शॄंगार

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
4 Jul 2010 - 9:29 pm

भिजलेले चिंबुन केस चुंबून सखे मोहरतो
ओलेती झालिस तू, अन् न्हाऊन मनी मी निघतो

डोळ्यातिल काजळ रेखा काळजात मी गिरवीतो
शृंगार तुझा होतो अन् रंगून आत मी निघतो

मलमली ओढणी मधला गंधार मनी घुमघुमतो
नक्षीत बिलोरि तिच्या मी माझेच बिंब पाहातो

काजळी रेशमी केस, हुंगून मनी पाझरतो
ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो

शृंगारकविता

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

4 Jul 2010 - 9:37 pm | अभिज्ञ

वाह ! क्या बात है.

सुंदर काव्य.

अभिज्ञ.

पंचम's picture

4 Jul 2010 - 9:37 pm | पंचम

क्या बात है!

शृंगार तुझा होतो पण रंगून आत मी निघतो...................

जाम भिडू मस्त रे

ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो............

कवितेमागची प्रेरणा ही जबर असणार...........

श्रावण मोडक's picture

4 Jul 2010 - 10:59 pm | श्रावण मोडक

"मोकळ्या केसांत माझ्या, तू जिवाला गुंतवावे..."
अशा 'आदेशा'नंतरची ही स्थिती आहे.

शैलेन्द्र's picture

4 Jul 2010 - 11:16 pm | शैलेन्द्र

वा छान...

सहज's picture

5 Jul 2010 - 5:37 am | सहज

>डोळ्यातिल काजळ रेखा काळजी (काळीज / कलेजा या अर्थी की चिंता / काळजी?? )पुन्हा

तिथे जरा गोंधळ झाला बाकी मेंदीचा सुगंध दरवळला....

राजेश घासकडवी's picture

5 Jul 2010 - 9:54 am | राजेश घासकडवी

सुधारणा केली आहे.

स्पंदना's picture

5 Jul 2010 - 6:12 am | स्पंदना

>>>>ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो>>>>

व्वाह क्या बात कही!!

पुर काव्य सुन्दर!! बहोत खुब!

निरन्जन वहालेकर's picture

5 Jul 2010 - 7:52 am | निरन्जन वहालेकर

" ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो "
मान गये राजेश साहेब ! खुप खुप आवड्ली गझल.

Dhananjay Borgaonkar's picture

5 Jul 2010 - 11:32 am | Dhananjay Borgaonkar

काजळी रेशमी केस, हुंगून मनी पाझरतो
ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो

क्या बात है!!!!
जबरदस्त..

मराठमोळा's picture

5 Jul 2010 - 11:38 am | मराठमोळा

अरे वा!
छान शृंगारिक काव्य. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

पाषाणभेद's picture

5 Jul 2010 - 12:27 pm | पाषाणभेद

आपल्या बैठकीत आले एकदाचे तुम्ही! भन्नाट काव्य!
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

पाषाणभेद's picture

5 Jul 2010 - 12:27 pm | पाषाणभेद

आपल्या बैठकीत आले एकदाचे तुम्ही! भन्नाट काव्य!
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

धनंजय's picture

5 Jul 2010 - 6:13 pm | धनंजय

वा!

("पण" ऐवजी दोन्ही वेळेला "आणि" [किंवा "अन्", किंवा नुसता स्वल्पविराम] अधिक आवडले असते.)

राजेश घासकडवी's picture

6 Jul 2010 - 2:09 pm | राजेश घासकडवी

("पण" ऐवजी दोन्ही वेळेला "आणि" [किंवा "अन्", किंवा नुसता स्वल्पविराम] अधिक आवडले असते.)

गुणगुणून पाह्यल्यावर अन् अधिक आवडलं. धन्यवाद.

sur_nair's picture

5 Jul 2010 - 8:34 pm | sur_nair

चांगली आहे पण तुमची आहे असा विश्वास बसत नाही. कळायला खूपच सोपी आहे म्हणून असेल कदाचित. कुठलाही abstract संदर्भ नाही. असो. अधे मध्ये असेही होऊ द्या.

अविनाशकुलकर्णी's picture

5 Jul 2010 - 11:54 pm | अविनाशकुलकर्णी

काजळी रेशमी केस, हुंगून मनी पाझरतो
ओढता कवेत तुला मी माझीच कवीता

मस्त कविता

jaypal's picture

6 Jul 2010 - 11:01 am | jaypal

"शॄंगार" आवडला :X 8> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

आनंदयात्री's picture

6 Jul 2010 - 11:13 am | आनंदयात्री

सुंदर कविता आहे राजेश. आवडली :)

शेखर's picture

6 Jul 2010 - 12:08 pm | शेखर

कविता आवडली..