मदवल माया थोली ले..

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
21 Jun 2010 - 6:48 pm

डिस्क्लेमर: ही कविता माझी नाही. कुणाची ते माहित नाही. कुणास माहित असल्यास सांगावे. तसेच काही शब्द चुकले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण लहान असतांना केव्हातरी पाठ झालेली आहे. मला वाटतं याचे कमीत कमी एक आणखी कडवे आहे.. पण काही केल्या आठवत नाहीये.
***
संदर्भः ही कविता म्हणजे कृष्णाच्या एका गोकुळातल्या बोबड्या बोलणार्‍या मित्रानं मांडलेली भोळी पण प्रेमळ तक्रार आहे. त्यामुळे अगोदर बोबड्या बोलीतच लिहितो. खाली समजण्यासाठी साध्या भाषेत लिहिलेले आहेच! जमले तर माझ्या (भयानक) आवाजात इस्निप्स वर टाकून इथे लिंकेनच! ;)
***

दाय बा तित्ना, अता मी उत ना, थंदत तुजी नाही बली ले..
तिती तिती उपताल थांदू दोविंदा, मदवल माया थोली ले..

एतदा हली, दवल्याधली दहीदुध थाया देलो ले..
थालेत दोपाल पलून देले मला पतलून थेवलं ले..
थेवलं तं थेवलं.. बुदुबुदु माल्लं.. मद मी मुलुमुलु लल्ला ले..
तिती तिती उपताल थांदू दोविंदा, मदवल माया थोली ले..

एतदा हली, दमुनातिली पानी प्याया देलो ले..
थालेत दोपाल पलून देले मला धत्लुन देल्लं ले..
देल्लं तं देल्लं.. तोंदले फुतले.. ताते लुतले.. मद मी मुलुमुलु लल्ला ले..
तिती तिती उपताल थांदू दोविंदा, मदवल माया थोली ले..

================

जाय बा कृष्णा, आता मी उठं ना, संगत तुझी नाही बरी रे..
किती किती उपकार सांगू गोविंदा, मजवर माया थोडी रे!

एकदा हरी, गवळ्या घरी दही-दूध खाया गेलो रे..
सारेच गोपाळ पळून गेले मला पकडून ठेवलं रे..
ठेवलं तं ठेवलं.. बुदुबुदु मारलं.. मग मी मुळुमुळु रडलो रे..
किती किती उपकार सांगू गोविंदा, मजवर माया थोडी रे!

एकदा हरी, यमुनातीरी, पाणी प्याया गेलो रे..
सारेच गोपाळ पळून गेले मला ढकलून दिलं रे..
दिलं तं दिलं.. टोंगळे फुटले.. काटे रुतले.. मग मी मुळुमुळु रडलो रे..
किती किती उपकार सांगू गोविंदा, मजवर माया थोडी रे!

राघव

अद्भुतरसकविताबालगीत

प्रतिक्रिया

सहज's picture

21 Jun 2010 - 6:54 pm | सहज

त्युत!

अवलिया's picture

21 Jun 2010 - 6:55 pm | अवलिया

तह्मत अहे

अरुंधती's picture

21 Jun 2010 - 7:12 pm | अरुंधती

थान तविता! आवल्ली! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jun 2010 - 7:16 pm | बिपिन कार्यकर्ते

अलेच्चा!!! बगायची ल्हायलीच होती... थान आहे.

बिपिन कार्यकर्ते

यशोधरा's picture

21 Jun 2010 - 7:23 pm | यशोधरा

कसली गोड कविता आहे! :)

मुक्तसुनीत's picture

21 Jun 2010 - 7:24 pm | मुक्तसुनीत

कविता गमतीशीर.

वरील काही प्रतिक्रियांमधे काही अन्-इंटेन्शनल कॉमेडीजसुद्धा आहेत :-)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

21 Jun 2010 - 9:56 pm | भाग्यश्री कुलकर्णी

बहुतेक हा काव्यप्रकार "नामदेवाचा बोबडा" ह्यातला आहे.कुत्ना थमाल रे थमाल अपुल्या गायी.अशी काहीशी सुरवात असलेला नामदेवांचा बोबडा आठवतो आहे.

मस्त कलंदर's picture

21 Jun 2010 - 10:07 pm | मस्त कलंदर

हुश्श!!! खाली नीट बोलीतली कविता टाकलीय.. मला वाटले मोकलाया दाही दिशा पार्ट टू आली की काय??

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jun 2010 - 10:14 pm | बिपिन कार्यकर्ते

तुम्ही एका महान जालिय कवीचा अपमान करताय... मोकलाया ही फारच उच्च होती.

बिपिन कार्यकर्ते

राघव's picture

21 Jun 2010 - 11:54 pm | राघव

माझं तर ते वाचता वाचताच फेफरं निघालेलं होतं! :D

राघव

राघव's picture

21 Jun 2010 - 11:55 pm | राघव

सर्वांचे मनापासून आभार!

राघव

पुष्करिणी's picture

22 Jun 2010 - 8:25 pm | पुष्करिणी

थविता एकद्म गोगोद आनि मत्थ आहे, आव्ल्ली
पुष्करिणी

विसोबा खेचर's picture

22 Jun 2010 - 9:03 pm | विसोबा खेचर

छान रे राघवा..

तात्या.

मदनबाण's picture

23 Jun 2010 - 11:37 am | मदनबाण

अले वा... चान !!! :)

मदनबाण.....

"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson