१२ राशींमधला प्रवास

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
20 Jul 2010 - 9:03 pm

जवळ्जवळ एक तप झालं असेल भारतात एक खूप मस्त राशींवरचं पुस्तक वाचलं होतं. ज्यात जीवात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो ते सविस्तर सांगीतलं होतं. आणि एका धाग्यात तो प्रवास सुंदर रीतीने ओवून दाखवला होता. जितकं आठवेल तितकं आणि तर्कशुद्ध इथे मांडायचा प्रयत्न करते.

मेष राशीत जीवात्मा नुकताच जन्मास आलेलं अर्भक असतो. स्वयंकेंद्रीत आणि मी म्हणेन तसच व्हावं अशी अपेक्षा असणारा. मनाविरुद्ध झाल्यास सगळं घर डोक्यावर घेणारा.
वृषभ राशीत तो ज्याला इंग्रजीत "टॉडलर" म्हणतात तसा होतो. या बाळाला प्रत्येक रंग , रूप, रस, गंध याचं आकर्षण वाटतं. प्रत्येक गोष्ट हातात घेऊन चाखून पहाणे , हाताळणे तिचा आनंद घेणे.
मिथुन राशीत जीवात्म्याची ओळख पहील्यांदा पुस्तकांशी, शब्दांशी होते. नाना प्राकारचे शब्दखेळ, कोट्या त्याला मोहवतात. अनेक लेखक या राशीवर सापडतात.
कर्क या राशीत बाळ थोडं अजून मोठं होतं. त्याला अवतीभवती कुटुंब आहे याची जाण पहील्यांदाच येते. कौटुंबीक जिव्हाळा कळू लागतो. या राशीवरचे स्त्री-पुरुष अतोनात कुटुंबवत्सल असतात खरे.
सिंह ही रास म्हणजे पौगंडावस्था. सारखं आरशापुढे रममाण होण्याची वृत्ती.
कन्या पहील्यांदा बाहेरच्या जगाची चाहूल लागते आणि कुणासाठी तरी काहीतरी करावं , मदत, सेवा करावी असं जीवात्म्यास वाटू लागतं.
तूळ १८० अंशातून राशीचक्र फिरलं आणि स्वकेंद्रीत जीवात्मा प्रथमच बहीर्मुख झाला. त्याला जोडीदाराची निकड भासू लागली. लग्न, सोशल सर्कल (मित्र परीवार) ही अनुभवसंपन्नता या राशीत तो अनुभवतो.
वृश्चिक विवाहोपरांत कामपूर्ती, अधिक गूढ गोष्टींकडे कल आदि चा अनुभव या राशीत येतो
धनु धर्म, धार्मीकता, पर्यटन, देशाटन आदिची आवड जीवात्म्यास निर्माण होते. थोडं मी, माझं कुटुंब या पलीकडे जाणार्‍या या शेवटच्या ४ वैश्वीक राशी
मकर बरचसं वैराग्यं
कुंभ देशाटन उपरान्त लोकसंग्रह, लोकोपयोगी कार्य हे जीवात्म्याकडून होतं
मीन मोक्ष, अंत, सर्व राशींचे गुण पहावयास मिळतात.

राशीआस्वाद

प्रतिक्रिया

अभिषेक पटवर्धन's picture

20 Jul 2010 - 9:21 pm | अभिषेक पटवर्धन

आता या राशी चंद्रराशी आहेत कि सौरराशी आहेत?
तसही राशी भविष्य हे सौरराशीचं आहे की चंद्रराशीचं हे कसं ओळखायचं? म्हणजे पेपरात येतात किंवा टीव्हीवर दाखवतात त्यातली माझी रास नक्की कोणती हे कसं कळेल?

क्रेमर's picture

21 Jul 2010 - 6:14 pm | क्रेमर

ज्यात जीवात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो ते सविस्तर सांगीतलं होतं.

शुचितै, आयड्यात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो यावरही काही लिहिता येईल का?

-क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.

चतुरंग's picture

21 Jul 2010 - 6:18 pm | चतुरंग

'||विकास||' जिथे ह्या काड्या संपतात तिथे आयड्यात्म्याचा 'विकास' सुरु होतो! ;)
(संबंधितांनी ह.घे.)

(अविकसित)चतुरंग

क्रेमर's picture

21 Jul 2010 - 6:26 pm | क्रेमर

गोठलेल्या अवस्थेत आयड्यांना काड्यांची गरज पडत नाही. ;)

-क्रेमर (गोठलेला अक्षय पुर्णपात्रे ((गोठलेला कर्क))
_________________
बाकी चालू द्या.

अवलिया's picture

21 Jul 2010 - 6:29 pm | अवलिया

गोठलेला आणि गोठवलेला यात फरक असावा.

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jul 2010 - 6:36 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. परंतु जुन्या मित्रांचे सय असे करवीत असावेत.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

क्रेमर's picture

21 Jul 2010 - 6:45 pm | क्रेमर

गोठलेला गोटातला असतो. इतरांना गाठता गाठता ज्याला गाठले जाते तो गोठवलेला. :)

-क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.

आमोद शिंदे's picture

21 Jul 2010 - 7:00 pm | आमोद शिंदे

क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))

सदस्य नाव कसे बदलायचे? मलाही काहीतरी भन्नाट घ्यावेसे वाटत आहे :)

क्रेमर's picture

21 Jul 2010 - 8:03 pm | क्रेमर

कर्क, अक्षय पुर्णपात्रे, क्रेमर ही एकाच सदस्याची (खात्याची) बदललेली सदस्यनामे नाहीत. ही एकाच व्यक्तिने तीन वेगवेगळी सदस्यत्वे घेऊन (खाती उघडून) घेतलेली नावे आहेत.

एकाच खात्यावर सदस्यनाम बदलायचे असल्यास श्री नीलकांत यांना कळवावे. (अशा प्रकारे नाव बदलल्याचे आठवणारे उदाहरण : पुर्वीचे सदस्यनाम 'खराटा', आताचे सदस्यनाम 'नितीन थत्ते')

-क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.

शेखर's picture

21 Jul 2010 - 6:54 pm | शेखर

पाध्यांच्या राशीला लागलेला गोठवलेला असतो असे वाटते.

Nile's picture

22 Jul 2010 - 2:43 am | Nile

हॅ हॅ हॅ, की पाध्ये ज्याच्या राशीला लागतात तो गोठवलेला होतो?

-Nile

रेवती's picture

20 Jul 2010 - 9:26 pm | रेवती

सिंह ही रास म्हणजे पौगंडावस्था. सारखं आरशापुढे रममाण होण्याची वृत्ती.
हा हा हा! माझ्या मुलाची रास!
आत्तातरी मजेशीर वाटतय वाचायला!

रेवती

हर्षद आनंदी's picture

20 Jul 2010 - 9:32 pm | हर्षद आनंदी

मकर राहिली की? तीचे काय

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

शुचि's picture

20 Jul 2010 - 9:38 pm | शुचि

=)) मकर म्हणजे खरं म्हणजे करीअर. ते माहीत नाही आता कसं बसवायच? :(

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पुष्करिणी's picture

20 Jul 2010 - 10:35 pm | पुष्करिणी

ज्यांची मीन रास आहे त्यांनाच मोक्ष मिळणार म्हणजे...अरेरे मला उगीचच फार आशा होत्या

इथून तिथून मिथून
पुष्करिणी

कवितानागेश's picture

21 Jul 2010 - 12:42 am | कवितानागेश

पुष्करिणी,
अहो, मिथून राशीच्या लोकाना सग्गळे शॉर्ट्कट्स शोधून काढता येतात! ;;)
आपण मोक्षाचापण शोधू!
============
( मिथून) माउ :))

मुक्तसुनीत's picture

21 Jul 2010 - 12:50 am | मुक्तसुनीत

क्रेमरच्या भाषेत , "चालू द्या !" :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2010 - 12:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

साफ असहमत!

