मै सोला बरसका

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
20 Jun 2010 - 8:54 am

लॅच काढुन मी हॉल मधे प्रवेश केला.
स्वयंपाक घरातुन आवाज येत होता.
कुटुंबाचे मैत्रीणीबरोबर फोन वर बोलणे चालु होते.
वाक्य कानावर आलो.
तिथेच थबकलो.
.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

"अग ह्यांच्याबरोबर कुठे जायचे म्हणजे संकटच असते"
.......
"अग, काल एका लग्नाला गेले होते. हे ऑफिसमधुन थेट आले. जरा उशिराच आले. आल्या आल्या ह्यांच्या फॅन क्लब ने घेराव घातला. साधारण १५ जणांचा ग्रुप होता. त्यातल्या एकाने प्रश्न विचारला. ह्यांनी उत्तर दिले. त्यातले ६ जण डोळ्यात पाणी येइपर्यंत हसले. बाकी सर्वजण प्रश्नार्थक मुद्रे मधे."
....
"चार धामाला येणार का? असा प्रश्न होता."
............
"उत्तर? अरे मला माझ्या तीन धामाला पुरेसा न्याय देता येत नाही हल्ली. आणि तु चार धामाचे बोलतोस? आणि तीन धामाला बोलताना बोटांच्या अ‍ॅक्शन ने अवतरण चिन्हे. आता ह्यात हसण्यासारखे काय ते तु मला सांग बघु."
.........................................................................................
.........................................................................................

शी. काय बाई चहाटळपणा. तु म्हणतेस तेच खरे. पुरुषांचे वय १८ नंतर वाढतच नाही.आमच्या ह्यांचे तर १६ लाच थांबले आहे. तु कसला तरी शब्द वापरतेस? काय ग तो?
...........................................
परत एकदा सांग.
...........................................
पेरिनियल डीझायर टु विझिट पबर्ट मॅच्युरिटी.
........................................................................................
........................................................................................
अग पण?
........................................................................................

"नाही ग. मला कळते. ऑफिस मधे एवढे टेन्शन असते. विरंगुळा हवा असतो. पण ज्यांना हे कळत नाही त्यांचा प्रॉब्लेम होतो ना? कळल नाही म्हणुन चरफडतात. मला छळतात. मला अर्थ विचारतात. मला तरी कुठे सर्व समजते. आणि समजायलाच पाहीजे ह्याचा नाद मी पहील्या एका वर्षातच सोडला होता. पण ही मंडळी ह्यावर विश्वास ठेवत नाहीत, कट्कट मेली."
.........................................................................................
.........................................................................................

"कळले नाही म्हणुन स्वतः ला 'लेसर ह्युमन" समजायचे? आणि बोलणार्‍याचा राग करायचा? कमाल आहे."
.........................................................................................

"हां. आज तेच करते. घरी आल्यावर तु म्हटल्यासारखे स्पष्ट सांगुनच टाकते."
मी हळुच दरवाजा बंद केला.बाहेर गेलो आणि बेल दाबली.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

20 Jun 2010 - 9:44 am | शिल्पा ब

बरं!!! म्ह्णजे पुरूषांच मानसिक वय फारसं वाढत नाही असं म्हणायचं आहे असं मला वाटलं...पण तरी तुमचे लेख क्रिप्टिक का काय असतात त्यामुळं कदाचित मला कळलंय ते चुकीचंही असू शकतं...इतरांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

टारझन's picture

20 Jun 2010 - 10:23 am | टारझन

=)) =)) =)) =)) =)) च्यायला प्रभु ... बाबा __/\__

बाकी आज संध्याकाळचं काय ? फोन कराल काय ? , त्यानुसार मग सुत्र हलवायला :)

- चारधामयात्री

सहज's picture

20 Jun 2010 - 2:53 pm | सहज

कोशीश करके देख ले, दरिया सारे, नदिया सारी,
दिल की लगी नही बुझती, बुझती है हर चिंगारी

सोला बरसकी बाली उमर को सलाम
ऐ मास्तर तेरी क्रिप्टिक नजर को सलाम

मनिष's picture

20 Jun 2010 - 9:37 pm | मनिष

नाही कळले. इथे किंवा व्यनि ने सांगणार का?