..

प्रियाली's picture
प्रियाली in जनातलं, मनातलं
8 Jun 2010 - 10:35 pm

..

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

8 Jun 2010 - 11:15 pm | शिल्पा ब

सत्यकथा आहे का? प्रेम नसेल तर कर्तव्य म्हणून करावे...त्यांनी नाही का केले?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

प्रियाली's picture

8 Jun 2010 - 11:32 pm | प्रियाली

सत्यकथा असली/ नसली म्हणून काय फरक पडतो? थोडीशी सत्यही आहे पण बरीचशी रचवलेली आहे तरीही सत्याशी फारकत घेते असे वाटत नाही. प्रभूसरांचे सर्टिफिकेट खाली आहे. ;)

शिल्पा ब's picture

8 Jun 2010 - 11:48 pm | शिल्पा ब

फरक नाहि पडत, पण उगाच एक उत्सुकता :)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

8 Jun 2010 - 11:28 pm | विनायक प्रभू

नक्कीच.

नंदन's picture

11 Jun 2010 - 12:54 am | नंदन

सहमत आहे. कथा आवडली. बालवयात पोरके झालेले गृहस्थ - परिणामी हेकटपणाकडे झुकणारी वृत्ती - मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी मुलीला विज्ञान शाखेऐवजी कलाशाखेत जाण्याची सक्ती करणे हा पूर्वार्ध तर एका परिचित कुटुंबात घडलेला माहीत असल्याने प्रभूसरांशी सहमती दर्शवतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

टारझन's picture

9 Jun 2010 - 12:07 am | टारझन

प्रतिसाद सुचत नाही.

बेसनलाडू's picture

9 Jun 2010 - 12:09 am | बेसनलाडू

#:S
(नशीबवान)बेसनलाडू

मस्त कलंदर's picture

9 Jun 2010 - 12:20 am | मस्त कलंदर

नशीबवान

=)) =)) =)) =)) =))

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

धनंजय's picture

9 Jun 2010 - 3:48 am | धनंजय

कथा ओघवती लिहिलेली आहे.

सहज's picture

9 Jun 2010 - 6:16 am | सहज

हेच म्हणतो.

इंटरनेटस्नेही's picture

9 Jun 2010 - 1:56 am | इंटरनेटस्नेही

आपल्याकडे काहीही नसताना आपल्याला मिळतो तो आपला खरा मान..असे कुठेस वाचल्याच आठवल या निमित्ताने.

आपल्या मुलांशी आपण प्रेमाने वागावे, तरच आपल्याला म्हातारपणी प्रेमाने सांभाळले जाईल. आणि आपण आपल्या आई वडिलांशी प्रेमाने वागावे म्हणजे आपली मुले आपल्या म्हातारपणी आपली सेवा करतील.

प्रस्तुत कथे बाबत बोलायचे झाले तर अंजूने, आपल्या भावाने विषय काढण्या आगोदरच स्वतहून मदत देऊ करायला पाहिजे होती.

मुलगी असो वा मुलगा, आपल्या आई वडिलांची जबाबदारी दोघांनी समप्रमाणात घ्यायला हवी.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

अनामिक's picture

9 Jun 2010 - 2:14 am | अनामिक

आपल्या मुलांशी आपण प्रेमाने वागावे, तरच आपल्याला म्हातारपणी प्रेमाने सांभाळले जाईल.

वरच्या वाक्यातले "तरच" जरा खटकले. कितीतरी घरात वडील तापट स्वभावाचे असतात, कित्येकवेळा परिस्थिती माणसाला तसं बनवते. पण याचा अर्थ त्या बापाचे/पालकाचे मुलांवर प्रेम नसते असा थोडीच होतो? बाल्यावस्थेत ठिक, पण मोठं झाल्यावरही पालकांचा स्वभावगुण कळू नये?

