रसिक वाचकांनी आस्वाद घ्यावा अशी योजना!
------------
समुत्कर्ष बुक्स
चैत्रपालवी लायब्ररी योजना
ज्याप्रमाणे चैत्रात वृक्षांना नवी कोवळी पालवी फुटते व सारी सृष्टी आनंदाने मोहरुन जाते., त्याप्रमाणे आपल्याला ही साहित्यवृक्षावरची नवपालवी ….नव नवी पुस्तके आकर्षित करतात. आपल्याला पुस्तकांच्या विश्वातच रममाण व्हावेसे वाटते. आपल्यापर्यन्त अशी नव -नवीन पुस्तके पोचवीत व ते ही कमीत कमी खर्चात, यासाठी " समुत्कर्ष" आपल्यासाठी एक विशेष योजना घेऊन येत आहे.
य़ोजना:
१.आपण रु.१०० सभासद शुल्क भराल.
२. त्यासोबत रु. १००० डिपॊ्झीट भराल ( एक वर्षासाठी)
३. आपल्याला हवे असणारे नवे कोरे पुस्तक आपण घेऊन जाऊ शकता.
४.पुस्तक वाचून झाल्यावर आपल्याला ते पुस्तक परत करावेसे वाट्ल्यास आपण चांगल्या स्थितीत ३० दिवसाच्या आत परत करा.
५..आपल्या डिपॊ्झीट मधून पुस्तकाच्या किंमतीच्या ३० टक्के रक्कम वळती करु, उदा. रु. १०० चे पुस्तक परत केल्यास रु.३० आपल्या डिपॊ्झीट मधून कमी होऊन आपले रु.९७०/- शिल्लक राहतील. याप्रमाणे पुढील १ वर्षापर्यंत याच पद्धतीने चालू राहील.
किंवा
६. समजा, हे रु.१०० चे पुस्तक आपण विकत घेतलेत तर आपल्याला १५ % सवलत मिळेल. म्हणजेच रु.१००० मधून रु.८५/- वजा होतिल आणि रु.९१५/- शिल्लक राहतील
७.वर्ष संपण्याच्या आतच आपले रु.१०००/- संपले तर पुन्हा रु.५००/- भरुन पुढील पुस्तके वाचण्यासाठी अथवा विकत घेता येतील.
८. नवीन वर्षात पुन्हा रु.१०००/- भरुन नवीन सुरुवात करावी लागेल.
योजनेचे फायदे :
१. नव-नवीन पुस्तके हाताळायला मिळणार ..........२. ताजे विषय वाचायला मिळणार
३. पुस्तक वाचल्यावर परत करण्याची संधी अत्यंत अल्प किंमतीत. ४. पुस्तक विकत घेतल्यास १५% सवलत
५.वर्षाच्या शेवटी शिल्लक पैसे परत घेता येतील किंवा त्या किंमतीची पुस्तके घेता येतील किंवा पुढील वर्षात वापरता येतील.
संपर्क : श्री. अभय थिटे ९४२२३३१८६४ सौ. स्वाती क्षीरसागर ९८५०२८९७३०
समुत्कर्ष बुक्स, शोप न ७ , कलाकुंज -अपार्टमेंट , सहावी गल्ली, डहाणुकर कोलनी ,को्थरुड पुणे-२९
दूरध्वनी: ०२० २५४५०८२२
प्रतिक्रिया
18 Jul 2010 - 6:34 pm | यशोधरा
म्हणजे पुस्तक परत केलं तर ३०% कापणार, आणि तेच जर विकत घेतलं तर १५% मूळ किंमतीत सूट देणार का?
18 Jul 2010 - 6:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मलाही हाच प्रश्न आहे.
आणि पुस्तकं घरपोच मिळणार का?
अदिती
18 Jul 2010 - 6:44 pm | यशोधरा
घरपोच बहुतेक नसतील मिळणार. नियम ३ पहा.
