मिसळाख्यान

शैलेश's picture
शैलेश in जे न देखे रवी...
2 Apr 2008 - 11:03 am

जय जय मिसळपावा । तूझी किर्ती अमर्यादा ।
गुणानुक्रम तुझे वर्णीता । विद्वज्जनही थकती ।। १ ।।
टोपीकरांचा* प्रभाव पडूनी । कैसे कैसे जन वर्तती ।
चिंताक्रांतले थोर ज्ञानी । अंतराळी सभेसी ।। २ ।।
इतालियन चायनीज भक्षती । नटमोग-या मालिका बघती ।
आणिक मिरवती फ्याशनी । तयांसी शहाणे करावे ।। ३ ।।
मजसी तेथ पाचारण करोनी । मिसळीचे गुण वर्णुनी ।
वेवस्थित काव्य रचोनी । मिसळपावी प्रकाशना सांगितले ।। ४ ।।
त्यांची आज्ञा शिरोधर । मी तो केवळ आज्ञाकार ।
कवितेचा गंधही ना ठाव । परि प्रयत्न करीतो ।। ५ ।।
अहो ही मिसळ अलौकिक । तेणे साधली ओवी मज ।
आणि श्रोते आपण विद्वान । म्हणूनी धारिष्ट्य करीतो ।। ६ ।।
अंतःकरण करावे कुशाग्र । धरावे मिसळीचे संधान ।
सेवावे आनंदात अमर्याद । मिसळाख्यान हे ।। ७ ।।
कथा आहे फार जुनी । म्हणा युगायुगांतरांची ।
आटपाट नगरी राज्य करी । त्रैलोक्याचा स्वामी ।। ८ ।।
रोज पंचपक्वांनांचे सेवन होते । शब्द झेलण्या सेवकांचे ताफे ।
पंचक्रोशीतील सर्व सुखे । हात जोडूनी होती ।। ९ ।।
परी त्या आनंदी कणभर न्यून होते । सदा गूढ खेद बोचत असे ।
काय करावे या मनाचे असे वाटे । राजा चिंतातूर जाहला ।। १० ।।
हळू हळू अन्नावरची वासना उडे । प्रकृती दिवसमासी क्षीण होतसे ।
राणी प्रधान प्रजाजन घाबरले । काय जाहले हो नृपतीसी ? ।। ११ ।।
देशोदेशींचे दूत आले । नानाविध डाग्तर वैद्य जाहले ।
औषध प्रार्थनांचा पाऊस पडलासे । परि गुण येई ना ।। १२ ।।
अखेर राजाने दवंडी पिटविली । जो दूर करेल खेदासी ।
उचीत सन्मान देऊनी तयासी । राजदरबारी घेईल ।। १३ ।।
सुवर्णाचे सहस्त्रविध होन । पांच नगरांची जहागीर ।
आणि मंत्र्यांसमवे बसायचा मान । देऊ करी ।। १४ ।।
ऐकोनी हे वर्तमान । चर्चा करीती समस्त जन ।
शल्य लाडक्या सम्राटाचे । कोण दूर करील ।। १५ ।।
वसुंधरेवर गडबड उडाली । आटपाट नगरी रिघ लागली ।
तांत्रिक, कुडमुड्या आणि वैदूंची । समालोचकही होते ।। १६ ।।
फेकतक, जीजीरे आणि कट्यार टिव्ही । बेसमय तसेच कार्टुनाग्रणी ।
गिधाडवाहने घेऊन वाहिनीकर निघाले । चला काही काम मिळाले ।। १७ ।।
अशाप्रकारे मिसळाख्यानाचे । प्रथम अध्यायाचे पान पहिले ।
येथेच समाप्त जाहले । आता भेटू विरामानंतरी ।। १८ ।।

टोपीकर = इंग्रज

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

2 Apr 2008 - 11:38 am | विजुभाऊ

फक्कड्.शेवटी समास राहीला..
!!जय जय मिसळवीर समर्थ.......!!

विसोबा खेचर's picture

2 Apr 2008 - 3:51 pm | विसोबा खेचर

अशाप्रकारे मिसळाख्यानाचे । प्रथम अध्यायाचे पान पहिले ।
येथेच समाप्त जाहले । आता भेटू विरामानंतरी ।। १८ ।।

मस्त! :)

विरामानंतरच्या आख्यानाची वाट पाहतो आहे...

तात्या.

सर्किट's picture

2 Apr 2008 - 10:09 pm | सर्किट (not verified)

वा शैलेश वा !!

मस्त !

- सर्किट

पुढच्या पानांच्या प्रतीक्षेत.

चतुरंग

बेसनलाडू's picture

2 Apr 2008 - 10:21 pm | बेसनलाडू

आख्यान आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू

प्राजु's picture

3 Apr 2008 - 12:02 am | प्राजु

म्हणते... आवडले आख्यान.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com