हणुन ब्रिगेडने इतिहास आपल्या पद्धतीने लिहिणे सुरु केले असेल असे माझे मत आहे.
22 Jul 2010 - 4:32 pm | मैत्र
उदाहरण दिले आहे.
आपल्या पद्धतीने ? म्हणजे शिव्या देऊन ... संतांना?
प्रतेकाचे आपले मत जरूर असते पण माझे ते चांगले अन दुसर्याचे तेवढे वाईट घाणेरडे असे म्हणने चुकिचे आहे.... --
उद्या लेनचे समर्थन करणारे महाभाग तुम्हाला हेच वरचे उत्तर देतील!
माझा मुद्दा मताचा नाही. भाषेचा आहे.
आणि पुराव्याचं काय झालं?
22 Jul 2010 - 4:36 pm | आम्हाघरीधन
एखाद्या व्यक्तीकडे तुमचा अन त्यांचा पाहण्याचा दॄष्टीकोण वेगवेगळा असु शकतो असे मत तुमच्या जेम्स लेन संबंधी विविध प्रतिक्रियेतुन व्यक्त होते आहे.. आता त्यात तुम्हाला काही गैर वाटत नाही यात मी काय करणार [( [(
22 Jul 2010 - 4:47 pm | मैत्र
जेम्स लेन हे मी फक्त एक उदाहरण दिले. "दुसर्याचे मत घाणेरडे नाही फक्त ते दुसर्याचे मत आहे तुमच्याशी न जुळणारे "असं जे कोणी जेम्स लेनचे समर्थन करु शकतात ते ब्रिगेडला म्हणू शकतात.
जे दत्तो वामन पोतदारांचे उदाहरण दिले आहे त्याप्रमाणे ( खरे खोटे माहीत नाही. पण ते काही बोलले नाहीत सार्वजनिक पणे हे खरे) ब्रिगेडने आपले विचार खाजगीत ठेवावेत. संतांवर पुस्तके लिहून चिखल फेक करु नये. इतिहासाच्या पुस्तकात दस्त ऐवजांचे संदर्भ, पुरावे, inferences असतात. दोषारोप करणारी गलिच्छ भाषा नव्हे.
23 Jul 2010 - 3:18 pm | नाद्खुळा
अम्हाघरिघन ...
तुमचे वाचण चांगले आहे, पन वरिल एका प्रतिक्रिये प्रमाने किंचित श्या द्वेशाने कुठेतरि प्रेरित आहे. (खरच विचार करा, पटेल )
काहि व्यक्तिना टारगेट करन्या पेक्शा, आपन त्या विशयात किति खोल्वर ज्ञाणि अहोत हे पहिल्यास अप्ल्याला पटेल, कि आपन किति पुर्वग्रह्दुशित अहोत. (सर्वाना पटेल)
समाजात असे नेते होत रहतिल मतांसाथि उद्या तुम्हाला हि बुडवतिल.
जागे व्हा, महाराष्ट्र धर्म गाजवा,
जुने पाने उकरुन काढुन (महिति नसताना) देश बुदवु नका, इतिहास अप्ल्याला कधि माफ करनार नाहि.
हे सकारात्मक घ्या ... जरा विचार करा हा मुददा अत्ताच का आला, समाज कारनाचे राजकारण होत असल्याचि हि सुर्वात आहे.
क्शमस्व... पटलं तर घ्या नाहितर सोडा ... :)
22 Jul 2010 - 4:44 pm | Dipankar
हे काय पुरावे देणार.
22 Jul 2010 - 4:17 pm | आंबोळी
ओ मैत्र,
आदिलशहाने एका हिंदू संन्याशाला किल्ला दिला असे तुम्ही सांगताय का? उत्तम. याचा मात्र पुरावा जरूर द्यावा
कै च्या कै काय बोलताय? रामदास हे अदिलशाही आणि मोगलांचे गुप्तहेर होते हे माहित नाही का तुम्हाला?
मग त्याना किल्ला राजे देणार की अदिलशहा?
आंबोळी
22 Jul 2010 - 4:30 pm | आम्हाघरीधन
आदिलशहाने एका हिंदू संन्याशाला किल्ला दिला असे तुम्ही सांगताय का? उत्तम. याचा मात्र पुरावा जरूर द्यावा
पुरावा नक्कि देईल.. थोडी वाट पहा..
22 Jul 2010 - 4:35 pm | मैत्र
लिहून टाकले. आता पुरावा शोधत आहात का?
त्या एका वकीलाचा आणि समर्थांचा काय संबंध होता त्याचे उत्तर द्यायला तर पुरावा नकोय.
