जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
15 Jul 2010 - 1:57 am
गाभा: 

नमस्कार मिपाकरहो,

चिंतातुर जंतू यांचा हा उत्तम लेख त्यावर काही आक्षेपार्ह प्रतिसाद आल्याने आणि त्या प्रतिसादांचा त्रास मिसळपाव प्रशासनाला होऊ शकेल या शंकेतून काही काळ अप्रकाशित करण्यात आला होता. सध्या लेख प्रकाशित करून वाचनमात्र ठेवला आहे. लेखावरील आक्षेपार्ह प्रतिसाद एक एक करून अप्रकाशित केले जातील. तरीही असे प्रतिसाद राहील्यास सजग सदस्यांनी संपादकांना तसे कळवावे.

धन्यवाद,
संपादक मंडळ

जेम्स लेनच्या शिवाजीविषयीच्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टानं उठवल्यामुळे पुन्हा एकदा मराठी माध्यमं आणि जालावर त्याविषयी गदारोळ उठला आहे. या गदारोळात काही मूलभूत गोष्टींकडे सातत्यानं दुर्लक्ष होताना दिसतं आहे. हे दुर्लक्ष केवळ या एका मुद्द्यापुरतं मर्यादित नाही तर ते एका वाईट आणि अक्षम्य परंपरेच्या पायवाटेला हमरस्ता बनवणाऱ्या प्रवाहाचा भाग आहे. म्हणून सुशिक्षित समाजानं तरी त्याची दखल घेतली पाहिजे असं वाटतं. त्यासाठी हा लेखप्रपंच.

पुस्तकामागची ऐतिहासिक भूमिका:
मुळात आपल्याकडे अनेकदा असं दिसतं की एखाद्या गोष्टीवर अगदी आग्रही मतं प्रदर्शित करणाऱ्या लोकांनाही काही मुलभूत गोष्टी माहीत नसतात. असंच काहीसं या पुस्तकाच्या बाबतीत झालेलं दिसतं. इतिहास संशोधन करताना अनेक दस्तऐवजांचा वापर केला जातो. पुरावा म्हणून आधार घेतला जातो. ज्याची सत्यासत्यता अस्पष्ट आहे किंवा जी असत्यच आहेत अशी साधनंही इतिहासाचा अभ्यास करताना वापरता येतात याची जाण आपल्याकडे फारशी दिसत नाही. मिथकं आणि लोककथा यांचा वापर इतिहासात अशाच प्रकारे केला जातो. त्याची एक पध्दत आहे. त्याचे काही उपयोग आहेत. उदा. रामाविषयी उत्तरेत निर्माण झालेल्या लोककथा आणि दक्षिणेत निर्माण झालेल्या लोककथा यांचा तौलनिक अभ्यास केला तर त्यांत रामाची प्रतिमा भिन्न दिसते. रामाच्या दक्षिण विजयाविषयी जित (म्हणजे हरलेल्या) दक्षिणी लोकांचा जो विचार दिसतो, तो रामाला देव न मानता मर्त्य आणि स्खलनशील दाखवतो. किंवा, शकुंतला-दुष्यंताच्या मूळ कथेतली शकुंतला स्वाभिमानी आहे पण कालिदासाच्या नाटकात ती दुष्यंतानं आपला स्वीकार करावा यासाठी खूप झटते कारण ती कालिदासाच्या काळातल्या पुरुषप्रधान संस्कृतीनुसार वागते. अशा प्रकारे कालसापेक्ष, समाजसापेक्ष विश्लेषण करण्यासाठी लोककथांचा वापर करणं ही इतिहास संशोधनातली एक रूढ पद्धत आहे. हीच पध्दत लेन शिवाजीच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या मिथकांना लावतो. या पध्दतीत काहीही गैर नाही. लेनचे निष्कर्ष चूक किंवा बरोबर ठरवण्याचं काम इतिहास संशोधकांचं आहे आणि ते त्यांना करू दिलं पाहिजे. पण त्यासाठी मुळात पुस्तक उपलब्ध होणं गरजेचं आहे.

पुस्तकातला वादग्रस्त भाग:
'शिवाजीचे खरे पिता शहाजी नसून दादोजी कोंडदेव होते, असं महाराष्ट्रात काही लोक खाजगीत (चेष्टेच्या सुरात) म्हणतात.' अशा प्रकारचं विधान लेन पुस्तकात करतो. आता दोन प्रश्न विचारावे लागतात:
१. एखादी वदंता अस्तित्वात आहे असं म्हणणं हे पुस्तकात गैरलागू आहे का? तर अजिबात नाही. कारण पुस्तकाचं स्वरूपच शिवाजीविषयीची मिथकं, आख्यायिका, लोककथा यांचा धांडोळा घेऊन त्यातून काय बोध होतो, ते पाहणं हा आहे. त्यामुळे अशा वदंतेचा उल्लेख करणं या पुस्तकाच्या एकंदर स्वरूपाशी सुसंगत आहे.
२. अशी वदंता खरंच अस्तित्वात आहे का? तर नक्कीच आहे. इतरांविषयी सांगू शकत नाही, पण पुण्यात ब्राह्मणी वातावरणात वाढलेल्या लोकांना कधीतरी असं काहीतरी कानावर येतं. उदा: दत्तो वामन पोतदार यांच्या हे (म्हणजे शिवाजीच्या पितृत्वाविषयीची कथित बाब) लक्षात आलं पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही असं माझ्या स्वत:च्या कानावर आलं होतं. त्याला आता कित्येक वर्षं लोटली. तेव्हा जेम्स लेनचं अस्तित्व आमच्या दखलपात्रही नव्हतं. त्यामुळे या वदंतेला जन्म देणारा मनुष्य लेन खचितच नाही. त्याला निव्वळ तिची वाच्यता करण्याबद्दल (आणि तेही शिवाजीविषयीच्या मिथकं/लोककथांच्या चर्चेच्या चौकटीत ती करण्याबद्दल) झोडपणं म्हणजे निरोप्याला जीवे मारण्यासारखं आहे.

लोकक्षोभ:
या पुस्तकात भावना भडकवणारं लिखाण आहे म्हणून त्यावर बंदी घालणं योग्य आहे असं एक मत दिसतं. वरचे मुद्दे वाचून हे मत पोकळ आहे असं समंजस लोकांना वाटेल अशी अशा आहे. तरीही जर भावना भडकवणाऱ्या लिखाणाचाच लेखाजोखा घ्यायचा झाला, तर सर्वप्रथम लेनला लक्ष्य बनवणार्‍या संभाजी ब्रिगेडची पत्रकं, पुस्तकं यांवर बंदी घालावी लागेल. कारण त्यांतलं लिखाण खूप भडक आणि प्रक्षोभक आहे. त्यात 'असं काही लोक म्हणतात' वगैरे संभ्रमाला जागा नाही. उलट अंतिम सत्य आम्हालाच कसं ठाऊक आहे असं अतिरंजित शैलीत ठणकावून सांगितलं गेलं आहे. त्या मानानं लेनचं लिखाण हे Oxford किंवा तत्सम शैक्षणिक (academic) प्रकाशनसंस्थेला पचेल असंच (म्हणजे काहींच्या भाषेत मुळमुळीत) आहे. त्याच्याशी तार्किक लढा देता येऊ शकेल कदाचित, पण त्याला रंजक वा सवंग म्हणणं कठीण आहे.

आता पुस्तकाला बाजूला ठेवून पुस्तकासंदर्भातल्या घटनांचं ऐतिहासिक विश्लेषण करायला कुणी संशोधक बसला तर त्याला काय सापडू शकेल? (हे सर्व केवळ अंदाज आहेत; हेच अंतिम सत्य आहे असा लेखकाचा अजिबात दावा नाही. मात्र, विशिष्ट काळात समाजात घडणाऱ्या काही गोष्टींना एका सुसंगत धाग्यात बांधणं शक्य होतं आहे असं जाणवतं, एवढंच.)

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाज पुरेसा सत्ताधारी असूनही सर्वसामान्य मराठा मतदाराला त्याचा पुरेसा लाभ मिळत नसावा, कारण वरची समृद्धी तळागाळातल्या मराठा समाजापर्यंत पोहोचत नव्हती. नव्वदीच्या दशकात या काहीशा असंतुष्ट समाजाचा एक घटक काँग्रेसी पक्षांपासून दूर जाऊ लागला होता. १९९५ मध्ये भाजप-सेना युतीचा झेंडा विधान भवनावर फडकला. यामुळे काँग्रेसी मराठा नेते कदाचित असुरक्षित झाले असावेत.

अशातच एक वेगळा राजकीय प्रवाह दिसू लागला: धर्म, प्रांत, भाषा यांविषयीच्या अस्मितांना खतपाणी घालून, सर्वसामान्यांच्या भावना भडकावून त्यांद्वारे मतं मिळवता येतात याचे पुरावे नव्वदच्या दशकात अधोरेखित झाले. अशा भावना भडकलेला मतदार काही काळापुरता आपलं विदारक आर्थिक वा सामाजिक वास्तव विसरून जाऊ शकतो, हेही लक्षात येऊ लागलं.

काहीशा दुरावलेल्या मराठा मतदाराला अशीच काहीशी भूल घालून आपल्याकडे पुन्हा खेचून आणता येईल अशा आशेत मराठा नेतृत्व मराठा समाजाला भडकावता येईल अशा एखाद्या मुद्द्याच्या शोधात असावं.

एका काळापर्यंत महाराष्ट्र सरकारचे व त्या अनुषंगानं पवार यांचे लेनसारख्यांशी - म्हणजे व्यक्तिश: लेनच असं नाही, पण महाराष्ट्राविषयी काम करणाऱ्या परकीय इतिहास संशोधकांशी - चांगले घनिष्ठ संबंध होते. उदा: "House and Home in Maharashtra, New Delhi, Oxford University Press, १९९८" हे पुस्तक पाहावे. त्यात परदेशात महाराष्ट्राविषयी घडलेल्या एका चर्चासत्रातले शोधनिबंध आहेत. चर्चासत्राची सुरुवात पवारांच्या बीजभाषणानं झाली होती. म्हणजे पवार त्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी परदेशात गेले असावेत. अशा चर्चासत्रांना, यात आणि इतरत्र प्रकाशित झालेल्या अनेक संशोधकांना पवारांनी सरकारतर्फे (मुख्यमंत्री म्हणून) मदत केली होती. महाराष्ट्रावर होणाऱ्या संशोधनाशी त्यामुळे ते परिचित असावेत. लेन हा त्यांपैकी एक होता.

या पार्श्वभूमीवर भावना भडकावून राजकीय फायदा उठवता येईल असा मुद्दा म्हणून लेनचा कोलीत म्हणून वापर केला जाऊ शकतो, याची जाणीव मराठा नेतृत्वाला झाली असावी. त्यातच भांडारकर संस्था हे soft target होतं. कारण ज्याच्या भावना संस्थेवरच्या हल्ल्यानं दुखावतील आणि जो आपल्यापासून दुरावेल, असा मतदार अगदीच अल्पसंख्य होता - कारण मुळातच सुशिक्षित मतदारानं (म्हणजे आपण सर्व किंवा आपल्यापैकी बरेच जण) विचारवंतांना 'विचारजंत' म्हणून संबोधत सुशिक्षित, ज्ञानाधिष्ठित व्यवहाराला केराची टोपली दाखवली होती (हेच अजूनही चालू दिसतं).

थोडक्यात, स्वत:ला सुशिक्षित, समंजस, प्रतिष्ठित म्हणवून घेणारे आपण जेव्हा विचारवंतांना अप्रतिष्ठा दाखवतो, जगभरात रूढ असणार्‍या विचारपद्धतींना आणि ज्ञानशाखांना आपल्या अज्ञानापोटी कस्पटासमान मानतो, तेव्हा अशा भावना भडकावून लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून राजकारण करणाऱ्या आणि त्यावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या नेत्यांच्या हातातली आपण बाहुली बनतो. यातून आपण एक समाज म्हणून आपली वैचारिक दिवाळखोरी जगजाहीर करतो. जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवली जाण्याच्या निमित्तानं आपलंच आपल्याला जे दर्शन घडतं आहे, ते याच्याशी सुसंगतच आहे.

प्रतिक्रिया

अनिवासि's picture

15 Jul 2010 - 2:16 am | अनिवासि

अतीशय विचारपुर्वक लेख. सहमत. satanic verses वर झालेल्या प्रतिक्रियेच्या वेळी त्या समाजाला अतीरेकी/अशिक्षीत म्हणुन नावे ठेवली आणि आता आपणही तेच करत आहोत असे मला वाटत होते. ह्या मुद्देसुत लेखाने बराच प्रकाश पडला. धन्यवाद!

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2010 - 4:29 pm | मुक्तसुनीत

सर्वप्रथम , एक डिस्क्लेमर : माझा हा प्रतिसाद अनिवासी यांना उद्देशून नाही. मला दुसर्‍यापानावर जायला आवडत नाही म्हणून येथे लिहितो आहे.

प्रस्तुत धाग्याच्या निमित्ताने अभिव्यक्तीस्वातंत्र्य, कलावंत/लेखकांना मोकळा श्वास मिळण्याकरताचे वातावरण आदि गोष्टींचा परामर्श घेतला जातो आहे हे उत्तमच.

मात्र या निमित्ताने, ज्या लोकांची प्रतिमा गोलायाथ विरुद्ध उभ्या असलेल्या डेव्हिड्ची असते त्यांच्यातले काही मानवी गुणदोषही जाणून घेणे उद्बोधक ठरू शकते.

जेम्स लेनच्या प्रकरणी त्यांनी मजकूर काढून घेतला, त्याच्या प्रकाशनानेही ही तयारी दाखवली हे सारे एकवेळ समजून घेण्यासारखेच आहे. शेवटी जीव वाचवायला हे करणे आवश्यक ठरते. (सॉक्रेटीसच्या वीरमरणाचे दाखले देऊन आजकालच्या साहित्यिकांना भ्याड ठरवणे अर्थातच शक्य आहे. )

मात्र काही व्यक्तींच्या संदर्भात हे प्रश्न निश्चितच जास्त गुंतागुंतीचे होतात. एका व्यक्तीचे उदाहरण घेऊन हे स्पष्ट करता येईल. ही व्यक्ती कार्यरत आहे , मुख्य म्हणजे अशा व्यवसायात आहे ज्यात अब्रूनुकसानीचे दावे ही क्षुल्लक बाब ठरावी ; त्यामुळे नाव न घेताच (भ्याडपणे) लिहितो.

ऐंशीच्या उत्तरार्धात , नव्वदीच्या दशकात ही व्यक्ती तिच्या सायंदैनिकामुळे प्रकाशात आली. महाराष्ट्रातल्या उजव्या शक्तींच्या विधानसभेपर्यंतच्या घोडदौडीच्या यशाचा काळ. आता सत्तेबाहेर पडलेल्या आणि जनाधार हरवलेल्या या उजव्या शक्ती त्यावेळी जोरात होत्या. या काळात त्या शक्तींविरुद्ध दंड थोपटून त्यांच्या गल्लीमधे त्यांना आवाज देण्याची हिंमत दाखवल्याने , प्रस्तुत सायंदैनिकचालक सार्‍या प्रागतिक लोकांच्या आदराचे स्थान बनले होते.

आजचे सत्य असे आहे की हे सायंदैनिक काही कोटींना विकले गेले आहे. विकत घेणारा घटक त्याच उजव्या शक्तींपैकी एकाची फिनान्शिअल विंग. सायंदैनिक संपलेलेच आहे. पण त्याबरोबरच या नव्वद-दशक-कालीन प्रकाशमान व्यक्तीचे रेप्युटेशनही. गेल्या दशकभरात वृत्तपत्रीय वर्तुळात या व्यक्तीच्या (गैरहजर असलेल्या ) अर्थशुचितेबद्दल उघडउघड चर्चा आहे.

मुद्दा इतकाच आहे, की वेगळा विचार मांडणार्‍या , प्रसंगी एस्टॅब्लिशमेंट शी दोन हात करणार्‍या घटकांनाही शेवटी मानवी बाजूही असतेच. अंगणात गोलायाथ समोर उभा असलेला डेव्हिड परसात " दिज आर द हॉलो मेन, दिज आर द स्टफ्ड मेन" चे उदाहरण ठरू शकतो.

सुनील's picture

16 Jul 2010 - 4:47 pm | सुनील

वागळे की दुनिया!

चालायचच!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

क्रेमर's picture

16 Jul 2010 - 4:59 pm | क्रेमर

दीर्घकाळानंतर ठामपणे घेतलेल्या भुमिकांमधील चूका ध्यानात येतात. लोक बदलतात. हा लेनची माफी व अभ्यासकांचा भ्याडपणा या (अल्पकालीन) गोष्टींपेक्षा वेगळा मुद्दा आहे.

_________________
बाकी चालू द्या.

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2010 - 5:03 pm | मुक्तसुनीत

क्रेमर यांच्या विधानाशी असहमती.
माझ्या पोस्ट मधे मी दोन्ही बाबतीत या संदर्भात साम्य आहे असे म्हण्टलेले नाही. "एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध दोन हात करणार्‍यांची मानवी बाजू" या संदर्भात दोन्ही गोष्टींकडे पाहण्याचा प्रयत्न आहे.

क्रेमर's picture

16 Jul 2010 - 5:06 pm | क्रेमर

माझ्या पोस्ट मधे मी दोन्ही बाबतीत या संदर्भात साम्य आहे असे म्हण्टलेले नाही.

तसे असल्यास प्रस्तुत चर्चेत 'एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध दोन हात करणार्‍यांची मानवी बाजू' याविषयीचे भाष्य अप्रस्तुत आहे.
_________________
बाकी चालू द्या.

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2010 - 5:08 pm | मुक्तसुनीत

जरूर सांगा.

येथे लेन्सचे पुस्तक, उडालेला धुरळा, महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाचा सांगोपांग अभ्यास, त्याचे सामाजिक परिणाम, धुरळ्यामागील राजकारण, सजाण नागरिकांनी वैचारिक दमनास विरोध करण्याची गरज याबाबत आहे. एका व्यक्तिने त्याच्या/ तिच्या जीवनात भुमिकाबदल करण्याबद्दल नाही.

_________________
बाकी चालू द्या.

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2010 - 5:17 pm | मुक्तसुनीत

म्हणजे अवांतर म्हणून घेतलेल्या बँडविड्थ चा नवा शब्द अप्रस्तुत आहे तर ! :-)

क्रेमर's picture

17 Jul 2010 - 1:04 am | क्रेमर

हे जे कोण डाव्या बाजूचे पत्रकार होते यांच्यावर आधी (शारिरिक) हल्ला करणारी माकडे अजुनही त्यांच्यावर हल्ला करत असतात हे खरे आहे काय? (पत्रकाराचे नाव स्पष्टपणे लिहिलेले नसल्यामुळे संदिग्धता आहे.) तसे असल्यास या पत्रकाराचे उदाहरण देणे अप्रस्तुत नाही. वैचारीक दडपशाहीवरून समाजाची परिपक्वता जोखणार्‍या धाग्यावर मिपावर पुर्वी झालेल्या या चर्चेला लिंकवण्याचा मोह आवरत नाही. यासंदर्भात आणखी एक उद्बोधक चर्चा.

_________________
बाकी चालू द्या.

आमोद शिंदे's picture

21 Jul 2010 - 2:00 am | आमोद शिंदे

दोन्ही लिंक्स एकच चर्चा दाखवत आहेत. दुसरी चर्चा कोणती ते कळेल काय?

आमोद

क्रेमर's picture

21 Jul 2010 - 2:26 am | क्रेमर

धन्यवाद.
दुसर्‍या चर्चेचा दुवा
धागा वर आलाच आहे तर ही घ्या आणखी एक तशीच चर्चा.
_________________
बाकी चालू द्या.

आमोद शिंदे's picture

21 Jul 2010 - 2:30 am | आमोद शिंदे

आभारी आहे. आता दुसरी चर्चाही वाचतो.

वेताळ's picture

16 Jul 2010 - 5:20 pm | वेताळ

वरील आपल्या लेखात आपण सुशिक्षित लोक विचार करत नाहीत. त्याची विचार करण्याची शक्ती संपली आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न प्रमाणापेक्षा जास्त यशस्वी झाला आहे. आपल्याला हवे ते विचार,निष्कर्ष लोकाच्या गळी उतरवण्यात आपण यशस्वी झाला आहात.जेवढे मुद्दे तुम्हाला सोपस्कार वाटतात तेव्हढ्याचा परामर्श तुम्ही घेतलात व जे मुद्दे विचारात घ्यायला हवे होते त्या कडे पुर्णपणे डोळेझाक केली आहे.
पहिला मुद्दा रामायण किंवा शंकुतला-दुष्यत ही भारतातील दंतकथा आहेत. पण शिवाजी महाराज व त्याचा इतिहास ही दंतकथा नसुन ते एक सत्य आहे.ज्याचे पुरावे आज ही उपलब्द आहेत.
पुढे तुम्ही म्हणता कि
अशा प्रकारे कालसापेक्ष, समाजसापेक्ष विश्लेषण करण्यासाठी लोककथांचा वापर करणं ही इतिहास संशोधनातली एक रूढ पद्धत आहे. हीच पध्दत लेन शिवाजीच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या मिथकांना लावतो.

