..पाउस

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in जे न देखे रवी...
21 Jul 2010 - 1:09 pm

आलाय पाउस ...चिंब भिजून घे
तळहातावर थेंबांचा स्पर्श.......मनात साठवून घे..
थेंबांची सरसर,थेंबांचा नाद...कानामध्ये साठवून घे
पाउस आलाय ... भिजून घे

ओल्या ओल्या मातीचा गहिरा गंध....तुझा आहे
पानांचा ओला ओला हिरवा रंग.... तुझा आहे
चेहऱ्यावर पडणारा प्रत्येक थेंब.....तुझ्यासाठी आहे
आला आहे पाउस..भिजून घे

ढगांचही मन भरून आलय...... तुझ्यासारखं
मनातल्या मनात...त्याच गहिवरण समजून घे...
आला आहे पाउस...भिजून घे..

ओले कपडे..ओले केस...
ओला तळवा.... आणि ओल चिंब मन..
..बाकी सगळा पाउस तसाच अंगावर सुकव..
...पण मन तसाच ठेव...अगदी ओल चिंब...
...भिजलेल मन ... मनातला पाउस.... मनभर साठवून घे...
....... आला आहे पाउस ...भिजून घे...

शांतरसकविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

21 Jul 2010 - 1:10 pm | अवलिया

कुठे आहे पाउस? आम्ही वाट पाहात आहोत..

विठ्ठला! धाड रे पाउस लवकर... !!

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jul 2010 - 1:24 pm | llपुण्याचे पेशवेll

नानाशी सहमत आहे.
अष्टपाद बाबांनी पावसाला शिव्या दिल्या पासून पावसाने महाराष्ट्रात येणे बंद केले आहे त्याबद्दल त्यांचा निषेध..
बाकी अस्सल कोल्हापुरी कुठे चाल्ले आहेत?

पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

21 Jul 2010 - 3:25 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

...अहो ते नाव आहे हो माझ!
......माझ्या नावाची अशी तौहीन?..... X(

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jul 2010 - 7:23 pm | llपुण्याचे पेशवेll

ओह्हो असं होय.
;)
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

फ्रॅक्चर बंड्या's picture

21 Jul 2010 - 2:20 pm | फ्रॅक्चर बंड्या

...भिजलेल मन ... मनातला पाउस.... मनभर साठवून घे...
....... आला आहे पाउस ...भिजून घे...

छान आहे कविता...

पण पाउस कुठे आहे ... :''(
binarybandya™

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

21 Jul 2010 - 3:33 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

....अहो काय्....भारतात राहुन विचारता कि पाउस्स कुठे?...
म्हणुनच मनभर साठ्वुन घ्यायचा असतो.....माग्च्या वर्षी साठवला होतात का?..नाहि ना?....म्हणुनच!...
या वर्षी पण वाया घालवला ना!
....पुढ्ल्या वर्षी लक्षात ठेवा...! 8>

फ्रॅक्चर बंड्या's picture

21 Jul 2010 - 7:24 pm | फ्रॅक्चर बंड्या

दरवर्षीचा पाउस नवा असतो ...
असे काही साठवुन वगैरे ठेवायचे नसते ...

----
दरवर्षी नवा पाउस ,जमले तर नवी मैत्रीण....
binarybandya™

स्वछंदी-पाखरु's picture

21 Jul 2010 - 2:46 pm | स्वछंदी-पाखरु

कविता उत्क्रू ष्ट आहे... छान मन येवढ्या तळपत्या उन्हात पण अगदी ओल चिंब झाल.....

विडंबन....

आलाय पाउस ...कांदा भजी तळुन दे.....
कढई तापली आहे....कांदा भजी तळुन दे.....
तळतांनाच सरसर नाद.....कानामध्ये साठवून घे
आलाय पाउस ...कांदा भजी तळुन दे.....

गरमा गरम बटाटे वड्याचा गहिरा गंध....तुझा आहे
पुदीन्याच्या चटणीचा ओला ओला हिरवा रंग.... तुझा आहे
तोंडात जाणारा प्रत्येक घास.....तुझ्यासाठी आहे
आलाय पाउस ...बटाटे वडा तळुन दे.....

ढगांचही पोट रीकाम झालय...... तुझ्यासारखं
मनातल्या मनात...त्याच हादडण समजून घे...
आलाय पाउस ...हीरवी मिर्ची तळुन दे.....

गरमा गरम कांदा भजी.....गरमा गरम बटाटे वडे
..बाकी सगळ्यांच्या वाट्यातल पण तूच संपव..
...पण पोट तसच ठेव...अगदी भूकेल...
...भुकेल पोट ... अत्रुप्त जीभ.... मग पोटभर हादडुन घे...
....... आला आहे पाउस ...मिसळ-पाव बनवून दे...

जागु's picture

21 Jul 2010 - 2:46 pm | जागु

मस्त.

स्पंदना's picture

21 Jul 2010 - 6:54 pm | स्पंदना

कविता चांगली आहे.

विडंबन चवदार आहे.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

पाषाणभेद's picture

21 Jul 2010 - 7:17 pm | पाषाणभेद

छान पाऊस पाडलाय!
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

आनंदयात्री's picture

21 Jul 2010 - 11:47 pm | आनंदयात्री

छान आहे कविता.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !