हे तुमचं लिखाणबिखाण
गोष्टीबिष्टी, लेखबिख, कविताबिविता
हे सगळं ठीक आहे
चांगलंच आहे उदाहरणार्थ
चंद्र, नद्या, पक्षी, फुले, निसर्ग
पहिला पाऊस, आईची माया, माणुसकी
फुटपाथवरची म्हातारी, प्रेयसीची आठवण, फाटका झगा
जन्म, मृत्यू, प्रेम, स्वार्थ, मैथुनही
गडकर्यांपासून कोलटकरांपर्यंत
दासू वैद्य, वर्जेश इश्वरलाल सोळंकी
मध्ये विंदाबिंदा, बाकीबाब, पाडगावकर आणि कुसुमाग्रज
सगळे झाडून कवी झाले बघा
गाडगीळ, गोखले, माडगूळकरांपासून
गवस पेठ्यांपर्यंतच्या कथा घ्या
आपट्यांपासून महाजनांपर्यंत
कादंबर्या घ्या
दोस्तोवस्की घ्या, टॉलस्टॉय घ्या, स्ट्रिंडबर्ग घ्या
लोकांना माहिती असलेले तर घ्याच, पण माहिती नसलेले आधी घ्या
वैचारिक लेख घ्या, समीक्षणं घ्या, जीव तोडून घातलेले वाद घ्या
वामकुक्षाळ च्युईंगमपासून केसफिस्कार मेंदूखाजेपर्यंत
सगळं तुमचं साहित्य - तुमचं चिरंतन, अजरामर साहित्य घ्या
आणि त्यानी समृद्ध वगैरे केलेली तुमची आयुष्यं घ्या
परिसंवादांत जुन्या गहिवरांबरोबर नवी पालवीही कुरवाळून घ्या
कलेनं माणसाच्या जीवनाला कसा अर्थ आणला हो म्हणून
मिरवणुका काढून त्यात मूठभर गुलालही उधळा वाटल्यास
आणि मग थकून जमिनीवर पडाल जेंव्हा डोळे मिटून
आकाशात एकच मोठा डोळा उघडावा तसं
विक्राळ गगनभेदी आयुष्य दिसेल क्षणभर
आपल्या कोट्यावधी रक्ताळलेल्या हातांनी
तुम्हाआम्हांला कुस्करणारं, कुरवाळणारं
आणि तुमच्या अजरामर वगैरे साहित्याच्या छाताडवर
चिखलतुडव नाचत खदाखदा हसणारं
दचकाल तेंव्हा क्षणभर स्वतःशी रिते होऊन संपूर्ण
संभोगानंतर होता तसे हुबेहूब विरक्त
खाडकन डोळे उघडून बघाल
आपले हस्तमैथुनी दुबळे हात
त्यांतील अशक्त लेखण्यांसह
कापून टाकावेसे वाटतील तुम्हाला
तुमचे हात
हे होईल, उद्या किंवा परवा नक्कीच
तोवर चालू द्या तुमचं
लिखाणबिखाण.
प्रतिक्रिया
18 Jun 2010 - 7:07 am | पाषाणभेद
कवितेचा उत्तरार्ध वास्तवतेची जाणीव करून देतो. एखादा लेखक / कवि त्याच्या कलाकृतीवर प्रेम करतो. त्यात तो आकंठ बुडतो. त्याला तेच योग्य वाटू लागते. बाह्यजगाला तो विसरतो. जगाची चालरीत, इतर लोकांची त्याच्याप्रती वागणूक तो विसरतो. अन जेव्हा वास्तवाचे भान येते तेव्हा कदाचित वेळ झालेला असतो. बाह्यजगाला त्याच्या कलाकृतीशी काहीच घेणेदेणे नसते. त्या वेळी त्याला केवळ इतरांसारखेच जीवन जगणे भाग पडते. तो कलाकृतीशी फारकत घेवू इच्छीतो.
सन्जोपरावांनी हेच अगदी योग्यरित्या कवितेत मांडलेय. प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत असे अनुभव त्याला काही कालावधीपुरते तरी येवू शकतात. जो यातून बाहेर पडतो तो एकतर सिदहस्त कलाकार गणला जातो किंवा एक सामान्य माणूस म्हणून तो तयार होतो.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
18 Jun 2010 - 8:07 am | सहज
मेणकट मेहरबानी
ललीत काफीरबानी
मेजवानीश्च मितहारी
नोकरीचाकरी लै भारी
पॉझिटीव्ह जीए चाय्व्ही
जळजळांग हे लाहीलाही
हा तर मिभो काय म्हणत होते गुप्त संदेश वगैरे वगैरे
---------------------------------------
नॉट एव्हरीथिंग दॅट ग्लिटर्स इज गोल्ड, नॉट एव्हरीबडी नेम्ड हुहुहुहु इज हीए.
18 Jun 2010 - 8:38 am | टारझन
=)) =)) =))
=)) =)) =))
हरकाम्या इल्ल्यास
सुकवता है कपडे पचास
नखरे तेरे , तेरे पास
मे म्हैने मे कैसे ये उपास
लोफर कही का गटर की पैदास
जमलं जमलं ... आमाला बी जमलं =))
-- सर्जेराव
18 Jun 2010 - 12:35 pm | विनायक प्रभू
सहज रावांनी तर पुरुषांना सुद्धा ते दिवस असतात असे क्रिप्ट मधे सुचवले आहे की काय?
18 Jun 2010 - 12:52 pm | अवलिया
क्या बात है ! सहज अगदि मनातलं बोललास...
नेत्र लागले रे पैलतीरी.... असे झालेले दिसतेय.
--अवलिया
18 Jun 2010 - 4:41 pm | भडकमकर मास्तर
सहजकाकांनी कमीतकमी वाक्यात मोठा संदेश दिलेला पाहून आनंद वाटला...
सह्हजकाका झिन्दाबाद...
पॉझिटीव्ह जीए चाय्व्ही
या ओळींना विशेष दंडवत __/\__ :)
ही कविता वाचून
अमर्त्य सेना वसंतसेना
सेनासमथिंग कलहारी
अशा काही इलिनॉईच्या दुगाण्या आठवल्या
18 Jun 2010 - 8:20 am | आनंदयात्री
अले व्वा .. सरांना कित्ती कित्ती लेखक अन कवी माहिती आहेत नै !!