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
18 Jul 2010 - 6:58 pm | विटेकर
आपण श्री. थिटे यांच्याशी बोलावे .. त्यांचे दुकान डहाणूकर मध्ये आहे.. अपवादात्मक परिस्थितीत पुस्तके घरपोच मिळ्ण्याची व्यवस्था होऊ श् केल ही! मूळात " वाचन चळ्वळ "वाढावी असा प्रयत्न आहे.. आणि घरपोच व्यवस्थेत अनेकानेक नवीन पुस्तके हातात घेऊन चाळण्याचा आनंद घेता येईल का? मर्यादा पडतील असे मला वाटते.
अनेकवेळा आपण ठरवलेले पुस्तक न घेता वेगेळेच पुस्तक घेऊन येतो नाही का?
-विटेकर
-------------
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
18 Jul 2010 - 7:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तराबद्दल धन्यवाद.
साधारण दुकानदारही पुस्तकांच्या छापील किंमतीवर १५% सूट देतात; डहाणूकर कॉलनी (माझ्या लेखीतरी) माझ्या रहाण्याच्या, काम करण्याच्या जागेपासून फार लांब असल्यामुळे हा प्रश्न विचारला.
अदिती
18 Jul 2010 - 6:48 pm | विटेकर
पुस्तक विकत घ्यायचे असेल तर १५% सवलत मिळेल .. म्हण्जे पुस्तकाच्या किंमतीच्या ८५% पैसे द्यावे लागतील आणि नुसतेच वाचून सुस्थितीत परत करायचे असेल तर फक्त ३०% द्यावे लागतील.
- विटेकर
-----------------
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
19 Jul 2010 - 2:09 pm | मृत्युन्जय
उपक्रम आणि उद्देश स्तुत्य आहे. परंतु योजना चांगली आहे असे मात्र म्हणवत नाही.
इथे तुम्ही १०० रुपयाच्या पुस्तकाचे उदाहरण दिले आहे.
आता कल्पना करा की तुम्ही शांताराम वाचायला नेले (वाचनालयात हे पुस्तक आहे असे मानुयात). रु. १००० चे पुस्तक. ते एखादा वाचनप्रेमी १० दिवसात वाचुन काढु शकतो. १० दिवसानी वाचुन झाले म्हणुन परत करायला गेलात की ३०० रुपये उडाले.
हेच जर मी इतर एखाद्या चांगल्या वाचनालयातुन आणले तर महिन्याची वर्गणी साधारण रुपये १०० असु शकेल. म्हणजे मी ३०० रुपयात ३ महिने पुस्तके वाचु शकेन. म्हणजे रुपये १००० ची साधारण ९ पुस्तके मी त्याच किमतीत वाचु शकेन.
म्हणजे योजना वाचनालय म्हणुन तरी किमान चांगली नाही.
आता पुस्तक खरेदीची सुविधा लक्षात घेउयात. सुट १५% मिळत आहे. इतर दुकानदार १००० रुपयाची पुस्तके घेतली तर असेही कदाचित २०% सुट देतील. (प्रदर्शनात याहुन जास्त मिळते त्यामुळे दुकानदार २०% देतील असे म्हणतो आहे). हा विचार करता पुस्तक खरेदी साठी सुद्धा हा पर्याय योग्य होत नाही.
19 Jul 2010 - 2:14 pm | यशोधरा
असेच काहीसे म्हणायचे आहे.
19 Jul 2010 - 2:14 pm | मितभाषी
असेच म्हणतो.
28 Jul 2010 - 4:57 pm | मितभाषी
काय झाले तुमच्या वाचक योजनेचे?
29 Jul 2010 - 9:39 am | प्रकाश घाटपांडे
निरंजन पाठक हे गृहस्थ इंद्रधनु वाचनालय व स्वागत मंगल केंद्र असा व्यवसाय चालवतात. त्यांचा पत्ता तारकेश्वर प्लाझा,सनसिटी रोड, निर्मल टाउनशिपजवळ (सुर्यनगरी मागे) आनंदनगर सिंहगड रोड, पुणे असा आहे. फोन नं २४३४५९८५ मोबाईल ९४२३५८४९७४
घरपोच पुस्तक मिळतात. १५ दिवसातुन एकदा घरी येउन नवीन पुस्तके देउन जुनी घेउन जातात. १५० रु डिपॉझिट व मासिक फी अंतरा नुसार. उदा. सिंहगड रोड असेल तर १५०, गावात २००, औंध बाणेर २५० ते ३००/- विमान नगर वगैरे ३५०/-
आपल्याला हवी असलेली पुस्तके अगोदर सांगितले कि घेउन येतात. अर्थात काही मर्यादा असणारच.
