बीज...

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
3 Jul 2010 - 1:47 pm

भिजलो असा सचैल, मी पावसात पुढच्या,
या आजच्या उन्हाचे, मज तकदीर ज्ञात आहे.

जाळो कितीक मजला, हे वणव्यातले निखारे,
अन देवो कितीक नियती, रक्तातले इषारे,
नक्षत्र ते मृगाचे, मी जपले अंतरात आहे.

फिरल्या नभी ग्रहांच्या, वक्रीच आज छाया ,
अन झाल्या फितुर दैवा, माझ्याच हस्तरेषा,
आवळीन मी तयांचा, जीव मनगटात आहे.

जगतो असा सदैव, स्वप्नात त्या उद्याच्या,
अन जाणतो खुणा मी, सुकल्या या नदीच्या,
मिळणार रुप मजला, जे जगवि़ख्यात आहे.

शांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

टारझन's picture

4 Jul 2010 - 12:24 am | टारझन

अलिकडे मिपावर येणार्‍या बोजड, निरर्थक,कुंथुन कुंथुन पाडलेल्या संदेशपर कवितांपेक्षा तुमची कविता सोपी सहज आणि सुंदर वाटली .

- सैलधरं

शैलेन्द्र's picture

4 Jul 2010 - 5:50 pm | शैलेन्द्र

तु अहो जाहो करायला लागलास? असो, धन्यवाद

टारझन's picture

4 Jul 2010 - 6:43 pm | टारझन

आमच्या दृष्टीनं चांगलं लेखन करणार्‍याला आम्ही नेहमीच आदर देतो सायेब :)
बाकी आमच्या डोक्याला शॉट लागला की तो शॉट प्रतिक्रीयेत येतो :) अर्थात आमचा डोक्याला लागलेला शॉट दिसत नाही लोकांना(वाचक,लेखक,संपादक)
दिसतो तो फक्त प्रतिसाद ..दिसतो तो फक्त प्रतिसाद ... दिसतो तो फक्त प्रतिसाद आणि फक्त प्रतिसाद !! (हे वाक्य बोलताना ,पुर्ण मंचावर काळोख आणि फक्त माझ्यावर प्रकाशझोत राहिल ह्याची नेपथ्यकाराने काळजी घ्यावी)

-(कल्लाकार) टारझन दामले

शैलेन्द्र's picture

4 Jul 2010 - 11:03 pm | शैलेन्द्र

"आमच्या दृष्टीनं "

हे महत्वाचं,

आम्ही काळजी घेवु..

चतुरंग's picture

7 Jul 2010 - 1:14 am | चतुरंग

प्रकाशयोजना प्रकाशयोजना!!
असो. तरीही उजेड पडेल ह्याची काय खात्री म्हणा!! ;)

(फिरता रंगमंच)चतुरंग

टारझन's picture

7 Jul 2010 - 1:34 am | टारझन

इष्टेज वरच्या लायटी चालुबन करणारा ज्यो आसंल त्यानं काळजी घेणे ...

तरीही उजेड पडेल ह्याची काय खात्री म्हणा!!

=)) =)) =)) =)) =)) का ? आम्ही एवढा उजेड पाडल्यावरही असे उद्गार का ? मन उद्विग्न झालं आहे !! कोणी धीर देता का धीर ? ( नाही नाही सुधीर नको .. =)) )

साला प्रतिसाद लिहीता लिहीता क्वालेजातल्या णाटक प्र्याक्टिस षेशन मधे पोचलो :)

(हालता देखावा) रावण आणि सुर्पणखा

मनोगत व उपक्रमावर शिकवणी लावल्याचे कानावर आले आहे. असो.
कविता छान आहे.
वेताळ

शैलेन्द्र's picture

4 Jul 2010 - 6:13 pm | शैलेन्द्र

थोड्याच कालावधित त्या साईट सुधारुन जातील, माझा विश्वास आहे..

राजेश घासकडवी's picture

4 Jul 2010 - 6:40 pm | राजेश घासकडवी

बीजाच्या दुर्दम्य आशा, आकांक्षा, व त्याचं मनोगत आवडलं.

मिळणार रुप मजला, जे जगवि़ख्यात आहे.

छान.

कवितेला एक गजलेचा बाज आहे, अर्थातच आकारबंध वेगळा आहे. वृत्ताच्या दृष्टीने थोडा प्रयत्न केला तर कविता एका नवीन पातळीला पोचेल.

अवांतर : टार्‍याची काळजी मनाला भिडली, तेव्हा लवकरच त्यालाही कळेल अशी एखादी कविता लिहिण्याचा इरादा आहे.

तुम्हाला उद्देशुन काही नव्हतं तरी तुम्हालाच मनाला का बॉ झोंबलं भिडलं , तुम्हाला कळली तरी पुरे आहे तुमच्या II लेव्हल II ला =))

II मनभिडवी II
आम्ही लोकान्ला कळत नाय म्हणुन मठ्ठ मठ्ठ म्हणतो आणि नंतर ते स्वतः उडवुन हुशार्‍या दाखवतो ;)

शैलेन्द्र's picture

4 Jul 2010 - 11:07 pm | शैलेन्द्र

ह्म्म,
तुम्ही म्हणताय ते खरयं, पण मग मला गजल वृत्ताचा आणि पर्यायाने शुद्धलेखनाचा/ व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल...

बघुया, कसं जमत ते...

रामदास's picture

4 Jul 2010 - 8:29 pm | रामदास

नक्षत्र ते मृगाचे, मी जपले अंतरात आहे. ही ओळ फार आवडली.
आवळीन मी तयांना , जीव मनगटात आहे. असे हवे होते का ?
येऊ द्या आणखी कविता.
तळटीप :
टारझन मनमिळवी अशी सही वाचायची इच्छा आहे.