सहीच आहेत सर !!
18 Jun 2010 - 10:12 am | विजुभाऊ
आंद्याशी सहमत
हाटेलातल्या मेन्यू कार्डावरच्या पदार्थांची लिस्ट लिहुन झालीय
लेखकांच्या नावाची लिस्ट हे देखील साहित्य मानौन घ्यावे .
असो...... लेखणीच्या उतारवयामुळे हे असे व्हायचेच
अवांतरः कधीकाळी भविश्यात उत्खनन झालेच तर शौचालयातील भिंतीवरच्या मुक्तकाना सुद्धा शिलालेखांचा दर्जा मिळेल
18 Jun 2010 - 8:25 am | प्रकाश घाटपांडे
थोडक्यात जव्हर टंकनी चालतीय तव्हर काही बी लिवा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
18 Jun 2010 - 8:53 am | अक्षय पुर्णपात्रे
समजली. हस्तमैथुनाने काहीतरी वाकडे होते असा गैरसमज आहे. मुक्तक वाचून तो गैरसमज समज वाटला.
18 Jun 2010 - 9:07 am | प्रकाश घाटपांडे
हस्तलाघव समजुन वाचावे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
18 Jun 2010 - 4:08 pm | अक्षय पुर्णपात्रे
आत्ममैथुन समजून पुन्हा वाचले. (हस्तलाघवही चपखल आहे पण आत्ममैथुनातला सच्चेपणा त्यात नाही.)
18 Jun 2010 - 4:24 pm | बिपिन कार्यकर्ते
कंसाशी सहमत आहे. आत्ममैथुन म्हणजे कसं संशयाला जागा उरत नाही... हस्तलाघव थोडं ऑल इन्क्लुझिव होईल. ;)
बिपिन कार्यकर्ते
18 Jun 2010 - 5:50 pm | अक्षय पुर्णपात्रे
मुक्तक या लेखनप्रकारात अपेक्षित असलेला ध्येयहीन स्वच्छंद प्रस्तुत लेखनात आढळत नाही. तेव्हा प्रस्तुत लेखनप्रकारास आत्ममैथुन असे नाव देणे योग्य ठरेल काय?
18 Jun 2010 - 7:04 pm | रामदास
हस्त नक्षत्रावर केलेले ते असा तर अर्थ नसेल ना ?
19 Jun 2010 - 8:37 am | प्रकाश घाटपांडे
नक्षत्रफलित 'सौख्य' असले म्हणजे झालं.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
18 Jun 2010 - 8:57 am | नीलकांत
मौनावरचे व्याख्यान आवडले. :)
- (अज्ञ) नीलकांत
18 Jun 2010 - 9:08 am | मुक्तसुनीत
गोलपिठा मधल्या "त्या" (कु?)प्रसिद्ध कवितेची आठवण करून देणारी कविता - मात्र "त्या" कवितेमागच्या एकंदर पार्श्वभूमीचा अभाव असणारी.
आणि मग थकून जमिनीवर पडाल जेंव्हा डोळे मिटून
आकाशात एकच मोठा डोळा उघडावा तसं
विक्राळ गगनभेदी आयुष्य दिसेल क्षणभर
आपल्या कोट्यावधी रक्ताळलेल्या हातांनी
तुम्हाआम्हांला कुस्करणारं, कुरवाळणारं
आणि तुमच्या अजरामर वगैरे साहित्याच्या छाताडवर
चिखलतुडव नाचत खदाखदा हसणारं
या जातीचा अनुभव प्रस्तुत कवितेच्या पहिल्या परिच्छेदात आलेल्या (आणि न आलेल्या) काही नावांनी केलेल्या लिखाणामधे आल्याचे काही लोक म्हणू शकतात. अर्थात दुसर्यांना आलेल्या अशा अनुभवाचे वर्णन "रीकींग ऑफ काँडेसेंशन" अशा शब्दांत करता येईलच.
कवितेच्या शेवटच्या परिच्छेदात आलेल्या "प्रोक्लेमेशन"चे अजून दिव्यदर्शन प्रत्यक्षांत येऊ न शकल्याने (निदान आज-उद्या-परवा तरी) चार शब्द वाचेन असे म्हणतो. गुलाल उधळणे, कुरवाळणे इत्यादि गोष्टी आजवर जमल्या नाहीत पण आता काळ थोडा राहिलासे वाटते.
सरतेशेवटी, शब्दांच्या देवघेवीच्या व्यवहाराचे वैयर्थ वर्णन करण्याकरता, त्याला चूड लावायला पुन्हा शब्दांचाच आश्रय घ्यावा लागतो हे पाहाताना अंमळ वाईट वाटले खरे. जर का एकंदर ज्ञानाच्या प्रक्रियेची, वाचन-लिखाण-वेव्हाराची फलश्रुती अशी "रिती" वाटत असेल तर त्याबाबत येणारे छद्म, त्याबद्दल बोलताना येणारे शब्दांमधले (!) विष कितपत अर्थपूर्ण ठरते ? शतकानुशतके चालत आलेल्या प्रक्रियेला एखाद-दोन परिच्छेदांमधे कचर्यामधे टाकताना त्याबद्दलच्या नकाराखेरीज नवे कसले सत्यदर्शन घडताना येथे दिसत नाही.
18 Jun 2010 - 12:43 pm | प्रदीप
!
18 Jun 2010 - 5:11 pm | भोचक
मुसूंशी संपूर्ण सहमत.
(भोचक)
जाणे अज मी अजर
21 Jun 2010 - 1:58 pm | विजुभाऊ
मुक्त सुनीत काकांचे कौतूक करावे तेवढे कमीच होईल.
एरव्ही फारसे ल्हिणर नाहीत पण संजोप काकांचे काही असले की त्यांची प्रतिक्रिया हमखास येतेच.
फक्त प्रश्न असा पडतो की स्वतःची उत्तम अशी प्रतिभा असताना अशी ही आरती का गाता?