बंद करा असला भोंगळपणा! स्वतःचं काम नाहीच, वर बारा वर्षांपूर्वी वाचलेलं पुस्तक, त्यातलं आठवतंय तेवढं लिहीलेलं, आणि ते पण काय तर जगाच्या लोकसंख्येला बारा गटांमधे विभागून, प्रत्येक गटातल्या प्रत्येक "जीवात्म्या"*चा प्रवास कसा हे दोन शब्द ते दोन ओळी एवढ्यात लिहून झालं?

या असल्या धाग्यांसाठी "बाबागिरी", "भोंदूगिरी" किंवा "पेज थ्री गॉसिप" नावाचा नवीन सेक्शन मिपात तयार करावा आणि आमच्यासारख्यांना तो अजिबात दिसणार नाही, अशी निवड करता यावी, अशी नम्र सूचना.

अदिती

*ही जीवात्मा काय भानगड आहे? आणि त्याचा प्रवास म्हणजे नक्की कुठून कुठे होतो??

Nile's picture

21 Jul 2010 - 12:57 pm | Nile

सहमत. असले अंधश्रद्धाळु धागे काढण्याचे प्रयोजन काय? वर ते 'तर्कशुद्ध' असल्याचा दावा काय? काहीही सुरु आहे.

-Nile

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2010 - 1:04 pm | परिकथेतील राजकुमार

या असल्या धाग्यांसाठी "बाबागिरी", "भोंदूगिरी" किंवा "पेज थ्री गॉसिप" नावाचा नवीन सेक्शन मिपात तयार करावा आणि आमच्यासारख्यांना तो अजिबात दिसणार नाही, अशी निवड करता यावी, अशी नम्र सूचना.

विज्ञान विशारदा अदितीजी ह्या देवावर-भविष्यावर वगैरे विश्वास ठेवणार्‍या नसल्या तरी त्यांच्या विषयी आदर आहे. मात्र त्यांनी ह्या प्रकारांना भोंदूगिरी वगैरे म्हणुन आमच्या श्रद्धेला ठेच लागु देउ नये अशी त्यांना विनंती आहे. आमची श्रद्धा आहे, आम्ही वाचणार आणि बोध घेणार.

अदिती ह्यांना अशी विधाने पुन्हा न करण्याबद्दल तंबी देण्यात यावी अशी संपादक मंडळाकडे नम्र विनंती आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2010 - 1:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओ परा, तुमची नक्की कशावर श्रद्धा आहे ते आधी विषद करा.

ते जीवात्मा म्हणजे काय, त्याचा प्रवास म्हणजे काय हे मला कळलेलं नाही, मी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोणत्यातरी पुस्तकात काहीतरी लिहीलं होतं, ते कोणालातरी बारा वर्षांनंतर आठवतं तसं ती आयडी 'तर्कशुद्ध' लिहीत आहे यावर तुमची श्रद्धा आहे का? या "कोणत्यातरी", "काहीतरी", "सुंदर" असल्या अधांतरी प्रकाराला माझा सगळ्यात पहिले विरोध आहे; तो तुम्हाला नीट समजला आहे का हरीकथेतील फेडपकुमार?

अदिती

अवलिया's picture

21 Jul 2010 - 1:14 pm | अवलिया

पराची श्रद्धा कशावर ते माहित नाही.. पण काल संध्याकाळी डेक्कन ला श्रद्धा नावाच्या मुली बरोबर फिरत होता असे राजेने सांगितले असं पुपे म्हणत होता हे सहजरावांनी व्यनीतुन कळवलं

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2010 - 1:25 pm | परिकथेतील राजकुमार

ओ परा, तुमची नक्की कशावर श्रद्धा आहे ते आधी विषद करा.

जगातील सर्वच सुंदर-पवित्र गोष्टींवर माझी श्रद्धा आहे.