माझे आतापर्यतचे आयुष्य महाराष्ट्रात गेले,माझे वडील त्याचे वडील अश्या कितीतरी पिढ्या इथे महाराष्ट्रात आहेत किंवा होवुन गेल्या. परंतु लेन किंवा त्याचे समर्थन करणारे जी लोककथा किंवा ईनोद आमच्या कोणत्याच पिढीने कधी एकला किंवा वाचला नव्हता मग अचानक लेन सारख्या माणसाला तो पुण्यात वास्तव्यास असताना कसा काय बर वाचता किंवा एकता आला?का तो फक्त त्यालाच सांगण्यासाठी बनवला गेला? ह्यावर तुम्ही का प्रकाश टाकत नाही.मग असले बिनबुडाचे लिखाण कशाबद्दल खपवुन घ्यायचे?जी कधीच दंतकथा किंवा लोककथा म्हणुन महाराष्ट्रात कधी सांगितली गेली नाही ती कशाबद्दल खपुन घ्यावी? व खोटी गोष्ट स्विकारली म्हणजे वैचारिक उन्नती कोणाची होणार आहे?
एका ठिकाणी तर तुम्ही खरे गुन्हेगार कोण आहात हे सांगत असताना त्याना त्याची शिक्षा न मिळता उलट त्याचा जयजयकार करण्यास सांगत आहात.
पण पुण्यात ब्राह्मणी वातावरणात वाढलेल्या लोकांना कधीतरी असं काहीतरी कानावर येतं. उदा: दत्तो वामन पोतदार यांच्या हे (म्हणजे शिवाजीच्या पितृत्वाविषयीची कथित बाब) लक्षात आलं पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही असं माझ्या स्वत:च्या कानावर आलं होतं.

मग हे सगळ पुण्यात घडले असे सांगता. मग लेनला ह्या सर्व मिथकाची माहिती पुण्यात व ज्याठिकाणी तो संदर्भ घेत होता त्या संस्थेतच माहित झाला असावा. मग हे सगळे त्याला सांगणारे कोण लोक ह्याचा शोध खरतर घेतला गेला पाहिजे.
मुळातच लेनच्या लिखाणाला कुठेही लिखित किंवा दंतकथेचा आधार नाही. ही गोष्ट अगदी जाणिवपुर्वक बनवुन ती लेन कडुन लिहुन घेतली आहे.कारण महाराष्ट्रात एका राजाच्या पंतप्रधान घराबद्दल दंतकथा प्रसिध्द आहे. त्याचा रोष महाराजांवर दंतकथा पसरवुन तरी कोणी घेत नाही का ह्याचा शोध घेतला गेला पाहिजे. अशी जर एकादी दंतकथा असती तर तिच्याबद्दल लिखाण इतरत्र तरी झाले असते.मुघल किंवा इतर मुस्लिम शासक महाराजाचे मोट्ठे शत्रु होते त्याच्या लिखाणात तरी अशी गोष्ट आली पाहिजे होती.किंवा एकाद्या बखरीत किंवा इतिहासकालीन पत्रात तसा उल्लेख हवा होता. म.फुले देखिल एक इतिहास संशोधक होते त्याच्या लिखाणात देखिल असा उल्लेख नाही. मग एकाएकी ५०/६० पुर्वी हे पुण्यात कसे काय बरे लोकाना कळाले?

बाकी संभाजी ब्रिग्रेट किंवा तत्सम संघटना काय ह्या पावसाळ्यातील कुत्र्यांच्या छत्री प्रमाणे आहेत. जरा पोषक वातावरण मिळाले कि फोफावायला सुरुवात करतात.पण त्याची खेळी अजुनतरी यशस्वी ठरली नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचा अजुन एक ही नेता जनतेने स्विकारला नाही आहे.त्यात कोणीही निवडुन येण्याच्या पात्रतेचा नाही आहे.लोकाच्यात रोष आहे तो महारांजावर जी चिखलफेक केली त्याला व ती करण्यात ज्यानी चिखल पुरविला त्या साहित्यिक म्हणुन मिरवणार्या भ्याड षंढाविषयी.
काही ठिकाणी तुम्ही ओढुन ताणुन वेगवेगळ्या लोकांचे हितसंबध ह्या प्रकरणात गुंतल्याचे दाखवुन मुळ प्रकरण तुम्ही विसरवण्याचा प्रयत्न केला आहे.वैचारिक दिवाळखोरी मराठी माणसाची तुम्ही एका परदेशी लेखकाचे पुस्तक स्विकारणे किंवा त्याचा विरोध करणे ह्यावरुन कसे काय ठरवु शकता? लेन कुणी आतंरराष्ट्रीय ख्यातीचा इतिहास संशोधक किंवा लेखक नाही आहे.तो जी चिखलफेक करतो त्यावर लोक चिढतात किंवा वेगवेगळ्या मार्गाने आपला विरोध व्यक्त करतात म्हणजे तो समाज वैचारिक दिवाळखोरीत निघाला असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? मग त्याच समाजाचे तुम्ही एक घटक आहात.लेन ने खरोखर जर संशोधन करुन ते पुस्तक प्रसिध्द केले असते तर ते प्रकाशन निव्वळ महाराष्ट्रात विरोध होतो म्हणुन मागे घेतले गेले नसते.

वेताळ

श्रावण मोडक's picture

16 Jul 2010 - 5:47 pm | श्रावण मोडक

उशीरा वाचला हा प्रतिसाद. सायंदैनिक संपले, अर्थशुचितेविषयी चर्चा झाली. त्यापुढे इतरही बरंच काही झालं. काही तथ्यं, काही त्याभोवतीची आवरणं... मानवी बाजू वगैरे ठीक. पण ती ध्यानी न घेता याच व्यक्ती जेव्हा समाजाला अक्कल शिकवू जातात तेव्हा पंचाईत होते. चालायचेच. :)
हा प्रतिसाद मुद्याला धरून असला तरी अवांतर ठरू शकेल. तसे वाटल्यास बिनदिक्कत उडवावा.

मुक्तसुनीत's picture

17 Jul 2010 - 7:11 am | मुक्तसुनीत

या विषयावरचा , प्रस्तुत लेखातल्या विचारांशी साधर्म्य दाखवणारा एक अभ्यासपूर्ण लेख.

http://thinkmaharashtra.com/think1/index.php?option=com_content&view=art...

क्रेमर's picture

17 Jul 2010 - 7:34 pm | क्रेमर

अशा लेखांतील सुलभीकरण वापरुन मला एक समांतर-गंमतीदार विश्लेषण सूचते.

शतकानुशतके ब्राह्मण समाजाने ब्राह्मणेतरांना ज्ञानापासून दूर ठेवले. ज्ञानशाखांवरील मक्तेदारी मागील शतकांत संपुष्टात येत आहे असे त्यांच्या ध्यानी आले. ब्राह्मणेतरांवरचा ब्राह्मणांचा प्रभाव कमी होऊ लागला. ब्राह्मणांचे खच्चीकरण टाळण्यासाठी काही लोकांना ब्राह्मणांची एकजूट करावीशी वाटली. त्या डावपेचाचा भाग म्हणून लेनला हा विनोद असल्याचे काही लोकांनी खोटे-खोटेच सांगितले. जेणेकरून शिवाजीच्या चाहत्या समाजातील लोक ब्राह्मणांवर हल्ले करतील व ब्राह्मण या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी एकत्र येतील.

_________________
बाकी चालू द्या.

मुक्तसुनीत's picture

15 Jul 2010 - 2:29 am | मुक्तसुनीत

लेख आवडला. कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाकडे संयत दृष्टीने वेध घेण्याच्या , त्या प्रश्नांचे स्वरूप समजून घेण्याच्या प्रवृत्तीला जेथे "विचारजंत" असे हिणवले जाते त्या प्रस्तुत संकेतस्थळावर हा लेख टाकण्याकरता लागणारे धैर्य दाखवल्याबद्दल अभिनंदन.

महाराष्ट्राच्या बदलणार्‍या सांस्कृतिक पोताबद्दलची निरीक्षणे मार्मिक आहेत. वारकरी परंपरा, प्रबोधनाची , वैचारिक चळवळींची पार्श्वभूमी , आंबेडकरी चळवळींचे माहेरघर ही बिरुदे मिरवणार्‍या महाराष्ट्रात फोफावलेली ही असहिष्णुतेची विषवल्ली ही खरोखरच चिंतेची बाब आहे.

मनिष's picture

15 Jul 2010 - 11:32 am | मनिष

शब्दा-शब्दाशी सहमत. पण विचारांना आवहन करणे, विचार मांडणे आणि ते पटवून देणे हे अवघड काम आहे आणि भावना भडकावणे सोपे..तेच राजकारणी करतात. संभाजी ब्रिगेड किंवा सनातन प्रभात - अतिशय भडक आहेत, त्यांच्यावर खरच बंदीची गरज आहे!

सुनील's picture

15 Jul 2010 - 2:39 am | सुनील

चांगला लेख.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धनंजय's picture

15 Jul 2010 - 2:42 am | धनंजय

आवडला.

अडगळ's picture

15 Jul 2010 - 3:03 am | अडगळ

माणसाचा देव केला की त्याला बासनात गुंडाळून ठेवणे सोपे जाते.
आणि मग पारायणाचा धंदा पण जोरात करता येतो. जाणुनबुजून वा अपघाताने केलेले/झालेले मूर्तिभंजन सुध्दा म्हणूनच कधीकधी महत्त्वाचे ठरते.एरवी न दिसणार्‍या अनेक बाजू या मंथनातून दिसुन येतात.

Nile's picture

15 Jul 2010 - 3:13 am | Nile

सदर प्रकरणाचा लेखाजोखा आवडला. जास्तीत जास्त लोक (पेपरे, वाहिन्या आणि इतर जातीयवादी माध्यमांनी निर्माण केलेल्या) पुर्वग्रहदुषित भावनेला दोन मिनीटे दुरु करुन हे वाचतील तर बरे होइल.

अशी वदंता खरंच अस्तित्वात आहे का? तर नक्कीच आहे.

+१. मी सुद्धा लेनप्रकरणा आधी ऐकले होते.

-Nile

क्रेमर's picture

15 Jul 2010 - 5:40 am | क्रेमर

पुस्तकामागची ऐतिहासिक भुमिका, वदंतेचा वापर करून व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा अभ्यास यांचे महत्त्व विषद करून जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत होत असलेल्या गदारोळाचा आढावा घेण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. या पुस्तकावर बंदी घातली जाऊ नये, पुस्तक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असावे याबाबत नीरक्षीर विवेकाने विचार करणार्‍या कुठल्याही व्यक्तिला काही आक्षेप नसावा. याआधी झालेल्या गदारोळात भांडारकर प्राच्यसंस्थेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणे आवश्यक आहे. अशा वृत्तींना परिपक्व समाजात थारा नसावा. हे सर्व मान्य होण्यासारखेच आहे. परंतु आपल्याकडे अशा घटनांची कमतरता नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतच असतात. प्रसिद्धी माध्यमांत याविषयी चर्चा झडतच असतात. याबाबत वेळोवेळी डोळ्यात खूपणारी गोष्ट म्हणजे तथाकथित विचारवंत मात्र ठामपणे दबावाला बळी न पडता आपली मते मांडत नाहीत. माफी मागून, पुस्तक मागे घेऊन पळपुटेपणा दाखवतात. आपल्या लिखाणाने, कलाकृतीने उडालेल्या धुरळ्याची जाबाबदारी टाळण्याची कातडीबचाऊ भुमिका घेतली जाते.

जेम्स लेनच्या प्रकरणात काय दिसून येते? त्याने लिहिलेल्या पुस्तकातील विश्लेषणाविषयी अभ्यासक वाद घालू शकतील. त्या लेखनाच्या पात्रतेविषयी मत मतांतरे असतील. पण पुस्तकातील आक्षेप घेण्यात आलेल्या मजकुरात काहीही गैर नाही. त्या वाक्याबाबत पुअर जजमेंट हा एकमेव आक्षेप घेता येऊ शकेल. म्हणजे महाराष्ट्रात काही काळ घालवल्यानंतर, इथल्या अभ्यासकांशी बोलल्यानंतर लेनला या विधानाचा विपर्यास करून कशा प्रकारचा जनक्षोभ माजू शकेल याची कल्पना यावयास हवी होती. (त्याआधी प्रस्तावनेत आभार मानलेल्या जयंत लेले यांच्या पुस्तकावरही अशा स्वरुपाच्या विधानामुळे बंदी घातली गेल्याचे विकीपिडियावरून कळते.) हा एक भाग सोडल्यास जेम्स लेनची चुकी काय हे कळत नाही. या भागाबाबतही अभ्यासक म्हणून मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्याला त्या वदंतेविषयी लिहिणे आवश्यक वाटले असणे शक्य आहे. असे असतांना झुंडशाहीला बळी पडून जेम्स लेनने माफी मागण्याची आवश्यकता होती काय? तसेच पुस्तकात आभार मानलेल्या एकातरी व्यक्तिने* ही वदंता ऐकली असल्याची कबुली दिली काय? (याउलट काहींनी ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसकडे पुस्तक मागे घेण्याची मागणी केली.) विचारवंतांच्या अशा कणाहीन, भ्याड भुमिकेमुळे मुठभर लोकांची झुंडशाही यशस्वी ठरते. या विचारवंतांचे 'अक्षम्य परंपरेच्या पायवाटेला हमरस्ता बनवणाऱ्या प्रवाहातील' योगदान विचारात घेणे गरजेचे आहे. लेखात चिंतातुरजंतु यांनी या महत्त्वाच्या घटकाल वगळलेले आहे.

लेखाच्या उत्तरार्धात केलेल्या राजकिय विश्लेषणाशी असहमत आहे. या विश्लेषणात मराठा वोट बँकेला आपल्याकडे वळवून घेण्यासाठी रचलेले कारस्थान असा काहीसा सूर आहे. माझ्या मते हे सुलभीकरण आहे. सर्वप्रथम जातींचा राजकारणासाठी वापर हा नव्वदच्या दशकात लागलेला शोध नसून त्याच्या कितीतरी आधीपासूनच असा वापर महाराष्ट्रात सुरू आहे. आपल्या समाजात जातीयवाद खोलवर रुजलेला आहे. अशा प्रकरणांतून ही जातीय अस्मिता उफाळून येते एवढेच. 'मराठा समाजाला भडकवता' यावे असा मराठा समाज एकजिनसी नाही. अशा फुटकळ प्रकरणांतून कुठल्या राजकिय पक्षाला (हिंदुत्वाप्रमाणे किंवा प्रांतिक मुद्द्यांप्रमाणे) फायदा झाल्याची काही ठोस उदाहरणे नाहीत. प्रस्तुत प्रकरणात सर्वच राजकिय पक्ष सामील झालेले दिसतात. (संभाजी ब्रिगेडचे खेडकर यांच्या पत्नी भाजपत असल्याचे ऐकले होते.) या मुद्द्याचा वापर करून निवडणुका जिंकता येतील असे कुठलेच मतांचे गणित दिसत नाही. महाराष्ट्रात मराठा, वंजारी, धनगर, माळी या जातींमध्ये सत्तेसाठी चढाओढ आहे. ब्राह्मणांविरुद्ध जमवाजमव करून कुठल्याच पक्षाला फारसे यश मिळण्याची शक्यता नाही. तेव्हा लेखाच्या उत्तरार्धातील राजकिय विश्लेषण अगदीच तकलादू आहे. तसेच कमीतकमी जालावरील चर्चांतून फक्त मराठा जातीतल्याच लोकांचा संताप झाला आहे असे दिसत नाही. सर्वच मराठी लोकांच्यात संताप जाणवतो - फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांत नाही. लेखकाचा तसा हेतू नसेलही पण उत्तरार्धातले विश्लेषण शिवाजीची पॅन मराठी ओळख नाकारते असा माझा समज झाला आहे.

*In India, my scholarly home has been the Bhandarkar Oriental Research Institute in Pune, and there I profited from the advice and assistance of the senior librarian, V. L. Manjul. I read texts and learned informally a great deal about Marathi literature and Maharashtrian culture from S. S. Bahulkar, Sucheta Paranjpe, Y. B. Damle, Rekha Damle, Bhaskar Chandavarkar, and Meena Chandavarkar. Thanks to the American Institute of Indian Studies and Madhav Bhandare, I was able to spend three productive periods of research in Pune. (या दुव्यावरून) तसेच I thank especially Anne Feldhaus, Meera Kosambi, Jim Masselos, Irina Glushkova, A. R. Kulkarni, Rajendra Vora, Narendra Wagle, Jayant Lele, Dilip Chitre, Eleanor Zelliot, Lynn Zastoupil, Stewart Gordon, and Lee Schlesinger. (येथून)

पंगा's picture

15 Jul 2010 - 5:58 am | पंगा

तसेच कमीतकमी जालावरील चर्चांतून फक्त मराठा जातीतल्याच लोकांचा संताप झाला आहे असे दिसत नाही. सर्वच मराठी लोकांच्यात संताप जाणवतो - फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांत नाही. लेखकाचा तसा हेतू नसेलही पण उत्तरार्धातले विश्लेषण शिवाजीची पॅन मराठी ओळख नाकारते असा माझा समज झाला आहे.

अधोरेखिताबद्दल थोडा साशंक आहे. (संताप होणे हे योग्य की अयोग्य या वादात न पडता) ज्याप्रमाणे फक्त मराठा जातीतल्याच लोकांचा संताप झालेला आहे असे दिसत नाही, त्याचप्रमाणे फक्त एका विशिष्ट जातीच्या (कोणत्याही एका विशिष्ट जातीच्या) लोकांत संताप झालेला नाही, असेही जाणवत नाही. आपला तसा हेतू नसेलही, पण त्या वाक्यातल्या उत्तरार्धातले विश्लेषण एका विशिष्ट जातीची पॅन मराठी ओळख नाकारते असा माझा समज झाला आहे.

धन्यवाद.

(अवांतरः ही 'विशिष्ट जात' कोणती असावी बरे?)

- पंडित गागाभट्ट.

क्रेमर's picture

15 Jul 2010 - 6:22 am | क्रेमर

सर्वच मराठी लोकांच्यात संताप जाणवतो - फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांत नाही.

'फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांतच नाही तर सर्व मराठी लोकांच्यात (सर्व जातीतील मराठी लोकांत) संताप जाणवतो' या अर्थाने वाक्य वापरले आहे. त्या वाक्याप्रमाणेच पुढचे वाक्य पहा. ओबामाला अमेरिकेतील सर्व वंशातील लोकांनी मते दिली - फक्त एका विशिष्ट वर्णाच्या लोकांनी नाही.

पंगा's picture

15 Jul 2010 - 6:34 am | पंगा

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

आपण दिलेली पर्यायी वाक्यरचना नि:संदिग्ध आहे; उलटपक्षी मूळ वाक्यरचनेतून अनपेक्षित (आणि भलताच, अभिप्रेत अर्थाच्या काहीसा विरुद्धार्थी) अर्थ वाचकापर्यंत पोहोचून गैरसमज होण्यास (माझा झाला तसा) भरपूर जागा आहे, एवढेच या निमित्ताने नमूद करू इच्छितो.

बाकी आपलेही विश्लेषण विचार करण्यासारखे आहे.

- पंडित गागाभट्ट.

क्रेमर's picture

15 Jul 2010 - 7:24 am | क्रेमर

अभिप्रेत, अनपेक्षित, विरुद्ध सर्व अर्थ लावण्याचा वाचकाचा अधिकार अबाधित आहे.

पंगा's picture

15 Jul 2010 - 10:03 am | पंगा

प्रश्न वाचकाचा अधिकार अबाधित असण्याचा नाही. (तो अधिकार तर अबाधित आहेच.)

मात्र, लेखकास अभिप्रेत असलेला अर्थ सोडून इतर भलताच कोणतातरी अर्थ वाचकास प्रतीत होणे हे लेखकाकरिता अन्याय्य (unfair अशा अर्थी) आहे की नाही हे मला माहीत नाही (मला वाटते असावे), पण वाचकाकरिता (लेखकास समजून घेण्याच्या दृष्टीने) निश्चितच अन्याय्य (पुन्हा, unfair) आहे असे वाटले, म्हणून हा प्रपंच.

असो.

- पंडित गागाभट्ट.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jul 2010 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार

सर्वच मराठी लोकांच्यात संताप जाणवतो - फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांत नाही.

हा संताप कोणाल आणि नक्की कोणाविषयी जाणवत आहे, हे अजुनही माझ्या लक्षात येउ शकलेले नाही.

