आमचे गजाननबुवा..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
8 Jul 2010 - 10:15 pm

ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर गायकीचे दिग्गज पं गजाननबुवा जोशी..

डाँबिवलीचे पं गजाननबुवा जोशी..

"बुवा, आपल्या साठीच्या कार्यक्रमानिमित्ताने मला गायला मिळालं आणि माझं गाणं आपल्याला आवडलं हेच माझ्याकरता खूप आहे!" असे उद्गार खुद्द भीमण्णांनी ज्यांच्याबद्दल काढले ते गजाननबुवा..!

गजाननबुवा आणि त्यांच्या घरातून, उल्हासकाका - मधुबुवांसारख्या त्यांच्या शिष्य परिवारातून मला अगदी भरपूर, मनसोक्त गाणं मिळालं हे माझं भाग्य.. मी केव्हा त्या घरचा झालो, त्या विलक्षण गाण्याच्या प्रेमात पडलो हे कळलंच नाही..

सौ अपूर्वा गोखले.. म्हणजे गजाननबुवांची थोरली नात, म्हणजे आमच्या बच्चुभाईंची लेक. माझी चांगली मैत्रीण..तिनं आपल्या आजोबांची काही ध्वनिमुद्रणे येथे चढवली आहेत..

या धाग्याद्वारे आपल्याला विनंती इतकीच की आपण कृपया कधी वेळ मिळाल्यास सदर ध्वनिमुद्रणे अवश्य ऐकावीत.. त्या रागांबद्दल, गजाननबुवांच्या त्या गायकीबद्दल मीही कधी वेळ मिळाल्यास येथे मिपावर अवश्य लिहीन..

कळावे,

आपला नम्र,
(ग्वाल्हेर प्रेमी, गजाननबुवांच्या परंपरेचा प्रेमी) तात्या.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

वाटाड्या...'s picture

9 Jul 2010 - 11:13 am | वाटाड्या...

नक्की वाचीन / ऐकिन.

सध्या वेळ मिळत नाहीये. शक्य तितक्या लौकर प्रतिक्रिया देइनच.

- वा

अवलिया's picture

9 Jul 2010 - 11:34 am | अवलिया

छानच रे तात्या ! :)

>>>या धाग्याद्वारे आपल्याला विनंती इतकीच की आपण कृपया कधी वेळ मिळाल्यास सदर ध्वनिमुद्रणे अवश्य ऐकावीत..

मंडळी ऐकण्यात इतकी गुंतली आहेत की धाग्याला प्रतिसाद देवुन किमान दाद द्यावी हे पण भान राहिले नाही... (की कुठे गेले विद्वज्जन हा आमचा टाहो योग्यच म्हणायचा?)

अहाहा ! याला म्हणतात गायकी !! उगाच नाही भारतीय संगीत सर्व श्रेष्ट !!!

>>>त्या रागांबद्दल, गजाननबुवांच्या त्या गायकीबद्दल मीही कधी वेळ मिळाल्यास येथे मिपावर अवश्य लिहीन..

जरुर लिहावे अशी माझी वैयक्तिक विनंती आहे. या निमित्ताने माझ्यासारख्या अडाणी माणसाला दोन शब्द समजतात. :)

--अवलिया

विसोबा खेचर's picture

9 Jul 2010 - 11:52 am | विसोबा खेचर

की धाग्याला प्रतिसाद देवुन किमान दाद द्यावी हे पण भान राहिले नाही...

जाऊ द्या हो नानोबा.. हल्ली जमाना आहे महागायक/महागायिकेंचा, इन्डियन आयडॉल्सचा, त्यांनी मागितलेल्या मतांच्या जोगव्याचा, स्पर्धेत हारल्यानंतर त्यांच्या रुसव्याफुगव्यांचा-रडारडीचा आणि अवधुत गुप्तेंसारख्या थोर गुरुवर्यांचा!

बाबारे सारा 'चाबुक' जमाना आहे हल्ली! :)

चालायचंच रे नान्या..

आमच्या गजाननबुवांचं गाणं हल्लीच्या गाणार्‍यांइतकं थोर नसेल कदाचित! पण आम्हाला आपली तीच जुनीपुराणी साजूक तुपातली मिठाई आवडते आणि राहवत नाही म्हणून आम्ही खुळ्यासारखे तिच्यातील गोडवा इतरांनीही चाखावा म्हणून असले घागे काढत बसतो झालं! :)

अवलिया's picture

9 Jul 2010 - 12:17 pm | अवलिया

>>आम्हाला आपली तीच जुनीपुराणी साजूक तुपातली मिठाई आवडते आणि राहवत नाही म्हणून आम्ही खुळ्यासारखे तिच्यातील गोडवा इतरांनीही चाखावा म्हणून असले घागे काढत बसतो झालं!

आपण आपलं लिहित रहावं मनात येईल ते आणि तसंच.

--अवलिया

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jul 2010 - 1:44 pm | llपुण्याचे पेशवेll

आम्हाला आपली तीच जुनीपुराणी साजूक तुपातली मिठाई आवडते आणि राहवत नाही म्हणून आम्ही खुळ्यासारखे तिच्यातील गोडवा इतरांनीही चाखावा म्हणून असले घागे काढत बसतो झालं!
हम्म. आम्हालाही आवडते. मिठाई खिलवल्याबद्दल धन्यवाद तात्या..

खुद के साथ बातां: सध्या शनि मंगळ युती चालू आहे काय?

पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

मी ऋचा's picture

9 Jul 2010 - 12:29 pm | मी ऋचा

वेळ काढुन नक्की ऐकेन.

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

यशोधरा's picture

9 Jul 2010 - 12:57 pm | यशोधरा

इथे मिपावर "समृद्ध व्हावे.. " मधे दिलेली लिंक ऐकली. भारी! आता गजाननबुवांच्या नातीने चढवलेली ध्वनीमुद्रणे ऐकेन. दुवे दिल्याबद्दल धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

9 Jul 2010 - 1:28 pm | विसोबा खेचर

आता गजाननबुवांच्या नातीने चढवलेली ध्वनीमुद्रणे ऐकेन.

धन्यवाद.. :)

इथे मिपावर "समृद्ध व्हावे.. " मधे दिलेली लिंक ऐकली. भारी!

अहो गजाननबुवांची खास ठेवणीतली गायकी आहे ती.. विलंबित त्रितालात ती 'बरजो न माने..' बंदीश कशी रुबाबात, लयदार चालली आहे पाहा.. कसदार अस्थाई कशी भरावी ते इथं कळतं!

बंदिशीच्या बोलांचं काम पाहा.. तालालयीला घट्ट असलेले बोल कसे लयदार पडले आहेत ते सौंदर्य पाहा.. बसंत आणि बहार या दोन रागांचं बेमालूम ब्लेंडिंग पाहा.. त्यातली अ‍ॅस्थेटीकस् वाखाणण्याजोगी आहेत..!

तार सप्तकातल्या मध्यमापर्यंत लीलया फिरणारी आवाजाची, गायकीची फिरत पाहा. तिहायांचे अंदाज पाहा.. समेवर येण्यातली सहजसुंदरता पाहा..एकेक आवर्तन कसं निभावलं आहे ते पाहा..

तालासोबत लीलयापणे खेळणार्‍या तानांमधली बुद्धीप्रधानता पाहा..

'गुंदे लावो री मालनिया..' या द्रुत बंदिशीबद्दल तर काय बोलावं?! केवळ सुरेख..

यशोधराजी, आमचे गजाननबुवा म्हणजे साक्षात एक विद्यापिठ होतं!

गिरगावातल्या एका खत्रूड म्हातार्‍याच्या हातापायापडून त्यांच्याकडे असलेलं गजानबुवांचं एक स्पूल रेकॉर्डिंग ऐकवायची विनंती केली होती मी.. अखेर तो म्हातारा ते ध्वनिमुद्रण ऐकवायला तयार झाला एकदाचा..

त्या ध्ववनिमुद्रणात बुवा छायानट गायले होते.. खास ग्वाल्हेरचा राग..

उस्ताद अहमदजान तिरखवाखासाहेब होते साथीला.. मैफल तुफानच रंगली होती.. खासाहेबही जबरा रियाजी.. आड अंगाने वाजवत होते तरीही बुवा प्रत्येकवेळेस अलगद समेवर येत होते..

शेवटी तबला थांबवून मध्येव खासाहेब कौतुकाने बोलले होते,

"ये बम्मन बडा खतरनाक है!" :)

असो..

गाण्यात खूप काही शिकायचं आहे अजून.. शिकलेलं-सवरलेलं खूप काही लिहायचं आहे अजून..

अनेक मैफली रेंगाळताहेत डोळ्यापुढे, अनेक गाणी, अनेक बंदिशी कानात वाजताहेत!

तात्या.

शानबा५१२'s picture

9 Jul 2010 - 2:29 pm | शानबा५१२

एकले....तात्या तुम्ही महान आहात......आता मी हे का लिहल ते सांगितल तर तुम्हाला राग येइल.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Jul 2010 - 2:43 pm | बिपिन कार्यकर्ते

अजून एका थोर गायकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद तात्या. गाणे नक्की ऐकेन.

बिपिन कार्यकर्ते

प्रभो's picture

9 Jul 2010 - 6:49 pm | प्रभो

असेच म्हणतो.

sur_nair's picture

10 Jul 2010 - 8:35 am | sur_nair

अतिशय धन्यवाद

शानबा५१२'s picture

11 Jul 2010 - 12:16 am | शानबा५१२

मी 'शुध्द मराठी'चा क्लास लावला आहे.आपण येता का??

'अतिशय धन्यवाद' वाचुन मला 'मोठा आनंद' झाला
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

स्वाती२'s picture

10 Jul 2010 - 7:40 pm | स्वाती२

धन्यवाद तात्या!

तिमा's picture

11 Jul 2010 - 10:22 am | तिमा

तात्या धन्यवाद, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
डोंबिवलीला रहात असताना बुवांच्या घरी जाऊन त्यांचा रियाज ऐकण्याची भाग्य लाभले होते आम्हास. अर्थात वडिलांची व बुवांची ओळख असल्यामुळेच ते शक्य झाले.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

विसोबा खेचर's picture

12 Jul 2010 - 9:49 pm | विसोबा खेचर

डोंबिवलीला रहात असताना बुवांच्या घरी जाऊन त्यांचा रियाज ऐकण्याची भाग्य लाभले होते आम्हास.

क्या बात है..

माझं आजही त्या घरात येणंजाणं आहे.. बच्चुभाई थकले अलीकडे..

आता कधी वेळ मिळाला तर मधुबुवांसमोर तानपुरा घेऊन बसतो आणि शिकतो जसं जमेल तसं.. :)