ज्ञानेश्वरांबद्दल काय पुरावा आहे?
22 Jul 2010 - 4:47 pm | परिकथेतील राजकुमार
चालेल. तोवर हे लिखाण स्वतःच अप्रकाशीत करा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
23 Jul 2010 - 12:26 pm | चेतन
=))
http://misalpav.com/node/8009#comment-123153
याला उत्तर अजुन देताय
असो.....
जेम्स लेनला विरोध या मूळ मुद्दाशी अंशत: सहमत (पण विरोध कोण करतय हे बघितलं तर मात्र तुमची कीव येते)
चेतन
22 Jul 2010 - 4:50 pm | मितभाषी
भांडा, भांडा... असेच भांडत रहा. :T बहुधा 'दुहीचे" बीजं मराठी माणसाच्या जनुकातच असावेत. X(
ज्या संतांनी, महापुरुषांनी अवध्या मानवजातीच्या मांगल्याची, कल्याणाची कामना केली त्यांना आता एका चौकटीत बांधुन टाकले आहे.
रामदास आमचा. तुकाराम तुमचा, 'बाबा' आमचा, फुले तुमचे. असेच भांडत रहा.
मराठी गडी यशाचा धनी. हे वाचायला म्हणाय पुरतेच राहीले आहे.
22 Jul 2010 - 4:55 pm | आंबोळी
भावश्याभौ,
जो पर्यंत मतांच्या तुंबड्या भरण्यासाठी नेते मंडळी जातीय दुहीची बिजे पेरत राहतील आणि असली मेंढरे त्याचे आलेले गवत खाउन त्यांच्या पारड्यात मतांच्या लेंड्या टाकत राहतील तो पर्यंत हे असेच चालत राहणार.....
तस्मात जवळचे झाड पकडा.
आंबोळी
22 Jul 2010 - 4:56 pm | मैत्र
शिवाजी महाराज, समर्थ रामदास, संत तुकाराम, ज्ञानेश्वर हे कोणाचे होते? इथे आमचे तुमचे काहीच वाद नाही. वाद फक्त ब्रिगेडच्या लिखाणाचा आहे.
ज्या संतांनी, महापुरुषांनी अवध्या मानवजातीच्या मांगल्याची, कल्याणाची कामना केली त्यांना आता एका चौकटीत बांधुन टाकले आहे.
-- त्या त्या जातीने त्या त्या व्यक्तीला फक्त त्या जातीच्याच वैयक्तिक अधिकारात धरले आहे. किंवा त्या त्या जातीच्या एक गठ्ठा मतांसाठी ते ते नेते तो खेळ घडवून आणत आहेत.
22 Jul 2010 - 5:50 pm | पुष्करिणी
धागा प्रवर्तकानं जीजामातां बद्द्ल एक विधान केलं आहे..
'कुणा स्त्रीच्या चारित्र्यावर चिखलफेक करणार्याला कसले आले अभिव्यक्ती स्वातंत्र्य'.
याच्याशी सहमत.
पण ह्याच न्यायानं , ज्या लिखाणावरून ही रणधुमाळी माजली आहे त्यामुळं एका पुरूषाच्या ( दादोजी कोंडदेव )चारित्र्यावरही चिखलफेक झाली आहे हे कसं विसरायचं?
या तथाकथित विनोदामुळं ( जर दादोजी कोंडदेवांना शिवाजी राजांचे शिक्षक मानत असाल तर ) एका पुरूषाची स्वामीनिष्ठा, एका शिक्षकाची तळमळ इ. इ. यांवर शिंतोडेच उडाले ...
शिवाजीराजांना घेउन ते पुण्याला आले तेंव्हा त्यांच वय ७० वर्ष होतं असं म्हणतात्...
आता दादोजी कोंडदेव हे राजांचे शिक्षक नव्हते आणि फक्त प्रजा होते असं जरी घटकाभर मानलं तरीही हा अत्यंत घाणेरडा आरोप आहे.
तेंव्हा जे कोणी जेम्स लेन च्या लिखाणाच्या प्रसिद्धीच्या विरोधात आहेत त्यांचं याबाबत काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
* मी हा तथाकथित विनोद ह्या प्रकरणाआधी कधीच ऐकलेला नव्हता
* मी जेम्स लेनच पुस्तक वाचलेल नाही
पुष्करिणी
22 Jul 2010 - 5:58 pm | llपुण्याचे पेशवेll
पण ह्याच न्यायानं , ज्या लिखाणावरून ही रणधुमाळी माजली आहे त्यामुळं एका पुरूषाच्या ( दादोजी कोंडदेव )चारित्र्यावरही चिखलफेक झाली आहे हे कसं विसरायचं?