आमच्याकडे हेच गृहस्थ येतात. पुस्तकाच्या अंतरंगा विषयी त्यांना चांगली माहिती आहे. घरगुती संबंध प्रस्थापित झाल्यावर पाच च्या ऐवजी ८ ते १० पुस्तके देखील देतात. वाचनाच्या बाबतीत माझी बायको ही सखाराम गटणेची बहिण आहे. पुस्तकांचा फडशा पाडते.
आजच त्यांना विचारल कि पुस्तकाच्या किमती पहाता डिपॉझिट एवढे कमी कसे? ते म्हणतात या निमित्ताने लोक वाचतात हेच खुप झाले.
ग्रंथालयाचे जाचक नियम नको वाटतात. मला ग्रंथालय कथा आणि व्यथा आठवते.
29 Jul 2010 - 1:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
याच आठवड्यात मंगळवारी दुपारी चुकून ऑफिसच्या कँपसबाहेर जायची वेळ आली तेव्हा गेटपाशी 'रसिक'ची व्हॅन दिसली. चौकशी केल्यावर कळलं की हे रसिक दुकानाचं फिरतं ग्रंथालय आहे. डिपॉझिट नाही, महिना १५०/- वर्षाचे १५००/-, महिन्यातून एकदा ते घरी (किंवा ऑफिसात) येणार, एका वेळेस पाच पुस्तकं मिळणार. लग्गेच पैसे खर्चून आनंद कमावला.
साधारण २५% इंग्लिश पुस्तकं होती. त्यातली बरीचशी पुस्तकं 'माझ्या टाईप'ची नव्हती. मराठी पुस्तकांमधेही साधारण अर्धी पुस्तकं 'माझ्या टाईप'ची वाटली. तरीही एका पुस्तकासाठी ३० रुपये हा हिशोब मला सस्त्यातला वाटला.
ही योजना मुंबैतही आहे, पण वेळ कमी होता म्हणून मी जास्त चौकशी केली नाही.
29 Jul 2010 - 3:54 pm | सागर
तुम्हाला डि-मोटिव्हेट करायचे नाहिये पण रसिक ची योजना आर्थिकदृष्ट्या परवडणारी पण आहे आणि पुस्तकांचा साठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मार्केट मधे तुम्हाला योजना यशस्वी करायची असेल तर लोकांना इतर तगड्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तुम्ही जास्त काय देता यावरच यशापयश अवलंबून असते असे मला वाटते.
मी तरी पर्याय निवडायचा असेन तर रसिक चीच योजना निवडेल.
29 Jul 2010 - 9:52 am | अप्पा जोगळेकर
ही योजना म्हणजे लोकांना मामा बनवण्याचा अभिनव पुणेरी धंदा आहे. मृत्युंजय यांच्या प्रतिसादाशी सहमत. सहसा पुस्तकांवर सूट मिळतेच. आणि १५% हा काही फार आकर्षक आकडादेखील नाही. समजा मी महिन्याला एक या हिशोबाने पुस्तक वाचले आणि मला एकही आवडले नाही तर गेलोच की खड्ड्यात. शिवाय दर वर्षी १०० रुपयांचा मलिदा आहेच. त्यापेक्षा मी वाचनालयात जाउन वाचेन आणि जर आवडलेच तर जागोजाग लागतात त्या प्रदर्शनातून विकत घेईन.
अभिनव वाचनालय योजना ! ( पुण्यात फक्त )
हे बाकी आवडले. पुण्यातच असू देत.