राम राम मंडळी,
सतत काहीतरी नवीन देण्याच्या मिसळपावच्या उद्दीष्टाला धरुन आम्ही आपल्या लाडक्या संकेतस्थळावर "गप्पाड्डा" (गप्पांसाठी जागा/चॅट रुम) सुरु करायचे योजले आहे. अजून ही सोय पूर्णपणे कार्यांन्वित नसल्याने तुर्तास काही सद्स्यांना थोडी अडचण येण्याची शक्यता आहे.
तमाम मिसळपाव ग्रामस्थांनी त्याचा आनंद घ्यावा ही विनंती. काही अडचणी असल्यास त्या येथे मांडल्यास हरकत नाही.
वि.सु.येण्याची नोंद करणे आवश्यक आहे.
हिच सोय येथेही मिळेल
आपला नम्र,
सरपंच.
प्रतिक्रिया
1 Apr 2008 - 9:27 am | विद्याधर३१
वा अप्रतीम सोय.. मिसळपावचे अभिनंदन...
+१ हेच म्हणतो...
म.म.
( आयला बहुधा पहिला मीच वाटत) विद्याधर
1 Apr 2008 - 9:34 am | सृष्टीलावण्या
प्रामाणिकपणे इथे येऊन लिहिणारे तुम्हीच पहिले. बाकीचे मात्र तिथेच गप्पा झोडण्यात रममाण झाले आहेत.
सरपण्च, हा सुंदर गपाड्डा चालू करून तुम्ही बाजी मारलीत. मिपा दिवसेंदिवस लोकाभिमुख होत चालले आहे. अभिनंदन.
>
>
वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्हाटी बोलैन...
1 Apr 2008 - 9:29 am | रविराज
वा अप्रतीम सोय.. मिसळपावचे अभिनंदन...
+१ हेच म्हणतो...
1 Apr 2008 - 9:33 am | विसोबा खेचर
सरपंच (सभासद क्रमांक १) आणि सरपंच. ह्या दोन वेगळ्या व्यक्ति आहेत याची नोंद घ्यावी! :)
सरपंच. (सभासद क्रमांक ३६८) ह्या व्यक्तिला मिपाच्या तर्फे कुठलिही सूचना, निवेदन देण्याचे अधिकार मिपाने दिलेले नाहीत याचीही कृपया नोंद घ्यावी!
सरपंच या नावामुळे मिपाच्या सभसदांची दिशाभूल होऊ नये म्हणून हा प्रतिसाद...
बाकी चालू द्या! :)
तात्या.
1 Apr 2008 - 9:46 am | विद्याधर३१
केल्यबद्दल कारवाई का करु नये???
अवान्तर : आता लेखनाला उत्तर्/लक्ष देताना सरपंच खरा आणी ठिपक्याचा हे बारकाइने पहावे लागणार बहुधा.....
विद्याधर
1 Apr 2008 - 9:58 am | विसोबा खेचर
आता लेखनाला उत्तर्/लक्ष देताना सरपंच खरा आणी ठिपक्याचा हे बारकाइने पहावे लागणार बहुधा.....
त्याची काही गरज नाही. फक्त सरपंच ह्या नावासमोर संगणकाचा उंदीर नेल्यास सभासद क्रमांक १ (user 1) असे दिसल्यास तो खरा सरपंच. बाकी सगळे खोटे, एवढं लक्षात ठेवा! :)
बाय द वे, सरपंच (ठिबक्याचा) ह्या सभासदाला, सरपंच या नावामुळे प्रत्येक वेळेस सभासदांचा उगाच गोंधळ/दिशाभूल होऊ नये म्हणून लवकरच त्याने त्याचा आयडी बदलावा अशी नम्र विनंती...
तात्या.
1 Apr 2008 - 11:00 am | मधु मलुष्टे
नक्कीच !!!
पण.. खरे सरपंच आजचा दिवस जाउ देतील अशी आशा करतो...
उद्या ह्याच वेळेला (किंवा आधीच), मी पूर्वच नाव धारण करेनच....
हे सगळ निव्वळ गंमत म्हणुन..
(सध्याचा ठिबक्याचा) सरपंच.
म.म.
1 Apr 2008 - 9:38 am | प्रमोद देव
हे बहुदा एफू चे प्रकरण असावे असा दाट संशय आहे.
1 Apr 2008 - 9:39 am | छोटा डॉन
वा अप्रतीम सोय.. मिसळपावचे अभिनंदन...
अवांतर : च्यायला आम्हीच सापडलो बरं तुम्हाला ...
असो. १० दिवसांनंतर सुरवात चांगली झाली ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
1 Apr 2008 - 10:28 am | धमाल मुलगा
अरे वा वा वा...
गप्पाड्डा!!!!
सक्काळी सक्काळी फिरकी ताणली शेठ तुम्ही!!!!
1 Apr 2008 - 12:00 pm | मनस्वी
कबूलीजवाब :)
वा अप्रतीम सोय.. मिसळपावचे अभिनंदन...
+१ हेच म्हणते...
1 Apr 2008 - 2:18 pm | ब्रिटिश टिंग्या
वा अप्रतीम सोय.. मिसळपावचे अभिनंदन...
+१ हेच म्हणतो...
1 Apr 2008 - 5:29 pm | शरुबाबा
वा अप्रतीम सोय.. मिसळपावचे अभिनंदन...
+१ हेच म्हणतो...
1 Apr 2008 - 5:41 pm | मदनबाण
या विशेष सोयी बद्धल सरपंच.आपले विशेष आभार !!!!!
(आपला गप्पाड्डया)
मदनबाण
1 Apr 2008 - 6:24 pm | सुवर्णमयी
हे पण एक एप्रिल फूल आहे का?
1 Apr 2008 - 6:28 pm | धमाल मुलगा
हि:हा हा हा हा......बोकाशी बो!!!!!!
सुवर्णमयीताई सगळ्यात जोरात ग॑डली रे !!!!!!
मनस्वीच्या मनस्वी भाषेत... "एsss ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढा!"
- (आचरट) ध मा ल.
1 Apr 2008 - 7:39 pm | प्राजु
फूलच आहे..
हो ना ध.मु.???हम्म.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
1 Apr 2008 - 7:48 pm | वरदा
फूलच
अक्ख्या साईट वर हेच तर करतो आपण गप्पा मारणे मग वेगळा गप्पाड्डा कशाला काढतील?
2 Apr 2008 - 9:51 am | मधु मलुष्टे
१ एप्रील निमित्त थोडी गंमत केली...
कोणी सांगाव कदाचीत अस काही सुरु होइल ही.... (आठवा जी-मेल)
बाकी प्रतीसादा बद्दल.. आणि समजुतदारपणा (म्हणजे रे काय ?) बद्दल आभारी आहे....
-मधु