उदा. ऑर्कुट सारख्या सोशल वेबसाईटसवरील हे स्टेटस बघा :-

"ब्राह्मण जिवंत राहणे हा बहुजनांचा अपमान"

MARATHYANNO Shivrayanchi badnami karnarya BAMNANA dhada shikva.James Laine hastak asun BAMNANCHE mastak ahe.Te mastakach thecha.

''आई जिजाऊ यांच्या चारित्र्य हनानाचा बदला पृथ्वी निब्राम्हन करूनच वसूल केला पाहिजे''

" करा तलवारीला धार आन बामणावर वार"

कदाचीत हि फेक प्रोफाईल्स देखील असु शकतील. पण मुद्दा हा आहे की संताप हा असा देखील असु शकतो ? आणि हा संताप नक्की लेनवरच अथवा त्याच्या पुस्तकावर आहे का ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मृगनयनी's picture

15 Jul 2010 - 4:31 pm | मृगनयनी

संभाजी ब्रिगेडचे खेडकर यांच्या पत्नी भाजपत असल्याचे ऐकले होते.)

रेखा पुरुषोत्तम खेडेकर... बुलढाण्याच्या आमदार होत्या. १९९० सलापासून बीड, बुलढाणा येथे "संभाजी ब्रिगेड" या अतिरेकी संघटनेचा उगम झाला... असे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. :|

"ब्राह्मण जिवंत राहणे हा बहुजनांचा अपमान"

MARATHYANNO Shivrayanchi badnami karnarya BAMNANA dhada shikva.James Laine hastak asun BAMNANCHE mastak ahe.Te mastakach thecha.

''आई जिजाऊ यांच्या चारित्र्य हनानाचा बदला पृथ्वी निब्राम्हन करूनच वसूल केला पाहिजे''

" करा तलवारीला धार आन बामणावर वार"

प.रा..... या अशा वाक्यांवर काही प्रतिक्रिया देण्याचं किन्वा atleast ही वाक्ये खरोखर चुकीची आहेत... यामुळे समाजात जातीयवाद जास्त बोकाळतो.... हे समजून घेऊन इथे उघडरीत्या मांडायचं धारिष्ट्य खूप कमी मिपाकरांकडे आहे.

"संभाजी ब्रिगेड'वाल्यांना (अर्थात दुर्जनांना)मुक्ती मिळू देत" या वाक्यामुळे अतिदु:खी होऊन प्रतिक्रिया देणारे "मिपाकर" आता मूग गिळून का बरं बसले आहेत.... हे ज्याचे त्यानेच समजून घ्यावे! ;)

तथाकथित आया-बहिणींच्या अर्थात मायावती'च्या उल्लेखाने कळवळणारे "महापुरुष" आता कुठे गेले बरं! :-?

_____________

त्या ब्रिगेडवाल्यांनी किन्वा महासन्घवाल्यांनी किन्वा ब्राह्मणद्वेष्ट्यांनी ब्राह्मणंविरूद्ध कितीही गरळ ओकली.. वाट्टेल ते लिहिले, बोलले तरी सत्ताधीश राजकारणी मात्र सोयीस्कररीत्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात... हेच तर खरे दुर्दैव! :|

|| जय परशुराम ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

थोडे शब्द इकडचे तिकडे केले तर तोच अर्थ होतो.
संभाजी ब्रिग्रेड किंवा तत्सम संघटना काय लायकीच्या आहेत हे सर्वाना ठाउक आहेच. पण वरील चितावणीखोर वाक्ये कोणाची आहेत हे कळाल्याशिवार त्यावर तरी कसे भाष्य करणार?
आपले विचार जर कोणी मान्य करीत नसेल तर त्याची हत्या करावी ह्या विचारसरणीचाच मी तिरस्कारच करतो.दुर्जनाचा नाश करायला भारतात कायदा अस्तित्वात आहे.
तसेच स्त्रींयाच्यावर शस्त्र उगारणे किंवा त्याची हत्या करणे ह्याला देखिल माझा विरोध आहे.

वेताळ

क्रेमर's picture

15 Jul 2010 - 4:45 pm | क्रेमर

हा संताप कोणाल आणि नक्की कोणाविषयी जाणवत आहे, हे अजुनही माझ्या लक्षात येउ शकलेले नाही.

वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टीविषयी संताप जाणवत आहे. संभाजी ब्रिगेड किंवा तत्सम जातीयवादी लोकांना ब्राह्मणांविषयी संताप जाणवत आहे. इतरांना लेनविषयी तसेच पाश्चात्य इतिहासलेखकांविषयी संताप जाणवत आहे. आणखी काही इतरांना लेनच्या पुस्तकावर घातलेली बंदी चुकीची आहे असे म्हणणार्‍या लोकांविषयी संताप जाणवत आहे. हा संताप निरनिराळ्या लोकांविषयी जाणवत आहे हे खरे असले तरी या संतापाचे मूळ एकाच गोष्टीत आहे. ते म्हणजे आपल्या समाजाचा अपरिपक्वपणा.

अडगळ's picture

15 Jul 2010 - 6:32 am | अडगळ

जो एकजिनसी नाही आहे त्याला या निमित्ताने कळपात आणण्याचा प्रयत्न करणे (अनेक डावपैकी अजून एक डाव म्हणून )आणि मताच्या राजकारणाचा खेळ मांडणे असा डाव असावा.हा प्रयत्न किती योग्य आहे वा कितपत यशस्वी झाला हा भाग वेगळा.

क्रेमर's picture

15 Jul 2010 - 7:30 am | क्रेमर

जो एकजिनसी नाही आहे त्याला या निमित्ताने कळपात आणण्याचा प्रयत्न करणे (अनेक डावपैकी अजून एक डाव म्हणून )आणि मताच्या राजकारणाचा खेळ मांडणे असा डाव असावा.

असू शकेल. समाजातील प्रत्येक दुर्गुणासाठी राजकारणास वेठीस धरणे, हे मला सुलभीकरण वाटते.

प्रियाली's picture

15 Jul 2010 - 5:50 am | प्रियाली

लेन प्रकरण आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा घेतलेला परामर्ष आवडला. लेखाची मांडणीही आवडली.

या पुस्तकात भावना भडकवणारं लिखाण आहे म्हणून त्यावर बंदी घालणं योग्य आहे असं एक मत दिसतं. वरचे मुद्दे वाचून हे मत पोकळ आहे असं समंजस लोकांना वाटेल अशी अशा आहे.

अशी आशा करू.

तूर्तास एवढेच.

- पंडित गागाभट्ट.

सहज's picture

15 Jul 2010 - 6:40 am | सहज

लेख आवडला.

पण मला वाटते प्रश्न जेम्स लेन व त्या पुस्तकातील काही संदर्भांचा नाही आहे. तर प्रचलित नियम, कायदे या संदर्भात किती लागू अथवा गैरलागू असणार आहेत व किती काळ हे असे चालणार आहे? कधी एम एफ हुसेन यांनी काढलेले चित्र, कधी जेम्स लेन, कधी बाबासाहेबांच्या रिडल्स वरुन, कधी कुठल्या सिनेमात, नाटकात वापरलेले काही शब्द, व्यक्तिरेखा. दरवेळी राजकीय पक्षांनी केलेली झुंडशाही किती दिवस चालणार आहे?

राजकीय पक्षांनी यासंदर्भात असलेले कायदे, त्यातील त्रुटी यासंदर्भात एकत्र येउन काही काम करुन पाहीले पाहीजे व जे नियमबाह्य आहे त्यावर बंदी, अटी इ उपाय करावेत. उगाच लोकांच्या भावना भडकावून राजकारण करुन नये.

लवकरात लवकर "महाराष्ट्राचे आधिकारीक धोरण" (अंमलबजावणीत) यायला हवे व जे नियमात बसते त्याला लायनीने जाउ द्यावे. जर सुप्रीम कोर्टाने बंदी उठवली असेल गुमान मान्य करावे नसल्यास कायदे बनवावे पण दंगा करत बसु नये.

बोलायला मराठी माणुस नेहमी भैय्या लोकांना नावे ठेवतो पण दिवसेंदिवस जातीचे राजकारण करायला भैय्या लोकांना मागे टाकायला बघत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2010 - 6:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला.

-दिलीप बिरुटे

अप्पा जोगळेकर's picture

15 Jul 2010 - 8:18 am | अप्पा जोगळेकर

सही लिहिलंय. आवडलं.

अविनाशकुलकर्णी's picture

15 Jul 2010 - 9:31 am | अविनाशकुलकर्णी

सरकारने satanic Verses वर बंदी घातली चालली... अभिव्यक्ति स्वातंत्र्य विचारांचे हवे..विकृत विचारांचे कशा साठी?...

प्रकाश घाटपांडे's picture

15 Jul 2010 - 9:57 am | प्रकाश घाटपांडे

उत्तम लेखाबद्दल जंतुंचे आभार.
उत्तरार्धातील जातीय समीकरणाचे राजकारणावर मतमतांतरे असु शकतात.क्रेमर यांनी दर्शवलेल्या मतभिन्नतेत जसा मराठा समाज एकजिनसी नाही तसा कुठलाही समाज एकजिनसी नाही असे म्हणता येते. एका कुटुंबात देखील मतमतांतरे असतात. त्यांचा दुसरा मुद्दा जनक्षोभाची कल्पना लेनला यायला हवी. खर तर हा मुद्दा येथील स्थानिक विद्वानांच्याही लक्षात आला असणार परंतु पुस्तकाचे स्वरुप हे अ‍ॅकॅडमिक असल्याने त्याचा एवढा गदारोळ होईल असा अंदाज त्यांना त्यावेळी आला नसावा. अशा वदंता या अनेक ऐतिहासिक पौराणिक पुरुषांच्या बाबतीत असतात. त्या लोककथा/वदंता म्हणुन मौखिक वा लिखित परंपरेतुन पुढे सरकत असतात. कालौघात प्रक्षिप्त भाग हि घुसडला जात असतो. त्यामुळे या पुस्तकातील अशा जाता जाता केलेल्या उल्लेखावर भविष्यात एवढा गदारोळ होईल याची त्यांना व लेनला कल्पना नसावी.
क्रेमर यांचा तिसरा मुद्दा विद्वानांच्या कातडी बचाव धोरणाचा. ही गोष्ट खरीच आहे. पण त्यात महत्वाची बाब अशी आहे कि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा यासाठी समाजमन हे तेवढे विकसित असावे लागते. झुंडशाही वा समुह उन्मादा समोर हे अशक्य असते.समुहाला धड असते डोके नसते. अशा वेळी माफी मागणे हाच व्यावहारिक पर्याय असतो.survival is truth. विद्वान टिकला तरच विचार टिकणार आहेत. माझ्या अंनिसतील एका कट्टर नास्तिक मित्राला मी प्रश्न विचारला कि समजा अशी कल्पना कर कि तु जंगलात भरकटला आहेस व आदिवासींच्या तावडीत सापडला. त्यांचा देव हा एक दगड आहे. त्याच्या पाया पडले तरच तुला मी सोडतो असे सांगितले तर तु त्या देवाच्या पाया पडशील का? तो म्हणाला," छॅ! अजिबात नाही. जे आपण मानित नाहि त्याच्या कशाला पाया पडायचे. जीव गेला तरी बेहत्तर."
त्याला मी म्हणालो की तु जिवंत राहिला तरच तुझ्या विचारांचा वाद प्रतिवाद प्रचार प्रसार होणार आहे. केवळ पाया पडण्याच्या एका कृतीमुळे तुझ्या विचारांशी प्रतारणा होते काय किंवा त्या कृतीमुळे लगेच तु आस्तिक होतो काय?
केवळ विद्वानांच्या माफिमुळे किंवा तडजोडी मुळे त्यांना कणाहीन, भ्याड म्हणणे हे तर्कशुद्ध नाही.
तुर्तास इतकेच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

क्रेमर's picture

15 Jul 2010 - 5:04 pm | क्रेमर

त्यामुळे या पुस्तकातील अशा जाता जाता केलेल्या उल्लेखावर भविष्यात एवढा गदारोळ होईल याची त्यांना व लेनला कल्पना नसावी.

कल्पना नसणे यावरून एक समाजशास्त्रीय अभ्यासक म्हणून लेनला मराठी समाज समजलेला नाही असा निष्कर्ष कढता येईल. (ही केवळ शक्यता आहे. वरही पुअर जजमेंट हा आरोप असू शकतो अशी शक्यताच वर्तवली आहे.)

मर यांनी दर्शवलेल्या मतभिन्नतेत जसा मराठा समाज एकजिनसी नाही तसा कुठलाही समाज एकजिनसी नाही असे म्हणता येते.

खरेच आहे.
संभाजी ब्रिगेडचा कावा :
शिवाजीविषयीचा विनोद -> ब्राह्मण अभ्यासकांनी केलेली मदत -> लेनला मदत केरणारे अभ्यासक, संस्था यांना झोडा -> या प्रकरणाचे खापर ब्राह्मणांवर फोडा. त्याच जातीत हा विनोद होतो असा सोयिस्कर समज.

लेखातील सुलभीकरण :
पुस्तकावरील बंदी, इतर अरेरावी -> संभाजी ब्रिगेडचा सहभाग -> मराठा जातीचे (काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांचे) राजकारण -> इतरांना (शिवाजीचा अपमान म्हणून) खरोखर वाटलेल्या संतापाचा तसेच राज ठाकरे व इतरांनी याविरुद्ध केलेल्या आवाजाचा सोयिस्कर विसर.

अशा प्रकारचे विश्लेषण/ सुलभीकरण घातक आहे. आपल्या समाजात जातीयवाद खोल रुतून बसलेला आहे. त्याचे प्रतिबिंब राजकारणात पडलेले दिसते. राजकारणामुळे जातीयवाद जन्माला आलेला नाही.

पण त्यात महत्वाची बाब अशी आहे कि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.

टोपणनाव यांचा प्रतिसाद पहावा.

केवळ विद्वानांच्या माफिमुळे किंवा तडजोडी मुळे त्यांना कणाहीन, भ्याड म्हणणे हे तर्कशुद्ध नाही.

भीतीमुळे माफी मागणे याला भ्याडपणा म्हणतात. स्ट्रॅटेजिक भ्याडपणा वगैरे वर्गीकरणे करत रहावीत.

यशोधरा's picture

15 Jul 2010 - 10:08 am | यशोधरा

उत्तम लेख. मांडणी आवडली.

कवितानागेश's picture

15 Jul 2010 - 10:12 am | कवितानागेश

'शिवाजी राजांचे वडील कोण' हा कुठल्याही ( देशी/पर्देशी)संशोधक म्हणवणार्या लोकांचा विषय कसा काय होउ शकतो हे मला अत्तापर्यन्त कळले नाही!
बखरी सोडून, लोककथांच संदर्भ संशोधनासाठी घ्यायचा, आणी वर परत ऑक्सफर्ड नी त्याला मान्यता द्यायची,
ह खोड्साळ्पणाच नाही काय?
त्याला विरोध करणे आवश्यक आहे.
शिवाजीराजांचे वडील, गुरु, आई, कोणीही असोत,
ते स्वत। सदा पूजनीयच आहेत!

============
माउ

दिवाळखोरी जगजाहीर आहे. पण ते मांडताना एक दिशाभूल होते आहे असं वाटतं एक महत्त्वाचा मुद्दा:

हीच पध्दत लेन शिवाजीच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या मिथकांना लावतो.
लेन ने पुस्तकात, प्रस्तावनेत किंवा इतरत्र लेखी किंवा पत्रकारांसमोर असं विधान केलं आहे काय की या पुस्तकातलं संशोधन हे इतिहासाचा आढावा, माझा दृष्टिकोन, इ. नसून मिथकं, लोककथा यांचा धांडोळा घेऊन तो काळ आणि समाजव्यवस्थेतला महाराजांचा संदर्भ उभा करण्याचा प्रयत्न आहे? म्हणजेच पुस्तकातले बहुतांश संदर्भ / मुद्दे हे कुठल्या पुराव्याच्या नव्हे तर समाजात प्रचलित लोककथा, मत मतांतरे, आणि पिढ्यान पिढ्या ऐकत आलेल्या महाराजांच्या कर्तृत्वाच्या कथा यावर आधारलेले आहेत.

दत्तो वामन पोतदार यांच्या हे (म्हणजे शिवाजीच्या पितृत्वाविषयीची कथित बाब) लक्षात आलं पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही असं माझ्या स्वत:च्या कानावर आलं होतं.

-- त्यांनी जाहीर वाच्यता केली नाही .. पण मग हे त्यांच्या लक्षात आलं होतं याला काही पुरावा / संदर्भ आहे काय?

हे मान्य की ब्रिगेडचं लिखाण अशक्य कोटीतलं आहे आणि अतिशय गलिच्छ भाषेत वाट्टेल ती विधाने केली आहेत आणि त्यावर बंदी घालणं आवश्यक आहे. आळंदी पालखीने याला केलेला विरोध सर्वांना माहीत आहे. आणि अशा स्वरुपाच्या लिखाणावर बंदी यावीच. तशीच या लेनच्या पुस्तकावर घालण्यात काय चूक आहे?

तेव्हा अशा भावना भडकावून लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून राजकारण करणाऱ्या आणि त्यावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या नेत्यांच्या हातातली आपण बाहुली बनतो. -- हे मान्य आणि हातातून निसटत चाललेला मराठा मतदार मराठा महासंघाच्या माध्यमातून भडकवून ' नरो वा कुंजरो वा' म्हणजे भांडारकर वर हल्ल्याचा निषेध पण महासंघावर किंवा ब्रिगेडच्या पुस्तकांवर कारवाई नाही. किंवा महासंघाच्या सभांन्ना उपस्थित राहणे अशी चतुराई स्पष्ट आहे.
जिथे अडचण होईल तिथे प्रतिक्रिया द्यायचीच नाही आणि पत्रकारितेला आपल्या बळावर अशा संबंधांत बरोब्बर लांब ठेवायचे हे आता उघड झाले आहे.

लेन इथे असताना त्याला एक आंतरराष्ट्रिय इतिहास संशोधक म्हणून मदत करणार्‍या सर्वांचे त्याने इंग्लिश पद्धतीने आणि या क्षेत्रातल्या मान्यतांप्रमाणे आभार मानले. आता या दहा पंधरा वेगवेगळ्या लोकांनी त्याला पुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि दस्तावेजांशिवाय फक्त पान ९३ चा हवाला दिला म्हणणे केवळ हास्यास्पद आहे.

पण या राजकारणाच्या आणि वैचारिक दिवाळखोरीच्या आधारावर लेनचे समर्थन करता येणार नाही. प्रस्तुत लेखातल्या संयत आणि गंभीर धारेत कुठेतरी याचे समर्थन झाल्याचे वाटते.

Dhananjay Borgaonkar's picture

15 Jul 2010 - 11:19 am | Dhananjay Borgaonkar

चिंतातुर,
अतिशय उत्तम लेख आहे. आवडला.

धनंजय बोरगांवकर

शिल्पा ब's picture

15 Jul 2010 - 11:37 am | शिल्पा ब

लेख चांगला लिहिला आहे...
पण ऐतिहासिक दस्तऐवज अभ्यासण्याऐवजी लेनला मिथकांचा का आधार घ्यावा वाटला असावा?
काहीही झाले तरी शिवाजीराजा हा शूर, पराक्रमी राजा होता आणि त्यांच्यासारखा राजा झाला नाही आणि आता तर शक्यताहि नाही हे वस्तुस्थिती आहे.

संभाजी ब्रिगेड वगैरे प्रकार हे फक्त समाजात अस्वस्थ निर्माण करून राजकीय फायदा उपटण्यासाठीच निर्माण केले आहे असे माझे मत आहे.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

15 Jul 2010 - 12:12 pm | प्रकाश घाटपांडे

एखाद्याच कर्तुत्व, सत्य, भावनिक आवाहन, शपथ या गोष्टी साठी कशाला तरी वेठीस ( परमेश्वर, आई) धरण्याची आपली परंपरा तशी जुनीच. आमच्या शाळेत (जीवन शिक्षन मंदिर) आजुबाजुच्या वाड्यातोड्यांची पोर असायची. एखादी अफवा कि सत्य याची शहानिशा करताना प्रवर्तक पोरगा म्हणायची," ख्वॉट नाय सांगत.हा लागली पैस चाल. ख्वॉट आसन तर आपन दोन बापाचं"
म्हणजे एखादी पराधीन गोष्ट सत्य आहे कि नाही हे ठरवण्यासाठी आपण आपल्या आईचे चारित्र्य पणाला लावतो आहे हे त्याच्या गावी ही नसायचे. आपल्या भावनाविश्वातील एखादी घटना, सत्य, समजुती, आश्वासने यासाठी तुम्ही एका बापाचे आहात हे सांगण हा जणु काही त्याचा पुरावाच. समाजातील त्याचे अस्तित्व हे बापाच्या कर्तुत्वावर असल्याने हे मुद्दे कळीचे बनतात.पुरुष प्रधान संस्कृतीत तो कोणत्या बापाचा आहे यावर त्याचे 'अस्तित्व'च अवलंबुन असते.
व्यक्तिगत संवेदनशील मुद्दे, समाजाचे संवेदनशिल मुद्दे हे जनप्रक्षोभात विचारात घ्यावे लागतात. ती संवेदनशीलता कशी उलगडायची वा फुलवायची यावर बरेच काही अवलंबुन असते.
इतिहासहा शेवटी उपलब्ध साहित्यातुन काढलेला अन्वयार्थ असतो. इतिहासात नेमक सत्य काय हे उलगडणे अशक्य.