21 Jun 2010 - 5:19 pm | मुक्तसुनीत
माझ्या प्रतिक्रियेत आरती नेमकी कुठे दिसली ते कळवले तर आनंद होईल. बाकी तुमच्या प्रतिक्रियेमधे नक्की काय आहे ते वेगळे सांगायची गरज नाही. तुमचा जो काही पर्सनल अजेंडा आहे तो पुढे करण्याकरता इतरांचा उद्धार करू नका असे सुचवतो.
22 Jun 2010 - 7:50 pm | विजुभाऊ
पर्सनल अजेन्डा काहीच नाही. आणि कशासाठी ठेवायचा म्हणे तो तसा?
प्रतिसादातदेखील तुम्ही इतके उत्तम लिहिता..... फक्त ते प्रतिसाद केवळ एखाद्या विषिष्ठ लेखकाच्या लिखाणावरच देत असता. म्हणून ते तसे लिहिले होते. ( एखादा अगदी फालतू लेख आवडला नाही तरी तुमच्या उत्तम प्रतिसादासाठी मात्र तो धागा आवर्जून उघडतो)
असो.
18 Jun 2010 - 9:16 am | ऋषिकेश
(काहिसे भडक) मुक्तक आवडले
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
18 Jun 2010 - 9:28 am | रामदास
एक छोटासा संवाद आहे तो देतो आहे.
हू टॉट यु ऑल धिस डॉक्टर ?
प्रॉम्ट केम रीप्लाय.
सफरींग .
सर ,आयुष्याचे अनुभव सच्चे असतील तर अंताला तुम्ही म्हणता तसे होण्याची काही शक्यता दिसत नाही किंबहुना तसे आधीच झाले म्हणून काही अजरामर कलाकृतींची निर्मीती झाली.
पण सुडो लेखकांच्या आणि वाचकांच्या बाबतीत तुम्ही म्हणत तसे होण्याची शक्यता दाट आहे.
ग्रेस्,खानोलकर,जीए ज्यांनी अनुभवले असतील त्यांना धक्का बसणार नाही पण त्या लेखकांची/कवींची केवळ बेगडी नक्कल लिहून करणार्यांची अवस्था मात्र तुम्ही म्हणता तशी होईलही.
*वर प्लेगचा केलेला उल्लेख आठवणीवर भरोसा टाकून केला आहे. एखादा शब्द इकडे तिकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे मुक्तक आणखी रीफाईन करणे तुमच्या प्रतिभेला सहजशक्य होते असे वाटते.
18 Jun 2010 - 11:14 am | श्रावण मोडक
अर्थातच, रामदासांशी सहमत.
यात फक्त थोडे पु.ल. आणि इतर काही (प्रस्तुत कवितेत यादी नसली तरी पुरेसे सूचक बरेच काही आहे) वाढवले की संजोप रावांना काय म्हणायचे आहे हे बहुदा सापडते.
18 Jun 2010 - 4:20 pm | अक्षय पुर्णपात्रे
सुडो आणि खरे लेखक, वाचक यांच्यात काय फरक आहे?
18 Jun 2010 - 4:26 pm | बिपिन कार्यकर्ते
सुडो आणि खरे लेखक, वाचक यांच्यात काय फरक आहे?
फरक डाव्या उजव्याचा असावा. ;) आय मीन, डावं उजवं करता येण्याच्या ताकदीचा असावा. काय म्हणता? :D
(मध्यम) बिपिन कार्यकर्ते
18 Jun 2010 - 5:57 pm | अक्षय पुर्णपात्रे
स्युडो म्हणजे खोटे. लेखक कदाचित खोटेपणाने लिहू शकतील. (तसे करण्यासाठी अनेक प्रेरणा सांगता येतील. उदा. पुस्तक/ लेखन खपण्यासाठी प्रणयप्रसंगांचे अतिशयोक्त वर्णन वगैरे) पण स्युडो वाचक कोण हे कळत नाही. (नावे फेकण्यासाठी (नेम्सड्रॉपिंगसाठी) कोणी वाचन केल्याचा दावा करत असल्यास ती व्यक्ति (न वाचताच) व्यक्ति खोटे बोलत आहे म्हणजे वाचक नाही.)
18 Jun 2010 - 10:01 am | नील_गंधार
मुक्तक काहिसे भडक आहे.
त्यावर रामदासांची प्रतिक्रिया समर्पक वाटते.
प्रश्न उमटतो तो कविने अशी कविता कोणत्या अवस्थेत केली असेल.
खुद्द कविच अशा विरक्तीकडे चालु लागला आहे काय?
नील.
अवांतर : जाता जाता कविता पुन्हा एकदा वाचलि .कवितेचा दर्जा फार वरचा आहे हे जाणवते.
18 Jun 2010 - 10:02 am | मुक्तसुनीत
कवितेवर भाष्य करणे समर्पक. कवीवर करणे अयोग्य. असो.
18 Jun 2010 - 10:18 am | छोटा डॉन
+१
बाकी आमची कवितेवर बोलण्याची लायकी नाही.
-----
छोटा डॉन
18 Jun 2010 - 11:02 am | नंदन
हा सवाल बहुतेक अनेक प्रतिभावंतांना आजवर पडला असावा. शिवाय, यक्ष-युधिष्ठिर संवादाप्रमाणे उद्याची शाश्वती नसताना आपण अमर आहोत अशा थाटात बेत रचणारे लोक हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे इ. गोष्टी खर्या आहेत. मात्र रोजच्या जगण्यात या आकळलेल्या विश्वाची मर्यादा आपसूक कमी करून घ्यावी लागते - आपण काही थोर लिहित/वाचत आहोत हा भ्रम आणि त्या भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी सरसावलेले काही - हे सारे त्याच वर्तुळात (फार तर वेगवेगळ्या त्रिज्यांनिशी) येत असावेत असं माझं एक वैयक्तिक, अल्प अनुभवांवर आधारित मत.
>>> लोकांना माहिती असलेले तर घ्याच, पण माहिती नसलेले आधी घ्या
--- हे भारीच :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 Jun 2010 - 11:47 am | विसोबा खेचर
जगावं की मरावं हा एकच सवाल.. की झोकून द्यावं स्वत:लाच मृत्यूच्या काळ्याशार डोहात..!
रावशेठ,
फार दिवसांनी एक उत्तम, उच्च दर्जाचे मनस्वी मुक्तक वाचले..
