अवलियांचे रूळ आणि गुरू चतुरंग यांचा गूळ पाहून मलाही अंमळ लहानपणची खूळं आठवली.
पायात पाय
घालून आम्ही पाडायचो
तो एका सायकलीवर असायचा अन
मी दुसरीवर टांग मारायचे
तोल सांभाळत
पाडत असताना खोड्या काढताना
असंच तासभर खेळायचे
सगळेजण मिळून मिसळून पाडायचो
आयटीच्या रूळावरून
कधीतरी तो मोटर-मन झाला
मी मात्र आहे त्याच सायकलीवर
पाय मारत... तास न तास
प्रतिक्रिया
24 Jun 2010 - 8:40 pm | रेवती
वाह! वा!
क्या बात है!
बिडंबन आहे असं वाटतच नाहिये!
रेवती
24 Jun 2010 - 8:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कसं वाटणार रेवतीताई, एका गरीब पोस्टडॉकची करूण कहाणी आहे गं ती! ;-)
(सायकलवाली) अदिती
24 Jun 2010 - 8:46 pm | रेवती
असं असेल तर मग मलाही चानस आहे 'मूळ' नावाचे विडंबन करायचा!
आज नेमका घाईगर्दीचा दिवस! बघते दुपारी जमलं तर.
रेवती
25 Jun 2010 - 10:01 am | युयुत्सु
वेळीच विचार करा! माझा एक वर्ग मित्राने दूर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर Maine मधून astrophysics मध्ये पीएच्डी केलं आणि आता unix programing करून सुखाचे जीवन जगत आहे.
दूसरा वर्गबंधू डिपार्टमेंट टॉपर. ईश्वराचा लाडका पुत्र. पार्टिकल फिजिक्स मध्ये पीएच्डी केली. पण त्याला एक दिवस साक्षात्कार झाला की जीवनाचं अंतिम सत्य पार्टिकल फिजिक्सच्या इक्वेशन्स मध्ये नसून moving averages सारख्या सोप्या इक्वेशन्समध्ये दडलेलं आहे. त्याच्या गुज्जु रक्ताने त्याला स्टॉक मार्केट्च्या वाटेवर अलगद आणून सोडलं. तो पण आता सुखात आहे.
अशा किती गोष्टी सांगू...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
24 Jun 2010 - 8:44 pm | मुक्तसुनीत
(चूळ)
एकाच कट्ट्यावर बसून
आम्ही पिंकायचो
तो गुठखा खात असायचा अन
मी मशेरीवर चूळ भरायचो
मुखरस सांभाळत
पिंकत असताना खोड्या काढताना
मुखरस तोंडात असंच तासभर घोळवायचे
दोघेजण मिळून जमीन "रंगवायचो"
सायटींवर भरलेल्या चुळांमुळे
कधीतरी तो संपादक झाला
मी मात्र आहे त्याच गुठख्यावर
चुळा भरत ... तास न तास
24 Jun 2010 - 8:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा ...
आता मूळ, तूळ ... राहिले आहेत. ;-)
अदिती
24 Jun 2010 - 8:50 pm | मुक्तसुनीत
शिवाय हेही शिल्लक आहेत :
शूळ (पहा : पोटशूळ , इनो वगैरे)
धूळ
कूळ (ऋषि(केशा)चे कूळ , नदीचे मूळ वगैरे)
25 Jun 2010 - 1:50 am | बिपिन कार्यकर्ते
कोणीतरी सूळ टाका रे !!!!!!
बिपिन कार्यकर्ते
24 Jun 2010 - 8:46 pm | शुचि
=D> =D> =D>
मशाल्ला!! क्या बात क्या बात!!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
24 Jun 2010 - 8:47 pm | चतुरंग
पब्लिक सुटलंय आज! ;)
(माणिकचंद)चतुरंग
24 Jun 2010 - 11:14 pm | युयुत्सु
भन्नाट! हे मूळ कवितेचं विडंबन की विडंबनाचं विडंबन?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
24 Jun 2010 - 11:17 pm | प्रभो
मुसुशेठ...मस्तच!!
24 Jun 2010 - 8:47 pm | शुचि
आदिती छान जमलय विडंबन. :)
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
24 Jun 2010 - 8:48 pm | चतुरंग
(सायकलींची पाडापाडी खेळलेला)चतुरंग
24 Jun 2010 - 8:51 pm | गणपा
जबरा
वार्षिक विडंबन दिन जोरात चालु आहे.
24 Jun 2010 - 8:58 pm | घाटावरचे भट
वा वा...
24 Jun 2010 - 9:04 pm | प्रभो
लै भारी......सायकलची धडकाधडकी आठवली... आठवड्याला ४ स्पोक्स तरी बदलावे लागायचे. :)
24 Jun 2010 - 10:13 pm | विसोबा खेचर
लै भारी, चालू द्या.. :)
24 Jun 2010 - 11:31 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता, विडंबन, विडंबन^२ .... सगळंच दणक्यात!!!
बिपिन कार्यकर्ते
24 Jun 2010 - 11:34 pm | राजेश घासकडवी
:)
24 Jun 2010 - 11:38 pm | भडकमकर मास्तर
अप्रतिम चाल्लंय ..
मस्त
24 Jun 2010 - 11:58 pm | अडगळ
पायात पाय घालून
आम्ही पाडायचो.
कधी एकेरी पट काढायचो ,
कधी लांगेत बोटे घालायचो.
लंगोट घालताना,
माती मळताना, थंडाई गिळताना
असंच आयुष्यभर लोळायचं ,
एकमेकांना हलकेच बजावून सांगायचो.
गादी वरच्या नुरा खेळून कधी
त्याच्या दारात बी गाडी आली,
मी मात्र मारत आहे त्याच पेठांत
चकरा , ही तालीम ते ती तालीम
24 Jun 2010 - 11:58 pm | चतुरंग
एकदम भारी!! :) =D>
(स्वतंत्र धाग्यात टाका ना राव!)
(रुस्तम ए मिपा)चतुरंग
25 Jun 2010 - 6:03 am | सहज
छान कविता केलीस!
25 Jun 2010 - 5:17 pm | अवलिया
जोरदार हो दुर्बिणवाल्या बै
--अवलिया