प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

क्लिंटन's picture

15 Jul 2010 - 2:27 pm | क्लिंटन

हा एक उत्तम लेख आहे हे वेगळे सांगायलाच नको. जेम्स लेनच्या पुस्तकाविषयी झालेला गदारोळ बघून लेनने खरोखरच असे काही म्हटले आहे का याची खात्री करण्यासाठी मी ते पुस्तक अमेरिकेत असताना ग्रंथालयातून वाचले होते.बाकी पुस्तक खास काहीच नाही निदान आपल्यासारख्यांना शिवभक्तांना तरी शिवाजी महाराजांविषयी असते त्यापेक्षा बरीच कमी माहिती त्या पुस्तकात आहे असे जाणवले. आणि आक्षेपार्ह मजकूर म्हणाल तर तो त्या पुस्तकात नक्कीच आहे याची खात्री मी करून घेतली आहे.

चिंतातुरजंतूंच्या मुद्द्यांविषयी पूर्णपणे सहमत. त्यात आणखी एका मुद्द्याची भर. जेम्स लेनच्या पुस्तकात श्रेयनामावलीमध्ये भांडारकर संस्थेतील बहुलेकरांचा उल्लेख महाराजांच्या किल्ल्यांना जेम्स लेनेने दिलेल्या भेटींसाठी बहुलेकरांनी मदत केली याबद्दल आहे.यावरून जेम्स लेनच्या वादग्रस्त विधानांबद्द्ल बहुलेकर जबाबदार कसे ठरतात?स्वत: बहुलेकरांनी असे विधान केले आहे का?माझ्या एम.एस थिसिसमध्ये एकूण ४० वेगवेगळ्या व्यक्तींच्या लिखाणाचा संदर्भ मी दिला होता.समजा मी काही वादग्रस्त विधान त्या थिसिसमध्ये केले असते तर त्याबद्दल त्या ४० पैकी कोणालाही जाऊन मारणार का?अर्थात संभाजी ब्रिगेडसारख्या रिकामटेकड्या आणि बेअक्कल लोकांकडून इतका विचार केला जायची शक्यता जराही नाही.

संभाजी ब्रिगेडवाल्यांना रस केवळ तोडफोड आणि गुंडगिरी करण्यात.स्वत: शिवछत्रपतींचे ध्येय आसेतुहिमाचल हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे होते.त्यात पूर्वी कधीही कोणीही केला नव्हता तो अश्लाघ्य प्रकार (शिवाजी महाराजांना एका जातीच्या बंदिस्त चौकटीत कोंडणे) या मंडळींनी केला आहे.मला वाटते जेम्स लेनने आमच्या महाराजांची बदनामी जितकी केली नसेल तितकी या मंडळींनी त्यांचेच नाव घेऊन केली आहे. त्यांचा बंदोबस्त पहिला व्हायला हवा.

अमोल केळकर's picture

15 Jul 2010 - 3:20 pm | अमोल केळकर

वेगळा ( चांगला ) विचार करायला लावणारा लेख आहे. लेख आवडला

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

तिमा's picture

15 Jul 2010 - 5:30 pm | तिमा

निर्भिडपणे लिहिलेला चांगला लेख. पण हे समजण्याची कुवत समाजातल्या बर्‍याच लोकांना नाही. मागे एका प्रतिक्रियेत म्हटले तेच परत म्हणतो, 'कानाखाली आवाज' ही भाषा वापरणार्‍यांना मानसिक परिपक्वता यायला अजून १०० वर्षे पाहिजेत.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

चिंतातुर जंतू's picture

15 Jul 2010 - 6:04 pm | चिंतातुर जंतू

अनेक प्रतिक्रियांमध्ये अनेक मुद्दे आलेले आहेत. त्यातल्या काहींना हा प्रतिसाद. इतर मुद्द्यांनाही हळूहळू जमेल तसा प्रतिसाद देईन.

लेखाच्या उत्तरार्धात केलेल्या राजकिय विश्लेषणाशी असहमत आहे. या विश्लेषणात मराठा वोट बँकेला आपल्याकडे वळवून घेण्यासाठी रचलेले कारस्थान असा काहीसा सूर आहे. माझ्या मते हे सुलभीकरण आहे.

होय हे सुलभीकरण आहे, पण त्याचा धनी मी नव्हे. शहाबानो प्रकरणात न्यायालयाच्या पुरोगामी निकालाला केराची टोपली दाखवणारं राजकीय नेतृत्व 'असं केलं नाही तर मुस्लिम व्होट बँक आपल्यापासून दुरावेल' असं सुलभीकरण करतं. रामाच्या नावावर भावना भडकावून हिंदू व्होट बँक आपल्याकडे खेचता येईल असं मानणारं नेतृत्व असं सुलभीकरण करतं. त्यांनी ते तसं केलं असावं, असं म्हणणारा राजकीय विश्लेषक सुलभीकरण करतो असं म्हणता येईल का?

'मराठा समाजाला भडकवता' यावे असा मराठा समाज एकजिनसी नाही. अशा फुटकळ प्रकरणांतून कुठल्या राजकिय पक्षाला (हिंदुत्वाप्रमाणे किंवा प्रांतिक मुद्द्यांप्रमाणे) फायदा झाल्याची काही ठोस उदाहरणे नाहीत. प्रस्तुत प्रकरणात सर्वच राजकिय पक्ष सामील झालेले दिसतात. (संभाजी ब्रिगेडचे खेडकर यांच्या पत्नी भाजपत असल्याचे ऐकले होते.) या मुद्द्याचा वापर करून निवडणुका जिंकता येतील असे कुठलेच मतांचे गणित दिसत नाही.

मराठा जात एकसंध आहे असं यात अजिबातच म्हटलेलं नाही. सत्तेवरचे मराठे आणि त्यांना मिळणारे फायदे तळागाळात झिरपत नसल्याचा दावा वर केलाच आहे. शिवाय आर्थिक, सामाजिक, भौगोलिक असे अनेक स्तर मराठा समाजात आहेतच. पण मुद्दा तो नाही. पूर्वी आपला हक्काचा मतदार असलेला मराठा समाज आपल्यापासून दूर चालला की काय याच्या भीतीतून (व असुरक्षिततेतून) ही राजकीय खेळी खेळली गेली असावी, असं वाटतं, एवढंच. त्याचा प्रत्यक्ष राजकीय फायदा किती झाला याविषयीही वर काही म्हटलेलं नाही. त्यामुळे ही खेळी मूर्खपणाची होती, असं आपण खुशाल म्हणू शकता. त्यामुळे मराठा नेतृत्व मूर्ख ठरेल कदाचित, पण विश्लेषण चुकीचं ठरवण्यासाठी ते पुरेसं नाही.

ब्राह्मणांविरुद्ध जमवाजमव करून कुठल्याच पक्षाला फारसे यश मिळण्याची शक्यता नाही. तेव्हा लेखाच्या उत्तरार्धातील राजकिय विश्लेषण अगदीच तकलादू आहे.

अहो हाच तर मुद्दा आहे! soft target ही संकल्पना याचसाठी वापरलेली आहे. ब्राह्मणांविरुद्ध राजकीय खेळी केल्याने तोटा काहीच नाही. पण मराठ्यांची त्या निमित्तानं दिशाभूल/फसवणूक करून (म्हणजे मराठ्यांचा राग ब्राह्मणांकडे वळवून) जर मराठ्यांची मोट बांधता आली, तर त्याचा थोडा फायदाच होईल. मग काय हरकत आहे? अशा विचारातूनच ही खेळी खेळली गेली असावी.

उत्तरार्धातले विश्लेषण शिवाजीची पॅन मराठी ओळख नाकारते

यात पुन्हा एकदा असं म्हणावं लागेल की विश्लेषणात शिवाजीची व्यापक ओळख नाकारलेली नाही. प्रकरणाला ब्राम्हण-मराठा वादाचं स्वरूप देणाऱ्यांना ती कदाचित नाकारायची असेल. शिवाजीच्या पितृत्वाविषयी वदंता पसरवणाऱ्यांना ती कदाचित नाकारायची असेल. पण अशी मंडळी अस्तित्वात आहेत असं म्हणणं म्हणजे ती व्यापक ओळख नाकारणं नव्हे. नाहीतर पुन्हा एकदा निरोप्याच मरायचा.

समाजातील प्रत्येक दुर्गुणासाठी राजकारणास वेठीस धरणे, हे मला सुलभीकरण वाटते.

सर्वसाधारण मुद्दा म्हणून मान्य. पण या विशिष्ट प्रकरणातली राजकीयता दुर्लक्षित करणं अवघड आणि धोक्याचं आहे, असंही वाटतं. ऐन निवडणुकींच्या तोंडावर भांडारकर संस्थेवर हल्ला झाला होता. संभाजी ब्रिगेड म्हणजे कोण ते तोपर्यंत फार कुणाच्या गावीही नव्हतं. त्यांचं ब्राह्मणविरोधी लिखाण त्या सुमाराला सहज उपलब्ध होऊ लागलं. ब्रिगेडचं संधान कोणत्या राजकीय पक्षाशी होतं (आणि आहे), हे तेव्हाही उघड होतं आणि आजही आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर या प्रकरणातली राजकीयता सहजासहजी नाकारता येईल असं वाटत नाही.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

क्रेमर's picture

15 Jul 2010 - 6:53 pm | क्रेमर

राजकिय नेतृत्वाने सुलभीकरण करावे हे स्वाभाविक आहे. कारण सुलभीकरण त्यांना फायदेशीर ठरते. मात्र विश्लेषकाने अशी चूक करू नये.

शहाबानो प्रकरणात असलेल्या मतांना लांब जाऊ न देणे हे हेतू असावा. तर बाबरी मशीदीच्या प्रकरणात नवीन वोट बँक निर्माण करणे हा हेतू असावा. प्रस्तुत प्रकरणातही मराठा वोट बँक निर्माण करण्याचा किंवा मराठा मते दूर जाऊ नये असा प्रयत्न होत असावा, हे नाकारलेले नाही. परंतु प्रस्तुत लेखातील राजकिय विश्लेषण पटत नसल्याचे मत मांडले आहे. या प्रकरणाबाबत घटनाक्रम तपासल्यास काय दिसते?

  • २२ डिसेंबर २००३: शिवसैनिकांनी भांडारकर संस्थेशी संबंधित लोकांवर हल्ला केला. संस्कृत अभ्यासक श्रीकांत बहूलकर यांना मारहाण करण्यात आली व तोंडाला काळे फासण्यात आले.
  • ५ जानेवारी २००४: संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेत जाऊन मोडतोड केली. दुर्मीळ हस्तलिखितांचे नुकसान केले.

यावरून लक्षात यावे की संभाजी ब्रिगेडच्या गाढवांना या प्रकरणाचा राजकिय वापर करावा हा शोध लागण्यापुर्वी अशा प्रकारांत कौशल्यप्राप्त शिवसेनेने या प्रकाराचा राजकिय वापर करण्याचा प्रयत्न आधी केला. तेव्हा 'पूर्वी आपला हक्काचा मतदार असलेला मराठा समाज आपल्यापासून दूर चालला की काय याच्या भीतीतून (व असुरक्षिततेतून) ही राजकीय खेळी खेळली गेली असावी' हा दावा निराधार आहे.

ब्राह्मणांविरुद्ध राजकीय खेळी केल्याने तोटा काहीच नाही. पण मराठ्यांची त्या निमित्तानं दिशाभूल/फसवणूक करून (म्हणजे मराठ्यांचा राग ब्राह्मणांकडे वळवून) जर मराठ्यांची मोट बांधता आली, तर त्याचा थोडा फायदाच होईल. मग काय हरकत आहे?

मराठा महासंघ नावाची संघटना गेली कित्तेक दशके महाराष्ट्रात अस्तित्त्वात आहे व त्यांचे ब्राह्मणविरोधी गरळ ओकण्याचे काम नित्य सुरूच असते. लेन्स प्रकरणाच्या वेळीच सूचलेली ही गोष्ट नाही. या फ्रींज एलिमेंट्सना राजकिय पक्ष भीक घालत नसत. तेव्हा नव्वदच्या दशकानंतर असे काही राजकारण करता येईल हे नव्याने सूचले, असे विश्लेषण मला पटलेले नाही.

यात पुन्हा एकदा असं म्हणावं लागेल की विश्लेषणात शिवाजीची व्यापक ओळख नाकारलेली नाही.

अर्थातच आपल्या हेतूंविषयी शंका नाही. पण वरील विश्लेषणातून असा समज होणे शक्य होईल असे मला वाटले.

* २२ डिसेंबर २००३: शिवसैनिकांनी भांडारकर संस्थेशी संबंधित लोकांवर हल्ला केला. संस्कृत अभ्यासक श्रीकांत बहूलकर यांना मारहाण करण्यात आली व तोंडाला काळे फासण्यात आले.

* ५ जानेवारी २००४: संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेत जाऊन मोडतोड केली. दुर्मीळ हस्तलिखितांचे नुकसान केले.

यावरून लक्षात यावे की संभाजी ब्रिगेडच्या गाढवांना या प्रकरणाचा राजकिय वापर करावा हा शोध लागण्यापुर्वी अशा प्रकारांत कौशल्यप्राप्त शिवसेनेने या प्रकाराचा राजकिय वापर करण्याचा प्रयत्न आधी केला. तेव्हा 'पूर्वी आपला हक्काचा मतदार असलेला मराठा समाज आपल्यापासून दूर चालला की काय याच्या भीतीतून (व असुरक्षिततेतून) ही राजकीय खेळी खेळली गेली असावी' हा दावा निराधार आहे.

तेव्हा शिवसेनेत असलेल्या राज ठाकरे यांनी बहुलकरांची माफी मागितली होती. ज्या प्रकरणाचा राजकीय फायदा उठवायचा असतो, त्या बाबतीत हे वर्तन विसंगत आहे. शिवसेनेचा अशा बाबींतला प्रघात हा माफी वगैरे मागण्याचा अजिबातच नसतो. अशी माफी नंतर ब्रिगेडनं मागितल्याचं ऐकिवात नाही.

शिवसेनेचा हल्ला तात्पुरता राजकीय खेळी मानला, तरीही इतरांना याच प्रकरणाचा राजकीय फायदा उठवण्यापासून तो परावृत्त करत नाही.

दुसरा मुद्दा: लेनच्या पुस्तकाशी संबंध नसताना बाबासाहेब पुरंदरे यांनाही ब्रिगेडने त्याच वेळी लक्ष्य केले. हे शिवसेना कदापि करणार नाही, कारण ठाकरे कुटुंब व बाबासाहेब यांची मैत्री जगजाहीर आहे. ब्रिगेडची ही खेळी लेनच्या निमित्तानं ब्राह्मणांना लक्ष्य करण्याशी सुसंगत होती.

एकंदरीत, प्रत्यक्ष कृती करणं व तिची जबाबदारी (अभिमानानं) स्वीकारणं यात किमान या प्रकरणात तरी शिवसेना काहीशी तळ्यात-मळ्यात होती. हे त्यांचं पारंपरिक वर्तन अजिबातच नाही. उलट संभाजी ब्रिगेड मात्र इथं दोन्ही बाबतींत शिवसेनेच्या पुष्कळ पुढे होती.

मराठा महासंघ नावाची संघटना गेली कित्तेक दशके महाराष्ट्रात अस्तित्त्वात आहे व त्यांचे ब्राह्मणविरोधी गरळ ओकण्याचे काम नित्य सुरूच असते. लेन्स प्रकरणाच्या वेळीच सूचलेली ही गोष्ट नाही. या फ्रींज एलिमेंट्सना राजकिय पक्ष भीक घालत नसत. तेव्हा नव्वदच्या दशकानंतर असे काही राजकारण करता येईल हे नव्याने सूचले, असे विश्लेषण मला पटलेले नाही.

एकेकाळी मराठा महासंघाला कुणी विचारत नसे हे अगदीच बरोबर. म्हणूनच भांडारकर संस्थेवरचा हल्ला ही त्यांच्या मदतीनं आपली पोळी भाजून घेण्याचा डाव होता. म्हणजे वरवर पाहाता 'आमचा यात काही हात नव्हता', असं म्हणताही येतं; पण 'ते आमचेच भाडोत्री पोळ होते, व त्यामुळे आम्हालाच कसं मराठ्यांच्या हिताचं रक्षण करता येतं' हेही दाखवून देता येत होतं.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

क्रेमर's picture

16 Jul 2010 - 1:11 am | क्रेमर

शिवसेनेचा अशा बाबींतला प्रघात हा माफी वगैरे मागण्याचा अजिबातच नसतो. अशी माफी नंतर ब्रिगेडनं मागितल्याचं ऐकिवात नाही.

राज ठाकरे यांनी माफी मागितली हे बरोबर. राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यात फरक केला जावा. अबू आझमीच्या थोबाडीत मारल्यानंतर मनसेच्या आमदारांनी लेखी माफी मागितली परंतु आझमीविरोध थांबवलेला नाही. २००६मध्ये शिवसेना सोडणार्‍या राज ठाकरेंना २००३मध्ये स्वत:च्या मनानुसार निर्णय घेणे शक्य झाले असावे. अर्थात या माफीनंतरही शिवसेनेची भुमिका जराही बदलली नाही. जेम्स लेनच्या पुस्तकाविरोधात त्यांनी इतरत्र धुमाकूळ घालणे सुरूच ठेवले होते. बंदी उठवल्यानंतर शिवसेना, मनसे या पक्षांनी केलेली विधाने, काढलेले मोर्चे यावरूनही या प्रकरणाचा राजकिय लाभ उचलण्याविषयी त्यांच्यात इतर पक्षांप्रमाणेच (राष्ट्रवादी, काँग्रेस) चढाओढ सुरू असल्याचे दिसते. राज ठाकरे यांनी तर हे पुस्तक महाराष्ट्रात विकू न देण्याचा संकल्पही सोडला आहे.

उलट संभाजी ब्रिगेड मात्र इथं दोन्ही बाबतींत शिवसेनेच्या पुष्कळ पुढे होती.

संभाजी ब्रिगेडच्या माकडांनी शक्य तितकी प्रसिद्धी मिळवण्यासाठी शिवसेनेपेक्षा पुढे राहण्याचा प्रयत्न केला, हे मान्य आहे.

लेनच्या पुस्तकाशी संबंध नसताना बाबासाहेब पुरंदरे यांनाही ब्रिगेडने त्याच वेळी लक्ष्य केले. हे शिवसेना कदापि करणार नाही, कारण ठाकरे कुटुंब व बाबासाहेब यांची मैत्री जगजाहीर आहे. ब्रिगेडची ही खेळी लेनच्या निमित्तानं ब्राह्मणांना लक्ष्य करण्याशी सुसंगत होती.

ब्रिगेड ब्राह्मणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होती यात काही शंका नाही. मराठा महासंघाच्या पारंपारीक पवित्र्याशी साजेसेच ते वर्तन होते. त्यात 'नाविन्यपूर्ण' काही नव्हते.

म्हणजे वरवर पाहाता 'आमचा यात काही हात नव्हता', असं म्हणताही येतं; पण 'ते आमचेच भाडोत्री पोळ होते, व त्यामुळे आम्हालाच कसं मराठ्यांच्या हिताचं रक्षण करता येतं' हेही दाखवून देता येत होतं.

महाराष्ट्रातील मराठ्यांनी अनेक दशके सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आहे. लेन किंवा भांडारकर संस्था यांचा वापर करण्याची कुठलीही गरज 'त्या' नेतृत्वाला वाटली नसावी. अर्थात काही स्मॉल टाइम गावगुंडांना आमदारकी पदरात पाडून घेण्याकरता या प्रकाराचा फारतर उपयोग झाला असावा.

.......
या विषयाबाबत माझी असहमती आता मी पुरेशी स्पष्ट केलेली आहे. राजकारणाकडे बोट दाखवून आपल्या समाजातील मुलभूत समस्यांचे आकलन होणार नाही असे माझे मत आहे. त्या मताला बदलावे असे मला या चर्चेदरम्यान वाटलेले नाही. यापुढील चर्चाही त्याबाबत फारशी फलद्रुप ठरेल असे मला वाटत नाही. तेव्हा माझ्या बाजूने चर्चा पुढे चालू ठेवण्याबाबत उत्साह मावळला आहे. सजाण नागरिकांनी अशा प्रकारच्या वैचारीक दमनाचा विरोध करावा या आपल्या व्यापक मुद्द्याशी सहमतीचा पुनरुच्चार करून माझ्या बाजूने ही चर्चा थांबवत आहे.