शैलेन्द्र's picture

4 Jul 2010 - 11:01 pm | शैलेन्द्र

धन्यवाद,
"आवळीन मी तयांना , जीव मनगटात आहे. असे हवे होते का ?"
तसेही चालेल, पण हस्तरेषांचा जीव, स्वता:ची मुठ आवळल्यावर गुदमरतो, आणी ते करायचे सामर्थ्य मनगटात आहे, अशी कल्पना होती.

निरन्जन वहालेकर's picture

5 Jul 2010 - 7:41 am | निरन्जन वहालेकर

" जाळो कितीक मजला, हे वणव्यातले निखारे,
अन देवो कितीक नियती, रक्तातले इषारे,
नक्षत्र ते मृगाचे, मी जपले अंतरात आहे."

व्वा ! क्या बात है ! अतिशय सुरेख !

sur_nair's picture

5 Jul 2010 - 8:45 pm | sur_nair

"या आजच्या उन्हाचे, मज तकदीर ज्ञात आहे". वा क्या बात है. पण शेवटच्या कडव्यातले "अन जाणतो खुणा मी, सुकल्या या नदीच्या,
मिळणार रुप मजला, जे जगवि़ख्यात आहे" याचा नीटसा सदर्भ लागत नाही असे वाटले.

शैलेन्द्र's picture

5 Jul 2010 - 10:16 pm | शैलेन्द्र

धन्यवाद
"पण शेवटच्या कडव्यातले "अन जाणतो खुणा मी, सुकल्या या नदीच्या,
मिळणार रुप मजला, जे जगवि़ख्यात आहे" याचा नीटसा सदर्भ लागत नाही असे वाटले."

बीज जेथे पडले आहे ती खडकाळ वैराण जमीन आहे, पण एका सुकलेल्या नदीच्या खुणा तिथे आसपास आहेत, पावसाळ्यात ही नदी परत वाहु लागेल व बीज रुजेल, आणी ते एका महावृक्षाचे बीज असल्याने, त्या वृक्षाचे जगविख्यात रुप त्याल मिळेल अशी कल्पणा आहे.

मुळात ही कविता बीज हे रुपक वापरुन लिहीली आहे, बर्‍याचदा, आपण खुप प्रयत्न करुनही हाती काही लागत नाही कारण परिस्थीती प्रतिकुल असते(खडकाळ वैराण जमीन) पण जवळच कुठेतरी भविष्यातली संधी लपलेली असते, जर आपण चिकाटीने वाट पाहीली तर यश रुजायला वेळ लागत नाही.

धनंजय's picture

6 Jul 2010 - 3:42 am | धनंजय

छान कल्पना.

वृत्त-लयीची पकड आहे, पण कुठेकुठे हात सैल पडला आहे. मनगटाच्या जोराने या फितुर काव्यरेषा आवळल्या तर कवितेत कुठल्या कुठे पोचण्याचे सामर्थ्य आहे.

*(छिद्रान्वेशाबद्दल माफी मागतो. पण :-
?वक्रीच आज छाया? मला क्लिष्ट उपमा क्लेशकारक वाटतात. शिवाय वृत्तपूर्तीसाठी घातलेली भरीची अक्षरे टोचतात - उदाहरणार्थ "या आजच्या उन्हाचे", "नक्षत्र ते मृगाचे", "स्वप्नात त्या उद्याच्या", "सुकल्या या नदीच्या". इतके "हे/ते, या/त्या" निर्देश कृत्रिम वाटतात. "अंगुलिनिर्देश" हा अर्थ कमी, वृत्तपूर्ती अधिक वाटते. असला ढगळपणा टाळण्याचे कौशल्य कवीपाशी निश्चितच आहे.)*

टारझन's picture

6 Jul 2010 - 7:51 am | टारझन

पांढरी शाई वाचुन पांढरा फट्ट पडलो आहे , कोणीतरी रमोल अँब्युलंस सर्विस ला फोन लावुन उचला रे मला !
(रिड हर्ट) पतन विजयसुर्या

नंदू's picture

6 Jul 2010 - 4:56 am | नंदू

अन झाल्या फितुर दैवा, माझ्याच हस्तरेषा,
आवळीन मी तयांचा, जीव मनगटात आहे

व्वा क्या बात हैं !

शैलेन्द्र's picture

7 Jul 2010 - 12:50 am | शैलेन्द्र

धन्यवाद, आणी आपल्या सुचनांकडे नक्किच लक्ष देइल...

हर्षद आनंदी's picture

7 Jul 2010 - 2:05 am | हर्षद आनंदी

बीजाचा दुर्दम्य आशावाद, कुठेतरी पाय रोऊन भव्य दिव्य करुन दाखविण्याची जिद्द!! त्यासाठी अनंत अडचणींच्या वणव्यात जळण्याची तयारी, स्वतःला गाडुन घेण्याची मानसिकता ह्यातुनच एखादा शिवाजी, एखादा बाजीप्रभु, एखादा संभाजी, एखादा बाजीराव, एखादा भगतसिंग आणि असे अनेक कार्याचे वटवृक्ष उभे राहतात.

त्या जिद्दीवरच आज माणुस मंगळावर घर बांधण्याची, चंद्रावर पाणी शोधण्याची शर्थ करीत आहे!! त्या जिद्दीला लाखो सलाम!!

कविता अप्रतिम हे. वे. सां. न ल.

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

शैलेन्द्र's picture

7 Jul 2010 - 8:20 pm | शैलेन्द्र

धन्स...