या तथाकथित विनोदामुळं ( जर दादोजी कोंडदेवांना शिवाजी राजांचे शिक्षक मानत असाल तर ) एका पुरूषाची स्वामीनिष्ठा, एका शिक्षकाची तळमळ इ. इ. यांवर शिंतोडेच उडाले ...
ही गोष्ट देखील माझ्या ध्यान्यात आली नव्हती. धन्यवाद पुष्करीणी.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
22 Jul 2010 - 6:02 pm | आंबोळी
पण ह्याच न्यायानं , ज्या लिखाणावरून ही रणधुमाळी माजली आहे त्यामुळं एका पुरूषाच्या ( दादोजी कोंडदेव )चारित्र्यावरही चिखलफेक झाली आहे हे कसं विसरायचं?
या तथाकथित विनोदामुळं ( जर दादोजी कोंडदेवांना शिवाजी राजांचे शिक्षक मानत असाल तर ) एका पुरूषाची स्वामीनिष्ठा, एका शिक्षकाची तळमळ इ. इ. यांवर शिंतोडेच उडाले ...
पुष्करिणी,
अत्यंत योग्य मुद्दा मांडल्याबद्दल अभिनंदन....
हिच भुमिका खर म्हणजे इथल्या लोकांची असायला पाहिजे...
पण तसे न होता उलट लेनला वापरून आपला जातीय कंड शमवला जातोय....
असो... चालूद्या.
आंबोळी
22 Jul 2010 - 8:50 pm | आम्हाघरीधन
जर दादोजी कोंडदेवांना शिवाजी राजांचे शिक्षक मानत असाल तर
http://2.bp.blogspot.com/_45ebM7EfwDs/SVyb8yEUZhI/AAAAAAAAARU/ZtQSdKco1V...
http://2.bp.blogspot.com/_45ebM7EfwDs/SVyaiUbmcdI/AAAAAAAAARM/YznRTCKiTQ...
जरा हे वाचा!!! अन काही पुरावे असतील तर मला नाही थेट राज्य सरकारला द्या.. खरा इतिहास लिहिण्यास मदत होईल....
28 Jul 2010 - 10:19 pm | शिल्पा ब
अग्गोबाई!!! म्हणजे त्या संभाजी ब्रिगेडने पेपरात काय ते छापून आणले त्याला पुरावा म्हणायचा का? आणि कशाच्या आधारावर हि ब्रिगेड एवढा मूर्खपणा करतेय?
कोणी काहीही म्हणो...दहशतीने पुस्तक छापून, सरकारला नमवून इतिहास लिहिणार्यांना माझा मनाचा मुजरा....हो ... इतिहास घडविण्यापेक्षा "असा " इतिहास लिहिणे अगदी सोप्पे...
बाकी तुमच्या पुराव्याच्या प्रतीक्षेत ...
आणि ज्ञानेश्वरी हि ज्ञानेश्वरांनी लिहिलीच नव्हती तर त्या रेड्याने लिहिली होती....त्या मेल्या ब्राह्मणांनी रेड्याचे क्रेडीट मात्र घेतले हो...काय तरी लोक असतात...तुम्ही म्हणून खराखरा इतिहास लिहिताय नाहीतर आम्हाला कोण एवढा ज्ञान देणार?
22 Jul 2010 - 7:21 pm | तिमा
असल्या सर्व धाग्यांच्या व त्यावरील चर्चा, प्रतिसाद यातील गृहीतच चुकीचे आहे.
कुठल्याही थोर ऐतिहासिक व्यक्तिंवर त्यांच्यापेक्षा कैक पटींनी सामान्य व्यक्तिंनी टीका केली वा त्यांच्याविषयी अभद्र लिहिले तरी त्यांचे कर्तृत्व जराही कमी होत नाही. उलट अशा व्यक्तिंच्या अकलेचे दिवाळे दिसून येते. त्या थोर व्यक्ति जिवंत असत्या तरी त्यांनी असल्या क्षुद्र किड्यांकडे दुर्लक्ष केले असते.
खरा धोका आहे तो त्यांच्या नांवाने धंदा करणार्यांचा. त्यांचे मात्र याबाबतीत अनायसे फावते आहे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
22 Jul 2010 - 9:01 pm | आम्हाघरीधन
खरा धोका आहे तो त्यांच्या नांवाने धंदा करणार्यांचा. त्यांचे मात्र याबाबतीत अनायसे फावते आहे.