_________________
बाकी चालू द्या.

चिंतातुर जंतू's picture

16 Jul 2010 - 3:04 pm | चिंतातुर जंतू

राज ठाकरे यांनी माफी मागितली हे बरोबर. राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यात फरक केला जावा. अबू आझमीच्या थोबाडीत मारल्यानंतर मनसेच्या आमदारांनी लेखी माफी मागितली परंतु आझमीविरोध थांबवलेला नाही. २००६मध्ये शिवसेना सोडणार्‍या राज ठाकरेंना २००३मध्ये स्वत:च्या मनानुसार निर्णय घेणे शक्य झाले असावे. अर्थात या माफीनंतरही शिवसेनेची भुमिका जराही बदलली नाही. जेम्स लेनच्या पुस्तकाविरोधात त्यांनी इतरत्र धुमाकूळ घालणे सुरूच ठेवले होते. बंदी उठवल्यानंतर शिवसेना, मनसे या पक्षांनी केलेली विधाने, काढलेले मोर्चे यावरूनही या प्रकरणाचा राजकिय लाभ उचलण्याविषयी त्यांच्यात इतर पक्षांप्रमाणेच (राष्ट्रवादी, काँग्रेस) चढाओढ सुरू असल्याचे दिसते. राज ठाकरे यांनी तर हे पुस्तक महाराष्ट्रात विकू न देण्याचा संकल्पही सोडला आहे.

राज व शिवसेना यांत फरक करता येईलही, पण लेन-शिवाजी मुद्द्यावर एका बाबतीत दोहोंचं एकसंध वर्तन आहे, आणि तोच माझा कळीचा मुद्दा आहे. ती एकसंधता म्हणजे या वादाला ब्राह्मण-मराठा स्वरूप येऊ न देणं. शिवसेना व आता मनसे या दोहोंनी या प्रकरणात ब्राह्मणांना त्रास दिलेला नाही. म्हणूनच बहुलकरांची माफी मागणं या धोरणाशी सुसंगत ठरतं. त्यामुळे वरकरणी तरी हे राजचं शिवसेनेहून वेगळं वर्तन मानण्यापेक्षा या ब्राह्मणविरोधाला चिथावणी मिळेल अशी आंदोलनं टाळण्यासाठी ती माफी होती याला अधिक सबळ पुरावा दिसतो.

ब्रिगेड ब्राह्मणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होती यात काही शंका नाही. मराठा महासंघाच्या पारंपारीक पवित्र्याशी साजेसेच ते वर्तन होते. त्यात 'नाविन्यपूर्ण' काही नव्हते.

ब्रिगेडचा ब्राह्मणविरोध नवीन नव्हताच. त्याला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मुख्य धारेत आणण्याचा प्रकार नवीन होता. आणि त्याचे खरे लेखक मराठ्यांचं लाडकं राजकीय नेतृत्व होतं. एकेकाळी महाराष्ट्रानं ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद मोठ्या प्रमाणात भोगला होता; पण भांडारकर संस्थेवर हल्ला झाला, त्या आधीच्या काळात ब्राह्मणविरोध हा काही निवडणुकीतला मुद्दा नव्हता. या सर्व प्रकरणानं तो तसा बनवला गेला. हेच त्या राजकीय विश्लेषणात मांडायचं होतं.

असो. तूर्तास मीही लेखातल्या राजकीय विश्लेषणाबद्दलची मांडणी थांबवतो आणि प्रतिसादांमध्ये आलेल्या इतर काही मुद्द्यांचा परामर्ष घेतो. मात्र त्यासाठी थोडा धीर धरावा ही विनंती.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

Dhananjay Borgaonkar's picture

15 Jul 2010 - 6:34 pm | Dhananjay Borgaonkar

भारतीय राजकारणात निम्म्याहुन जास्त गोष्टी या मतांच्या राजकारणावरुनच होतात. नेत्यामधे पॉवर असते आणि त्याचा व्यवस्थित गैरफायदा घेतला जातो. संभाजी ब्रिगेड हे त्याचेच पिल्लु.

संभाजी ब्रिगेडचा नवीन फतवा - निनाद बेडेकर, बाबासाहेब पुरंदरे, या इतिहासकारांना सातार्‍यात बंदी का तर त्यांनी जेम्स लेन ला पुस्तक लिहायला मदत केली.
अशावेळी कोणताच राजकीय हस्त़क्षेप का नाही होत?बंदी घालणारे हे कोण?

ज्या लोकांनी हे प्रकरण उचलुन धरले आहे त्यापैकी किती जणांनी किल्ल्यांच्या जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेतलाय?

कानडाऊ योगेशु's picture

15 Jul 2010 - 7:01 pm | कानडाऊ योगेशु

आज जर एखाद्या पक्षाला मराठा विरुध्द ब्राम्हण हा वाद चिघळत ठेवुन मराठा वोट बँक आपल्या बाजुने वळवण्यात यश येते आहे असा दुसर्या एखाद्या पक्षाला अंदाज आला तर जुन्याच हिंदु विरूध्द मुस्लिम ह्या वादाला पुन्हा मैदानात आणले जाऊ शकते.
मंडल आयोग विस्मरणात जाऊ देवु नका.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

चिरोटा's picture

15 Jul 2010 - 7:22 pm | चिरोटा

अतिशय चांगला लेख.

यातून आपण एक समाज म्हणून आपली वैचारिक दिवाळखोरी जगजाहीर करतो

सहमत आहे.मराठी/मराठा वा हिंदु अस्मिता,एकूणच ह्या वृत्तींना पाठिंबा देणारे मराठी सुशिक्षित्,त्यांना ती अस्मिता पटवून देणारे राजकारणी , एकंदरितच महाराष्ट्रात वैचारिक अपरिपक्वता जाणवते.
---------------
बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालापाहिजे.

पिंगू's picture

15 Jul 2010 - 11:45 pm | पिंगू

लेख वाचून मनातील संभ्रम दूर झाला... खरच सुशिक्षित मंडळींमध्ये काही शेंडा-बुडखा माहीत नसताना विचार व्यक्त करण्याची चुकीची प्रवृती आढळून येते... :(

अरुंधती's picture

16 Jul 2010 - 6:06 pm | अरुंधती

हा लेख लिहिल्याबद्दल चिंतातुरजंतुंचे अभिनंदन!
कारण ''हाणा, मारा, झोडा, ठेचा'' च्या सध्याच्या गदारोळात अत्यंत संयतपणे असे विचार मांडायला धैर्यच लागते.

आज शिवाजी महाराजांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालायचे चालू आहे. शिवराय लोकप्रिय वीरपुरुष, स्वराज्यसंस्थापक होते, आहेत व राहतील. पण त्या लेनच्या लिखाणाच्या निमित्ताने आपला समाज मतभिन्नता, वेगळी दृष्टी किंवा पाश्चात्याच्या दृष्टीने केलेली लोकप्रिय व्यक्तिमत्वाची मीमांसा(??) स्वीकारण्यास कितपत परिपक्व (???) आहे हे पुन्हा एकदा नजरेसमोर आले. आपली ती मानसिकताच नाही हे अधोरेखित झाले. आम्ही आजही बालिशच आहोत व त्यातच आम्हाला भूषण आहे!

त्यामुळे वाटते की आज एका पुस्तकावर बंदी घालण्याने काम भागेल.
पण भविष्यात कोण कोणाविषयी ''लोककथा, मिथके'' वगैरेंच्या आधारावर काय काय लिहू शकेल ह्याची कल्पना करता येत आहे काय? आणि त्यावर उसळणारे जनक्षोभ आपल्याच जनतेची वैचारिक, मानसिक, शारीरिक व आर्थिक हानी किती प्रकारे करु शकतात ह्याचीही जाणीव ठेवायला हवी. कळपातल्या मेंढरांना कळत नाही कित्येकदा ती कोणत्या दिशेने जात आहेत ते! पण समाजातील दिशादर्शक व्यक्तिमत्वांनी समाजात प्रक्षोभ होऊ नये आणि तसा तो होऊ लागला तर प्रक्षोभ निर्माण करणार्‍या सर्वच घटकांना आपल्या जबाबदारीचे भान आणून देणे फार गरजेचे आहे. त्यासाठी अजून आग्रही भूमिका हवी. फक्त आपल्या व्होटबँकचा, आपल्या व्यक्तिगत स्वार्थाचा विचार करणारे समाजाला रसातळाचा मार्ग दाखवत आहेत हे मात्र नक्की!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

आळश्यांचा राजा's picture

16 Jul 2010 - 11:47 pm | आळश्यांचा राजा

डिस्क्लेमर –

१. मला ब्राह्मण – ब्राह्मणेतर या वादात पडायचे नाही. मी हा “वाद” मुळातच नाकारतो. माणसाला जातींच्या (फ़ॉर दॅट मॅटर धर्म/ भाषा/ लिंग) रकान्यात बसवणे, आणि त्यावरून त्याचे अमुक अमुक इंटरेस्ट असावेत असं ठरवणं मला मान्य नाही.
२. प्रस्तुत प्रतिसादात मी ब्राह्मण, मराठा, ब्राह्मणेतर इ. जातीवाचक समूहनामे वापरली आहेत, ती केवळ मला दुसरा पर्याय नाही म्हणूनच. कारण प्रतिवाद करण्याच्या मुद्यात ही नामे वापरली आहेत.

लेख वरवर पाहता संयत आणि विचारी वाटतो. पण तसे नाही. लेख पक्षपाती आहे असे जाणवते. खुद्द लेखकाला तरी याची कल्पना आहे की नाही हे समजायला मार्ग नाही. (म्हणजे जाणीवपूर्वक तसे लिहिले आहे, की तसे होत गेले आहे- अशा अर्थाने.) आश्चर्य असे की क्रेमर, वेताळ आणि मैत्र वगळता एकतर कुणी त्यांची नोंद घेतलेली नाही, किंवा नोंद घेऊनही प्रतिसाद दिलेला नाही. असो.

माझा प्रतिसाद पुस्तकाला नाही, तर या लेखाला आहे.

एका काळापर्यंत महाराष्ट्र सरकारचे व त्या अनुषंगानं पवार यांचे लेनसारख्यांशी - म्हणजे व्यक्तिश: लेनच असं नाही, पण महाराष्ट्राविषयी काम करणाऱ्या परकीय इतिहास संशोधकांशी - चांगले घनिष्ठ संबंध होते. उदा: "House and Home in Maharashtra, New Delhi, Oxford University Press, १९९८" हे पुस्तक पाहावे. त्यात परदेशात महाराष्ट्राविषयी घडलेल्या एका चर्चासत्रातले शोधनिबंध आहेत. चर्चासत्राची सुरुवात पवारांच्या बीजभाषणानं झाली होती. म्हणजे पवार त्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी परदेशात गेले असावेत. अशा चर्चासत्रांना, यात आणि इतरत्र प्रकाशित झालेल्या अनेक संशोधकांना पवारांनी सरकारतर्फे (मुख्यमंत्री म्हणून) मदत केली होती. महाराष्ट्रावर होणाऱ्या संशोधनाशी त्यामुळे ते परिचित असावेत. लेन हा त्यांपैकी एक होता.
या पार्श्वभूमीवर भावना भडकावून राजकीय फायदा उठवता येईल असा मुद्दा म्हणून लेनचा कोलीत म्हणून वापर केला जाऊ शकतो, याची जाणीव मराठा नेतृत्वाला झाली असावी.

लेखाच्या या दुसर्या भागात आडून आडून असे सुचवलेले आहे, की लेनच्या कानावर ही “वदंता” मराठा नेतृत्त्वाने (पवार) घातली (असावी). भांडारकर संस्थेतल्या “ब्राह्मणांनी” नाही. हा अंदाज जस्टिफाय करण्यासाठी एक विश्लेषण मांडलेले आहे. वेल. काही लोक म्हणतात ही “वदंता” लेनच्या कानावर ब्राह्मणांनी घातली. तसं म्हणणार्यांचंही एक विश्लेषण आहेच. हे विश्लेषण आणि ते विश्लेषण यांची कुस्ती न संपणारी आहे. ब्राह्मणविरोधी गटाची, म्हणजे संभाजी ब्रिगेड/ मराठा महासंघ, भाषा आणि कृती हिंसक आहे, भडक आहे; तर प्रस्तुत लेखातील भाषा हिंसक नाही, भडक नाही. (मी संयत म्हणणार नाही – लेख मुळीच संयत नाही. कसे ते पुढे येईलच.) एवढाच फरक. दोन्ही आरोप, अंदाज आणि विश्लेषणे तितकीच बरोबर किंवा चूक आहेत. त्यामुळे यावर माझा एवढाच प्रतिसाद, की ब्रिगेडच्या हिंसक भाषेचा आणि कृतीचा मी निषेध करतो. या लेखातील भाषा शांत आहे, एवढेच. कोणतेही विश्लेषण मान्य केले तरी एक गोष्ट निर्विवादपणे दोन्ही पक्ष मान्य करतात – ते विशिष्ट वाक्य (“वदंता”) त्या पुस्तकात घालण्याचा हेतू राजकारण होता.

म्हणजेच निखळ इतिहास संशोधन नव्हता.

इथेच लेखातील विसंगती उघडी पडते. पहिल्या भागात काय म्हटले आहे –

ज्याची सत्यासत्यता अस्पष्ट आहे किंवा जी असत्यच आहेत अशी साधनंही इतिहासाचा अभ्यास करताना वापरता येतात याची जाण आपल्याकडे फारशी दिसत नाही. मिथकं आणि लोककथा यांचा वापर इतिहासात अशाच प्रकारे केला जातो. त्याची एक पध्दत आहे. त्याचे काही उपयोग आहेत. उदा. रामाविषयी उत्तरेत निर्माण झालेल्या लोककथा आणि दक्षिणेत निर्माण झालेल्या लोककथा यांचा तौलनिक अभ्यास केला तर त्यांत रामाची प्रतिमा भिन्न दिसते. रामाच्या दक्षिण विजयाविषयी जित (म्हणजे हरलेल्या) दक्षिणी लोकांचा जो विचार दिसतो, तो रामाला देव न मानता मर्त्य आणि स्खलनशील दाखवतो. किंवा, शकुंतला-दुष्यंताच्या मूळ कथेतली शकुंतला स्वाभिमानी आहे पण कालिदासाच्या नाटकात ती दुष्यंतानं आपला स्वीकार करावा यासाठी खूप झटते कारण ती कालिदासाच्या काळातल्या पुरुषप्रधान संस्कृतीनुसार वागते. अशा प्रकारे कालसापेक्ष, समाजसापेक्ष विश्लेषण करण्यासाठी लोककथांचा वापर करणं ही इतिहास संशोधनातली एक रूढ पद्धत आहे. हीच पध्दत लेन शिवाजीच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या मिथकांना लावतो.

म्हणजे, इथे असं म्हणायचं आहे, की लेनने जे “वदंते”विषयी लिहिलंय ती एक इतिहास संशोधनाची पद्धतच आहे. क्षणभर मान्य करू. म्हणजे ही वदंता उल्लेखिण्यामागे राजकारण नव्हते.

मग मराठा नेतृत्त्वाच्या धूर्त राजकारणाचे विश्लेषण करायची काय गरज होती? जर लेन स्कॉलर आहे, तर त्याला स्कॉलरच राहू देत ना. त्याला बिचार्याला “कोलीत” कशाला म्हणताय? त्याने स्वत:ला असं राजकारण्यांना वापरू दिलं असं का म्हणताय?

आता विसंगतींचा मुद्दा बाजूला ठेऊ. या लेखाच्या पहिल्या भागाचा परामर्ष घेऊ.

जी असत्यच आहेत अशी साधनंही इतिहासाचा अभ्यास करताना वापरता येतात याची जाण आपल्याकडे फारशी दिसत नाही.

रामाच्या आणि शकुंतलेच्या उदाहरणावरून रामाचं आणि शकुंतलेचं संशोधन होत नाही, तर ज्या काळात त्या कथा लिहिल्या गेल्या त्या काळातल्या समाजाचं संशोधन होत असतं. बरोबर? शिवाजीच्या आईचं चारित्र्यहनन करणारा “नॉटी” जोक मराठी माणसं एकमेकांना सांगतात असं लेननं म्हणणं म्हणजे शिवाजीचं संशोधन नव्हे, तर जो समाज शिवाजीविषयी असं बोलतो, त्या सध्याच्या मराठी समाजाचं संशोधन. बरोबर? म्हणजे, याचा अर्थ असा होतो की शिवाजीला सध्याच्या मराठी समाजात देव मानलं जात नाही, सामान्य माणूस मानलं जातं. त्याची आई चरित्रहीन होती, स्खलनशील होती, असं मराठी लोक सहजपणे मान्य करतात, त्यावर “नॉटी” जोकपण करतात. इतके मराठी लोक मनमोकळे आहेत, ‘पुढारलेले’ आहेत. असा या विधानाचा अर्थ होतो. असं आहे का? शिवाजीला देव न मानता हाडामांसाचा माणूस मानणारे बरेच लोक असतील. पण जिजाबाईंना स्खलनशील मानणारे किती लोक आपण किंवा लेनने पाहिले आहेत? मी तरी आजपर्यंत मी ज्या ज्या लोकांच्या संपर्कात इतके वर्षांत आलो, त्यातले आपणच पहिले, (आणि नाइल दुसरे) जे म्हणाले, की मी असं असं ऐकलं होतं बुवा. त्यातही आपणही असं म्हणालेला नाहीत, की मी हे मानतो, किंवा मी हा जोक “नॉटीली” मित्रांना सांगितलेला आहे, किंवा मला कुणीतरी हा “नॉटी” जोक सांगितलेला आहे. (लेनला असे नॉटी मराठी लोक कुठे भेटले असावेत बरं? मला बघायची इच्छा आहे त्या विचारवंतांना.)

मिथकं आणि लोककथा यांचा वापर इतिहासात अशाच प्रकारे केला जातो. त्याची एक पध्दत आहे.

शिवाजीच्या आईचं चारित्र्यहनन हे मिथक की लोककथा? आणि ही लोककथा केंव्हा आली अस्तित्त्वात? इंग्रजांच्या पत्रांत आहे की पोर्तुगीजांच्या? औरंगजेबाच्या अखबारांमध्ये होती का ही लोककथा? शिवाजीच्या स्वत:च्या काळात त्याच्या जानी दुश्मनांनी ज्या हीन गोष्टीचा विचार केला नाही, ती ‘लोककथा’ आली कोणत्या काळात? आणि कुणी आणली? का आणली? आपण खालील गोष्ट बोलून मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारलेला आहे –

अशी वदंता खरंच अस्तित्वात आहे का? तर नक्कीच आहे. इतरांविषयी सांगू शकत नाही, पण पुण्यात ब्राह्मणी वातावरणात वाढलेल्या लोकांना कधीतरी असं काहीतरी कानावर येतं. उदा: दत्तो वामन पोतदार यांच्या हे (म्हणजे शिवाजीच्या पितृत्वाविषयीची कथित बाब) लक्षात आलं पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही असं माझ्या स्वत:च्या कानावर आलं होतं. त्याला आता कित्येक वर्षं लोटली. तेव्हा जेम्स लेनचं अस्तित्व आमच्या दखलपात्रही नव्हतं. त्यामुळे या वदंतेला जन्म देणारा मनुष्य लेन खचितच नाही. त्याला निव्वळ तिची वाच्यता करण्याबद्दल (आणि तेही शिवाजीविषयीच्या मिथकं/लोककथांच्या चर्चेच्या चौकटीत ती करण्याबद्दल) झोडपणं म्हणजे निरोप्याला जीवे मारण्यासारखं आहे.

म्हणजे आपण हे मान्य केलंत की पुण्यातल्या (काही) ब्राह्मणांना ही ‘वदंता’ माहीत होती. ही गोष्ट शिवाजीच्या समकालीनांना माहीत नव्हती. त्याच्या हितशत्रूंना देखील माहीत नव्हती. अशा परिस्थितीत कसलाही शंकेचादेखील आधार नसताना अशी वदंता एका ठरावीक भागातच, ठरावीक लोकांमध्येच अस्तित्त्वात येते तेंव्हा कुणीही हेच म्हणणार, की या वदंतेचा जन्म तिथेच झाला. आपण वरील गोष्ट जाहीरपणे मान्य करून जातीयवादाच्या आगीत तेल ओतले आहे हे नम्रपणे नमूद करतो. महामहोपाध्याय द. वा. पोतदार सूज्ञ होते. कोणती गोष्ट खाजगी ठेवायची, कोणती जाहीर करायची याची जाण त्यांना होती. लेनला नाही. त्याला ज्या कुणी ही वदंता सांगीतली त्यांनाही नाही. आणि आपल्यालाही नाही असे खेदाने म्हणावे लागते. आपण नुसतेच मान्य केले नाही, तर या बेसलेस गॉसीपला लोककथा/ मिथक यांच्याशी तोलून त्याचा सांगोपांग अभ्यास व्हावा असेही सुचवत आहात!