-अनामिक

इंटरनेटस्नेही's picture

9 Jun 2010 - 4:30 pm | इंटरनेटस्नेही

तरच म्हणजे मला असा म्हणायचं आहे की एक वेळ मुलांना सुविधा पुरवण्यात कमतरता झाली तरी चालू शकेल, मात्र प्रेमाने वागणूक द्यायला पैसे लागत नाहीत. अनेकदा आपला स्वभावाच रागीट आहे असे दाखवून आपल्या पत्नी व मुलांवर दहशतवादाचा वापर करून नियंत्रण ठेवले जाते. जे अमानवी आणि मी तर म्हणेन की भ्याड आहे. अशा वागण्याची किंमत म्हातारपणी प्रस्तुत कथेतील नानां सारखी मोजावी लागते.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

बेसनलाडू's picture

9 Jun 2010 - 2:24 am | बेसनलाडू

आधीची पिढी आणि नंतरची पिढी अशा दोन दगडांवर पाय ठेवणे, नि त्यांमध्ये भावनिकदृष्ट्या तसेच इतर ऐहिक माध्यमांतून गुंतून राहणे विवक्षित कालावधीसाठीच असते. आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ देणारे जर कोणी असेलच, तर तो म्हणजे आपल्याच पिढीतील आपलाच जोडीदार (आणि अर्थातच आपण स्वतः), हे लक्षात ठेवले की बरेच त्रास, अपेक्षा व तक्रारी (मुलांनी सांभाळ केला नाही वगैरे) कमी होण्याची शक्यता असते. मुलामुलींकडून ठेवल्या जाणार्‍या अपेक्षा, मुलामुलींसाठी करायची तरतूद (पैसा, दागिने, जमीनजुमला इ. स्थावरजंगम मालमत्ता वगैरे) स्वेच्छापूर्वक, जमेल तितकेच करावे. मुलाला/मुलीला जमेल तितके उत्तम शिक्षण द्यावे/त्यासाठी प्रोत्साहित करावे आणि पाल्यावर जमतील तितके उत्तम संस्कार करावेत.
(मतदार)बेसनलाडू

प्रियाली's picture

9 Jun 2010 - 2:37 am | प्रियाली

प्रस्तुत कथे बाबत बोलायचे झाले तर अंजूने, आपल्या भावाने विषय काढण्या आगोदरच स्वतहून मदत देऊ करायला पाहिजे होती.

आई-वडिलांनीही मुलांना प्रेम समप्रमाणात द्यायला हवे. :) या कथेत, नानांचा समप्रमाणात प्रेम देण्याचा उद्देश नव्हता असे मी म्हणणार नाही परंतु समीकरण समप्रमाणावर सुटले असेही म्हणता येत नाही.

अंजूने किंवा तिच्या जागी जर एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झालेला असता तरी त्याने काय करायला हवे होते किंवा काय केले असते? पैशांचीच मदत ना. अनेकदा, पैशांची मदत नको असते. एका गड्याला पगार देण्याचा असा किती खर्च होता? परंतु, घरात सतत आजारी माणूस असणं, त्याच्या दुखण्या-खुपण्यासाठी डॉक्टरच्या फेर्‍या, घरातली अडचण (आजारी मनुष्य, बाहेरची व्यक्ती - गडी) या सर्वांत काय मदत होणार?

