परवा कोल्हापूरला गेल्तो...
जाताना, प्रवासातच, आठवणींची जुळवाजुळव करून ठेवली होती...
कोल्हापुरात जायचं म्हटलं, की मला बर्याच वेळा `सत्यवादी' आठवतो...
ते तीनचार रंगाचे, उभे पट्टे असलेलं पहिलं पान, आणि त्यावरच्या मस्त मथळ्यांच्या बातम्या...
त्यातले खास कोल्हापुरी शब्द... ते आठवतच सकाळी कोल्हापुरात उतरलो.
रेस्ट हाऊसवर गेलो, आणि जस्ट फ्रेश होऊन भायेर पडलो.
मस्त पाऊस पडून गेल्ता... हवा बी लई गार!!
वाटेवर एका रिक्षाला हात केला, आणि आत बसत, `घुमीव' म्हणून सांगिटलं!
पयले घेटली, शिवाजी उद्यमनगरात...
फडतरेची मिसळ चापली.
ल्हानपनी, कोल्हापुरात आलो, की सकाळी अंबाबाईला जायचो.
ते आटवलं, आनि मिसळ संपताच अंबाबाईचं दर्शन घेटलं...
शनि अमावस्या म्हणून बाजूच्या शनीच्या देवळात गर्दी व्हती, म्हंताना अंबाबाईचं दर्शन लई `निवांत' झालं...
पुन्हा भायेर आलो, रिक्शात बसलो...
आमची रिक्षा निगाली...
मागं, एक खून खटला कोल्हापुरात लई गाजला व्हता, तवा, रिक्षाच्या मागं, `नाम्या बगतूस काय, घाल गोळी' असं कायतरी लिव्हलेलं वाचलं व्हतं...
आजपन आसं कायतरी बगायला मिळावं, म्हणून माजी नजर भायेर भिरभिरत व्हती.
म्हंताना रिक्षाच्या मीटरकडे लक्ष न्हवतं.
मदीच कवातरी, रिक्षावाला `सॉरी' म्हनला, आनि मी नुस्तं `हा' म्हनलो. म्हंताना त्यानं रिक्षा थांबिवली.
दोन मिन्टांनी कुनीतरी यून त्याच्या बाजूला कोपर्यात बसला, आनि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
मंग माजं कानबी तिकडंच लागलं. आटवनी जाग्या झाल्या, आनि मी आयकू लागलो...
... फीर फीर फिरलो, आनि धा-साडेधाला साने गुर्जीत आलो, आनि रिक्षा सोडली...
ब्यागेतून डायरी काहाडली, आनि, त्यांच्या गप्पांतले, कानात साटवलेले सगळे शब्द पयले लिहून काडले.
वरती झक्कपैकी मथळा टाकला...
कोल्हापुरी तडका!!!
- वांड
- भावा
- काटा किर्र
- जाग्यावर पलटी
- नाद खुळा
- शुन्य मिनीटात आवर
- रिक्षा फिरवू नकोस
- लई भारी
- जगात भारी
- नाद न्हाई करायचा
- निवांत
- तानुन दे
- इस्कटलेला
- डोक्यावर पडलायास का ???
- चक्कित जाळ
- आबा घुमिव !!!
- वडाप
- काय मर्दा
- तर्राट पळालास बघ
- काय गुढघ्यावर पडलास काय ??
- शाळा करायलास काय?
- ट्येमका लागलाय
- पेटलास की
- कीशात नाही आना, आणि मला बाजीराव म्हना..!
- चिरकुट
- घुमिव की पिट्टा!
- चहात दही !
- खटक्यावर बोट.. जाग्यावर पलटी !
- एकशरे काढ़लास काय ?
- आम्बा पाडला
- पुडया सोडू नकोस
.... लई झ्याक!!!
प्रतिक्रिया
19 Jun 2010 - 12:50 pm | मी-सौरभ
अर्धवट संपवल्यासारखा .......
-----
सौरभ :)
19 Jun 2010 - 1:53 pm | विनायक पाचलग
एका साईटीवर या सगळ्या शब्दांची डिक्शनरी हाये म्हणे
असो
लेख लैच गंडलाय
प्युअर कोहापुरी
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
19 Jun 2010 - 5:26 pm | परिकथेतील राजकुमार
खुप छान आणि विचारपुर्वक लिहिलेला लेख. दिनेश राव तुमची प्रतीभा अफाट आहे. तुमच्यावर होणारी टीका ही केवळ व्यक्तीगत ईर्षेपायीच होते आहे यात शंका नाहि. तरी तीकडे दुर्लक्श करुन असेच लिहित रहा. पुलेशु.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
19 Jun 2010 - 3:27 pm | बिपिन कार्यकर्ते
मला लेख आवडला. कोल्हापुरी भाषेत वाचायला मजा आली. अमान मोमिन यांची आठवण आली.
बिपिन कार्यकर्ते
19 Jun 2010 - 3:50 pm | jaypal
ह्या तड्क्याचा ठसका लागायचा न्हाई पावनं :T
एक, दोन श्या देतो बाकी भर घालाया हाइत की हितली वांड टाळकी, ;)
रांड्या , शाहु***च्या
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
10 May 2012 - 3:11 pm | बॅटमॅन
>>शाहु***च्या
ही शिवी ऐकून अस्लं कळायचं बंद झाल्तं मर्दा, म्हन्लो तेला काय सांगायलैस खुळ्या ***च्या. त्यो म्हन्ला अक्ख्या कोल्लापुरात अशेच म्हंत्यात. तेजायला असली शिवी म्हनुन सांग्तो, काटाकीर्र बगा. कॉलेजात फेमस झाली लग्गेच!
अनवांतर: "*घाण" ही देखील एक अस्सल शिवी आहे. ती ऐकली/दिली की कान कसे तृप्त होतात.
10 May 2012 - 3:36 pm | गवि
पिसाळलंय बॅट्या तिच्यायला खरं एकदम अस्सल क्वल्लापुरी बोलायलंय भुरटं...
19 Jun 2010 - 3:54 pm | मदनबाण
हिंदुस्थान बेकरीत काही खरेदी केली नाय वाट्ट... आणि बहिर शेठ व कटके यांच्याकडचं अत्तर बी लयं भारी अस्तया...
जेवताना कोल्हापुरी लोक सावकाश होउंदे च्या जागी शिस्तीत होउंदे असं बी म्हणत्यात.
मदनबाण.....
"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg
4 Aug 2010 - 5:16 am | बन्ड्या
काहीतरी घेण्यासारख तरी लिवायचस..
आमन मोमीन चा चाह्ता
बन्ड्या