प्रभु रामचंद्र अन भगवान श्रीकॄष्ण यांचा पण रा.स्व.संघाबाबत असाच वापर केला असे आपणाला म्हणायचे आहे काय? की मंदिर वही बनायेंगे म्हणायचे अन कोर्टात डोळे मिटत म्हणायचे, " बाबरी मस्जिद गिराना एक दुखःदायी घटना थी|" .
मंदिर मात्र बनले नाही, भावनेच्या जोरावर संघाने सत्ता मात्र मिळविली....
वरुन जय श्रीराम.... चालु द्यात भावनेचे खेळ...
असाच शिवरायांचा वापर महाराष्ट्रात शिवसेनेने केला....
मात्र काही प्रमाणात का होईना त्यांनी शिवरायांची जाण ठेवली, लेन प्रकरणी मात्र शेपुट घातले होते हे सर्वश्रुत आहे..
22 Jul 2010 - 9:06 pm | Dipankar
म्हणजे तुमचेही शिवप्रेम हे उद्दिष्ट नसुन सत्ता हेच आहे तर
23 Jul 2010 - 8:57 am | अप्पा जोगळेकर
आम्हा घरी धन,
तुमचे सगळे प्रतिसाद वाचले. इथल्या अनेक लोकांनी तुमचा यशस्वी प्रतिवाद केला आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा चीत करावे असेही वाटत नाहीये.
तुम्ही प्रच्छन्न जातीयवादी आहात. निदान संभाजी ब्रिगेडचे लोकं उघड उघड जातीच्या नावाने शिव्या देतात.(वळवळणारे भ... किडे असं काय काय त्यांच्या लिखाणामध्ये असतं.) पण तुमच्या ठायी ते धाडसही दिसत नाही. माझी खात्री आहे की माझा प्रतिसाद नीट वाचण्याआधीच आडनावावरुन मी 'कोणत्या जातीचा' हे अनुमान बांधून तुम्ही आधीच एका विशिष्ट दृष्टिकोनातून निष्कर्ष काढून मोकळे झाले असाल.
हीन भावनेचे अशा प्रकारे जागोजाग विसर्जन करणे थांबवावे अशी विनंती करतो आहे.
23 Jul 2010 - 10:05 am | मितभाषी
हीन भावनेचे अशा प्रकारे जागोजाग विसर्जन करणे थांबवावे अशी विनंती करतो आहे.
@जोगळेकर महाराज,
इथे काही माकडे पृथ्वी निक्षत्रिय करण्याची भाषा करतात, त्यांनाही तुमचे मौलिक अमृताचे बोल ऐकवा ना. :)
----------------------------------------
@आम्हा घरी धन.
तुम्ही चुकीच्या 'पेठेत' आला आहात. =)) निदान नाका पाहुन तरी जकात फाडायची राव. :)
23 Jul 2010 - 10:29 am | Dipankar
इथे काही माकडे पृथ्वी निक्षत्रिय करण्याची भाषा करतात, त्यांनाही तुमचे मौलिक अमृताचे बोल ऐकवा ना
आम्ही पाहीली तर त्याला नक्की विरोध करु. पण आम्हा घरी धन हा वाद उकरुन फक्त एका जातीवर गरळ ओकणे हेच साध्य करु पहात आहेत
रामदास दादोजी ज्ञानेश्वर गुरु होते वा नाही हे पुराव्याने सिद्ध करणॅ हा अभ्यास झाला रामदासांचे दादोजींचे ते एका जातीचे आहेत म्हणुन चारीत्र्यहनन करणे हा द्वेष झाला. ब्रिगेडवाले हे फक्त चारीत्र्यहननचा धंदा करतात
23 Jul 2010 - 10:50 am | मैत्र
राम मंदिर हा वेगळा मुद्दा आहे.
पण त्याचा वापर झाला हे उघड सत्य आहे. मग हे सौ. खेडेकरांना आणि त्यांना भाजप मध्ये जाऊ देणार्या तुमच्या नेत्यांना माहीत नव्हतं का?
आणि हो शिवसेना झाली ५० - ६० वर्ष जुनी. आणि तेव्हाचे संदर्भ फार वेगळे होते. तेव्हापासून ती शिवरायांच्या नावाचा वापर करते आहे म्हणणे जरा पटायला अवघड आहे.
