अहो काय म्हणतोय ते बघाल का?
"काय"?
ट्रिप ला जातोय.
" जाउ दे की"
पंधरा हजार मागतोय.
"ठीक आहे. देउन टाक"
कुठे ते विचारा की?
"बर. विचारतो. कुठे"?
वर्गातले मित्र आणि मैत्रीणी पण बरोबर आहेत.
"ठीक आहे. त्याचे काय? रिझल्ट लागला आहे. मोकळे आहेत. करु दे की काय हवे ते."
ज्युनियर मित्र आणि मैत्रीणी आणि पण बरोबर आहेत.
"हो का.? बर बर."
अहो, दोन प्रोफेसर्स पण बरोबर आहेत.
"वा वा वा. चांगले आहे की."
अहो ते सर्व खजुराहो ला चालले आहेत. दोन दिवस राहाणार आहेत.
"मग त्यात तुला प्रॉब्लेम काय आहे? नविन शिक्षण पद्धतीचा भाग आहे तो. त्याला एक इंग्रजी शब्द आहे खास. तुला सांगितला तर नाही कळायचा. ह्या पद्धतीत मुलांबरोबर सिलॅबस च्या बाहेर जाउन संवाद साधला जातो."
जरा नीट बोला... त्याच्याकडे म्हणजे........
"कळले कळले. बोलव बघु त्याला"
थांबा मी जाते.
"नाही कुठेही जायचे नाही. असे विषय स्पष्ट बोलायचे असतात. बैलाची शेपटी धरायची नाही".
.........................................................................................
अकॉमॉडेशन काय?
३ स्टार
कितीजण आहात?
१२. दोन प्रोफेसर्स.
ट्रेन का प्लेन?
ट्रेन.
"मोबाईल ने बरोबर"
हो.
"पाच हजार जास्त घेउन जा"
नको.
सर्व प्लान झालेय ना व्यवस्थित.
हो.
"आमच्या कॉलेज च्या मित्रांची पण गेली होती. मी गेलो नव्हतो. पण स्टेशन वर सोडायला गेलो होतो".
??????????
अरे तुझे ते जॅकी चॅन, ब्रुस ली, जेट ली सारखेच मार्शल आर्ट्स एक्पोनंटस आहेत कलाकृतीतले कलाकार. फक्त आर्ट फॉर्म वेगळा.योगाभ्यासाने कमावलेली शरीरे. बघायचे विसरुन जायचे. नॉट टु बी इम्युलेटेड. अगदी डब्ल्यु. डब्ल्यु. एफ च्या सुपर स्टार वार्निंग सारखे.
ओके.
"माझ्या कॉलेज मधल्या दोघांनी वार्निंग ऐकली नाही. अजुनही वाकडे चालतात. ऑर्थोपेडीक वर खुप पैसा खर्च झाला".
खीखीखीखीखीखी.
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 8:22 am | सहज
नाही म्हणजे जरा हे उशीराच शिक्षण होतय नाही का?
:-)
25 Jun 2010 - 8:43 am | रामदास
वहीवाट नसावी .
बाकी धोपट मार्ग सोडायचा नाही.
25 Jun 2010 - 11:28 am | राजेश घासकडवी
विडंबन मालिकेतलं नवं पुष्प वाटलं. पण बघतो तर लेख. आवडला.
भारतात मार्शल आर्ट्स पूर्वी शिकवायचे. गेले ते दिवस.
25 Jun 2010 - 2:12 pm | शैलेन्द्र
"भारतात मार्शल आर्ट्स पूर्वी शिकवायचे. गेले ते दिवस."
पुर्वी पेरलेलं अजुन उगवतंय, काही दिवसातच चीनला मागे टाकु आपण प्रोडक्शनमधे...