एखादी वदंता अस्तित्वात आहे असं म्हणणं हे पुस्तकात गैरलागू आहे का? तर अजिबात नाही. कारण पुस्तकाचं स्वरूपच शिवाजीविषयीची मिथकं, आख्यायिका, लोककथा यांचा धांडोळा घेऊन त्यातून काय बोध होतो, ते पाहणं हा आहे. त्यामुळे अशा वदंतेचा उल्लेख करणं या पुस्तकाच्या एकंदर स्वरूपाशी सुसंगत आहे.

इ एच कार चे व्हॉट इज हिस्टरी वाचावे. कशाची दखल इतिहासाच्या अभ्यासकाने घ्यावी आणि कशाची नाही हे त्याने छान समजावून सांगितले आहे. असे नॉटी जोक खूपजणांचे सांगता येतील. त्यात काय, डॉमनिक लॅपिएरचं फ्रीडम ऍट मिडनाईट वाचा. भरलंय ते असल्या नॉटी जोक्सनी. सावरकर म्हणू नका, नेहरू म्हणू नका, आणि संस्थानिक तर काय आगारच नॉटी जोक्सचं. तो काय इतिहास आहे काय? तो डॉमनिक लॅपिएरचा मानसिक इतिहास आहे. (म्हणजे त्याच्या कल्पनेतला इतिहास नव्हे, तर त्याचं स्वत:चं मन कसं आहे हे दाखवणारा या अर्थाने.) तसंच हे पुस्तक म्हणजे लेनचा मानसिक इतिहास आहे का? अगदी तो ‘कोलीत’ आहे, ‘निरोप्या’ आहे हे मान्य केले तरी. त्याने कशाला व्हायचे कोलीत किंवा निरोप्या असल्या बेसलेस गॉसीपचा?

मी पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे ते इतिहासाचे पुस्तक आहे, की “शिवाजीविषयीची मिथकं, आख्यायिका, लोककथा यांचा धांडोळा घेऊन त्यातून काय बोध होतो”, ते पाहणारं समाजाच्या मानसशास्त्रावरचं पुस्तक आहे हे मला माहीत नाही. इन एनी केस, शिवाजीच्या आईचं चारित्र्यहनन करणारा आधार नसलेला एक किस्सा, जो खरोखर समाजात प्रचलित नाही, (

पुण्यात ब्राम्हणी वातावरणात वाढलेले

(काही) लोक सोडता कुणाला ते आतापर्यंत खरेच माहीत नसावे) तो लिहून आणि त्याचा विचार करून ना इतिहासाचा अभ्यास होऊ शकतो, ना समाजमनाचा अभ्यास होऊ शकतो. मग शक्यता दोन. लेनने अभ्यासू भाबडेपणाने या ‘वदंते’चा उल्लेख केला. खोडसाळ लोकांनी त्याला ‘कोलीत’ म्हणून वापरले आणि तो मूर्खपणे ‘निरोप्या’ बनला. दोन – त्यानेच, वाद निर्माण करून प्रसिद्ध होण्यासाठी खोडसाळपणे हा उल्लेख केला. म्हणजे एकतर तो मूर्ख आहे किंवा समाजकंटक आहे. किंवा दोन्ही आहे. अभ्यासक नाही. विचारांचे दमन इ. शब्द मी काही प्रतिसादांमध्ये वाचले. इथे काही विचार लेनने मांडला आहे असे वाटते का? म्हणजे मी वादग्रस्त वाक्यापुरते बोलतोय. म्हणजे आपल्या लेखातला पहिला मुद्दा बाद. दुसरा मुद्दा राजकीय विश्लेषणाचा. क्रेमर त्यावर कुस्ती करून दमले आहेत. मला त्यावर काय वाटते ते वर आलेले आहेच. माझा पॉइंट वेगळाच आहे.

पुस्तकाकडे दुर्लक्ष करणे योग्य होते. पण त्याला प्रसिद्ध केले आणि डॅमेज इज डन. आता काहीही करता येणार नाही. त्याने लोकांचा ‘ऑथेल्लो’ ऑलरेडी केलेला आहे. प्रतिसादांवरून लक्षात आले. काही लोकांच्या का होईना मनात संशयाची पाल हळूच चुकचुकली – खरं असेल का ते? खरंच जिजाबाई अशा असतील? त्याशिवाय असल्या स्कॉलरशिपचा पुरस्कार होणार नाही. लेनला या वदंतेचा उल्लेख करायचाच होता, तर फार तर त्याने असे लिहायला हवे होते, (‘पुण्यातल्या, ब्राह्मणी वातावरणात वाढलेल्या’) काही लोकांच्या कानावर अशी अशी काही आधार नसलेली गोष्ट (अधूनमधून) येत असते, त्यावरून अशा गोष्टी करणारे आणि पसरवणारे लोक हे असा असा विचार करतात असे दिसून येते. कंसातले शब्द ऑप्शनल. (तरीसुद्धा घाण ठरलेली होतीच म्हणा.)

मला विचाराल तर त्याने हे लिहायला नको होते.

आणि तुम्हीही हे लिहायला नको होते. म.म. पोतदारांसारखे दुर्लक्ष करायला पाहिजे होते. खाजगीत बोला काय वाटेल ते. असे जाहीरपणे नको.

त्याचे कसल्याही प्रकारचे समर्थन चुकीचे आहे. करू नये. त्याला विरोध करण्यामागे राजकारण असेलही. पण समर्थन करण्यामागे कसलाही वैचारिक आधार नाही. मी सेन्सॉरशिपचे समर्थन किंवा विरोध, काहीच करत नाही. तसा कुठलाही एक स्टॅंड घेता येत नाही. रस्त्यावर कपडे घालून फिरणारी माणसे असतात. रस्त्यावर कपडे काढून फिरणारी माणसे देखील इंटरनेटच्या कृपेने सचित्र बघायला मिळतात. ज्या समाजात नागडे फिरायचे कुणी मनाला लावून घेत नाही तिथे फिरतात काही लोक. ज्या समाजात असं नागडं फिरणं लोक पसंत करत नाहीत तिथं कपडे घालून फिरावे हे बेसीक शहाणपण आहे. द. वा. पोतदारांनी ते शहाणपण वापरले होते. म्हणून तोंडात तीळ भिजवला.

लेनवर बंदी घालण्याच्या मुद्याचं म्हणाल तर रस्त्यावर नागडं फिरणार्या माणसाकडं दुर्लक्ष करावं का अटक करावं असा तो प्रश्न आहे. माझ्या मते अटक करावं. पुस्तकावर बंदी घाला. वादळ उठलंय म्हणून. त्याचं वाचन नको. त्यावर चर्चाही नकोत. राजकारणही नको. वादळ उठलं नसताना, सगळं सामसूम असताना बंदी घालणं चुकीचं पण आहे, आणि मूर्खपणाचं पण आहे. आयदर दुर्लक्ष करा ऑर बंदी घाला. दुर्लक्षही करायचं नाही, बंदीही घालायची नाही, काय लिहिलंय ते वाचा, विचार करा म्हणायचं...विचारांचं दमन करू नका म्हणायचं... बात हजम नही होती.

मी एवढा वेळ घालवून हे का लिहिले?

ही जागा चांगली आहे. बरेच लोक इथे लिहितात, वाचतात. मराठी वाचणारे सगळ्या जातींधर्मांचे लोक येतात इथे. पुढे जाऊन ही जागा अजून समृद्ध व्हावी अशी मनापासून इच्छा. अशा सुंदर जागेवर ना कुणी तथाकथित ब्राह्मणविरोधाचे समर्थन करावे, ना तथाकथित ब्राम्हणांचे समर्थन करावे. या लेखात आणि काही प्रतिसादांत तथाकथित ब्राह्मणवादाचे/ ब्राह्मणांच्या बाजूचे समर्थन दिसले. ब्रिगेडला ती रिऍक्शन असेल. नकळत झाले असेल. पण असं दिसतंय हे खरं. लेख अनेकांना संयत आणि विचारी वाटला याचं आश्चर्य वाटलं.

मी ही गोष्ट संभाजी ब्रिगेडला सांगायला जाणार नाही. तिथे उपयोग नाही. (मी काही ब्रिगेडियरांशी(!) बोलून पाहिलेले आहे.) इथे सांगाविशी वाटली. उपयोग होइल असं वाटतं. कुणाशी ओळख नसतानाही मला काही लोकांच्या लिखाणामुळे आपलेपणा वाटतो. म्हणून बोललो. मैत्री असती तर हक्काने जंतूंना सांगितले असते, असे लिहू नका. या जागेला कसला टॅग लागू नये ही सदिच्छा. लेन म्हणा, संभाजी ब्रिगेड म्हणा, लक्ष देऊ नये हे उत्तम. दुर्लक्ष करण्यात कसली वैचारीक दिवाळखोरी नाही. नॉन इश्यू ला आपण इश्यू बनवत आहात हे लक्षात घ्यावे.

आळश्यांचा राजा

चिंतातुर जंतू's picture

17 Jul 2010 - 4:20 pm | चिंतातुर जंतू

लेखाच्या या दुसर्या भागात आडून आडून असे सुचवलेले आहे, की लेनच्या कानावर ही “वदंता” मराठा नेतृत्त्वाने (पवार) घातली (असावी). भांडारकर संस्थेतल्या “ब्राह्मणांनी” नाही. हा अंदाज जस्टिफाय करण्यासाठी एक विश्लेषण मांडलेले आहे.

हा आपला गैरसमज आहे. तो माझ्या लिखाणातल्या कशामुळे झाला ते कळत नाही. कारण मी पवारांना लेनच्या संशोधनाची कल्पना असावी (महाराष्ट्रावर संशोधन करणार्‍या या परदेशी संशोधकांच्या परिचयात आल्यामुळे) असा अंदाज बांधला होता. लेनला पवारांनी ही वदंता सांगितली असावी असं मला सुचवायचं नव्हतं. त्यासाठी पुण्यातले ब्राह्मण पुरेसे होते, याविषयी मला जवळपास खात्री आहे.

म्हणजे, इथे असं म्हणायचं आहे, की लेनने जे “वदंते”विषयी लिहिलंय ती एक इतिहास संशोधनाची पद्धतच आहे. क्षणभर मान्य करू. म्हणजे ही वदंता उल्लेखिण्यामागे राजकारण नव्हते.

मग मराठा नेतृत्त्वाच्या धूर्त राजकारणाचे विश्लेषण करायची काय गरज होती? जर लेन स्कॉलर आहे, तर त्याला स्कॉलरच राहू देत ना. त्याला बिचार्याला “कोलीत” कशाला म्हणताय? त्याने स्वत:ला असं राजकारण्यांना वापरू दिलं असं का म्हणताय?

लेनला स्कॉलर राहू देणं मला आवडेल. त्याला तसं राहता येत नाही, यामागे धूर्त राजकारण आहे. म्हणून त्याचं विश्लेषण. ते तुम्हाला पटत जरी नसलं, तरीही त्याची गरज लेनचं उत्तरदायित्व मर्यादित करण्यासाठी आहे. लेन स्वतःच्या मर्जीनं कोलीत झाला आहे, असं मला वाटत नाही. कारण त्याला महाराष्ट्रावर पुढे संशोधन करायला आवडलं असतं, असं वाटतं. ते आता इतक्यात तरी शक्य दिसत नाही.

तुमच्या मते मग लेन कदाचित मूर्ख किंवा भाबडा ठरेलही. पण हेही लक्षात घ्या, की हे प्रकरण होईस्तोवर महाराष्ट्रात अशा प्रकारे संशोधकांना झुंडशाहीचे अनुभव आलेले नव्हते. आपल्या संशोधनामुळे असं काही होऊ शकतं, हे कळल्यावर भांबावलेले संशोधक मी पाहिलेले आहेत (लेन नव्हे).

असो. उरलेल्या मुद्द्यांना सावकाश उत्तर देईन.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

चिंतातुर जंतू's picture

18 Jul 2010 - 5:51 pm | चिंतातुर जंतू

प्रतिसाद दोनदा पडला म्हणून त्यातला एक काढून टाकला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jul 2010 - 11:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादही मस्त आहेत. फक्त लेनप्रकरणात कोणत्या एकाच समाजाच्याच भावना दुखावल्या जात आहेत की सर्वच स्तरातून अशा भावना दुखावल्या ते चर्चेतून काही स्पष्ट झाले नाही. लेखन स्वातंत्र्यावर गदा येते वगैरे फारसे महत्त्वाचे गदारोळ करणार्‍यांना वाटत नाही. लेखक-कलावंतांनी क्षमा मागितली की त्या वादावर पडदा पडतो. असो, यावरुन इतिहासात एक तोड-फोडाची वाचलेल्या गोष्टीची आठवण सांगाविशी वाटते. घाशीराम कोतवाल नाटकाचा खास प्रयोग बाळासाहेब ठाकरेंसाठी झाला त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाले आणि त्या नाटकाचा पुढे परदेशगमनाचा मार्ग मोकळा झाला. 'शिक्षणाच्या आयच्या घो' हे शिर्षक ज्यांना आक्षेपार्ह वाटत होते त्या संस्कृती रक्षकांनी निर्मात्यांशी 'अर्थपूर्ण' संवाद साधून चित्रपटाचा मार्ग मोकळा केला. वरील उदाहरणातून मला म्हणायचे की आहे विनोदी स्वरुपात बोलल्या गेलेले लेखन आक्षेपार्ह ठरले, भावना दुखावल्या गेल्या. जर असाच अर्थपूर्ण संवाद लेनने संबंधीतांशी केला असता तर भावना दुखावल्या असत्या काय ? काय वाटते ?

-दिलीप बिरुटे

चिंतातुर जंतू's picture

17 Jul 2010 - 1:07 am | चिंतातुर जंतू

आतापर्यंत लेखातल्या राजकीय विश्लेषणाविषयी प्रतिसादांत आलेल्या मुद्द्यांना संबोधलं होतं. हा प्रतिसाद मुख्यत: लेन, एकंदर संशोधक/विचारवंत आणि इतर सुशिक्षित समंजस समाज यांच्यातल्या दोष-गुणांविषयी आहे.

शिवाजी ही व्यक्ती वास्तवात घडून गेली असताही / इतर दस्तऐवज सोडून लोककथा, मिथक, सांगोवांगी वगैरेंचा विचार करावाच तरी कशाला?

शिवाजीचं पितृत्व हा संशोधनाचा विषय कसा ठरू शकतो? वगैरे

कोणत्याही ज्ञानशाखेत वरील प्रकारचे प्रश्न अप्रस्तुत ठरतात. कारण कोणत्याही विषयाशी संबंधित उपलब्ध साधनांना वाजवी विश्लेषण पध्दतींच्या आधारावर तोलता येणं हे त्या त्या ज्ञानशाखेत अंतर्भूतच असतं. म्हणजे काय? तर एकदा मिथकं, आख्यायिका, लोककथा ही इतिहासाची साधनं मानली, आणि त्यांना घेऊन काय प्रकारचं विश्लेषण केलं तर ते इतिहास संशोधन म्हणून वाजवी ठरतं हे एकदा लक्षात घेतलं, तर मग विश्लेषण कुणाहीविषयी करता येतं. यायला पाहिजे. मग शिवाजीचा अपवाद करता येत नाही. आपण हीच बाब विसरतो आहोत, म्हणूनच त्याची जाणीव करून द्यावीशी वाटली.

लेन ने पुस्तकात, प्रस्तावनेत किंवा इतरत्र लेखी किंवा पत्रकारांसमोर असं विधान केलं आहे काय की या पुस्तकातलं संशोधन हे इतिहासाचा आढावा, माझा दृष्टिकोन, इ. नसून मिथकं, लोककथा यांचा धांडोळा घेऊन तो काळ आणि समाजव्यवस्थेतला महाराजांचा संदर्भ उभा करण्याचा प्रयत्न आहे?

पुस्तकाचं स्वरूप हे शिवाजीविषयीच्या विविध कथनांचा धांडोळा (आणि विश्लेषण) असंच आहे. उदा. http://www.amazon.com/Shivaji-Hindu-King-Islamic-India/dp/0195141261 इथे पुस्तकाचं वर्णन पाहा. आणि हे ही लक्षात घ्या की हा इतिहास या ज्ञानशाखेचा एक भाग आहे. म्हणजे असा आढावा हा इतिहासाचाच एक उपप्रकार असतो.

लेखात लेनचं समर्थन आहे, पण लेनचं लिखाण असमर्थनीय आहे.

लेखात लेनचं समर्थन नाही, तर त्यानं वापरलेल्या विश्लेषण पध्दतीचा उल्लेख आहे आणि ती इतिहास संशोधनामध्ये वाजवी आहे असं म्हटलेलं आहे. कारण बऱ्याच जणांना अजूनही असंच वाटतं की लेन सांगोवांगीच्या गोष्टी वापरतो म्हणजे तो खोडसाळ किंवा वाईट इतिहास संशोधक आहे. लेनचं समर्थन असेल तर ते इतकंच की त्यानं वापरलेली पध्दत मुळात गैर नाही; त्यामुळे त्यानं काढलेले निष्कर्ष इतिहास तज्ञांनी तपासून पाहिले पाहिजेत. तसं होण्यासाठी पुस्तक उपलब्ध झालं पाहिजे. त्याचे निष्कर्ष सार्थ आहेत की नाहीत याविषयी माझा अभ्यास अपुरा पडतो, त्यामुळे त्याबद्दल मी काही मतप्रदर्शन करू शकत नाही. जाताजाता हे मात्र नमूद करावं लागेल की शिवाजीच्या पितृत्वाविषयी त्यानं कसलाही निष्कर्ष काढलेला नाही.

लेन कुणी आतंरराष्ट्रीय ख्यातीचा इतिहास संशोधक किंवा लेखक नाही आहे.

ज्याचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीच्या प्रकाशनांमध्ये प्रसिध्द झाले आहेत, जो एका अमेरिकन विद्यापीठात प्राध्यापक आहे अशा माणसाविषयी असं विधान धाडसी ठरेल.

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली असली थेरं नको

ब्रिगेडच्या लिखाणावर बंदी यावीच. तशीच या लेनच्या पुस्तकावर घालण्यात काय चूक आहे?

हे व्यक्तीस्वातंत्र्य नाही तर ज्ञानविस्ताराच्या शक्यता खुल्या ठेवायला पाहिजेत असं प्रतिपादन आहे. पुन्हा हे लक्षात घ्या की ज्ञानशाखांची त्यांची त्यांची म्हणून काही शिस्त असते. त्या शिस्तीत कोणताही उपविषय वर्ज्य नसावा. तो वर्ज्य केला, तर समाजाची दीर्घगामी हानी होते. ती कशी हे पाहायला मध्यपूर्वेतले देश हे उत्तम उदाहरण ठरावेत. एकेकाळी तिथे निर्माण झालेलं ज्ञान युरोपात जायचं; कारण अनेक ज्ञानशाखांचा विस्तार युरोपात कमी झाला होता, पण मध्यपूर्वेत पुष्कळ झाला होता. हळूहळू प्रश्न विचारण्यावर, शंका काढण्यावर प्रतिबंध आले. तसा ज्ञानशाखांचा विस्तार थांबला. युरोपात उसनं ज्ञान घेऊन तो सुरु झाला असला तरी पुढे अखंड चालू राहिला. अखेर युरोप पुढे गेला आणि मध्यपूर्व मध्ययुगातच राहिली. आपण कुठे असावं हे आपणच ठरवायचं आहे.

तथाकथित विचारवंतांचा पळपुटेपणा, कातडीबचाऊपणा वगैरे आणि हा विषय मूळ लेखात वगळणे.

याचा प्रतिसाद हसत खेळत द्यायचा झाला तर असं म्हणता येईल, की विचारवंतांवर टीका करायला तत्पर असे पुष्कळ लोक या संस्थळावर कार्यरत आहेत. त्यात मी पामर (तोही नावात जंत असणारा!) काय भर घालणार?

असो. मुळात विचारवंत हे काही आकाशातून पडलेले नसतात. ज्या सुशिक्षित समाजाचा आपण सर्व एक भाग आहोत, त्यातलेच काही अत्यल्प लोक बुद्धिजीवी म्हणता येतील असे पेशे स्वीकारतात. त्यांचे गुणदोष हे देखील आपल्या गुणदोषांसारखेच असतात. इतर समाजघटकांप्रमाणेच ते देखील भ्याड, भ्रष्ट वगैरे असू शकतात. विविध व्यवसायांत काम करणाऱ्या आपणापाशी जर झुंडशाही आणि दमनाला प्रतिकार करण्याचं धैर्य नाही, तर निव्वळ विशिष्ट पेशातल्या लोकांकडे ते असावं अशी अपेक्षा वाजवी आहे का? चांगला इतिहास संशोधक हा निर्भीड असेलच असं नाही. तुम्ही निर्भीड नसाल तर शिवाजी हा तुमच्या संशोधनाचा विषयच ठरू शकत नाही अशी आज परिस्थिती आहे. यानं किमान काही चांगले इतिहास संशोधक शिवाजीपासून दूर पळत असणारच. हे खेदजनक नाही का? यात एक समाज म्हणून आपली हानी नाही का?