चित्रा's picture

9 Jun 2010 - 4:15 am | चित्रा

कथा ओघवती आहे.
दोष मुलीला द्यायचा का नाही, हे समजत नाही.
आईवडिलांनी मुलांना शक्य तेवढी समान वागणूक दिली पाहिजे. आणि मुलांनीही असमान वागणुकीची भावना असल्याने होणारी चिडचीड आणि सूडाची भावना/त्रागा आयुष्यात कधीतरी का होईना त्यागले पाहिजेत एवढेच वाटते.
अंजूचे चुकलेले विशेष नाही, तिने मदत नक्कीच केली आहे. पण ज्याकारणाने तिने वडिलांवर राग धरला, आईचीही पर्वा केली नाही, ते कारण अमेरिकेसारख्या संधी मिळू शकणार्‍या (पैसे देऊन का होईना) देशात कधीचे नाहीसे होऊ शकले असते. म्हणजेच, थोडक्यात अंजूने अमेरिकेत आल्यानंतर मनासारखे शिक्षण घेण्यास हरकत नव्हती. हे व्हायला कदाचित घरदार सांभाळून अनेक वर्षे नक्कीच लागली असती, पण निदान स्वतःच्या कष्टाने हव्या त्या (सायन्स) शाखेतील शिक्षण घेतल्यावर वडिलांना पैशाचा असलेला प्रश्नही तिच्या अधिक जवळून लक्षात आला असता. स्वतःची दुसर्‍याशी सातत्याने तुलना करीत स्वतःची कणव करीत राहण्यात मोठा धोका असतो. त्यामुळे आपल्या स्वतःला नक्की काय हवे आहे आणि काय श्रेयस आहे त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.

प्रियाली's picture

9 Jun 2010 - 4:34 am | प्रियाली

कथेत अंजूने अमेरिकेत आल्यावर शिक्षण घेतले असेच म्हटले आहे. नवर्‍याचाही त्याला पाठिंबा होता. :) त्यामुळेच कदाचित नानांनी हात पुढे केल्यावर तिने राग सोडला असावा परंतु राग सोडला म्हणजे मनातली अढी गेली असे नाही. तो सल कायम राहण्याची शक्यता असतेच. :) केवळ, शिक्षणामुळेच अढी असेल असेही नाही. नानांच्या तुसड्या आणि हुकूमशाही स्वभावाने इतर ठिकाणीही अंजूचे मन खट्टू झाल्याचा संभव आहेच.

अंजूचे चुकले असे मला वाटत नाही. तिने काय करायला हवे होते? मुळात अमेरिकेला जावे ही तिची इच्छा नाही. तिचे लग्न झाल्यावर आपला संसार सांभाळायचा की भारतात येऊन वडिलांची सेवा करायची. माझ्यामते दुसरा पर्याय प्रॅक्टिकल नाही.

चित्रा's picture

9 Jun 2010 - 8:54 am | चित्रा

शिक्षण घेतले हे लक्षात आले होते, पण असे वाटले की हव्या त्या विषयाचे शिक्षण नसेल घेता आले/घेतले नसेल. पण नीट वाचल्यावर लग्नही घाईत करून दिले की काय असे वाटले.. पण आई-वडिलांच्या अदूरदर्शी स्वभावामुळे नुकसान होणे, मनाविरूद्ध निर्णय घेणे किंवा त्यांनी आपल्याला अधिक योग्य मार्गदर्शन करायला हवे होते /संधी द्यायला हव्या होत्या असे वाटणे साहजिक आहे, पण तरी शेवटी वयात आलेल्या मुलींनी तरूण वयात आपल्याला हवा तो एखादा निर्णय घेऊ शकलो नाही तर ते सत्य स्विकारण्याची तयारी ठेवली पाहिजे.

अंजूचे चुकत आहे असे नाही, तिला वडिलांसाठी शेवटी जे करणे शक्य आहे ते ती करीतच आहे. पण आईवडिलांना कधीतरीच भेटणे, मुलांना आजीआजोबांना भेटण्याची विशेष संधी न मिळणे ह्याने आपले कुटुंबाचे काही नुकसान होते का ह्याचा अंजूने विचार केला असेल असे धरायला हवे. (अशा काही कुटुंबांना मी पाहिलेले आहे - त्यात मूळ चूक/गैरसमज ही थोडीथोडी दोन्ही बाजूंकडून असावी अशी माझी समजूत आहे - आईवडिलांचे जुनाट विचार आणि मुलांचे स्वतःचे वाढते संसार यात दोन्ही बाजूंनी चुका/अन्याय होत असतात). शेवटी आपल्याला सुखी करेल अशी काय गोष्ट आहे ते ज्याची त्याने ठरवायची असते.