वरीलपैकी काहींच्या 'मुक्तक काहीसे भडक आहे' या मताशी असहमत.. मुक्तक भडक नसून प्रखर वास्तववादी आहे असं मी म्हणेन..
जियो रावशेठ..!
तात्या.
18 Jun 2010 - 12:15 pm | प्रमोद देव
रावसाहेब...एकदम शून्यात गेले? :O
18 Jun 2010 - 12:42 pm | विनायक प्रभू
सहज रावांना प्रतिसाद ऑफ द इयर ह्या असा पुरस्कार द्यावा असे मी अनुमोदन करतो.
18 Jun 2010 - 1:27 pm | गणपा
आज सकाळी झोपेतुन उठल्या उठल्या मित्राच्या सांगण्यावरुन हा धागा उघडला. एक अक्षरही लागल नाही. झोपेच्या अंमलाचा परिणाम म्हणुन सोडुन दिलं.
पण आता हापिसात परत एकदा वाचुन काढल.
वरवर उथळ दिसणार्या आणि बरच अगम्य वाटणार्या या मुक्तकात बराच अर्थ दडलाय.
आवांतर : मास्तरांच्या वरच्या सुचनेला आपलपण अनुमोदन.
अतिआवांतरः शरदीनी तैंचा कवितापण वाचाव्यात का अजुन २-४ वेळा :?
18 Jun 2010 - 3:11 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता हा आपला प्रांत नव्हे हे परत एकदा कळले.
बिपिन कार्यकर्ते
18 Jun 2010 - 3:12 pm | अवलिया
"आपला" हे स्वत:ला की कवीला उद्देशुन?
--अवलिया
18 Jun 2010 - 3:33 pm | भडकमकर मास्तर
जगाला आवडलेले पुस्तक कोणी वाचाच, असे सांगितले आणि ते भिकार वाटले आणि चारचौघांत तसे म्हणायची सोय नसली तर या कवितेतली भावना दाटून येते...
रावांनी नुकतेच वाचून संपवलेले कोणते ओवररेटेड पुस्तक (किंवा लेखक) असेल बरे असा विचार करत आहे....
18 Jun 2010 - 4:34 pm | धमाल मुलगा
आवशींक खांव वरान!
जल्लां हयसर तं पक्का दशावतारीचो खेळ रंगलो असां!
ए रव्या...खंय असां मरें? हयसर झाडार मियां जागा धरुन बसलो असां मरें...
शॉट्ट है भौ.. कविता की धडा की मुक्तक की स्फुट की अस्फुट की काय ते चिवडा-लाडू जे असेल ते खंगरीच!
वर त्याच्यावरचे प्रतिसाद म्हणजे....आहाहा....
एखादी आवडीची व्हिस्की मस्त शरीर पिसासारखं हलकं करेपर्यंत प्यायल्यावर, बाहेर येऊन ठेल्यावरच्या पानवाल्यानं आपली केवळ नजर पाहुनच, न सांगता 'चुना जादा, एकसोबीस तीनसो, कडक रिमझिम डब्बल किमाम..' असं दणदणीत पान लाऊन आदरानं समोर धरावं आणि ते पान तोंडात टाकल्याबरोबर डोक्यात आणि डोळ्यापुढं ठाण्णकन दहा सुर्य चमकुन उतरायला लागलेली धुंदी पुन्हा दसपटीत भिरभिरत चढत जावी तसं काहीतरी झालंय बॉ ह्या धाग्याचं!
आम्ही हौतच हितं पान चघळत!
चालु द्या मंडळी... चालुद्या ;)
18 Jun 2010 - 4:36 pm | वाहीदा
सन्जोप राव,
तुमचा साहिर लुधियानवी तर होणार नाही ना ..
हर एक जिस्म घायल हर एक रूह प्यासी...
निगाहों में उलझन दिलों में उदासी....
जला दो इसे फूँक डालो ये दुनिया...
मेरे सामने से हटालो ये दुनिया
तुम्हारी है तो तुम्ही संभालो ये दुनिया...
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है....
--साहिर लुधियानवी
क्यों जीने के ये मकसद मुझे रिझाते नहीं...
रंगरलियाँ, ऐशो-आराम क्यों मुझे भाते नहीं...
हकीकत मुझे हर एक मंजर में नज़र आती है...
दुनिया के बनाये नज़ारे मुझे नज़र आते नहीं...
रौशनी देने वाले अंधेरे में चिराग ढूढ़ते हैं ...
बेरुखी भरे समंदर में एक बूँद आस ढूढ़ते हैं...
कब के मर चुके जमीर इस दुनिया में...
और वो बाज़ार में आबरू और ईमान ढूढ़ते हैं...
~ वाहीदा
19 Jun 2010 - 9:18 am | आनंदयात्री
>>कब के मर चुके जमीर इस दुनिया में...
>>और वो बाज़ार में आबरू और ईमान ढूढ़ते हैं...
क्या बात है !! जियो !!
21 Jun 2010 - 2:05 pm | विजुभाऊ
प्यासा मधील विरक्तीकडे जाणारा गुरुद्त्त आठविला
प्यासा मधला विरक्तीकडे जाणारा कवी...... हा विरक्तीकडे जाणारा वाटत नाही तर तो नाकर्तेपणाचा उदोउदो करतजाणारा एक निष्क्रीय बांडगूळ वाटतो.
कॉलेजात असताना प्यासा पुन्हा पुन्हा पाहिला होता. त्यावर जोर्दार चर्चादेखील केल्या होत्या. त्यावेळी त्यातला कवी सच्चा वाटायचा
पण आज त्यावर विचार करता असे वाटते की स्वतःचे असे काहीच निर्माण न करणार्याला मोठे का मानायचे?
