सारेच सुटलेत, हे पाहिल्यावर दिवसभराचा कंटाळा काढून टाकताना हे काही तरी होत गेलं... नंतर कळलं, कविता झाली.
नात्यातील प्रश्नांचे कंगोरे
एकेक करून उकलून घेताना,
काही सिद्धांत ती मांडायची, अन्
नेमकी विरुद्ध मूल्ये माझी
समीकरणाची मांडणी करून,
प्रमेयांची भूल विरून जाताना,
सारीच गणिते सोडवायची, असे
एकमेकांना हलकेच बजावून सांगायचो
उभयान्वयी अर्थांचे सूत्र चालवत
आपले गणित सोडवून ती गेली,
मी मात्र झोके खात राहिलो
शब्दांच्या जाती आणि संख्यांच्या किंमतीत
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 12:00 am | प्रभो
श्रामोंची परत गणितावर कविता..... :)
मागच्या वेळेस गणितावर दोन तासात दहा विडंबनं झाली होती. या वेळेस काय?? ;)
25 Jun 2010 - 12:35 am | मस्त कलंदर
फक्त गणितावरच नाय रे.. व्याकरणावर पण झाली होती.. श्रामोंचं गणितच वेगळं!!!
कविता आवडली हो.
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 Jun 2010 - 12:39 am | प्रभो
गणितावर आमचंही एक समीकरण होतं, म्हणून लक्षात राहिलं.... :)
25 Jun 2010 - 12:04 am | राजेश घासकडवी
कंस घातले नाहीत हे बरं केलंत. कविता स्वतंत्र म्हणून समर्थ आहे.
25 Jun 2010 - 12:22 am | नंदन
सहमत आहे.
श्रामोंचीच व्याकरण ही कविता आठवली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
25 Jun 2010 - 1:26 am | बिपिन कार्यकर्ते
श्रावण, अतिशय सुंदर कविता. एकदम परिणाम करून गेली. स्वतंत्र दमदार कविताच आहे ही...
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 1:27 am | धनंजय
दोघांनी सोडवायचे गणित किंवा तर्क.
**(मला क्लिष्ट उपमा [mixed metaphor] जड जातात. "उभयान्वयी" आणि "झोके" दोन्ही कल्पना कळतात. पण एका कल्पनाचित्रात अंतःचक्षूंसमोर आणता येत नाहीत. कथा समजली पण भावना नीट समजायला कठिण जाते आहे.)**
25 Jun 2010 - 5:59 am | सहज
हे काही तरी होत गेलं.
असो म्हणूनच म्हणत असावेत आगे की सोच!
प्रवासाच्या एका टप्प्यावर काही वेळ एक कॉमन रस्ता येतो, वेळ आली की परत वाटा वेगळ्या होतात. ज्याला हे समजते तो शांतपणे पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागतो, कॉमन रस्ता संपताना हसत खेळत निरोप घेतो, देतो. (पक्षी: नो गुत्तडा) व ज्या प्रवाश्याला हे आकलन लगेच होत नाही तो बहुदा असल्या कविता करत असावा. :P
25 Jun 2010 - 5:32 pm | शुचि
>>प्रवासाच्या एका टप्प्यावर काही वेळ एक कॉमन रस्ता येतो, वेळ आली की परत वाटा वेगळ्या होतात. ज्याला हे समजते तो शांतपणे पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागतो, कॉमन रस्ता संपताना हसत खेळत निरोप घेतो, देतो. >>
सुरेख!! अप्रतिम. किती सहज सांगून गेलात पण इतकं सहज नाही सोडता येत : (
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
25 Jun 2010 - 5:11 pm | अवलिया
छान !
--अवलिया
25 Jun 2010 - 5:33 pm | शुचि
मस्त!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||