लहानपणी आईच्या तोंडून ही कविता ऐकली होती. पण ती अपूर्ण आठवते. कोणाला जर पूर्ण आठवत असेल तर अवश्य द्यावी. तसेच कवीचे नांव माहित असल्यास ते जरुर द्यावे.
ड्रायव्हर मी होणार
आता मोटारीत बसणार
चहा, बिस्किटे, भजी मजेची
सिगार तोंडी धरीन सदा
भाजी-भाकरी भिकार खाणे
सोडून मी देणार हो s s
ड्रायव्हर मी होणार
आता मोटारीत बसणार |
शेतीभाती उदीम-धंदा
नको नोकरी कोणाची
जमीनजुमला विकून सारा
'फोर्ड' गाडी घेणार हो s s
ड्रायव्हर मी ......
प्रतिक्रिया
16 Jun 2010 - 9:57 am | पाषाणभेद
डायवर व्हवू नगं म्हनावं त्याला. लोकं मुडदा बशीवता त्याचा!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
16 Jun 2010 - 9:57 am | आनंदयात्री
अर्या बाप !! डेंजर हाय !!
-
धम्या डायवर चा मित्र आंद्या क्लिनर