एक चांगली गोष्ट अशी की इथे वडिलांनी मुलीला नावे ठेवलेली नाहीत. मुलीत आणि वडिलांत शेवटी थोडी का होईना, समजूत पटली. त्यामुळे अंजूला अपराधी वाटण्याचे कारण नाही, वडिल तिला अपराधी समजत नसावे.

बाकी भावा-बहिणींची घरातल्या वृद्धांना कोणी सांभाळायचे यावरून भांडणे होणे नवीन नाही; आणि घरातल्या कोणाही अपंग/लहान/वृद्ध व्यक्तीला सांभाळणे हे तर अतिशय कष्टाचे काम आहे. अनेक माणसांची मदत लागते. पण ते केल्यास घरच्यांना श्रेयस्कर असते, आणि हे समजा हल्लीच्या काळात जमत नसले तर अशा व्यक्तीला तिच्या शेवटच्या दिवसांत शक्य तितक्या सुखकर पद्धतीने ठेवणे (वृद्धाश्रम) हे तरी करता येऊ शकते. घरात असलेल्या वृद्ध व्यक्तीशी/व्यक्तीला कधीही मोबाईलने संपर्क करता यावा अशी सोय करावी.

जाताजाता - आमच्या घरात एकेकाळी माझ्या तीन आज्या (एक सख्खी आणि दोन मावस) राहत असत. त्यापैकी मावस आज्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे त्यातील एक मावसआजी कायमस्वरूपी चार सहा वर्षे आमच्याकडे राहिली, तिच्या मृत्युपर्यंत. ही आजी गेली त्याआधी बरीच आजारी होती. तिचे सगळे करण्यासाठी माझी आजी/दुसरी मावसआजी/आई/काक्या आणि घरातल्या मोलकरणी असे सर्व असत. आम्ही मुलेही तिला थोडीफार मदत करत असू - पाणी/खाणे नेऊन देणे वगैरे. आमच्या घरात आम्ही हे करू शकलो कारण एकत्र कुटुंबामुळे मनुष्यबळ खूप होते - एकाच व्यक्तीवर सगळा ताण पडायचा नाही - जो काही पडला तो अगदी अखेरीस. पण आजकालच्या लहान/जगभर विखुरलेल्या कुटुंबांमध्ये हे शक्य होतच असेल असे नाही, त्यामुळे वृद्ध मंडळींसाठी योग्य पर्याय तयार होणे आवश्यक आहे.

मस्त कलंदर's picture

9 Jun 2010 - 4:38 am | मस्त कलंदर

चित्रातैंशी सहमत..

पूर्ण दोष कुणालाच द्यावासा वाटत नाही.. ज्या त्या परिस्थितीत जो तो त्याच्या त्याच्या दृष्टीकोनातून बरोबर असेलही.. प्रियालीताईंनी मांडलेला मुद्दा, की मोलाची माणसं प्रत्येक ठिकाणी पर्याय ठरू शकतातच असेनाही हे ही पटलं..

कथेचा आशय पाहून कथा आवडली असे म्हणवत नाही. पण जर ही सत्यकथा असेल तर दोन्ही बाजू नीट मांडल्या गेल्या असे मला वाटते. बर्‍याचदा वाचकाला लेखकाच्या नजरेतून लेख वाचायला मिळतो. इथे तसे झाले नाही हे लेखिकेचं कौशल्य!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

शिल्पा ब's picture

9 Jun 2010 - 5:59 am | शिल्पा ब

आजारी माणसासाठी गडी ठेवणे हा मूर्खपणा आहे...एखादी/द नर्सची व्यवस्था करता आली असती..

[[अंजूने किंवा तिच्या जागी जर एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झालेला असता तरी त्याने काय करायला हवे होते किंवा काय केले असते?]]

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हंटले असते या धर्तीचे वाक्य आहे...काय करू शकतो याचा विचार करावा...जर हे गृहस्थ अजून असतील तर...एक पूर्णवेळ किंवा दोन शिफ्टमध्ये दोन अशी व्यवस्था करता आली असती / येऊ शकते...

आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काहीही झाले तरी हे आपले वडील आहेत हे विसरून कसे चालेल...त्यांचे काही चुकले असेलही...त्यांच्याकडून अन्याय झाला असेलही...पण आता शेवटच्या दिवसात त्याबद्दल मनात आधी धरून त्यांना वाईट वाटेल असं वागायची काय गरज आहे? आपले मत वेळच्या वेळी आणि शांतपणे मांडायचे होते एवढाच राग होता तर...तेव्हा शांतपणे ऐकून घेतले ना? आता कश्याला म्हातार्याला त्रास द्यायचा? जाऊ द्या कि सुखाने !!!

बाकी मी आपली " ढ " आहे त्यामुळे माझी मते अशी असतील
...(अनुभवाने ) वयाने मोठ्या असलेल्या लोकांकडून थोडा समंजसपणा अपेक्षित असतो...लहानपणी मला मारलं म्हणून मी आता त्यांच्याशी बोलणार नाही अशा पद्धतीने वागण्याला काय म्हणाल?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शिल्पा ब's picture

9 Jun 2010 - 4:17 am | शिल्पा ब

विषय भलताच नाजुक आहे..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शुचि's picture

9 Jun 2010 - 5:22 am | शुचि

करुण कथा आहे. व्यक्तीचित्रण, मनाचे कंगोरे सुंदर रंगवले आहेत. खूप वाईट वाटलं ... खूप खूप वाईट वाटलं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सन्जोप राव's picture

9 Jun 2010 - 6:32 am | सन्जोप राव

फुलपाखरांचे रंगीत पंख लावून आलेली एनारायडी चीअरगर्ली कथा.आपल्या शेव्ही किंवा मर्समधून फ्रीवेवरुन जाताना जशी जसराजांची तोडी ऐकावी तशी. 'स्त्रीलेखिकांचे अनुभवविश्व इतके संकुचित का?' असा जर एखादा परिसंवाद साहित्य संमेलनात झाला तर त्यासाठी 'केस स्टडी' म्हणून उपयोगी पडेल अशी कथा. (यातल्या 'पडेल' या शब्दावर कृपया कोटी करु नये!)
बाकी 'नाकात दम आणणे' असे मराठी मिसळपाववर चालून जात असावे!

सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह

मिसळभोक्ता's picture

9 Jun 2010 - 6:43 am | मिसळभोक्ता

पण नळावर फारशी मजा नाही, हल्ली. (असे कुणीतरी परवाच म्हणत होते.)

असो.

नानांना वृद्धाश्रमात ठेवले असते, तर संस्थळांवरचा बराच अश्रूपात टळला असता.

अति अवांतरः मर्स नव्हे मर्क.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रियाली's picture

9 Jun 2010 - 6:46 am | प्रियाली

पण नळावर फारशी मजा नाही, हल्ली

खरे आहे. खुसपटे काढण्यासाठी का होईना पण आमचे लेख वाचले तर जातात. आम्ही यांच्या लेखांकडे दुर्लक्षच करतो त्यामुळे नळावर मजा येईलच कशी?

असो. वृद्धाश्रमात ठेवण्याचा सल्ला देईन हं गोष्टीतल्या पात्राला :) पण वृद्धाश्रमात ठेवले की अश्रूपात टळतो हे नवीनच कळले. :)

टारझन's picture

9 Jun 2010 - 7:52 am | टारझन

पण वृद्धाश्रमात ठेवले की अश्रूपात टळतो हे नवीनच कळले.

+१ , आमचे हे २-३ काका लोक नेहमी णवणविण माहिती माहिती आणत असतात मसंवर , त्यामुळे खुपंच ज्ञाण वाढले आहे. :)

सहज's picture

9 Jun 2010 - 8:06 am | सहज

टार्‍या लेका नळावर मधेच आपली घागर घुसवू नकोस. जा जरा अभ्यास कर. म्हणी वाक्प्रचार पाठ केलेस का?
१) आपले काय ठरले आहे, मी तूला एक "ठेव"णार मग तू मला चार "ठेवू"न देणार.
२) आधीच मर्क(ट) त्यात नळावर आला. (यातल्या आला शब्दावर शाब्दीक कोटी करु नकोस)

आणी हो, उगाच मांजरी लढवू नकोस.