हे अर्थात विचारवंतांच्या भ्याडपणाचं समर्थन नाही. तुर्कस्तानसारख्या देशात राहून आर्मेनिअन लोकांचा तुर्कांनी केलेला छळ आणि सामूहिक हत्याकांड याविषयी आवाज उठवणारा ओरहान पामुक आदरणीय आहेच. कारण तिथे त्यालाही अशाच लोकक्षोभाला तोंड द्यावं लागतं आणि देशद्रोही म्हणून कोर्टात उभं केलं जातं. त्याची आणि लेनची तुलना नाहीच. फक्त, इतरांवर टीका करताना आपण स्वत:चे दोष सहज विसरून जातो, हेही लक्षात घ्यावं, एवढीच विनंती. कुणीतरी भ्याड आहे असं म्हणताना आपल्यापैकी कितीजण ज्याची भीती वाटेल अशा झुंडशाहीसमोर त्या झुंडीला अप्रिय अशा गोष्टी जाहीरपणे करण्याचं धाडस करतील याचाही विचार करावा. (आणि हे म्हणताना मी स्वत:ला भ्याड म्हणूनच गणतो आहे.)

आज जेव्हा पाश्चिमात्य देशांतील विचारवंत अशा समाजघातक राजकारणाविरोधी ठाम भूमिका घेतात तेव्हा आपल्यामागे एक मोठा समाज आहे याची त्यांना जाणीव असते. याचा त्यांना आधार असतो. असा आधार आपल्या विचारवंतांना वाटावा असं कोणतं जबाबदारीचं वर्तन आपल्याकडून होतं हा माझ्या दृष्टीनं या संस्थळावर विचारण्याजोगा कळीचा प्रश्न आहे, कारण त्याचा संबंध प्रत्यक्ष तुमच्या-माझ्याशी लागतो. आणि त्याचं उत्तर हे निराशाजनक आहे. आपल्याला अप्रिय वा अगदी घृणास्पद वाटणाऱ्या गोष्टींनाही विशिष्ट चौकटींत काही स्थान आहे ही बाब आपण सातत्यानं विसरताना दिसतो. आपली न्यायव्यवस्था अजून तरी तिची बुद्धी शाबूत ठेवून आहे ही बाब सुप्रीम कोर्टाच्या लेनविषयीच्या निर्णयानं पुन्हा एकदा सिद्ध झाली, पण आपण सुशिक्षित लोक सारासार विचारबुद्धीला तिलांजली देतो हेही पुन्हा एकदा सिध्द झालं. याचंच दु:ख आहे.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

क्रेमर's picture

17 Jul 2010 - 1:36 am | क्रेमर

विविध व्यवसायांत काम करणाऱ्या आपणापाशी जर झुंडशाही आणि दमनाला प्रतिकार करण्याचं धैर्य नाही, तर निव्वळ विशिष्ट पेशातल्या लोकांकडे ते असावं अशी अपेक्षा वाजवी आहे का?

होय. ही अपेक्षा वाजवी आहे. सैनिकाला शत्रूच्या गोळीचा सामना करावा लागतो, स्वत: इतरांना मारल्याबद्दल पश्चाताप सहन करावा लागतो. धंद्यात पैसे गुंतवणार्‍या गुंतवणुकदारास पैसे बुडाल्यास होणार्‍या परिणामांना तोंड देण्याचे धैर्य असावेच लागते. जनसामान्यांना त्यांच्या कृत्याने होणार्‍या परिणामांना सामोरे जाण्याचे धैर्य असावेच लागते. विचारवंतांना स्पेशल ट्रिटमेंट दिली जाऊ नये. ज्याप्रमाणे समजाकडून पुरस्कार मिळतात त्याचप्रमाणे लाथाही मिळू शकतात. त्यांना सामोरे जायला हवे.

आज जेव्हा पाश्चिमात्य देशांतील विचारवंत अशा समाजघातक राजकारणाविरोधी ठाम भूमिका घेतात तेव्हा आपल्यामागे एक मोठा समाज आहे याची त्यांना जाणीव असते.

लेन हा अमेरिकेचा नागरिक आहे. इथल्या (अमेरिकेतल्या) समाजाचे तसेच अभ्यासकांचे पाठबळ त्याला आहेच.

आपली न्यायव्यवस्था अजून तरी तिची बुद्धी शाबूत ठेवून आहे ही बाब सुप्रीम कोर्टाच्या लेनविषयीच्या निर्णयानं पुन्हा एकदा सिद्ध झाली, पण आपण सुशिक्षित लोक सारासार विचारबुद्धीला तिलांजली देतो हेही पुन्हा एकदा सिध्द झालं. याचंच दु:ख आहे.

या भावनेशी सहमत आहे.

_________________
बाकी चालू द्या.

आळश्यांचा राजा's picture

17 Jul 2010 - 3:50 pm | आळश्यांचा राजा

लेनने हा जोक केलेला नाही, त्याने फक्त असे म्हटले की असा असा एक जोक आहे, असे काहीजण म्हणतायत. टोपणनावांनी वर शिवाजीच्या पोर्तुगीज पैतृत्त्वाची एक वदंता उल्लेखिली. लेनने ती वदंता सांगितली आहे का? नसल्यास का नाही? (ते लेनला विचारा असे म्हणू नका.) त्याने फक्त महाराष्ट्रातली तथाकथित वदंता सांगितली. पोर्तुगीज वदंता समकालीन होती. महाराष्ट्रातली वदंता समकालीन नव्हती. सांगायचीच असेल तर पोर्तुगीज वदंता सांगणे हे विषयाला धरून ठरले असते. ही वदंता सध्याच्या काळातील आहे. शिवाजीच्या काळातील नव्हे. पुस्तक सध्याच्या काळाविषयी आहे की शिवाजीच्या काळाविषयी? या वदंतेतून शिवाजीच्या काळाचा बोध होतो की सध्याच्या काळाचा? आणि ही वदंता अस्तित्त्वात येण्यासाठी शिवाजी कितपत जबाबदार आहे? त्यामुळे त्याच्या व्यक्तीमत्वावर यातून काय प्रकाश पडतो?

तर याचे उत्तर खोडसाळपणा आहे. नकळत मूर्खपणे झालेला, किंवा मुद्दाम केलेला. लेन किती मोठा स्कॉलर आहे वगैरेंनी ही बाब झाकली जात नाही.

शिवाजीविषयीच्या वदंता, आख्यायिका, लोककथा यांतून धांडोळा घ्यायला अनेक आख्यायिका आहेत. भवानी तलवार, श्रीशैल येथे आत्मसमर्पणाचा प्रयत्न इ. हे जे इथे उल्लेख केलेले गॉसीप आहे, ते या लायनीत बसते का? जंतूंनी भले लेनचे समर्थन केले नसेल, त्याच्या अभ्यास पद्धतीचे समर्थन केले असेल. त्या अभ्यास पद्धतीमध्ये हे बसते का?

असो. पूर्णविराम. थँक्स.

आळश्यांचा राजा

चिंतातुर जंतू's picture

18 Jul 2010 - 12:43 am | चिंतातुर जंतू

सांगायचीच असेल तर पोर्तुगीज वदंता सांगणे हे विषयाला धरून ठरले असते.

पोर्तुगीज वदंता अस्तित्वात होती अथवा नाही हे मी सांगू शकत नाही. तरीही एवढं नक्की सांगू शकतो की सद्य काळात अस्तित्वात असणारी वदंता वापरणं गैर नाही. यासाठी लेननं वापरलेली संशोधनपध्दती समजून घेणं आवश्यक आहे. तीमध्ये विविध लोकांनी विविध काळात शिवाजीविषयी ज्या (खर्‍या-खोट्या) कहाण्या रचल्या त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. त्याला अनेक पदर आहेत. त्यातले काही शिवाजीबद्दल आहेत, तर काही कहाण्या रचणार्‍यांबद्दल वा सांगणार्‍यांबद्दल आहेत. पण त्याला काळाचं बंधन नाही.

तर याचे उत्तर खोडसाळपणा आहे. नकळत मूर्खपणे झालेला, किंवा मुद्दाम केलेला. लेन किती मोठा स्कॉलर आहे वगैरेंनी ही बाब झाकली जात नाही.

त्यानं सध्याच्या वदंता वापरण्यात काही गैर नाही. त्यामुळे यात (कळत-नकळत) खोडसाळपणा आहे असा निष्कर्ष निघत नाही.

शिवाजीविषयीच्या वदंता, आख्यायिका, लोककथा यांतून धांडोळा घ्यायला अनेक आख्यायिका आहेत. भवानी तलवार, श्रीशैल येथे आत्मसमर्पणाचा प्रयत्न इ. हे जे इथे उल्लेख केलेले गॉसीप आहे, ते या लायनीत बसते का?

होय. आणि अशा अनेक लेननं वापरलेल्या आहेत. उदा: तानाजीच्या सिंहगड विजयाच्या एका पोवाड्यामध्ये तानाजीच्या घरात लग्न असल्यामुळे शिवाजी त्याला मोहिमेवर पाठवायला तयार नाही आणि जिजाऊ त्याला तयार करते. कारण तानाजीला पाठवला नसता तर कदाचित गड जिंकला नसता. अशा अनेक गोष्टींमधून शिवाजीच्या जडणघडणीतल्या जिजाऊच्या भूमिकेविषयी जी प्रतिमा तयार होते त्याचं लेन विश्लेषण करतो. अशा सर्व अधिक महत्त्वाच्या गोष्टींच्या मानानं वादग्रस्त वदंतेला काहीच महत्त्व नाही.

(आता पुढचा भाग माझं मत आहे)
त्यामुळेच माझ्या मते ती काढून टाकायलाही लेन सहजासहजी तयार झाला असावा. त्यानं पुस्तकाच्या दर्जामध्ये काही फरक पडत नाही.
पण मग ती घातली तरी का असावी? खोडसाळपणा का नाही?

कारण त्या वदंतेनं एक प्रकारे शिवाजीचं श्रेष्ठ युगपुरुष असणंच अधोरेखित होतं. म्हणजे ज्याविषयी 'अरे, हा युगपुरुष आपल्यातला असायला हवा होता रे! च्च च्च!' असं वाटतं असा तो होता. यातून ब्राह्मणांचा संकुचितपणा किंवा स्वतःच्या वंशश्रेष्ठत्वाचा दंभही दिसत असेल. पण मग ती वदंता आधुनिक (म्हणजे खर्‍या अर्थानं हं!) ब्राह्मणांना लाजिरवाणी ठरेल. माझ्यापुरतं मी हे कबूल करतो की मी ती कुणाला सांगितली नव्हती. केवळ या वादाच्या पार्श्वभूमीवर तिचा उल्लेख केला.

पण या सर्वांत लेन शिरत नाही, कारण त्याच्या मुख्य कथनसूत्रात या विश्लेषणाला फार महत्त्व नाही. फक्त जाताजाता जंत्रीवजा त्या वदंतेचा उल्लेख होतो.

म्हणूनच मला असं वाटतं की त्या दोन ओळींमुळे एवढा गदारोळ माजेल याची त्याला थोडी जरी कल्पना असती, तर त्यानं तो भाग मुळातूनच वगळला असता, कारण आपलं काम मोकळेपणानं करता येणं त्याच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचं असावं असं त्याच्या आतापर्यंतच्या कामावरून वाटतं.

जंतूंनी भले लेनचे समर्थन केले नसेल, त्याच्या अभ्यास पद्धतीचे समर्थन केले असेल. त्या अभ्यास पद्धतीमध्ये हे बसते का?

होय, वर उत्तर दिलेलं आहे. शिवाय अ‍ॅमेझॉनवरचं वर्णनही असं म्हणतं:

James Laine traces the origin and development if the Shivaji legend from the earliest sources to the contemporary accounts of the tale. His primary concern is to discover the meaning of Shivaji's life for those who have composed-and those who have read-the legendary accounts of his military victories, his daring escapes, his relationships with saints. In the process, he paints a new and more complex picture of Hindu-Muslim relations from the seventeenth century to the present.

तुमच्या पहिल्या प्रतिसादातल्या अजून काही शंकांचं निरसन करणं बाकी आहे असं वाटतं, पण ते करण्याचा प्रयत्न आता उद्या करेन.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

चिंतातुर जंतू's picture

18 Jul 2010 - 5:49 pm | चिंतातुर जंतू

मागच्या प्रतिसादात समकालीन वदंता ही इतिहास संशोधनात एक साधन म्हणून वापरता येते का यासंबंधी सांगितलं होतं. या प्रतिसादात असभ्य वा हीन दर्जाची, ऐतिहासिक आधार नसलेली (थोडक्यात असत्य) आणि अवमानकारक ठरू शकणारी वदंता लेननं आपल्या पुस्तकात वा मी इथं लेखात (म्हणजे जाहीरपणे) उल्लेखण्याच्या योग्यायोग्यतेविषयी आळश्यांचे राजे व इतर काहींनी मांडलेल्या आक्षेपांसंदर्भात निवेदन आहे. ते आक्षेप थोडक्यात असे:

  • अशी वदंता जाहीर करून जातीयवादाच्या आगीत तेल ओतलं जातं.
  • अशी घाण उपसण्यानं काही साध्य होत नाही.
  • त्याचं कोणतंही समर्थन शक्य नाही.

जातीयवादाचं ह्त्यार हे आपल्याकडे अनेक गोष्टींना नको तितकं लावलं जातं. पाठ्यपुस्तकं, चित्रपट वगैरेंमध्ये जातीयवादी शब्द वापरू नयेत याचं एक टोक गाठलं जातं. विशिष्ट काळात विशिष्ट जातींचा उल्लेख शिवी वा अपमान करण्यासाठी होत होता, हे सत्य आहे. ते सवंग पध्दतीनं वापरण्याबद्दलचा आक्षेप योग्य असेलही, पण विश्लेषणासाठीही अशा गोष्टींचा उल्लेख टाळायला हवा, हे मान्य करणं जड जातं. किमान ज्ञानशाखांना तरी आपण अशा जराशानंही अवमानित होणार्‍यांपासून दूर ठेवायला ह्वं. नाहीतर काही दिशांमध्ये ज्ञानाचा विस्तार होणं थांबतं. ते समाजासाठी हानिकारक असतं. आपल्या समाजाविषयीच्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीची नोंद घेता आली, तरच आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना आपला समाज नक्की कसा होता, ते समजून घेता येईल. अशा प्रकारची सरसकट बंदी ही अखेर अज्ञान पसरवते. अप्रिय गोष्टींवर सरसकट, संदर्भाशिवाय बंदी घालून कोणत्याही समाजाचं भलं होतं असं इतिहास सांगत नाही.

या संस्थळावर या चर्चेच्या संदर्भात ही वदंता उल्लेखणं अश्लाघ्य होतं का? मला तरी असं वाटत नाही. आणि त्याचं कारणही वर सांगितलं तेच आहे. निंदानालस्ती, कुचेष्टा वा खोडसाळपणा न करता गंभीर चर्चा करायची असेल, तर त्या चौकटीत अशा एखाद्या एरवी असभ्य मानल्या जाणार्‍या गोष्टीची वाच्यता करणं हे गैर मानू नये. त्यात शहाणपणा नाही, कारण मग हा जो उहापोह या धाग्यावर झाला, तो होऊच शकला नसता.

हे स्थळ संपादित होतं. संपादकांना त्यांची धोरणं आणि सारासार विचारबुध्दी यांच्या चौकटीत काय संपादित करायचं हे ठरवावं लागतं. त्याविषयी इथं वादविवादही होतात. संपादक मंडळ, त्यांची धोरणं, होणारं संपादन आणि ते वादविवाद हे सर्व या संस्थळाचं आरोग्य कायम राखण्यात मदत करतात, असंही वाटतं. त्यामुळे त्यांचा अधिकार मी मान्यच करतो. आतापर्यंत तरी माझ्या लिखाणातल्या 'असभ्य' गोष्टींना त्यांनी इथं जागा दिलेली आहे, आणि ती बहुधा मी ज्या कारणांसाठी ते योग्य मानतो, त्यांसाठीच असावी असंही वाटतं. त्यामुळे संपादकांचे धन्यवाद. धाग्यावर आणि व्यक्तिगत निरोपांतून विविध विचार मांडणार्‍यांचे वा पसंती/नापसंती दर्शवणार्‍यांचेही आभार.

जाताजाता: E. H. Carr यांच्या 'What Is History?' या पुस्तकाचा आळश्यांचे राजे यांनी उल्लेख केला. हे पुस्तक अतिशय वाचनीय आणि मननीय आहे. इतिहासाच्या इतिहासातलं ते एक मानाचं पान आहे. ज्यांना इतिहास संशोधनाबद्दल अधिक माहिती करून घ्यायची आहे, त्यांनी ते जरूर वाचावं. मात्र हेही ध्यानात ठेवावं की हे १९६१ साली लिहिलं गेलं. साठच्या दशकात (विशेषतः १९६८ नंतर) अनेक ज्ञानशाखांत मूलभूत बदल झाले. तसे ते इतिहासातही झाले. मी ज्या पध्दतींच्या आधारे माझी विधानं करत होतो, त्या मुख्यतः या नंतरच्या 'न्यू हिस्टरी'मधून आल्या. 'कल्चरल हिस्टरी' या संकल्पनेचाही त्याच्याशी संबंध आहे. इतिहास या ज्ञानशाखेत वापरल्या जाणार्‍या वेगवेगळ्या संशोधन पध्दतींची प्राथमिक माहिती इथे मिळेल. धन्यवाद.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

आळश्यांचा राजा's picture

18 Jul 2010 - 8:06 pm | आळश्यांचा राजा

आपण माझे म्हणणे समजून घेतलेले आहे असे दिसते. थॅंक्स. त्याबद्दल असहमत आहात. हरकत नाही. संपादकांनी काय भूमीका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दलही काहीच म्हणणे नाही.

पवारांनी लेनच्या कानावर ही वदंता घातली असे आपल्याला म्हणायचे नव्हते हे स्पष्ट केलेत. पण मग पवार लेनला/ त्याच्या अभ्यासपद्धतीला ओळखत होते हे सांगायची गरज काय होती हे समजले नाही. तशी ओळख नसती, तरी आपल्या राजकीय विश्लेषणात काही फरक पडला असता असे वाटत नाही. असो. आपणच ‘तसे म्हणायचे नव्हते’ हे म्हटल्यामुळे यावर वाद बंद.

ज्ञानशाखा खुल्या असाव्यात,आणि त्यासाठी शासनाने पुरेसा पाठींबा द्यावा. हे योग्य आहे. व्यक्ती कुणीही असो, तिचे विश्लेषण करण्याचा संशोधकांचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. योग्य. परंतु असे विश्लेषण करताना असभ्य आणि तेही असत्य संदर्भ टाळता येणार नाहीत/ टाळू नयेत असं मला तरी वाटत नाही. मुक्तसुनीतांनी थिंकमहाराष्ट्रवरील ज्ञानदा देशपांडे यांच्या सुरेख लेखाची लिंक दिलेली आहे. त्यात त्यांनी तुम्ही म्हणता तसेच संशोधकांच्या/ विचारवंतांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. त्यांनीही अशा प्रकारच्या संशोधनाविषयी (तुम्ही दाखवली आहे तशीच) सखोल जाण दाखवली आहे. परंतु, त्यांनी लेनच्या हेतूंची आणि ज्या कंटेम्प्च्युअस (मराठी शब्द सुचत नाही) वृत्तीने त्याने हा संदर्भ बेदरकारपणे प्रसिद्ध केला त्याची निर्भर्त्सनाच केलेली आहे. ते मला पटते. प्रस्तुत मजकूर काढून टाकला काय नि राखला काय, गेलेला बाण परत येत नाही. आपण म्हणता तसे त्याने या वदंतेचा केवळ जंत्रीवजा उल्लेख केलेला असेल, त्यावर काही सभ्य/असभ्य भाष्य केले नसेलही, पण त्याचा परिणाम काय झालेला आहे ते दिसले आहेच. त्याला लेन जबाबदार नाही, तर राजकारणी आणि अप्रगल्भ समाज/ जनताच जबाबदार, असे म्हणणे मला पटत नाही. लेनला, आपण म्हणता तशी, परिणामांची कल्पना नसेल असे मला वाटत नाही. त्याबद्दल आपल्याशी असहमत.