ते जीवात्मा म्हणजे काय, त्याचा प्रवास म्हणजे काय हे मला कळलेलं नाही, मी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोणत्यातरी पुस्तकात काहीतरी लिहीलं होतं, ते कोणालातरी बारा वर्षांनंतर आठवतं तसं ती आयडी 'तर्कशुद्ध' लिहीत आहे यावर तुमची श्रद्धा आहे का? या "कोणत्यातरी", "काहीतरी", "सुंदर" असल्या अधांतरी प्रकाराला माझा सगळ्यात पहिले विरोध आहे; तो तुम्हाला नीट समजला आहे का हरीकथेतील फेडपकुमार?

विरोध आहे हे समजले. आपल्या मताचा देखील आदरच आहे. पण तुमचा विरोध आहे म्हणुन हे असले धागे काही लोकांना दिसू नयेत अथवा वेगळ्याच सदरात टाकावेत ह्या सुचनांना विरोध आहे.

उद्या एखाद्याला आवडत नाही म्हणुन धागेच टाकणे बंद व्हायला हवे अथवा दुसर्‍या सदरात हलवले जावेत हे चूक आहे !

©º°¨¨°º© भक्त पराद ©º°¨¨°º©
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2010 - 1:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =))

'अच्रत-बव्लत'पणाचा कहर आहेस तू! आणि धागा ... सभ्यतेच्या मर्यादेत आणि मिपाच्या धोरणात बसेल अशा शब्दांतला विरोध आधीच प्रकट करून झालेला आहे.

अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jul 2010 - 6:07 pm | llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ. धागा न वाचण्याच्या आपल्या मूलभूत व्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर करून धागा उघडू नका. शिंपल. आमच्या सारख्या अशिक्षित लोकांना असले धागे वाचण्यात लई मजा येते.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

Nile's picture

21 Jul 2010 - 1:13 pm | Nile

ओ बोधकथेतील फेककुमार =))

तुम्ही काय बोध घेतला ते सांगा बरं जरा इथे. आम्हाला पण कळुद्या.

-Nile

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2010 - 1:27 pm | परिकथेतील राजकुमार

जीवात्म्याचा विकास कसा होतो त्याचा मला बोध झाला. पण आपण अतीशय बाळबोध असल्याने आपणाला तो होणार नाही ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

Nile's picture

21 Jul 2010 - 9:18 pm | Nile

जीवात्म्याचा विकास कसा होतो त्याचा मला बोध झाला.

जगातील सर्वच अच्रत बाव्लत गोष्टींवर माझे प्रेम आहे.

पण आपण अतीशय बाळबोध असल्याने आपणाला तो होणार नाही

विरोध का आहे हे समजले नाही. आपल्या मताचा देखील अजिबात आदर नाही. पण तुमचा विरोध नाही म्हणुन हे असले धागे काही लोकांना दिसावेत अथवा टाकता येतात म्हणुन कुठल्यातरी सदरात टाकावेत ह्या सुचनांना विरोध आहे.

उद्या एखाद्याला आवडतं म्हणुन सविता भाभीचे धागेच टाकणे सुरु व्हायला हवे अथवा ते दुसर्‍या सदरात हलवले जावेत हे चूक आहे ! (धागे म्हणजे काय मुखपृष्ठ वाटले काय तुम्हाला?)

-Nile

सहज's picture

21 Jul 2010 - 1:28 pm | सहज

हा धागा माझ्याच राशीला का आलाय म्हणणारी रास कुठली

आणी हा कंपू माझ्या राशीला आलाय म्हणणारी रास कुठली

हा बोध!

(बोधीसत्व) सहज

अवलिया's picture

21 Jul 2010 - 1:32 pm | अवलिया

साधु साधु....

पपु हभप व्यनीखरडखेचरसम्राट मादकपाचकवीर सहजराव यांचा विजय असो....