जगाला फालतू मानणारा हा कवी स्वतः का मोठा आहे हे कधीच सिद्ध करायला तयार होत नाही. शेवटाच्या प्रसंगात तर तो चक्क पळपुटा वाटतो
18 Jun 2010 - 6:20 pm | तिमा
सध्ध्या मिपावरील कवि, लेखक शरपंजरी पडलेले आहेत आणि टवाळ फिरताहेत एकमेकांची पाठ खाजवत!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
18 Jun 2010 - 6:59 pm | शुचि
मुक्तक अतिशय सुंदर आहे. विषण्ण करणारं आहे. पण हेच मुक्तक उलटंदेखील वाचता येऊ शकतं. एका सकारात्मक दृष्टीकोनातून -
आयुष्य रक्ताळलेल्या हाताने सर्वांना -चिमण्या पाखरांपासून ते मानवापर्यंत सर्वांना कुस्करत , कुरवाळत आहे म्हणून "आयुष्य" या जालीम रोगावर उपाय प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार शोधतो आहे. हे लिखाण, कविता, माहाकाव्य, प्रार्थना, कला, प्रेम या गोष्टी या रोगावरचे उपचार.
जसं बायबल मधे म्हटलं आहे " अ फेथफुल फ्रेन्ड इज द मेडीसीन ऑफ लाइफ". प्रेम , भक्ती हे रामबाण औषध आहे या रोगावरचं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 Jun 2010 - 8:34 pm | अडगळ
साहित्य ही आयुष्यावर जगणारी , त्यातले रस शोषून तगणारी परजीवी गोष्ट आहे असे नेमाडेंचे वाक्य आठवते .तेव्हा आयुष्य तर नेहमीच एक पायरी वरच राहणार.
तुकाराम नावाच बिलंदर माणूस तर आधी सगळं आयुष्य शब्दात मांडतो आणि "मज विश्वंभर बोलवितो" म्हणुन शब्द कर्तृत्व (आणि पर्यायाने येणारा अहंभाव पण)पण नाकरतो .कोलटकर तर तुकाराम विकून खिमापाव खातात.परत आयुष्य एक पायरी वरच.
जाता जाता :
बिजेची चंद्रकोर दाखवताना कोणी सांगते कि ति बघ , त्या फांदीच्या मागे . शब्दांचे काम त्या फांदीसारखे.बाकी चंद्रकोर दिसली की झालं.
18 Jun 2010 - 8:38 pm | शुचि
सुंदर, अप्रतिम प्रतिसाद.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 Jun 2010 - 9:30 pm | मुक्तसुनीत
कोलटकर तर तुकाराम विकून खिमापाव खातात
कोलटकरांनी तुकारामावर कविता/भाष्य/भाषांतर यापैकी काही केल्याचे स्मरत नाही ? तुम्हाला दि. पु. चित्रे तर म्हणायचे नव्हते ? चूभूदेघे.
18 Jun 2010 - 11:36 pm | अडगळ
कोलटकरांच्या एकाच कवितेत तुकारामाचा उल्लेख येतो, ती कविता , ज्यात त्यांना पांढर्या दाढीचा प्रेमळ म्हातारा भेटतो.
भिक्षापात्र भटकलो....
19 Jun 2010 - 12:02 am | मुक्तसुनीत
"मुंबईने भिकेला लावलं" ही ती कविता काय ?
बाय द वे ... कोलटकरांनी तुकारामाचे इंग्रजी भाषांतर केलेले आहे.
विकी एंट्री नुसार
His early years in Mumbai were poor but eventful, especially his life as an upcoming artist, in the Rampart Row neighborhood, where the Artists' Aid Fund Centre was located[4]. Around this time, he also translated Tukaram into English.
सो , आय स्टँड करेक्टेड. धन्यवाद.
19 Jun 2010 - 12:09 am | अडगळ
ती च ती कविता.
तुकारामाच्या अनुवादाबाबत काय माहिती नाही , पण कोलटकरांनी जनाबाईच्या अभंगांचे इंग्रजी भाषांतर केलेले आहे .
18 Jun 2010 - 9:38 pm | धनंजय
आत्मनिरीक्षण. प्रत्येकाला करावेच लागते.
नाट्यलेखनाच्या प्रक्रियेबद्दल लेखन (पु. लंचे "नाटक असे बनते" अशा काही नावाचा नात्यमय लेख, विरक्ती-हास्यरस), कवितांच्या प्रक्रियेबद्दल कविता ("ट ला ट री ला री..." बीभत्स-रौद्र रस), चित्रकलेबद्दल चित्रकला (वेलाथ्केथचे "चित्र काढतानाचे आत्मचित्र", शांत रस), वगैरे आहेतच.
मात्र हा बेंबीशोध (बेलीबटन गेझिंग) खुद्दच थोडा स्वयंमैथुनी आहे. "स्वयंमैथुनात काय वाईट आहे" हा श्री. अक्षय पुर्णपात्रे यांचा प्रश्न सुयोग्य आहे. काहीच वाईट नाही. प्रश्न असा असतो, की स्वयंमैथुन-प्रसंगाचा एकला आनंद वितरित करता येतो का? कवी सुचवतात, की नाही. आणि त्या अर्थाने ही विरक्तीची उपमा वापरतात. कवी तरी त्यांच्या बेंबीशोधक स्वमर्दनातली रसनिष्पत्ती वाचकापाशी पोचवू शकले आहेत काय? मला वाटते होय. {अगदी स्वयंमैथुनाच्या चलचित्रणाच्या बाबतीतही विचार करू शकतो. आस्वादाच्या दृष्टीने बघावे, तर प्रेक्षकाला स्वयंमैथुनाची किंवा अन्य कुठली खरीखुरी अनुभूती होईल तरच स्वयंमैथुनाचे प्रदर्शन कलात्मक म्हणता येईल. (स्वमैथुनाच्या कित्येक पोर्नो अतिशय कंटाळवाण्या असतात, अशी माझी अंधुक स्मृती आहे. मात्र 'इ तु मामा ताम्बिएन' सारख्या चित्रपटांत स्वमैथुनाचे सांकेतिक चित्रण बर्यापैकी कलात्मक आहे.)}
कविता वाचनीय आहे. जमेल तोवर लिखाण करत जावे, अशी वाचक म्हणून कवीला विनंती करतो.
19 Jun 2010 - 12:55 pm | रामदास
?????????
21 Jun 2010 - 2:40 pm | राजेश घासकडवी
कविता आवडली. बर्याच जणांनी मुक्तक वगैरे म्हटलं आहे, पण मी कविताच म्हणेन. या कवितेत एक काहीसं भडक, लैंगिक रूपक वापरलं आहे, म्हणूनही काहींन ती भडक वाटली (ते रूपक कळल्यामुळे की केवळ हस्तमैथुन शब्दामुळे ते कळलं नाही)
मला या कवितेचा लागलेला अर्थ असा.