मिसळभोक्ता's picture

10 Jun 2010 - 1:10 am | मिसळभोक्ता

सहजराव,

"मांजरी" लढवणे निषिद्ध असेल, तर "बोके" लढवणे चालेल काय ?

बाकी, म्हणींवर आणखी काम करणे गरजेचे आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सन्जोप राव's picture

9 Jun 2010 - 6:48 am | सन्जोप राव

आम्ही डॉलरगुलाम नसल्याने आम्ही मर्सच म्हणणार. शेव्ही म्हटले हे उपकार समजा. एरवी आम्ही 'चेव्हरोलेट' असे म्हणत असतो.
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह

आम्ही डॉलरगुलाम नसल्याने

खरा अर्थ:--"' मला डॉलर मिळत नाहीत हो" असा असावा का?

मिसळभोक्ता's picture

10 Jun 2010 - 1:16 am | मिसळभोक्ता

फुलपाखरी अश्रूपतनविरोधी महासंघाचे प्रणेते संजोपराव,

डॉलरगुलामविरोधी संघटनेचे नेते आणि हरितमाजक्षालन संस्थेचे संस्थापक आदरणीय मालक, ह्यांच्याकडून सदर संस्थांचे कार्यकारी व्यवस्थापकत्त्व आपल्याला मिळालेले दिसते.

आपल्या ओळखीचे कुणी कॅन्सरग्रस्त आहेत की काय ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चतुरंग's picture

10 Jun 2010 - 1:20 am | चतुरंग

'हरितमाजक्षालन' हा शब्द बाकी भिडला हं काळजाला! ;)

(हरितमाजधारक डॉलरगोटू)चतुरंग

टारझन's picture

10 Jun 2010 - 1:46 am | टारझन

(हरितमाजधारक डॉलरगोटू)चतुरंग

आरारारा .... आवरा रे कोणी तरी =)) =)) =))

-(गुलाबीमाजधारक रुपयाटकलु) टारझन

बेसनलाडू's picture

10 Jun 2010 - 1:52 am | बेसनलाडू

_/\_
(अहिंसक)बेसनलाडू

डॉ.श्रीराम दिवटे's picture

9 Jun 2010 - 7:44 am | डॉ.श्रीराम दिवटे

छान लेखन केले आहे.
प्रतिक्रियाही वाचण्याजोग्या...

विनायक प्रभू's picture

9 Jun 2010 - 7:51 am | विनायक प्रभू

नाना तापट नसते तरी काहीही फरक पडला नसता.
हे अनुभवावरुन खात्रीने सांगत आहे.
(मॅनेजर- वृद्धाश्रम जिल्हा कर्जत- वय २७ कार्यकाल ३ वर्षे)

मदनबाण's picture

9 Jun 2010 - 8:08 am | मदनबाण

लेख आवडला...म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण !!!

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

प्राजु's picture

9 Jun 2010 - 8:10 am | प्राजु

हम्म!!
एकेकाचं नशिब!! आणखी काय?
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

नितिन थत्ते's picture

9 Jun 2010 - 9:35 pm | नितिन थत्ते

चांगले सादरीकरण.

कथेचा प्लॉट नेहमीचा आहे हे अनेकांनी म्हटले आहेच.
नानाकाकांची सुश्रुषा पूर्णपणे खांद्यावर घेणे अमितला मान्य नाही असे दिसते. या एकूण परिस्थितीत कोणी काय करायला हवे होते याचा एक विचार.

