जपान चित्रसफ़र - २ (ओदायबा)

डोमकावळा's picture
डोमकावळा in कलादालन
6 Jul 2010 - 12:27 pm

या आधी
जपान चित्रसफ़र - १ (असाकुसा मंदिर)

'तोयोसू' नावाच्या टोकियोच्या एका उपनगरा पासून काहीशा अंतरावर असणारे 'ओदायबा' नावाचे एक ठिकाण. ओदायबा हे जपानच्या समुद्रावर वसलेलं उपनगर. खर तर वसलेलं म्हणण्यापेक्षा समुद्रावर अतिक्रमण करून वसवलेलं कृत्रीम बेटच. टोकियो आणि ओदायबा हे 'रेनबो ब्रिज' (Rainbow bridge) नावच्या मोठ्या आणि सुंदर पुलाने जोडले गेले आहेत. या रेनबो ब्रिज मुळे आणि इथे असलेल्या निरनिराळ्या प्रेक्षणीय जागांमुळे ओदायबाला 'रेनबो सिटी' (Rainbow City) असं सुद्धा म्हणतात.

तोयोसूहून ओदायबाला रेल्वेने साधारण पणे २०-२५ मिनीटे लागतात. या छोट्याश्या प्रवासाचे मुख्य आकर्षण म्हणजे इथली स्वयंचलित रेल्वे. 'तोयोसू' स्टेशन ते 'शिंबाशी ' स्टेशन मध्ये असलेला हा 'युरिकामोमे' रेल्वे मार्ग संपूर्णपणे स्वयंचलित आहे. या मार्गावआहे.सर्व रेल्वे या संगणकाद्वारे चालवल्या जातात आणि या पूर्ण मार्गावर कोणत्याच रेल्वेत कोणताही रेल्वेचा कर्मचारी नसतो, ड्रायव्हर सुद्धा. या रेल्वे मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे इथले रूळ हे काँक्रीटचे असून रेल्वेला रबराचे आवरण असलेली चाके असतात. हा संपूर्ण मार्ग जमिनी पासून उचललेला असून सगळाच मार्ग हा उड्डाणपूलाच्या स्वरूपात आहे.

युरिकामोमे उड्डाणपूल...

काँक्रीट मार्ग...

आणि हीच ती स्वयंचलीत रेल्वे....

अगदी पूढे पहिल्या बाकावर बसून प्रवास करायला जाम मजा येते या रेल्वेत.

झाडांच्या मध्यभागी उभी असलेली ही कृत्रीम करवत आकर्षक वाटते.

ओदायबाच्या आधी 'अरिअके' (Ariake) नामक एका ठिकाणी असलेलं एक कमर्शिअल कॉम्प्लेक्स. ही 'टोकियो इंटरनॅशनल एक्झीबिशन सेंटरची' प्रतिकृती आहे. यालाच 'टोकियो बिग साईट' अस सुद्धा म्हणातात.

हाच तो 'रेनबो ब्रिज' (Rainbow bridge). रात्रीच्या वेळी दिव्यांच्या रोषणाईने हा ब्रिज एकदम उजळून निघतो.
आणि पलिकडे झगमगता उंच 'टोकियो टॉवर' (Tokyo Tower) (त्या बद्दल पुन्हा कधीतरी..)

इथला स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा (Statue of Liberty)... अमेरिका आणि फ्रान्स मधल्या पुतळ्यांच्या मानाने हा छोटासा पण तितकाच मनमोहक ...

इथे एकाच फोटोत स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, 'रेनबो ब्रिज' आणि 'टोकियो टॉवर' टिपायचा प्रयत्न...

छोट्या छोट्या बोटींमध्ये असलेली ही हॉटेलं...

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळ्याच्या एका बाजूला एक रेतीचा मोठा बीच तयार केलेला आहे. बीचच्या एका बाजूने पाण्याच्या सुरुवातीपर्यंत जाता येइल असा एक लाकडी पूल आहे. संध्याकाळच्या वेळेला या बीच वर बसून समोरचा झगमगता 'रेनबो ब्रीज', पाण्यातल्या विविधारंगी बोटी पहायची मजा काही औरच असते. क्यामेर्‍याच्या बॅटरीने दगा दिल्याने आणखी फोटो क्लिकता आले नाहीत. असो. पुन्हा केव्हा तरी.....

क्यामेरा : कॅनॉन पॉइंट अ‍ॅण्ड शूट
मॉडेल नं : डी एस सी - डब्ल्यू ५५ (१० मेगापिक्सेल आणि ४ ऑप्टीकल झूम)

क्रमश:

हे ठिकाणदेशांतर

प्रतिक्रिया

सहज's picture

6 Jul 2010 - 12:45 pm | सहज

>अगदी पूढे पहिल्या बाकावर बसून प्रवास करायला जाम मजा येते या रेल्वेत.

सहमत!!

रेल्वेप्रेमी लोकांची मज्जा आहे जपानमधे!

छान!

गणपा's picture

6 Jul 2010 - 12:59 pm | गणपा

मस्त.
चित्रसफर आवडली :)

जागु's picture

6 Jul 2010 - 1:10 pm | जागु

मस्तच.

स्वाती दिनेश's picture

6 Jul 2010 - 1:13 pm | स्वाती दिनेश

अगदी पूढे पहिल्या बाकावर बसून प्रवास करायला जाम मजा येते या रेल्वेत.
अगदी ,सहमत!
बाकी रेनबो ब्रिज,तोक्यो टॉवर,स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा इ. फोटो बघताना तोक्योच्या सहलीच्या आठवणी ताज्या झाल्या.
स्वाती
स्वगत-जपानकी दुनिया पूर्ण करायला हवंच आहे असं आता हे फोटो पाहिल्यावर तर फारच वाटायला लागलं आहे

ऋषिकेश's picture

1 Aug 2010 - 2:15 pm | ऋषिकेश

फोटो छान आहेत.

स्वातीताई, शुभस्य शीघ्रम् |

खादाड's picture

8 Jul 2010 - 3:49 pm | खादाड

छान फोटो !

टारझन's picture

8 Jul 2010 - 4:06 pm | टारझन

मस्त रे ....

पण पाहिजे ते फोटू आले नाय अजुन :) :)

- (लोणचंशौकिन) चिंचाराम कवठे

sneharani's picture

8 Jul 2010 - 4:18 pm | sneharani

फोटो मस्तच

आचारी's picture

1 Aug 2010 - 1:39 pm | आचारी

एकदम मस्त वाट्ल बुवा

आनंदयात्री's picture

1 Aug 2010 - 2:00 pm | आनंदयात्री

वा मस्त रे डोम्या !!

>>इथला स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा (Statue of Liberty)... अमेरिका आणि फ्रान्स मधल्या पुतळ्यांच्या मानाने हा छोटासा पण तितकाच मनमोहक ...

ही स्वातंत्र्यदेवता नपटी आहे का ?

मदनबाण's picture

1 Aug 2010 - 7:05 pm | मदनबाण

मस्त क्षण टिपले आहेत... :)
पुढच्या भागाची वाट पाहतो आहे...