पण त्याच पद्धतीने मुद्दामून संभाजी महाराजांचे नाव घेऊन शिवरायांबद्दल असलेली भक्ती / आदर याला बाजूला ठेवून संभाजीराजांच्या आयुष्यात नंतर घडलेल्या काही घटनांचे भांडवल करून त्याचा एका जातीवर रोख धरून, फक्त हातातून निसटत चाललेल्या सत्तेला पुन्हा काबीज करणे हाच शुद्ध राजकीय हेतू नाही का? जर यामागे सत्ताकारण नाही तर मग फक्त संभाजी राजांच्या / जिजाऊंच्या आदराने निघालेल्या संघटनेला फक्त एका आणि एका जातीचा आधार का लागतो?
तीनशे वर्षानंतर फक्त त्या एका जातीत जन्मले म्हणून काही लोकच जर योद्धा संभाजीराजांबद्दल आदर बाळगू शकतात तर तुम्ही स्वतःच त्या जुनाट जाती परंपरेतून बाहेर येत नाही आहात! कारण त्याच जातीत विचार बांधून ठेवले आहेत तुमचे. मुळात धर्मावर विश्वास नाही, जातीवर असायलाच नको तर पूर्ण महासंघ फक्त एका जातीचा का?
महाराष्ट्राचा का नाही? हे अतिशय उघड राजकारण नाही का?
ते अष्टप्रधान मंडळाचे तुम्ही पुन्हा पुन्हा लिहिता. मग मोरे, शिर्के, घोरपडे, मोहिते, खोपडे वगैरे सर्वांना ते त्या कुळात आहेत म्हणून आज तीनशे वर्षांनी ९६ कुळातून किंवा तुमच्या संघटनेतून बाहेर काढून का टाकत नाही?
माझा मुद्दा जातीचे राजकारण हा आहे. मूळ गोष्ट ही आहे की काही व्यक्तींनी काही केले म्हणून त्या जाती तल्या किंवा lineage मधल्या सर्व
लोकांना शतकानुशतके ते त्याच गोष्टीला अनुकूल होते / आहेत असा एकांगी विचार लोकांच्या माथी मारून, न समजणार्या सामान्य लोकांचे brainwashing करून त्याचे आपल्या राजकीय फायद्यासाठी भांडवल करायचे याला विरोध आहे.
इतिहासातल्या गोष्टी इतिहासात - जर नसतील दादोजी कोंडदेव शिक्षक, तर नाही शिकणार पुढची पिढी ते. पन्नास वर्षांनी कोणाला नाही लक्षात राहणार ते कोण होते. एका स्वामिनिष्ठ कारभार्याचे नाव खराब झाल्याने खूप मोठा फरक पडत नाही. पण त्या इतिहासाच्या वादात महाराष्ट्राची अशी अंतर्गत मुद्दामून दुफळी करणे ही नीच (माफ करा याहून योग्य शब्द मिळाला नाही) मनोवृत्ती आहे.
23 Jul 2010 - 11:06 am | Dipankar
जो न्याय अष्टप्रधांनांमुळे ब्राम्हणजातीला तोच न्याय मोरे, शिर्के, घोरपडे, मोहिते, खोपडे वगैरे सर्वांना लागु करा.
अष्टप्रधान मंडळाला सोयराबाईची फुस होती हे सोयीस्कर वगळले जाते. संभाजी राजांबरोबर बलिदान केलेला कवीकलश ब्राम्हण होता हे नजरेआड केले जाते. हा द्वेष नव्हे तर काय आहे
मला ब्राम्हण असल्याचा आजिबात अभिमान नाही जाती हिंदुधर्मातुन नाहीश्या होउ देत या मताचा मी आहे. पण कोणी ब्राम्हण आहे म्हणुन द्वेष करत असेल तर मी नक्की उत्तर देणार
23 Jul 2010 - 11:25 am | jaypal
महाराजांना घडविण्यात आणि त्यांच स्वराज्याच स्वप्न वास्तवात उतरविण्यास अनेक लोकांचे मोलाचे सहकार्य होते. राजमाता जिजाऊंनी महाराजांना कधीही राजपुत्रासारख वागवुन राजवाड्यात बंदिस्त केल नाही. बाल शिवाजीला समाजातील सर्व थरातील मुलांच्यात रमु दिल , खेळु दिल हा फार मोठा दुरदर्शीपणा होता. महराजांच्या आफाट कर्तुत्वाला केवळ कोणी एकटा संत अथवा शिक्षकच कारणीभुत नाहीत हे समजुन घेतल पाहीजे. (आणि तसे माननारे महराजांचा उपमर्द करीत आहेत असे मला वाटते.)