१. नानाकाकांनी वेगवेगळ्या बाबतीत जे डिस्क्रिमिनेशन केले होते त्याची कल्पना त्यांनी (मोठ्या) मुलीला पूर्णपणे दिलेली दिसते पण तशी जाणीव मुलाला करून दिली नव्हती असे दिसते. त्यामुळे कम व्हॉट मे अशी मुलाची तयारी सुरुवातीपासून झालेली नाही.

२. रिटायरमेंटनंतर नानाकाकांना बर्‍यापैकी पैसा मिळाला असे दिसते. त्यामुळे मुलाची भार उचलण्याची नाखुशी आर्थिक नसावी असे वाटते. ती आर्थिक नसेल / शारिरिक असेल तर पूर्णवेळ सेवक (गडी की नर्स हे फार महत्त्वाचे नाही) ठेवला तर काम भागले पाहिजे.

३. झुकत्या मापाची गोष्ट मुलीने भावाजवळ स्पष्ट बोलली पाहिजे. म्हणजे कदाचित मुलाला जाणीव होऊ शकेल.

४. कथेत मुलगी आणि तिचा नवरा यांच्यात या परिस्थितीबाबत काय अंडरस्टँडिंग आहे हे कळत नाही.

५. अनेकांनी आपापली वार्धक्याची व्यवस्था आपणच करावी असे म्हटले आहे. पण खरी परिस्थिती आर्थिक परावलंबनाची नाही असे वाटते. वृद्धांनी स्वतःची व्यवस्था केली असली तरी आणि वृद्धास्रमात राहिले तरी केव्हा ना केव्हा मुलांच्या घरी येऊन रहावेच लागते. अनेक वृद्धाश्रमात आजारी पडल्यावर घरी पाठवले जाते.

नितिन थत्ते

प्रियाली's picture

9 Jun 2010 - 9:47 pm | प्रियाली

नानाकाकांनी वेगवेगळ्या बाबतीत जे डिस्क्रिमिनेशन केले होते त्याची कल्पना त्यांनी (मोठ्या) मुलीला पूर्णपणे दिलेली दिसते पण तशी जाणीव मुलाला करून दिली नव्हती असे दिसते. त्यामुळे कम व्हॉट मे अशी मुलाची तयारी सुरुवातीपासून झालेली नाही.

निरीक्षण योग्य आहे किंवा असे डिस्क्रिमिनेशन आपल्याबाबत होत नाही म्हणून मनावर घेतले जात नाही.

ती आर्थिक नसेल / शारिरिक असेल तर पूर्णवेळ सेवक (गडी की नर्स हे फार महत्त्वाचे नाही) ठेवला तर काम भागले पाहिजे.

मुंबईच्या लहान जागेत जिथे लोकांना सतत कॉटवर पडलेला वृद्धच नको असतो तिथे आणखी एक परकी व्यक्ती येऊन राहणे हे देखील त्रासदायक आहे. त्यातून दांड्या, पेशंटकडे दुर्लक्ष, पैशांची मागणी, चोर्‍या वगैरे प्रकार आहेतच. एकंदरीत, व्यवस्था सुखदायी होईलच असे नाही. चित्राने म्हटल्याप्रमाणे पूर्वी एकत्र कुटुंबात हे सर्व होऊन निघे. आता दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे.

झुकत्या मापाची गोष्ट मुलीने भावाजवळ स्पष्ट बोलली पाहिजे. म्हणजे कदाचित मुलाला जाणीव होऊ शकेल.

असे करावे. जाणीव होईलच असे सांगता येत नाही पण प्रयत्न करावा.

कथेत मुलगी आणि तिचा नवरा यांच्यात या परिस्थितीबाबत काय अंडरस्टँडिंग आहे हे कळत नाही.

ते महत्त्वाचं वाटलं नाही म्हणून भर दिलेला नाही. ज्यांचे संसार बसलेले आहेत ते इतक्या दुरून ये-जा करू शकत नाहीत. नोकरी, मुले, शाळा, घर असे अनेक प्रश्न असतात त्यामुळे नवर्‍याच्या आणि मुलीच्या अंडरस्टँडिंगवर फारसा भर दिलेला नाही.