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

Nile's picture

21 Jul 2010 - 9:20 pm | Nile

धाग्याला रास असते का? म्हणजे ठराविक राशींचेच धागे उडतात म्हणुन विचारतोय.

बाकी गर्दीला चेहरा नसतो म्हणतात, तर मग कंपुला रास कशी?

सत्वद्वेष्टा
-Nile

प्रियाली's picture

21 Jul 2010 - 5:32 pm | प्रियाली

ही जीवात्मा काय भानगड आहे? आणि त्याचा प्रवास म्हणजे नक्की कुठून कुठे होतो??

ट्वायलाईट सिरिजमध्ये मानव आणि रक्तपिपासू यांचे मूल जन्माला आले आहे. जीवात्मा म्हणजे मानवी जीव + मानवी आत्मा (आमचे लाडके भूत) यांचे मूल असावे. कसें? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2010 - 5:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))

या जीवात्मांवर एक प्रायलाईट, आपलं प्रियाली-गोष्ट होऊन जाऊ देत!

अदिती

दिपाली पाटिल's picture

23 Jul 2010 - 11:09 am | दिपाली पाटिल

=)) =)) =)) भारी विश्लेषण....

दिपाली :)

शुचि's picture

21 Jul 2010 - 8:11 pm | शुचि

भोंगळपणा असेल तर "राशी" वगैरे वर्गवारी काढून टाका मिपावरून. वाचायचं तर वाचा नाही तर दुसरा धागा उघडा. फार वाटलं तर संपादक मंडळी धागा उडवू शकतात.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मुक्तसुनीत's picture

22 Jul 2010 - 2:14 am | मुक्तसुनीत

फार वाटलं तर संपादक मंडळी धागा उडवू शकतात.

थोडं वाटलं तर तुम्ही स्वतःच उडवता की नाहीतरी ! ;-)

आमोद शिंदे's picture

21 Jul 2010 - 6:49 pm | आमोद शिंदे

अदिती आणि परा दोघांच्याशी सहमत. लिखाण अंधश्रद्धा पसरवणारे आहे, पण ते न वाचायचा अधिकार आपल्याला आहेच.

शुचि's picture

21 Jul 2010 - 8:13 pm | शुचि

कशावरून अंधश्रद्धा आहे? अजून ज्योतीष हे शास्त्र आहे हे सिद्ध झालं नाहीये पण ते तसं होणारच नाही हे कशावरून?

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

आमोद शिंदे's picture

22 Jul 2010 - 3:09 am | आमोद शिंदे

तुमची अंधश्रद्धेची व्याख्या काय आहे?

अजून ज्योतीष हे शास्त्र आहे हे सिद्ध झालं नाहीये पण ते तसं होणारच नाही हे कशावरून?

झालं की म्हणू त्याला विज्ञान. तो पर्यंत काय?

प्रियाली's picture

21 Jul 2010 - 1:01 am | प्रियाली

<:P धागा कसा मऊ मऊ आहे.

<:P राशीचक्राला ब्रेक कोण मारणार बरे?

<:P आहे का कुणाकडे रिकामटेकडा वेळ, वरील मुद्दे खोडायला?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2010 - 10:32 am | परिकथेतील राजकुमार

मकर बरचसं वैराग्यं

वाचुन अगदी 'फेडअप' व्हायला झालय मला.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

पुष्करिणी's picture

21 Jul 2010 - 12:41 pm | पुष्करिणी

हरिकथेतील कीर्तनकार ...असा वगैरे घ्या आय्.डी. आता :)

पुष्करिणी

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2010 - 1:28 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

©º°¨¨°º© हरिकथेतील कीर्तनकुमार ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अनुप्रिया's picture

21 Jul 2010 - 12:55 pm | अनुप्रिया

+१

उद्यापासून सोनाली ऐवजी सन्याशी आयडी घेईन म्हणते =))
सोनाली

विजुभाऊ's picture

21 Jul 2010 - 11:25 am | विजुभाऊ

पुस्तकाचे नाव सांगाल का?
लिंडा गुडमनच्या "सन साईन्स" मध्ये अशी वर्णने आहेत .
ते पुस्तक इंग्रजी भाषेच्या सौंदर्यासाठी वाचावे इतकी सुंदर भाषा असते लिंडा गुडमनची.

अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे

जागु's picture

21 Jul 2010 - 12:45 pm | जागु

मकर वैराग्य 8>

महेश हतोळकर's picture

21 Jul 2010 - 1:30 pm | महेश हतोळकर

धर्म, धार्मीकता, पर्यटन, देशाटन आदिची आवड जीवात्म्यास निर्माण होते. थोडं मी, माझं कुटुंब या पलीकडे जाणार्‍या या शेवटच्या ४ वैश्वीक राशी

:O ~X( #o =)) :''(

विजुभाऊ's picture

21 Jul 2010 - 2:46 pm | विजुभाऊ

रा रा श्री आदरणीय प रा आणि ३_१४ यांच्याशी +१ सहमत
वरील चर्चा वाचून मला तुम्हा दोघांबद्दल आदर निर्मान झालाय

मुम्बैची गर्दीभरी लोकल हे सत्य असेल तर पुण्याची पी एम टी हा मोक्ष आहे....

इंटरनेटस्नेही's picture

21 Jul 2010 - 5:28 pm | इंटरनेटस्नेही

मेष राशी बद्दलचे सर्वच पटलं. चांगले लेखन.

--
(मेष)इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

वेताळ's picture

21 Jul 2010 - 5:39 pm | वेताळ

वृश्चिक विवाहोपरांत कामपूर्ती, अधिक गूढ गोष्टींकडे कल आदि चा अनुभव या राशीत येतो

म्हणजे ह्या राशीत जन्माला येणारे मुल लग्नाचीच वाट बघत बसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

वेताळ

वेदश्री's picture

21 Jul 2010 - 5:44 pm | वेदश्री

म्हणजे ह्या राशीत जन्माला येणारे मुल लग्नाचीच वाट बघत बसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

कोणाच्या लग्नाची याबद्दल कृपया खुलासा करावा! :D

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 5:49 pm | यशोधरा

=))

धमाल मुलगा's picture

21 Jul 2010 - 5:52 pm | धमाल मुलगा

=)) =))

>>म्हणजे ह्या राशीत जन्माला येणारे मुल लग्नाचीच वाट बघत बसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
नाय नाय..लग्न होईपर्यंत वाट बघत असते असे म्हणायचे असेल.

>>अधिक गूढ गोष्टींकडे कल आदि चा अनुभव या राशीत येतो
खरंय!
एकदा लग्न झालं की 'तिच्यायला! ह्यापेक्षा आणखी गुढ काय अस्णार? ' असा विचार प्रत्येकाच्या डोक्यात येत असणारच, पण वृश्चिक रास मात्र ते गुढ सोडवण्याच्या भानगडीत आणखी गुंतत जाते. ;)

@शुचि,
मजा आली. असेच आणखी मजेदार निरिक्षणं, राशींवरचं लेखन येऊ दे. :)

-(वृश्चिक) ध.

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jul 2010 - 6:20 pm | llपुण्याचे पेशवेll

नाय नाय..लग्न होईपर्यंत वाट बघत असते असे म्हणायचे असेल.
किंवा लग्नं होईपर्यंत वाट बघत नाहीत असं म्हणायचे असेल.
मजा आली. असेच आणखी मजेदार निरिक्षणं, राशींवरचं लेखन येऊ दे.
+१ . आपण लिखाणाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भरपूर वापर करा. ;) जोपर्यंत लिखाणाला पंख नाहीत तोवर ते उडणार नाही.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

रामदास's picture

21 Jul 2010 - 6:42 pm | रामदास

प्रकाटाआ.

अवलिया's picture

21 Jul 2010 - 6:09 pm | अवलिया

फारच छान... मजा आली / आला धागा आणि प्रतिसाद वाचुन.

येवु द्या अजुन असेच मस्त लेखन... :)

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

दिनेश's picture

21 Jul 2010 - 6:18 pm | दिनेश

वृषभ राशीतली पाखरे शोधा आता...कारण....वृषभ या बाळाला प्रत्येक रंग , रूप, रस, गंध याचं आकर्षण वाटतं. प्रत्येक गोष्ट हातात घेऊन चाखून पहाणे , हाताळणे तिचा आनंद घेणे.

लागा कामाला आता...

पुष्करिणी's picture

21 Jul 2010 - 6:23 pm | पुष्करिणी

तुम्ही कन्या राशीचे आहात का हो :)
पुष्करिणी

दिनेश's picture

21 Jul 2010 - 6:25 pm | दिनेश

बहुधा सगळ्याच राशींचा असावा मी..

पुष्करिणी's picture

21 Jul 2010 - 6:27 pm | पुष्करिणी

मोक्ष वाले मीन, अरे वा..:)

पुष्करिणी

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 6:26 pm | यशोधरा

बरं, कर्क आणि सिंह ह्या राज (ठाकरेंच्या नव्हेत, राजकारणीही नव्हे, तर राजेशाही) राशी आहेत असं मी वाचलं होतं, हे खरय का?

क्रेमर's picture

21 Jul 2010 - 6:31 pm | क्रेमर

बरं, कर्क आणि सिंह ह्या राज (ठाकरेंच्या नव्हेत, राजकारणीही नव्हे, तर राजेशाही) राशी आहेत असं मी वाचलं होतं, हे खरय का?

राज माहीत नाही पण कर्क या राशीचा खाजेशी संबंध असावा.

-क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या. खाज

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 6:33 pm | यशोधरा

ईक्स! :O
अवांतरः इतकी का म्हणे नावं बदललीत? तुमची रास मिथून का?

क्रेमर's picture

21 Jul 2010 - 6:42 pm | क्रेमर

इतकी का म्हणे नावं बदललीत?

स्टंटबाजी.

तुमची रास मिथून का?

मिथून नाही, वृषभ.

-क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.

शिल्पा ब's picture

21 Jul 2010 - 11:16 pm | शिल्पा ब

<<<मिथून नाही, वृषभ.

मग काय काय चाखून बघितलेत आत्तापर्यंत? ;)

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पुष्करिणी's picture

21 Jul 2010 - 6:33 pm | पुष्करिणी

सिंह असावी ( राशीस्वामी सूर्य , हेड ऑफ द डिपार्टमेंट )
कर्क नसावी ( राशीस्वामी चंद्र ).

पुष्करिणी

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 6:35 pm | यशोधरा

मनाचा कारक ना तो?

पुष्करिणी's picture

21 Jul 2010 - 6:38 pm | पुष्करिणी

म्हणूनच 'राज' नाही...

राजाला निर्णयक्षम / अ‍ॅथोरिटी असणं महत्वाचं, भावनाशील नाही

पुष्करिणी

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 6:40 pm | यशोधरा

हां त्ये हायेच म्हना..

राजेश घासकडवी's picture

21 Jul 2010 - 8:25 pm | राजेश घासकडवी

गेले काही दिवस आता जीवनात काही 'राम' राहिला नाही असं वाटतंय खरं...

राजकुमारसाहेबांच्या दुकानात वैराग्य मिळतं का थोडं?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2010 - 11:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:W बरं 'राम' राहिला नाहीये तर ...

मकर ही तुमची चांद्र रास का सौर रास?

अदिती

पुष्करिणी's picture

22 Jul 2010 - 2:06 am | पुष्करिणी

त्यांच्या जीवात्म्याचा विकास होउन ते आता कीर्तनकुमार झाले आहेत....
त्यामुळं आता त्यांच्या दुकानात जे काही आहे ते हवं असेल तर फुकट घेउन जाणे..

