नविन कथासंग्रह

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
21 Jul 2010 - 9:41 am

मंडळीनमस्कार,

हल्लीमिसळपावचा साहित्य क्षेत्रात उमटलेला ठसा जसा प्राजुच्या कविता संग्रहान रेखीव झाला तसाच आणखी एक ठसा उमटला आहे आपल्या सहप्रवासी अरुण मनोहरांच्या कथा संग्रहाचा!! या बद्दल माहिती मिळाली.
अरुण मनोहर हे थोडस लांबुन पाहिलेल व्यक्तिमत्व. एकतर वयान ते जेष्ठ!! आणि सर्व कार्यक्रमात त्यांचा असलेला पुढाकार!

सिंगापुरच्या मराठी साहित्यिक क्षेत्रात, अरुण मनोहर हे नाव माहित नसलेली व्यक्ती विरळच! अतिशय परिश्रम पूर्वक उभारलेल्या 'शब्दगंध ' या कवितेला वाहिलेल्या उपक्रमाच्या पाच स्तंभांपैकी अरुण मनोहर हे एक! सिंगापुरातील हा उपक्रम पाच वर्षांहून अधीक काळ दर महिन्याला सुरू आहे.

नावाप्रमाणे अतिशय 'मनोहर' हसत मुख असं हे व्यक्तिमत्व! मुळचे नागपूरकर! तिथेच अभियांत्रिकी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी कामानिमित्य रहाण्याची संधी यांना मिळाली. अमेरिका, फ़्रान्स, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, हॉन्गकॉन्ग, जपान, ईंडोनेशिया, फ़िलीपाईन्स, कोरिया, आणि सिंगापूर इतक्या ठिकाणी वैविध्यपूर्ण संस्कृतींच्या सहवासातल वास्तव्य या कवी मनाच्या व्यक्तिमत्वावर उमटलं नसेल तरच नवल!! ते गेली दहा वर्षे मेट्रो रेलच्या संगणकी नियंत्रणाच्या विविध प्रकल्पांवर कार्यरत आहेत. १९८२ पासून पत्नी- चित्रा आणि दोन मुलांसह सिंगापूर मधेच स्थायीक! पण मुळची मराठी साहित्याची आवड अन मराठी मातीची नाळ कायम राखत ते अविरत महाराष्ट्र मंडळ अथवा शब्दगंध अशा विविध कार्यक्रमात कुटुंबासहित कार्यरत असतात. मिसळपाव व्यतिरिक्त त्यांच लिखाण दिवाळी अंक, नियतकालिके आणि इतर मराठी संस्थळांवर सुद्धा प्रकाशित झाल आहे. ithe

त्यांचापहिला कथा संग्रह, "रोजाक – एक गोपाळकाला", पुण्याच्या नंदिनी पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रकाशित झाला आहे. १८ जुलाईच्या शब्दगंध कार्यक्रमात सिद्धहस्त लेखिका विद्युल्लेखा अकलुजकर ह्यांचे हस्ते उद्घाटन झालं. ithe

भारताच्या बाहेर राहून आलेले वैविध्यपूर्ण अनुभव त्यांनी या संग्रहात कथा रूपाने एकत्रित मांडलेले आहेत.

ithe

त्यांच्याच शब्दात सांगायचं तर," ह्या कथासंग्रहात मी बनवलेली सिंगापूरी मिसळ चोखंदळ वाचकांना चाखायला दिली आहे. वेगवेगळ्या चवींच्या १६ कथांचा हा "रोजाक" संग्रह आहे. सिंगापुरात "रोजाक" ही स्नॅकी डीश मिळते. गुणधर्माने ती आपल्या भेळ-मिसळला खूप जवळची आहे. माझ्या ह्या रोजाकमधे थोडा चायनीज व्हीनीगरचा शिपका, भारतातील तिखटागोडाची मिसळ, आणि कोरीयातील किमची देखील घातली आहे. जोडीला भविष्यकाळातले काही अफ़लातून फ़ुटाणे मिसळले आहेत. हे "रोजाक" किंवा गोपाळकाला रसिकांना आवडेल अशी आशा करतो."
एका

'मिसळपाव'करानी उमटवलेल्या या साहित्य क्षेत्रातला ठश्यानं आपला आनंद द्विगुणीत केल्या बद्दल ' अरुण मनोहर' यांचे हार्दिक अभिनंदन.

साहित्यिकअभिनंदन

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

21 Jul 2010 - 9:48 am | विंजिनेर

अरे वा! अरुणकाका अभिनंदन!