या घनघोर आयुष्याच्या अनुभवरूपी विराट महाकाय सौंदर्यवतीशी संग करण्यात मनुष्य, विशेषतः कलाकार थिटा पडतो. ही तफावत असल्यामुळेच की काय, तो आपलं लेखणीरूपी शिस्न हातात घेऊन हस्तमैथुन करतो. त्यातून जे वांझ काही पाझरतं त्यातून त्याला जीवनाच्या चित्रणाचं समाधान मिळतं. त्याच थेंबांचा, प्रतिमांचा उदो उदो करत तो आत्मसंतुष्ट असतो. सत्य जीवनाच्या जीवघेण्या अनुभुतींशी तुलना केली तर ही केवळ बुजगावण्यांची चित्रं आहेत असं कवीला म्हणायचं आहे. खरं आयुष्य तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाठीवर पाडून *वून जाईल तेव्हाच तुम्हाला यातला फोलपणा जाणवेल. तोपर्यंत चालू द्यात तुमचे पौगंडी पोरखेळ...
थोडक्यात सांगायचं झालं तर 'मोठे व्हा'
21 Jun 2010 - 3:01 pm | धमाल मुलगा
आमचं हे गुर्जी म्हणजे च्यायला अॅरिस्टॉटल आणि मस्तराम ह्यांचं सम-समान मिश्रण आहेत बॉ! ;)
काय ती अगाध प्रतिभा, काय तो दांडगा व्यासंग... काय ती सखोल विचारधारा!!!
धन्य धन्य जाहलो!
21 Jun 2010 - 4:47 pm | अक्षय पुर्णपात्रे
वरील विधान व आमैकाराने (तुमच्या कवीने) वापरलेल्या 'संभोग' या शब्दात सुसंगती नाही. तसे पाहीले तर मूळ लिखाणातच ही सुसंगती नाही. आत्मसाक्षात्करी अनुभव बलात्काराप्रमाणे वाटावा इतका तीव्र, अनपेक्षित, लुळे पाडणारा, इनवेसिव आहे तर अनुभवांती संभोगानंतरचा रितेपणा आहे बलात्कारानंतरची घृणा नाही. आमैकार (तुमचा कवी) लुळा पडावा, सरन्डर करण्यास तयार व्हावा इतका अशक्त आहे काय? तसे असल्यास कलेचा, अनुभवांच्या प्रतिमांचा आधीपासून असलेला हव्यास हा निव्वळ 'ग्रुपी' प्रकारचा वाटतो.
थोडक्यात 'मी मोठा नाही म्हणून जग मोठे नाही'.
21 Jun 2010 - 6:07 pm | राजेश घासकडवी
आमैकार हा शब्दप्रयोग खटकला. इथे या कवितेचा कवी हा आमैकार नाही. मुळात आमै शब्दच कवीने वापरलेला नाही. सर्व कलाकार हे आपल्या कलेच्या 'उत्पादना'साठी सृजनशील (किंवा सर्जनशील - योग्य तो शब्द निवडा) काही करत नसून आपल्या मनांतील कल्पना प्रतिमा आठवून हस्तमैथुन करतात असं कवीला म्हणायचं आहे.
बलात्कार शब्दही खटकला. या अनुभवातली आक्रमकता कवीला अधोरेखित करायची नसून त्या अनुभवाची तीव्रता ही खर्या संभोगाप्रमाणे आहे असं सूचित करायचं आहे. त्या तीव्रतेची तुलना हस्तमैथुनाशी करायची आहे.
21 Jun 2010 - 8:38 pm | अक्षय पुर्णपात्रे
आमैकार हा शब्द अर्थातच लेखकाने वापरलेला नाही.
लेखकाचे लेखनात व्यक्त केलेले मत हा समस्त कलाकारांवर आरोप आहे. हा आरोप लेखक (प्रस्तुत लेखन करून) स्वत:वरही करत आहे. तेव्हा लेखकाच्या लेखनाला 'आत्ममैथुन' किंवा धनंजयने वापरलेला 'स्वमैथुन' हा शब्द लागू पडतो. सिमॅन्टिक्समध्ये न शिरता लेखकाचाच 'हस्तमैथुन' हा शब्दही लागू होतो.
मग या लेखनाला कितपत किंमत द्यावी हा प्रश्न पडतो. हे म्हणजे 'सर्व जग खोटे बोलते' असा आरोप करून मी एकटाच खरे बोलतो असे म्हणण्यासारखे आहे. येथे सोयीस्करपणे मीही जगाचाच भाग आहे या सत्याला विसरले जाते. अशा लेखनातून 'मोठे व्हा' असा निष्कर्ष काढता येणे मलातरी जमणार नाही.
तसे असल्यास तुमच्या प्रतिसादातील 'खरं आयुष्य तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाठीवर पाडून *वून जाईल तेव्हाच तुम्हाला यातला फोलपणा जाणवेल.' या वाक्याकडे कसे पाहावे? खरे जग बलवान आहे, तुम्ही-आम्ही नीट पाहिलेले नाही पण सध्याच या बलवान जगाने माझी इच्छा नसतांना माझे डोळे उघडून माझ्या असहायतेची, अशक्तपणाची जाणीव करून दिली आहे. यास बलात्कार का म्हणू नये. बलात्कारात इच्छेविरुद्ध बलाचा वापर करून मिळेल ते ओरबाडणे असते. येथे जगाने लेखकाचे (किंवा निवेदकाचे) कलेविषयीचा दृष्टीकोनच ओरबाडून घेतला आहे. निवेदक हतप्रभ आहे. तरीही प्रस्तुत संदेश त्याला पोचवावासा वाटतो. का?
थोड्यावेळ हा संभोग हा शब्द मान्यही करू. पण पुढे जाऊन तुम्ही म्हणता
तीव्रतेची तुलना कशाबरोबर का करायची आहे? हस्तमैथुनाच्या प्रतिमेलाच का आठवायचे आहे?
हस्तमैथुन, संभोग या दोन संकल्पनामध्ये एकतर निवेदकाचा अथवा तुमचा गोंधळ होत आहे, असे वाटते.