मागील वर्षी मी शिवथर घळीत गेलो होतो. आज पर्यंत महाराजांना देवीने स्वपनात येऊन भवानी तलवार दिल्याचे ऐकुन होतो पण "दासबोधातील कर्मयोग (दासबोध विवरण भाग ५) ले. सुनिल चिंचोलकर" यांच्या पुस्तकाच्या मुखपॄष्ठावरील चित्रात संतरामदास महाराजांना तलवार देता आहेत आणि महाराज नम्रपणे गुड्घ्यावर बसुन स्विकारताना दाखवले आहे. हा प्रकार माझ्यासाठी नविनच होता. ईतिहास जाणकार प्रकाश टाकतील का?
************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
23 Jul 2010 - 12:14 pm | मैत्र
मीही हे पुस्तक पाहिले / वाचले आहे.
मला वाटतं ते त्या पुस्तकातल्या आशयाला अनुसरुन एक रुपक आहे.
आणि एका रामदास स्वामींनी काही उपदेश केला आणि फक्त त्यानुसार किंवा त्यामुळेच राजांनी स्वराज्य उभारले म्हणणारे मूर्खच म्हणायला हवेत.
मूळ बीज, विचार, स्वातंत्र्याची इच्छा ही जाधवांच्या पराक्रमी घराण्यातून आलेल्या जिजाऊंनीच दिली असावी. आपापसात लढून दुसर्या राजा साठी किंवा आपल्याच धन्याच्या हातून लखूजींप्रमाणे मरण्यापेक्षा या बारा मावळातल्या मराठ्यांना एकत्र करून आपले एक राज्य स्थापन करावे हे त्यांनीच बाल शिवाजीच्या मनावर बिंबवले असावे. दादोजी हा इतिहास खरा असला तरी त्यांचे काम हे सरदार शहाजीराजांनी दिलेले जहागिरीचे काम चोख पणे पार पाडणे आणि तरूण वयातील सरदार पुत्राला योग्य ते मूलभूत शिक्षण देणे, कारभारातल्या गोष्टींचे ज्ञान करून देणे एवढे होते. वयाने ज्येष्ठ असल्याने या दोघांबद्दल प्रेम असावे. त्यांचे मत स्वराज्याला फारसे अनुकूल नव्हते कारण शाह्यांची कराल सत्ता त्यांनी आयुष्यभर पाहिली होती. त्यामध्ये काही करता येईल असे त्यांना वाटत नसावे. ज्यांच्याबद्दल जिव्हाळा आणि स्वामिनिष्ठा आहे त्यांना काही होऊ नये असेही वाटत असेल.
रामदास स्वामींनी ह्याचा पाया रोवला म्हणणेही चुकीचे. पण त्यांचे विचार हे महाराष्ट्र धर्माला अनुसरुन होते. त्यांनी महाराजांबद्दल जाणले असावे की हा राजा या देशाला तारून नेऊ शकतो. ते बळ आणि चातुर्य दोन्ही शिवाजीराजांकडे आहे. तेव्हा ज्ञानाच्या, संन्याशाच्या समाजकारणाच्या हेतूने त्यांनी आपले काही विचार राजांना सांगितले असावेत आणि असा समाजाभिमुख, बलोपासनेचे धडे देणारा संन्यासी संत राजांना महाराष्ट्र विचार पसरवणारा आणि ज्ञानामुळे, वागण्यामुळे वंदनीय वाटला असावा.
हे चित्र जसेच्या तसे न बघता, ती तलवार कर्मयोगाचे पुरुषार्थाचे प्रतीक म्हणून बघावी तर योग्य. साधू संन्यासी यांना आदर दाखवण्याच्या आपल्या परंपरेत हे गुडघ्यावर बसून स्वीकार करणे असावे. त्यात त्यातला आदर, नम्रपणा आहे. बाकी काही सूचित नसावे.
राजांनी सर्वप्रथम आउसाहेबांकडुन्म, त्यांच्या आजू बाजूच्या इतर वडील धार्यांकडून, इतर सहकार्यांकडूनही बरेच काही घेतले असावे. त्यात एका कारभार्यांना किंवा समर्थांना सर्व श्रेय देण्याचे कारण नाही. पण त्यांचे contribution सुद्धा महत्त्वाचे आहे एवढेच.
शेवटी एक राजा, एक नेता स्वत:च्या कर्तृत्वाने राष्ट्र पुढे नेतो बाकी सर्व यथाशक्ती हातभार लावतात. मार्गदर्शन करणारे अनेक असतात. पण घडवणारा एखादाच बुद्धिमान आणि लढवय्या असतो. त्यामुळे फक्त एक शिवाजी महाराज, एखादे थोरले बाजीराव इतिहास घडवून जातात. त्यात त्या व्यक्तीच्या capabilities आणि थोडे नशीब जे त्यांच्या धैर्याला साथ देते याचाच वाटा मोठा असतो असं मला वाटतं.
23 Jul 2010 - 12:10 pm | मैत्र
दोनदा आल्याने काढून टाकला आहे.
23 Jul 2010 - 10:51 am | मितभाषी
ब्रिगेडवाले हे फक्त चारीत्र्यहननचा धंदा करतात
>>>>>>>>
ब्रिगेडवाल्यांना तुम्ही नाहक अवास्तव महत्व देत आहात. आणि नकळत मोठे करत आहात.
23 Jul 2010 - 2:15 pm | हुप्प्या
ह्या दोन्ही व्यक्तींबद्दल मला नितांत आदर आहे. सावरकरांची शिवाजीभक्ती प्रसिद्ध आहेच. आता काही लोकांना मिरच्या झोंबतील. पण बाबासाहेब पुरंदर्यांनी एका भाषणात म्हटले होते की १७ व्या शतकात जन्मलेले सावरकर म्हणजे शिवाजी महाराज. आणि १९ व्या शतकात जन्मलेले शिवाजी महाराज म्हणजे सावरकर! असो.
मूळ लेखात असे म्हटले आहे की अंदमानच्या तुरंगातले सावरकरांचे स्मारक उखडून टाकले आणि स्वातंत्र्यवीरांच्या नावाने गरळ ओकले गेले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जोरदार निषेध केला मग तसा लेनचा का नाही केला?
उत्तर
१. सावरकर स्मारक नष्ट करणे, त्यांच्याविरुद्ध गरळ ओकणे वगैरे कृत्ये त्यांना हीन लेखणे ह्या एकमेव उद्देशाने केली होती. लेनच्या पुस्तकाचा मूळ हेतू हा शिवबांचे जन्मदाते कोण याविषयी काही हीन सांगावे हा वाटला नाही. त्या पुस्तकाचा अत्यंत छोटा भाग त्याविषयी बोलतो आणि तेही सांगोवांगी, असे म्हटले जाते वगैरे. तेव्हा दोन्हींची तुलना होत नाही.
२. इतका निषेध होऊनही सावरकरांचे स्मारक हटवले गेले ते गेलेच.
३. फ्रीडम अॅट मिडनाईट ह्या पुस्तकात सावरकर व नथुराम गोडसे ह्यांचे गे संबंध होते असा "शोध" लावला आहे. ही ह्या देशभक्तावर घाणेरडी टीका आहे.
परंतु ह्या पुस्तकावर बंदी नाही.
४. स्वातंत्र्य मिळून ४०-५० वर्षे होईपर्यंत ह्या स्वातंत्र्यवीराचे पोस्टाचे तिकिट निघू शकले नव्हते.
तेव्हा सावरकराशी ह्या प्रकरणाची तुलना होत नाही.
मूळ लेखकाला सावरकर प्रकरणाशी तुलना करून ह्या विषयाला एक जातीय पैलू द्यायचा होता. खरे तर सलमान रश्दीच्या पुस्तकावरील बंदीशी तुलना करणे जास्त योग्य आहे. दोन्ही पुस्तके आहेत. दोन्हीविरुद्ध कुठल्यातरी गटाच्या तीव्र भावना आहेत. मात्र रश्दीच्या पुस्तकावर बिनबोभाट बंदी घातली गेली. लेनच्या पुस्तकावर मात्र उठवली गेली. हा साक्षात दुटप्पीपणा आहे. पण रश्दीच्या प्रकरणात ती "मजा" नाही. नेहमीच्या गटावर तोंडसुख घेण्यात जी गंमत आहे ती सॅटानिक व्हर्सेस मधे नाही. म्हणून मग सावरकर.
दुसरे असे की दादोजी कोंडदेव हे गुरु होते हे सिद्ध कसे करणार? त्यांची काही शाळा नव्हती जिथे महाराजांचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सापडेल. एक ज्येष्ठ, सचोटीने काम करणारा कारभारी एवढेच ते असले तरी त्या निमित्ताने महाराजांचा त्यांच्याशी संपर्क येऊन त्यातून ते काहीतरी शिकले असणे सहज शक्य आहे. हे स्वीकारल्यामुळे महाराजांचे कर्तृत्व कसे काय कमी होते?
मला तरी ह्यात काही गैर वाटत नाही.
