आभाळ रीत होतंय आणि मोतीचूर सांडतय
तरारून धरा आलीये आणि काहूर उठतय
सावळभूल उठलीये कृष्णपीस लागलाय
यमुनेच्या पुरापलीकडे मन वेड् धावतंय
सरीबरोबरी भिजता भिजता सुरातही चिंब होतेय
लाघव त्याच्या बासरीच जीवघेण छळंतय
अशी ही निळी मेघभूल मला पुरती वेढतेय
"इथेच आहे तो" भास असा सारखा देतेय
चांदण्या शिवाय अवघं आकाश श्याममय झालंय
मलाच तो गवसेना पण आभाळ त्याने व्यापलाय
वर्षेसारखी तुटून तुटून मीही मनभर ओसंड्तेय
कृष्णंगहिरे रूप साजिरे ठाई ठाई शोधतेय
आणि अचानक मला कसली चांदण मिठी पडली
आणि माझी ओळखा सगळी त्याच्यामध्ये विरली
सापडला माझा कृष्णसखा अन मी मुरली झाले
आभाळ रिते होतच होते मी कृष्णं ओठातून सांडले
अनुजा (स्वप्नजा)
प्रतिक्रिया
1 Jul 2010 - 4:53 pm | मीनल
चांदण्या शिवाय अवघं आकाश श्याममय झालंय,
आभाळ रिते होतच होते मी कृष्णं ओठातून सांडले
हे आवडले.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
2 Jul 2010 - 5:54 am | पाषाणभेद
चांगले. प्रतिकांचा योग्य वापर.

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
9 Jul 2010 - 3:35 pm | झुम्बर
आभार................