( पुणेरी दुकानदार आणि अ-पुणेरी गिर्‍हाइक एकाच राशीचे...:) )

पुष्करिणी

Nile's picture

22 Jul 2010 - 2:14 am | Nile

त्यांच्या जीवात्म्याचा विकास होउन ते आता कीर्तनकुमार झाले आहेत....

म्हणुनच परा मिपावर प्रवचनं लावुन बसतो असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

-Nile

पुष्करिणी's picture

22 Jul 2010 - 2:25 am | पुष्करिणी

आमच्या जीवात्मा इतका विकसित नसल्याने कीर्तनमुमार जे सांगतात ते प्रवचन आहे हे कळायला आम्हांला अजून बरेच जन्म घ्यावे लागतील...त्यामुळे काही माहित नाही.

पुष्करिणी

Nile's picture

22 Jul 2010 - 2:30 am | Nile

आयला असं आहे होय, जिवात्मा विकसीत झाला की शांती हरपते असे दिसतेय. मग पर्‍याच्या आत्माला शांती लाभो. ;)

-Nile

पुष्करिणी's picture

22 Jul 2010 - 2:37 am | पुष्करिणी

परा परा म्हणून त्यांच्या जीवत्म्याचं डिमोशन करू नका...:)

पुष्करिणी

Nile's picture

22 Jul 2010 - 2:38 am | Nile

जिवात्म्याचे डिमोशन करायला मि कोण सुखात्मे?

-Nile

अरुंधती's picture

21 Jul 2010 - 10:15 pm | अरुंधती

शुचि, त्या पुस्तकाचं नाव तरी सांगायचंस! :)
बाकी इथले प्रतिसाद वाचूनच बेहद्द करमणूक होत असते!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jul 2010 - 11:13 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी... मी मिथुन राशीचा... एकदम तंतोतंत लागू आहे.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

22 Jul 2010 - 1:34 am | चतुरंग

(मीन*)चतुरंग
* हा मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही अर्थाने! ;)

भाग्यश्री's picture

22 Jul 2010 - 2:22 am | भाग्यश्री

मी मकर.
सगळ्यांनी मकरेला वैराग्य वैराग्य म्हणूनच वैराग्य आणलंय! दुसरं काही बोल्तंच नाहीत.. :) (त्यातून माझ्या सन-मुन दोन्ही साईन्स मकर-कॅप्रिकॉर्न.. डब्बल वैराग्य! :) )

लिंडा गुडमनचे पुस्तक वाचून काही साधर्म्य सापडतंय का हे पाहणं हा एकेकाळी आवडता खेळ होता माझा. (नंतर पुस्तक हरवले..)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2010 - 11:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी पण मकर राशीची म्हणे! आता बरचसं वैराग्य आहेच, उरलेल्या भौतिक आवडींमुळे असल्या धाग्यांवर हात चालवायला मला फार मज्जा येते!

(धागा उडायचं आपलं भविष्य खोटं ठरलं रे पर्‍या!)

अदिती

अर्धवट's picture

22 Jul 2010 - 12:38 pm | अर्धवट

खूप सुंदर आणि अभ्यासपुर्ण लेख..

सगळे मुद्दे मला अगदी बरोबर लागु होतायत काही अपवाद* वगळुन

(काही अपवाद - वरुन दुसरी, चवथी, सहावी, आठवी, दहावी व बारावी रास आणि खालुन अकरावी, नउवी, सातवी, पाचवी, तीसरी, व पहिली रास.)

Dhananjay Borgaonkar's picture

22 Jul 2010 - 6:12 pm | Dhananjay Borgaonkar

माझ्या ओळखीत एक मुलगा आहे मकर राशीचा.
नुसता रोमीओगिरी करत भटकत असतो.

त्याला सांगतो आता..बा बा रे वैराग्य धारण कर..मकरेचा आहेस तू. =)) =)) =))

---------------
धनंजय बोरगांवकर