किती सुखाचे असेल

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
15 Jul 2010 - 5:23 pm

नवे नसे रे प्याद्याचेही वजीर होणे
कितीकदा पाहिले नृपाचे फकीर होणे

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?

तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!

असे तसे हे वेड नसे, भलतेच पिसे हे,
क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे

घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!

स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे,
किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

शांतरसगझल

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jul 2010 - 5:31 pm | परिकथेतील राजकुमार

स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे,
किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

मस्त ग तै !

आवडली एकदम कविता :)

वेडा फकीर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सागर's picture

15 Jul 2010 - 6:05 pm | सागर

क्रान्ति,

सुंदर कविता
समर्पक रुपके वापरली आहेत.

खास करुन
गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?

या कडव्यात तर तुम्ही प्राण ओतला आहे :)

येऊन द्यात अजून....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2010 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.....!

-दिलीप बिरुटे

श्रावण मोडक's picture

15 Jul 2010 - 6:09 pm | श्रावण मोडक

२, ६ विशेष उल्लेखनीय!

मीनल's picture

15 Jul 2010 - 7:07 pm | मीनल

सहमत
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

प्रभो's picture

15 Jul 2010 - 6:22 pm | प्रभो

आवडली!!

राजेश घासकडवी's picture

15 Jul 2010 - 6:35 pm | राजेश घासकडवी

दुर्दैवाने आज इतकंच म्हणता येतंय. एरवी तुमच्या कविता अप्रतिम असतात. विशेषतः ३ या कवितेत बसत नाही असं वाटलं.

स्पंदना's picture

15 Jul 2010 - 6:35 pm | स्पंदना

सुन्दर गझल.

=D> =D> =D> =D> =D>

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

घाटावरचे भट's picture

15 Jul 2010 - 6:39 pm | घाटावरचे भट

मस्तच कविता...

रेवती's picture

15 Jul 2010 - 7:18 pm | रेवती

तुझ्या कविता येण्याची वाट बघत असते.
ही कविताही छानच आहे.
गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?
हे ग्रेट!

रेवती

टुकुल's picture

15 Jul 2010 - 7:30 pm | टुकुल

जबरदस्त कविता/गझल.

--टुकुल

मनीषा's picture

15 Jul 2010 - 7:44 pm | मनीषा

घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!

खूपच छान !!

सुंदर आहे गझल .

निरन्जन वहालेकर's picture

16 Jul 2010 - 7:07 am | निरन्जन वहालेकर

अतिशय सुन्दर ! अप्रतिम ! !

अजय जोशी's picture

2 Aug 2010 - 8:38 pm | अजय जोशी

क्रांति,
फारच सुन्दर गझल. आजची सायंकाळ चांगली जाणार.
शुभेच्छा!

नगरीनिरंजन's picture

20 Aug 2010 - 8:27 am | नगरीनिरंजन

स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे,
किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

वा! व्वा!

राघव's picture

20 Aug 2010 - 10:07 am | राघव

नेहमी प्रमाणेच. :)

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?

तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!

क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे

घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!

............. हे खास!