21 Jun 2010 - 8:57 pm | राजेश घासकडवी
कलाकृती निर्माण करणं भंपक आहे, हे विधान कलाकृती ठरू शकतं, म्हणून ते भंपक होत नाही. आंधळ्यांना कळण्यासाठी कोणी डोळसाने ब्रेल लिपीत 'ब्रेल पलिकडे जग आहे' असं लिहिलं म्हणून त्यावर 'तू हे सुद्धा ब्रेल मध्येच लिहिलंस ना' असा आक्षेप घेणं योग्य नाही.
- प्रतिक्रिया संपादित. सभासदांचे नाव घेऊन लैंगिक उल्लेख टाळावेत.
21 Jun 2010 - 9:12 pm | अक्षय पुर्णपात्रे
एकतर 'कलाकृती निर्माण करणं भंपक आहे' हे विधान अर्थशून्य आहे नाहीतर असे विधान कलाकृती नाही. या दोन्हीतील एक घडू शकते. अर्थशून्य विधान कलाकृती असू शकते. त्यादृष्टीने प्रस्तुत लिखानाकडे पाहीले जावे. किंबहूना अनेकांनी तसेच पाहीले आहे. त्यातून काहींना प्रस्तुत लिखाण भडक, ढोंगी किंवा डोळे उघडणारे वाटले आहे.
.....
- प्रतिक्रिया संपादित. सभासदांचे नाव घेऊन लैंगिक उल्लेख टाळावेत.
21 Jun 2010 - 9:48 pm | राजेश घासकडवी
कलाकृतींना गणिती, तर्कशास्त्रीय व्याख्या लावू नका. आणि अगदी गणित आणायचंच असेल तर 'हे विधान सत्य असलं तरी सिद्ध करता येण्यासारखं नाही' या ग्योडेलच्या विधानाला काय म्हणाल?
- प्रतिक्रिया संपादित. सभासदांचे नाव घेऊन लैंगिक उल्लेख टाळावेत.
21 Jun 2010 - 10:18 pm | अक्षय पुर्णपात्रे
हस्तमैथुनासाठी लागणार्या प्रतिमांमध्ये संभोगाची प्रतिमाही असावी.
कलेला कलेच्या कलाने घ्या. असे मोजू नका, तसे मोजू नका. अशी बंधने असण्याची आवश्यकता नसावी. ग्योडेलचे विधान 'हे विधान सत्य असलं उपलब्ध प्रणालीतील प्रमेये वापरून सिद्ध करता येत नाही' असे असावे.
फरक नाही असे म्हटलेले आढळले नाही. हमै व प्रसं यातील फरक स्पष्ट करतांना हमैचेच कंटाळवाणे डेमॉन्स्ट्रेशन निवेदकाने वाचकांसमोर मांडले आहे, हेच आधीपासूनचे म्हणणे आहे.
21 Jun 2010 - 10:36 pm | राजेश घासकडवी
सभासदांनी आपलं नाव स्वीकारताना असे लैंगिक उल्लेख होऊ शकतील का याचा विचार करायला हवा होता. जर कोणी मेनका असं नाव घेतलं आणि दुसर्या कोणी विश्वामित्र मेनकेविषयी लिहिलं तर ती कोणाची चूक?
माझ्या प्रतिसादांत टारझन या आयडीविषयी एक अक्षरही नव्हतं. टारझन या कॅरेक्टरविषयी ते लेखन होतं. मी जो मुद्दा मांडत होतो त्याला ते उदाहरण चपखल बसत होतं ते संपादित करणं हे मिपाला शोभत नाही.
21 Jun 2010 - 10:43 pm | अक्षय पुर्णपात्रे
सदस्यांच्या नावाच्या आधीपासून ही नावे आहेत. मानव न पाहीलेल्या माणसाचा पौगंडावस्था ते प्रौढावस्था हा प्रवास प्रस्तुत चर्चेत चपखल उदाहरण होते. सदस्यांचे नाव प्रतिसादात आल्यास या नावाचा व सदस्याचा कुठलाही संबंध नाही असे डिस्क्लेमर घालता आले असते. ज्या सदस्यांचे नाव आले ते माझे मित्र आहेत, त्यांच्या नावाचा वापर करून विपर्यास करणे हा माझा हेतू अजिबात नव्हता. श्री घासकडवी यांचाही तसा हेतू नसावा असे वाटते.
21 Jun 2010 - 10:58 pm | धनंजय
उल्लेख आयडींबद्दल वैयक्तिक नव्हता, तर कुमारसाहित्यातील/चित्रपटांतील पात्रांबाबत होता. प्रतिसादांची साखळी वाचता हे अगदी स्पष्टच होते.
वेळेअभावी संपादकाने पूर्ण संदर्भ वाचला नसेल, तर ते (थोडेसेच) क्षम्य आहे. संपादक सर्व सेवाभावी आहेत, आणि मिपाची रहदारी खूपच वेगवान आहे.
एखाद्या सदस्याच्या (व्यक्तिगत अपमान न-करणार्या) संयमित लिखाणाबद्दल इतिहास माहीत असेल, तर कात्री लावायची घाई करू नये, अशी संपादकांना विनंती. सदस्यास स्पष्टीकरण विचारावे, वाटल्यास उत्तर मिळेपर्यंत उपप्रतिसाद थोड्या काळासाठी अप्रकाशित करावा.
21 Jun 2010 - 11:09 pm | Nile
दुजोरा देतो.
-Nile
22 Jun 2010 - 10:29 pm | पांथस्थ
सहमत आहे.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
21 Jun 2010 - 10:56 pm | राजेश घासकडवी
प्रत्यक्ष नाव लिहिल्याने प्रतिसाद संपादित झाला, म्हणून तुम्हाला एका काल्पनिक व्यक्तिरेखेचं उदाहरण देतो. समजा कोणी मनुष्याचा मुलगा केवळ वानरांनी जंगलात वाढवला. तो मोठा झाला, शक्तिमान पुरुष झाला. पण त्याची प्रत्यक्ष स्त्रीशी गाठ वयाच्या बावीसाव्या वर्षी झाली. त्याआधी अर्थातच त्याला संभोग म्हणजे काय हे माहीत नाही. त्याआधी त्याने हस्तमैथुन केलेच नसेल काय? पण जेव्हा त्याला प्रत्यक्ष स्त्री भेटते, व आपण गृहित धरू की ती आक्रमक आहे व पुढाकार घेते. जेव्हा ते प्रत्यक्ष संभोग करतात तेव्हा या काल्पनिक पुरुषाला आत्तापर्यंतच्या हस्तमैथुनातला फोलपणा जाणवणार नाही काय? संभोग व हस्तमैथुन यांच्या अनुभवातील तीव्रतेचा फरक आहे. कवी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.