याच विचारांमधून, माझे पुस्तकावरील बंदीचे समर्थन स्पष्ट होते. सरसकट बंदीचा मी पुरस्कर्ता नाही हे मी माझ्या पहिल्या प्रतिसादातच लिहिले आहे. परिस्थिती पाहून नियंत्रणे/ बंदी/ सेन्सॉरशिप येत असते. उदा. इथे वातावरण गढूळ होण्याचा धोका वाटल्यास संपादक ‘बंदी’ घालू शकतात/ घालतात. लेख/ प्रतिसाद उडवतात. ते चुकीचे आहे असे कुणीच म्हणणार नाही. (म्हणले तरी कुणी ते मान्य करत नाही.) तो त्यांचा अधिकार. (डिस्क्लेमर - यात टीका नाही. उपमा/ तुलना/ उदाहरण फक्त.) मग शासनाला असा अधिकार का नसावा? पब्लिक आपल्यासारखे प्रगल्भ असावे अशी अपेक्षा मुळातच चूक आहे. अत्र्यांच्या शब्दांत सांगायचे तर गर्दीचे मानसिक वय १३ वर्षे वयाच्या मुलाइतके असते. शासन असल्या बंदी (केवळ) मतांच्या राजकारणासाठी घालते असे समजणे शासनावर अन्याय करणारे आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ना विचारवंतांवर असते ना न्यायालयांवर. शासनावर असते. पब्लिक चिथावले जात असेल, दंगा करत असेल तर अशा पब्लिकचा बंदोबस्त करणे हे जसे रास्त आहे, तसेच, तशी संधी त्या पब्लिकला मिळाली कशी याचाही बंदोबस्त करणे आवश्यक ठरते. मग पुस्तक/ त्यातला असा असा उल्लेख हे कारण नाकारून केवळ चिथावले गेलेले लोक आणि त्यांचे नेते यांनाच कारण म्हणून धरणे योग्य नाही. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमलादेखील झुंडशाही दाबू पहात असेल, आणि दबावाला बळी पडून शासन बंदी घालत असेल, तर अशा बंदीचा मी निषेध करीन. इथे अशी परिस्थिती नाही असे माझे मत आहे. प्रस्तुत वदंता असत्य आणि असभ्य आहे हे आपण मान्य केल्यामुळे त्यावर अधिक भाष्याची गरज नाही. इतकेच ऍड करतो, हा मजकूर ज्या व्यक्तींविषयी आहे, त्या व्यक्ती (सगळ्या ‘भावना’ वगैरे बाजूला ठेवल्या तरीही) चारित्र्याचे मापदंड आहेत. जातीधर्म पार करून. याला खोडून काढणारा एकही आधार उपलब्ध नाही. असे असताना असत्याचा आधार घेऊन चारित्र्याविषयी शंकेचे पिल्लू सोडून द्यायचे यात कोणता ‘विचार’ येतो हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. त्या मायथॉलॊजिकल फिगरही नाहीत. त्यामुळे गांभीर्य अजूनच वाढते. यातूनच हेतूंविषयी शंका निर्माण होतात. त्यांचे नाव वापरून केल्या जाणार्‍या राजकारणाचा मी (नेहेमीच) निषेध करतो. तसेच प्रस्तुत वदंता जन्माला घालणार्‍या मानसिकतेचा आणि या वदंतेच्या जाहीर उल्लेखाचाही मी निषेध करतो. हे माझे मत बदलणे मला शक्य नाही.

प्रस्तुत लेखावरील काही प्रतिसाद/ काही अपेक्षित प्रतिसादांचा अभाव ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बर्‍याच जणांनी या विषयावर न बोलणे शहाणपणाचे मानलेले दिसते. टोपणनावांशी माझ्या झालेल्या संवादावर मी अजून काही भाष्य करण्याची गरज नाही. मोडतोड करणार्‍या लोकांची प्रगल्भता जगजाहीर आहेच. या संवादाच्या निमित्ताने शिकलेल्या आणि विचार करू शकणार्‍या (काही) लोकांच्या प्रगल्भतेवरही प्रकाश पडलेला आहे. असो.

आपण म्हणता तसे,

निंदानालस्ती, कुचेष्टा वा खोडसाळपणा न करता गंभीर चर्चा करायची असेल, तर त्या चौकटीत अशा एखाद्या एरवी असभ्य मानल्या जाणार्या गोष्टीची वाच्यता करणं हे गैर मानू नये. त्यात शहाणपणा नाही, कारण मग हा जो उहापोह या धाग्यावर झाला, तो होऊच शकला नसता.

हा बाकी पेचात पाडणारा मुद्दा आहे खरा!

इतिहासाच्या अभ्यासाच्या नवीन पद्धतींविषयी आपण काही माहिती दिलेली आहे. त्याबद्दल आभार.

आपल्याशी बोलून आनंद वाटला हे आवर्जून नमूद करतो.

(श्री. टोपणनावांसाठी - आपल्याशी होणारी उपचर्चा मी माझ्याकडून बंद केलेली आहे. तरी काही बोलणार असाल, तर ते "व्यक्तीस्वातंत्र्य'' आपल्याला अर्थातच आहे.)

आळश्यांचा राजा

श्रावण मोडक's picture

18 Jul 2010 - 9:03 pm | श्रावण मोडक

दाद दिली पाहिजे तुमच्या या प्रतिसादाला आणि इतरही प्रतिसादांना. पुरेसा बोलका. या वादाचाच समारोप करणारा प्रतिसाद आहे हा. समारोपही अशा बिंदूवर करताहात की तिथं अभ्यासाचे महात्म्य टिकते आणि अभ्यासाच्या नावाखाली होणारा भलताच उद्योगही रोखण्याची गरज व्यक्त होते.
या प्रतिसादातील -

कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ना विचारवंतांवर असते ना न्यायालयांवर. शासनावर असते. पब्लिक चिथावले जात असेल, दंगा करत असेल तर अशा पब्लिकचा बंदोबस्त करणे हे जसे रास्त आहे, तसेच, तशी संधी त्या पब्लिकला मिळाली कशी याचाही बंदोबस्त करणे आवश्यक ठरते. मग पुस्तक/ त्यातला असा असा उल्लेख हे कारण नाकारून केवळ चिथावले गेलेले लोक आणि त्यांचे नेते यांनाच कारण म्हणून धरणे योग्य नाही. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमलादेखील झुंडशाही दाबू पहात असेल, आणि दबावाला बळी पडून शासन बंदी घालत असेल, तर अशा बंदीचा मी निषेध करीन.

हे अगदी स्पष्ट लिहिलेत हे उत्तम. मला या भूमिकेत योग्य तो समतोल दिसतोय. त्याविषयी योग्य तो रास्तपणा शासनाकडे असेलच का याची उत्तरे भिन्न असू शकतात, पण शासनासाठी मार्गदर्शक म्हणूनच ही मांडणी पुरेशी आहे.

पंगा's picture

19 Jul 2010 - 11:58 pm | पंगा

त्याविषयी योग्य तो रास्तपणा शासनाकडे असेलच का याची उत्तरे भिन्न असू शकतात, पण शासनासाठी मार्गदर्शक म्हणूनच ही मांडणी पुरेशी आहे.

शासन मार्गदर्शनाकरिता मिपावरील प्रतिसादांकडे बारकाईने लक्ष ठेवून असते हे मिसळपावाचे यश मानून तोषावे, की शासनाचे (आणि कदाचित आणखीही कोणाकोणाचे) मिपावरील प्रतिसादांवर बारीक लक्ष असते म्हणून ("थोरल्या भावा"च्या आठवणीने) हळहळावे, यावर डोक्यात सध्या विचारद्वंद्व चालू आहे.

अशा परिस्थितीत "टोपणनावा"चीच (म्हणजे "टोपणनाव" या आयडीची नव्हे!) पॉलिसी श्रेयस्कर, असे आता पश्चाद्दृष्टीने जाणवू लागले आहे.

अतिशय "मार्गदर्शक" प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

बाकी चालू द्या.

- पंडित गागाभट्ट.

मराठी माणसे असे जातीवर जाऊन भांडत आहेत. शिवाजी महाराज हे काही एका जाती साठी राजा झाले नव्हते. महाराजांनी स्वताचे हिमतीवर आणि सर्वे जातीचे सहकार्य घेऊन राज्य निर्माण केले. कमीत कमी आता तरी एकजूट होऊन एकजात महाराष्ट्र उभा करू या. मुंबईत तर मराठी माणसास किमत नाही. किमान मला तरी वाटते किवा मी अनुभवले आहे कि महाराष्टातील कुठल्याही जातीतील माणसाला शिवाजी महाराजा विषयी आदर आहे. मग तो ब्राम्हण असो कि मराठा किवा इतर जातीतला पण आंबेडकरच्या बाजूला शिवाजीमहाराजाचा फोटो नक्कीच असतो. पण मिपाचा हा लेख व प्रतिसाद वाचून वाईट वाटले. चालू द्या. ..
जय महाराष्ट्र.

चिंतातुर जंतू's picture

19 Jul 2010 - 12:55 am | चिंतातुर जंतू

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचला तर त्यात काही रोचक गोष्टी समोर येतात.

नक्की कोणत्या समाजगटाच्या शिवाजीचा अनादर करणार्‍या (आणि म्हणून आक्षेपार्ह) मतामुळे वैमनस्य निर्माण होऊ शकेल असा प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारला असता त्याचं उत्तर सरकारला देता आलं नाही. फक्त भांडारकर संस्थेचे कर्मचारी हा तो गट आहे का, यावर सरकारचं उत्तर नाही असं होतं. मग तो कोणता गट, तर याला सरकारपाशी उत्तर नव्हतं.

(माझं मतः सर्व ब्राह्मण किंवा बरेचसे ब्राह्मण असं उत्तर योग्य ठरलं नसतं, कारण असे सर्व शिवाजीचा अनादर करतात हे सिध्द करता आलं नसतं; आणि असे काही ब्राह्मण अस्तित्वात आहेत, एवढंच म्हणून ते कायदा भंग सिध्द करायला पुरेसं ठरलं नसतं.)

अत्र्यांच्या शब्दांत सांगायचे तर गर्दीचे मानसिक वय १३ वर्षे वयाच्या मुलाइतके असते. शासन असल्या बंदी (केवळ) मतांच्या राजकारणासाठी घालते असे समजणे शासनावर अन्याय करणारे आहे.

या संदर्भात न्यायालयाच्या निर्णयात दिसणारा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांच्या भावना दुखावतील असा दावा आहे, तो गट हा समंजस, स्थिर मनाचा, कणखर व धैर्यशील असला तरीही त्याच्या भावना दुखावतील, हे सिध्द करता आलं पाहिजे, असा कायद्याचा अर्थ आहे. दुबळ्या वा अस्थिर मनाच्या, वा ज्यांना आपल्या विरोधातलं कोणतंही मत धोकादायक आहे असं वाटतं, अशा लोकांच्या भावना दुखावल्यानं प्रस्तुत मजकूर आक्षेपार्ह ठरत नाही.

तसंच पुस्तकाचा परिणाम काय होईल, हे पाहाताना ज्या प्रकारचे लोक हे या पुस्तकाचे अपेक्षित वाचक आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे, असाही कायद्याचा अर्थ आहे.

असो. आपण असहमत असण्याविषयी सहमत आहोत, असं मानू. भारतीय दंडविधानाविषयी माझा आदर मात्र हे निकालपत्र वाचून वाढला आहे, हे नमूद करतो. आपलाही तो वाढला असेल अशी आशा व्यक्त करतो, आणि इथे थांबतो.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

आळश्यांचा राजा's picture

19 Jul 2010 - 1:31 am | आळश्यांचा राजा

आपण असहमत असण्याविषयी सहमत आहोत, असं मानू.

अर्थातच.

कोर्टाचा निर्णय जालावर असल्यास दुवा दिलात तर बरं होईल. कोर्टाचा निर्णय केवळ कोर्टाच्या इंटरप्रिटेशनवर अवलंबून नसून पक्ष आपली बाजू कशी मांडतात यावरही अवलंबून असतो. भारतातील न्यायव्यवस्था इन्क्विझिटिव्ह नाहीये. एखाद्या पक्षाने आपली बाजू नीट मांडली नाही/ किंवा पक्ष हजरच राहिला नाही तर न्याय त्याच्या बाजूला असूनही कोर्टाचा निर्णय त्याच्या बाजूने लागेलच याची शाश्वती नसते. याचा अर्थ कोर्टाला काही कळत नाही असा नसून, न्यायव्यवस्था अशी आहे, एवढाच होतो.

असो. कोर्टाच्या या निर्णयावर, आणि त्यावरच्या आपल्या टिप्पणीवर माझे काहीच भाष्य नाही.

आळश्यांचा राजा

चिंतातुर जंतू's picture

19 Jul 2010 - 11:32 pm | चिंतातुर जंतू

कोर्टाचा निर्णय केवळ कोर्टाच्या इंटरप्रिटेशनवर अवलंबून नसून पक्ष आपली बाजू कशी मांडतात यावरही अवलंबून असतो. भारतातील न्यायव्यवस्था इन्क्विझिटिव्ह नाहीये. एखाद्या पक्षाने आपली बाजू नीट मांडली नाही/ किंवा पक्ष हजरच राहिला नाही तर न्याय त्याच्या बाजूला असूनही कोर्टाचा निर्णय त्याच्या बाजूने लागेलच याची शाश्वती नसते.

हे अगदी बरोबर आहे. या निर्णयाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारला कदाचित काही युक्तिवाद नीट करता आला नसेलही. परंतु निर्णयात उद्धृत केलेल्या काही गोष्टी या कायद्याचा अर्थ काय आहे, हे समजावून सांगतात. वादी-प्रतिवादींनी कसा युक्तिवाद केला, यामुळे तो बदलत नाही. मी उल्लेख केलेले दोन मुद्दे हे असा कायद्याचा अर्थ सांगतातः

  1. ज्यांच्या भावना दुखावतील असा दावा आहे, तो गट हा समंजस, स्थिर मनाचा, कणखर व धैर्यशील असला तरीही त्याच्या भावना दुखावतील, हे सिध्द करता आलं पाहिजे.
  2. पुस्तकाचा परिणाम काय होईल, हे पाहाताना ज्या प्रकारचे लोक हे या पुस्तकाचे अपेक्षित वाचक आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे.

असो. न्यायालयाच्या निर्णयाचा दुवा सहज मिळत नाही आहे. इतर कुणाला सापडल्यास तो द्यावा.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

आळश्यांचा राजा's picture

20 Jul 2010 - 1:35 am | आळश्यांचा राजा

न्यायव्यवस्था, न्यायालय, आपले दंडविधान, त्यांच्यावर आपण दाखवलेला विश्वास, आदर इ. पाहून बोलावेसे वाटते. आपल्या सोयीनुसार आपल्याला (म्हणजे तुम्हालाच नाही, सर्वांनाच – मलाही) कधी दंडविधानाविषयी आणि न्यायव्यवस्थेविषयी आदर वाटतो तर कधी कायदा गाढव वाटतो, न्यायदेवता आंधळी वाटते. सगळ्याच गोष्टी इथे स्पष्टपणे बोलता येतील असे नाही. पण राजकीय विश्लेषण वापरण्यासाठी लावलेली बुद्धी इथे या न्यायालयीन लढाईबाबत लावलीत तर एक इंटरेस्टिंग कंजेक्चर (अर्थातच सुलभीकरण असलेले) असे दिसेल:

हे वादळ आत्ता का उठले? बंदी हटली म्हणून. बंदी हटली नसती तर आत्ताचे दंगे झाले नसते. राजकीय हितसंबंधांना आपली पोळी भाजून घेता आली नसती. अर्थात, बंदी हटणे हे राजकीय हितसंबंधांना हवेच होते. मग,
१. सुप्रीम कोर्टात जावा, असे अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाल्या लोकांना राजकीय नेतृत्त्वाने सांगीतले/ भरीला घातले किंवा
२. अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले जेन्युइनली, विदाउट एनी पॉलिटिकल इंटरेस्ट कोर्टात गेले. सरकारने तिथे आपली बाजू जाणीवपूर्वक समर्थपणे मांडली नाही. बंदी हटली. काम झाले. अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले खूष. राजकारणीही खूष.

हे असे झाले असेल असे म्हणायचा माझा हेतू नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की अशा शक्यता/ अंदाज/ विश्लेषण एण्डलेस आहेत. कायद्याचा कीसही जगाच्या अंतापर्यंत काढता येईल. आपल्या सदसदविवेकबुद्धीला काय वाटते हे सरतेशेवटी महत्त्वाचे ठरते. कायदा काय म्हणतो/ दंडविधान काय म्हणते, न्यायालय काय म्हणते या बाबी नंतर येतात. एक शहाणा समाज म्हणून आपली काय जबाबदारी आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या मुद्यावर आपण असहमत रहायचे मान्य केलेले आहेच.

आळश्यांचा राजा

चिंतातुर जंतू's picture

21 Jul 2010 - 12:27 am | चिंतातुर जंतू

शक्यता अनेक आहेतच, पण त्यांचा तर्काधार तपासून पाहावा, असं वाटतं.

१. सुप्रीम कोर्टात जावा, असे अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाल्या लोकांना राजकीय नेतृत्त्वाने सांगीतले/ भरीला घातले किंवा

ज्यांची हयात विविध राजकीय पक्षांना गैरसोयीचे चित्रपट बनवण्यात आणि नंतर त्यांचे विना-काटछाट प्रदर्शन व्हावे यासाठी म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या लढ्यासाठी गेली, ते आनंद पटवर्धन ही बंदीविरोधातली जनहित याचिका दाखल करणार्‍यांपैकी एक होते. अचानक राजकीय नेत्यांनी भरीला घातलं म्हणून त्यांना अभिव्यक्ती आणि तिचं स्वातंत्र्य यांचा पुळका आला, अशा शक्यतेला फारसा तर्काधार मिळत नाही.

२. अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले जेन्युइनली, विदाउट एनी पॉलिटिकल इंटरेस्ट कोर्टात गेले. सरकारने तिथे आपली बाजू जाणीवपूर्वक समर्थपणे मांडली नाही. बंदी हटली. काम झाले. अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले खूष. राजकारणीही खूष.

राजकारण्यांना खर्‍या लाभाची आशा जेव्हा अशा गोष्टी निवडणूक आसपास असताना घडतात, तेव्हा असते. भांडारकर संस्थेवरचा हल्ला तसाच झाला. मिरजेची घडवून आणलेली दंगल हे अगदी ताजं उदाहरण आहे. शिवाय कोर्टाचा निकाल नक्की कधी लागेल, हे सांगणं अवघड आहे. त्यामुळे आता राजकारणी फार तर वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत, असं म्हणणं जास्त तर्काधारित वाटतं.

आपल्या सदसदविवेकबुद्धीला काय वाटते हे सरतेशेवटी महत्त्वाचे ठरते. कायदा काय म्हणतो/ दंडविधान काय म्हणते, न्यायालय काय म्हणते या बाबी नंतर येतात.

होय, पण माझी सदसदविवेकबुध्दी जे सांगते त्याला कायद्याचा वा तर्काचा आधार नाही असं जेव्हा मला दिसतं, तेव्हा सदसदविवेकबुध्दीला काही कठोर प्रश्न विचारावेत, असं मला वाटतं. कारण अखेर ती माझ्यासारख्या एका मूलतः स्खलनशील आणि विकारी मनुष्याच्या मनात निर्माण होते. त्यामुळे ती कधीकधी अज्ञानाधारित आणि (म्हणून अयोग्य) गोष्टी योग्य असल्याचं मला भासवते, असं मला जाणवतं. उदा: दीडशे वर्षांपूर्वी माझ्या पत्नीला शिकू देणं वा विधवा मुलीचा पुनर्विवाह करणं माझ्या सदसदविवेकबुध्दीला बहुतेक पटलं नसतं. त्यामुळे माझी सदसदविवेकबुध्दी ही माझा तरी अखेरचा खात्रीशीर आधार नाही.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

पांथस्थ's picture

21 Jul 2010 - 1:49 pm | पांथस्थ

हि एक वात्रटिका सापडली जेम्स लेन संदर्भात - पुन्हा जेम्स लेन

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

चिंतातुर जंतू's picture

22 Jul 2010 - 11:46 am | चिंतातुर जंतू

धागा इतर कुणाला दिसत नाही, पण मला दिसतो आहे. नवीन प्रतिसाद देता येतो आहे का, याची ही चाचणी.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

संपादक मंडळ's picture

23 Jul 2010 - 3:23 am | संपादक मंडळ

नमस्कार मिपाकरहो,

चिंतातुर जंतू यांचा हा उत्तम लेख त्यावर काही आक्षेपार्ह प्रतिसाद आल्याने आणि त्या प्रतिसादांचा त्रास मिसळपाव प्रशासनाला होऊ शकेल या शंकेतून काही काळ अप्रकाशित करण्यात आला होता. सध्या लेख प्रकाशित करून वाचनमात्र ठेवला आहे. लेखावरील आक्षेपार्ह प्रतिसाद एक एक करून अप्रकाशित केले जातील. तरीही असे प्रतिसाद राहील्यास सजग सदस्यांनी संपादकांना तसे कळवावे.

धन्यवाद,
संपादक मंडळ