ब्रिगेड वगैरे मंडळींनी ह्या थोर व्यक्तीला एका जातीत बंदिस्त करायचा घाट घातला आहे. देव करो आणि त्यांचा इस्कोट होऊ दे.
24 Jul 2010 - 6:15 pm | अशोक पतिल
लहानपणी इतिहास शिकलो , रामदास / ज्ञानेश्वर , शिवाजी महाराज, पेशवे बाजीराव, व अन्य व्यक्तीरेखा ह्र्दयात अश्या कही ठ्सल्यात की कोणी कितीही सशोधन करो, त्या प्रतिमा कधीही पुसता येणार नाहित.
कोणी कितीही सशोधन करो या काहिही करो , आपण सर्व मराटी जनाचे हे कर्तव्य हे आहे कि महाराष्ट्र धर्माचे आराध्य विषयी कायम श्रधा असु द्यावी. आपली जातीविषयी अभिमान असु द्यावा परन्तु आपल्या आराध्या विषयी जातपात नसावी.
25 Jul 2010 - 11:28 am | अर्धवटराव
मित्रा आम्हाघरिधना,
लेनच्या पुस्तकावर बंदी नकोच यायला. अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरेशी याचा काहि संबंध नाहि. या पुस्तकावर बंदी आलि असती तर आपण एक नामी संधी वाया घालवली असती. हे तथाकथित विद्वान (खास करुन हे फिरंगी) लेखणीच्या वापर फार काळजीपूर्वक करतात. त्या लेखणीनामक शस्त्राची किंमत त्यांना ठाऊक आहे. आणि त्यांचा संपूर्ण बिमोड करायचा असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे. अन्यथा आपण आपल्याच राज्यात तोडफोड करु आणि ते लोक परत असं वेडंवाकडं लिहायला मोकळे. मूळात या लेन प्रकरणी शिवप्रेमींनी लेखणीनेच रान माजवयला हवे. स्त्री चारित्र्य -> त्यातुन स्त्रीयांना मिळणारे आत्मबल -> या आत्मबलाने शिवाजीवर संस्कार करणारि जिजाऊ -> या संस्काराच्या शिदोरीवर राज्य स्थापन करणारा शिवाजी -> यातलं काहिच समजायच्या लायकिची नसलेली लेन ची दिवाळखोरीत निघालेली बुद्धी, अशी हि साखळी जर आपण व्यवस्थीत पब्लीश (मराठी शब्द ??) करु शकलो तर या गोर्या माकडांना पुन्हा असं काहि लिहायची छाती होणार नाहि. आणि हेच त्यांच्या गलीच्छ विचारसरणीला योग्य उत्तर असेल. समस्त शिवप्रेमींनि या संधीचा लाभ घ्यावा.
मराठी/मराठा/हिंदु/भारतीय आम्हाघरीधना,
इतीहासात डोकाउन बघीतल्यास आपण आपापसात भांडुन आपलीच लावलेली वाट, आणि शिवाजीसारख्या फार कमि लोकांनी दाखवलेली ऐक्याची वाट, या दोनच वाटा दिसतात. यातल्या कुठल्या वाटेवरुन चालायचं हिच खरी कसोटी. भवीष्यात तु आणि मी "आम्ही" बनुन खांद्याला खांदा लाउन चालतो, कि एकमेकांचे हाथ तोडतो यावरच स्वर्गस्थ शिवप्रभुंच्या आत्म्याचि शांती अवलंबुन आहे.
(शिवप्रभुंच्या आत्मशांतीचा १००% इच्छुक पण ७५% आश्वस्त) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
28 Jul 2010 - 10:29 pm | शिल्पा ब
ब्राह्मणाच्या नावाने खडे फोडून तुमचं काय भलं होणार आहे? मी एक आठवले नावाच्या सल्लागाराला काही सल्ल्यांसाठी भेटले होते...आता मी काही त्यांची जात बित पहिली नाही पण भेत्ल्याबरोबर त्यांनी " आमची अमुक तमुक सुद्धा एका बडव्यान्कडेच दिली आहे ", "माझी मुलगी अमुक अमुक संस्थेत आहे" वगैरे चालू केले...याचा काय संबंध होता..पण आम्ही पण ब्राह्मनासार्खेच हुशार आहोत हे दाखवायची संधी काही गैरब्राह्मण सोडताना दिसत नाहीत...अजूनही...तुम्हीच स्वतःला कमी लेखत आहात...मग उगाच बोंबाबोंब करायची ब्राह्मणांनी अमुक अन तमुक...
आणि आता हे संभाजी ब्रिगेड प्रकरण...