21 Jun 2010 - 11:10 pm | अक्षय पुर्णपात्रे
केले असावे. पण प्राण्यांमध्ये नर व मादी असे दोन प्रकार असतात. ते एकत्र येतात व त्यांना त्यातून काही एक आनंद मिळतो. हे ज्ञान त्यास किमानपक्षी असावे.
फरकाची जाणीव असूनही दुधाची तहान ताकावर भागवणार्या व्यक्तिची तहान शमतच नाही, असा निष्कर्ष काढला जाऊ नये. पण तो वेग़ळाच मुद्दा आहे. संभोगाचा अनुभव हा हमैपेक्षा निर्विवादपणे आनंददायी असू शकेल पण ते दर्शवण्यासाठी पुन्हा हमैचे प्रात्यक्षिक आवश्यक नाही.
21 Jun 2010 - 11:26 pm | राजेश घासकडवी
वा. थोडी प्रगती आहे. कवीने जी कल्पना मांडली आहे त्यात हे बाह्य ज्ञानच गृहित धरलेलं आहे. बाह्य निरिक्षण व हमै यांच्या बेरजेतून प्रत्यक्ष संभोगाचा अनुभव येतो का? हे म्हणजे दहावीतल्या मुलाला कुत्र्याचं झेंगट पाहून व स्वतःचा हमैचा अनुभव यावरून संभोग म्हणजे काय हे कळण्यासारखं आहे.
प्रात्यक्षिक नाहीच. जे आहे ते असं आहे हेच कवीने म्हटलं आहे.
22 Jun 2010 - 12:15 am | अक्षय पुर्णपात्रे
इतर लेखकांनी लिहिलेले, कलाकारांची कला पाहणे हेही बाह्यज्ञान आहे याचा मात्र निवेदकास विसर पडला आहे. प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर उड्या मारण्यापुर्वी इतर अनेकांनी असा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे व ते त्यांच्या अनुभवासंबंधीच भाष्य करत आहेत याचे भान विसरल्याचे उतावीळ शीघ्रपतन प्रस्तुत लेखनात आढळते, हे मान्य व्हावे.
21 Jun 2010 - 10:22 pm | मुक्तसुनीत
पूर्णपात्रे-घासकडवी यांच्यातली जुगलबंदी पाहून एकछत्री अमलात प्रसिद्ध असलेला (आणि छत्रचामरधारीनीच वापरायचा असलेला ) वाक्प्रचार आठवला : "बावरला टेंपोत !"
21 Jun 2010 - 10:33 pm | धमाल मुलगा
अहो हे तर 'भेटवला गण्गोत' असं झालं ;)
21 Jun 2010 - 10:38 pm | बिपिन कार्यकर्ते
पूर्णपात्रे-घासकडवी यांच्यातली जुगलबंदी पाहून एकछत्री अमलात प्रसिद्ध असलेला (आणि छत्रचामरधारीनीच वापरायचा असलेला ) वाक्प्रचार आठवला : "बावरला टेंपोत !"
मग त्या दिवशी आमची काय अवस्था झाली असेल कल्पना करा. त्यात परत अजून एक गुरूजी होते तिथे यज्ञात तूप ओतायला. ;)
बिपिन कार्यकर्ते
21 Jun 2010 - 10:46 pm | चतुरंग
भिजवला किंचित!! ;)
(टाकीन यज्ञापुर्ते)चतुरंग
21 Jun 2010 - 11:08 pm | Nile
वरील सर्व (खुल्या व छुप्या) संपादकांचा कडकडीत निषेध. उगाच मध्ये येउन मजा खराब करु नका.;) यांचे प्रतिसाद संपादित करा रे कुणीतरी. ;)
-Nile
22 Jun 2010 - 9:46 pm | श्रावण मोडक
च्यायला, भेट. सगळा हिशेब चुकता करतो. ;)
28 Oct 2015 - 4:57 pm | मारवा
मिपा क्लासिक- २
28 Oct 2015 - 5:20 pm | प्रसाद गोडबोले
हे असं काही वाचलं की लिहायची खुमखुमी येते !
आता काहीतरी जिलेबी पाडलीच पाहिजे !
28 Oct 2015 - 5:35 pm | आनंद कांबीकर
लिहिलय भाउ..........
28 Oct 2015 - 5:49 pm | बॅटमॅन
ऑ अच्चं जाल्लं तल!
28 Oct 2015 - 8:39 pm | mystic man
आणि मग थकून जमिनीवर पडाल जेंव्हा डोळे मिटून
आकाशात एकच मोठा डोळा उघडावा तसं
विक्राळ गगनभेदी आयुष्य दिसेल क्षणभर
आपल्या कोट्यावधी रक्ताळलेल्या हातांनी
तुम्हाआम्हांला कुस्करणारं, कुरवाळणारं
आणि तुमच्या अजरामर वगैरे साहित्याच्या छाताडवर
चिखलतुडव नाचत खदाखदा हसणारं
मग स्वतः कशाला लिहायला साहित्याचाच आसरा घेतलात? आणि जीवन काही असं तोंड मुस्कटून बसत नाही. जिथे संधी मिळेल तिथे फुलायलाच बघतं. अगदी रस्त्यावर भीक मागणार्याला पण ढीगभर पोरं असतात. ते जीवनाचं फुलणं नाही काय?
28 Oct 2015 - 8:49 pm | जव्हेरगंज
खतराटच आहे हे!
28 Oct 2015 - 11:41 pm | दिवाकर कुलकर्णी
हे मुक्तक बिकतक
प्रतिक्रिया बित्तीक्रीया
आमच्या टक्कुरिच्या बाहेरच आहे
मर्हाटीला उदंड आयुष्य ,जगाच्या अंतापर्यंत आहे एवडं निछीत