नमस्कार .मी हेमंत रायकर. व्यवसायानी प्रकाशक. आमचा हा व्यवसाय जयहिंद प्रकाशन -रायकर ब्रदर्स या नावानी प्रसिध्द आहे. आमचे वडील (कै) ग.का. रायकर यांनी हा व्यवसाय सुरु केला आणि नावारुपाला आणला. तो काळ मराठी साहीत्याचा -मराठी मासिकांचा -दिवाळी अंकांचा सुवर्णकाळ होता. श्री दीपलक्ष्मी आधी मासिक होते. सध्या श्री दीपलक्ष्मी हा दिवाळी अंक नियमीत स्वरुपात येतो. या व्यवसायाच्या निमीत्ताने माझ्याकडे उत्तमोत्तम साहीत्याचा खजीना उपलब्ध आहे. या खजीन्यातून काही निवडक लेख मिसळपावच्या वाचकांना द्यायचा मनसुबा आहे*. या मालीकेतला हा पहीला लेख जयवंत दळवींचा आहे.
ठणठणपाळाच्या खुसखुशीत लेखनाचा उत्तम नमुना .
श्रीदीपलक्ष्मीचे एक खास वैशिष्ठ्य म्हणजे रघुवीर मूळगावकरांची चित्रे. पुढल्या भागात त्यातली काही चित्रे तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.
*माझे मित्र आणि मिपा सदस्य श्री रामदास यांचे विशेष आभार.
प्रतिक्रिया
15 Jul 2010 - 8:45 pm | यशोधरा
हा अंक विकत मिळेल का?
15 Jul 2010 - 10:17 pm | पांथस्थ
इथे मिळेल - http://www.mimarathi.net/node/2898
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
15 Jul 2010 - 10:36 pm | श्रावण मोडक
टिपिकल दळवी लेखन!!!
16 Jul 2010 - 2:50 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त.. दळवींची शैली मस्तच. आणि ग.का. ही मोठा माणूस.
रायकर, तुमच्याकडे अक्षरशः खजिना असेल ना असल्या गोष्टींचा, आठवणींचा, फोटोंचा? येऊ द्या की राव मग सगळं?
बिपिन कार्यकर्ते
16 Jul 2010 - 3:43 pm | विसुनाना
जयवंत दळवींचा हा लेख इथे दिल्याबद्दल रायकरांचे (आणि रामदासांचे) आभार.
16 Jul 2010 - 4:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अनेक आभार ... रायकर आणि रामदासकाकांचेही!
(गद्य विडंबनात आपणच आद्य असल्याची खरड का प्रतिसाद आंतरजालावरच वाचल्याची आठवण झाली.)
अदिती
16 Jul 2010 - 4:10 pm | गणपा
धन्यवाद रायकर. मस्तच उपक्रम राबवताय तुम्ही.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत :)
16 Jul 2010 - 4:14 pm | मुक्तसुनीत
असेच म्हणतो.
अवांतर : हा लेख "परममित्र" मधेही समाविष्ट आहे काय ?
16 Jul 2010 - 4:43 pm | प्रदीप
तिथे हा वाचल्यासारखा वाटतो.
16 Jul 2010 - 4:25 pm | विंजिनेर
वा! वा! छान.
अजून एक मला आवडलेली गोष्ट म्हणजे, तुम्ही लेख टंकित स्वरूपात न टाकता छायाचित्र रूपात फ्लिकर वर चढवून टाकता आहात. उत्तम (पूर्व-प्रताधिकार असलेल्या)लेखाचा आनंद तर घेता येतो पण जाल-चोरांना यामुळे थोडा तरी आळा बसावा!
19 Jul 2010 - 7:23 pm | स्वाती दिनेश
मिपावर स्वागत आणि उपक्रम आवडला.
तुमच्या पोतडीत अनेक दुर्मिळ ,अनवट अनुभव असतील.. आम्हाला वाचायला आवडतील.
स्वाती