सहज's picture

21 Jul 2010 - 10:05 am | सहज

अरे वा! अरुणकाका अभिनंदन!

प्रभो's picture

21 Jul 2010 - 6:55 pm | प्रभो

अरे वा! अरुणकाका अभिनंदन!

स्पंदना's picture

21 Jul 2010 - 9:56 am | स्पंदना

फोटोज सरळ येत नाही आहेत.
मधला फोटो असा का दिसतो कोणास ठाउक!

वरती मला जिथुन माहिती मिळाली ती ' इसकाळ' ची
http://www.esakal.com/esakal/20100719/4633069621499852770.htm ही लिंक पण दिसत नाही आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2010 - 10:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फोटोज सरळ येत नाही आहेत.
मधला फोटो असा का दिसतो कोणास ठाउक!

फोटो डकवताना उंची आणि रुंदीपैकी एकच काहीतरी द्या, नाहीतर फोटोची ओढाताण होण्याची शक्यता जास्त आहे.

इसकाळची लिंक उघडायला अनेक वर्ष लागतात, पुस्तकाच्या नव्या आवृत्तीला नक्की उघडेल ही लिंक!

अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2010 - 10:38 am | परिकथेतील राजकुमार

अरुणकाकांचे अभिनंदन!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

Dhananjay Borgaonkar's picture

21 Jul 2010 - 11:06 am | Dhananjay Borgaonkar

हार्दिक अभिनंदन अरुणकाका :)

स्मिता_१३'s picture

21 Jul 2010 - 11:17 am | स्मिता_१३

स्मिता

स्वाती दिनेश's picture

21 Jul 2010 - 11:37 am | स्वाती दिनेश

अरुण मनोहर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
स्वाती

अवलिया's picture

21 Jul 2010 - 12:26 pm | अवलिया

अभिनंदन

=D>

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

समंजस's picture

21 Jul 2010 - 12:35 pm | समंजस

हार्दिक अभिनंदन =D>

पुष्करिणी's picture

21 Jul 2010 - 12:46 pm | पुष्करिणी

अरूणकाकांचे हार्दिक अभिनंदन

पुष्करिणी

मराठमोळा's picture

21 Jul 2010 - 12:53 pm | मराठमोळा

अरुण काकांचे अभिनंदन आणी अनेक शुभेच्छा! :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

पिंगू's picture

21 Jul 2010 - 1:10 pm | पिंगू

अरुण काकांचे हार्दिक अभिनंदन.... =D> =D> =D>

- पिंगू

घाटावरचे भट's picture

21 Jul 2010 - 1:16 pm | घाटावरचे भट

अरे वा, अभिनंदन!! :)

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 1:33 pm | यशोधरा

अभिनंदन!

गणपा's picture

21 Jul 2010 - 1:53 pm | गणपा

हार्दिक अभिनंदन!!!! :)

sneharani's picture

21 Jul 2010 - 2:44 pm | sneharani

हार्दिक अभिनंदन..!

जागु's picture

21 Jul 2010 - 3:50 pm | जागु

अरुणकाकांचे अभिनंदन.

स्वाती२'s picture

21 Jul 2010 - 3:57 pm | स्वाती२

हार्दिक अभिनंदन!

अरुण मनोहर's picture

21 Jul 2010 - 4:13 pm | अरुण मनोहर

अपर्णा अक्षय ह्यांचे ह्या लेखासाठी आणि सर्व हितचितकांनी व्यक्त केलेल्या भावनांसाठी खूप खूप धन्यवाद.

पाषाणभेद's picture

21 Jul 2010 - 6:13 pm | पाषाणभेद

अभिनंदन हं काका. अजून खुप खुप लिहा.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

रामदास's picture

21 Jul 2010 - 6:24 pm | रामदास

हार्दिक अभिनंदन..!

श्रीयुत संतोष जोशी's picture

21 Jul 2010 - 8:04 pm | श्रीयुत संतोष जोशी

मनापासून अभिनंदन =D>

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

टिउ's picture

21 Jul 2010 - 8:13 pm | टिउ

अभिनंदन!

रेवती's picture

21 Jul 2010 - 8:16 pm | रेवती

अभिनंदन!
छान बातमी!
मला वाटतं इ सकाळच्या पैलतिरात आलिये!

रेवती

अरुंधती's picture

21 Jul 2010 - 10:05 pm | अरुंधती

हार्दिक अभिनंदन!!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jul 2010 - 11:24 pm | बिपिन कार्यकर्ते

हार्दिक अभिनंदन!!!

बिपिन कार्यकर्ते