वृद्धांनी स्वतःची व्यवस्था केली असली तरी आणि वृद्धास्रमात राहिले तरी केव्हा ना केव्हा मुलांच्या घरी येऊन रहावेच लागते. अनेक वृद्धाश्रमात आजारी पडल्यावर घरी पाठवले जाते.

मरेपर्यंत काळजी घेणारे वृद्धाश्रम सहसा नसतात असे वाटते. असल्यास चू.भू.दे.घे. परंतु वृद्धांना कधी ना कधी घरी यावे लागते. शिवाय, आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवले हे सांगायची लाज वाटल्याने (आपल्याकडचा भोचकपणा) मुलांचीही घरातच सांभाळ करण्याची कुतरओढ सुरु असते. घर वडिलांच्या नावावर असल्यास (येथे नानांचे आहे) मालकालाच घराबाहेर काढले असाही बोभाटा होतो.

असो. विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद.

मिसळभोक्ता's picture

10 Jun 2010 - 1:18 am | मिसळभोक्ता

मरेपर्यंत काळजी घेणारे वृद्धाश्रम सहसा नसतात असे वाटते. असल्यास चू.भू.दे.घे.

हॉस्पाईस (उच्चार ? मराठी प्रतिशब्द ?)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रियाली's picture

10 Jun 2010 - 1:29 am | प्रियाली

तेथे बहुधा कॅन्सरग्रस्त लोकांचीच सेवा केली जाते असे वाटते आणि टर्मिनली इल नसणार्‍यांसाठी भारतात सोयी आहेत का हे माहित नाही. :( पुन्हा चू.भू.दे.घे.

आणि प्लीज आता गोष्टीत नानांना कॅन्सरग्रस्त करून टाकूया असं सांगू नका. नंतर पैसेही मागावे लागतील.

मिसळभोक्ता's picture

10 Jun 2010 - 1:48 am | मिसळभोक्ता

प्लीज आता गोष्टीत नानांना कॅन्सरग्रस्त करून टाकूया असं सांगू नका.

पब्लिकची डिमांड म्हणून कैरी नावाच्या चित्रपटात जी एंच्या मुलाची मुलगी केली होती.

इथे तर फक्त रोग बदलायचा आहे.

नानांना कॅन्सरग्रस्त करावे, ह्या पर्यायाला मत दिले आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रियाली's picture

10 Jun 2010 - 2:40 am | प्रियाली

कॅन्सरग्रस्त करायला हरकत नाही पण मग पुढे काय करावं? लोकांना व्य. नि. पाठवावे का की "आमच्या कथेतील एका पात्राला कॅन्सर झाला आहे. मदतीसाठी पैसे पाठवावे." तेवढंच, कोणाचे हरितमाजक्षालन झाले म्हणून जळजळग्रस्तांना आराम पडू द्यावा का काय?

मिसळभोक्ता's picture

10 Jun 2010 - 2:44 am | मिसळभोक्ता

लोकांना व्य. नि. पाठवावे का की "आमच्या कथेतील एका पात्राला कॅन्सर झाला आहे. मदतीसाठी पैसे पाठवावे."

हरकत नाही. तुम्ही व्यनि पाठवा, आणि आम्ही उत्तर पाठवू.

आमच्या कथेतील एका पात्राने दोन खोके आपल्या खात्यात जमा केले आहेत. कृपया पावती पाठवावी.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रियाली's picture

10 Jun 2010 - 3:01 am | प्रियाली

छ्या! आम्ही एक निवेदन टाकू. तुमचे तोंड बंद!

नितिन थत्ते's picture

10 Jun 2010 - 2:31 pm | नितिन थत्ते

>>लोकांना सतत कॉटवर पडलेला वृद्धच नको असतो
असेच नसावे. कॉटवर पडलेल्या वृद्धाचे वागणे कसे आहे यावरही ते अवलंबून असते.

जागेच्या टंचाईमुळे होणारा त्रास एकत्र कुटुंब असेल तर अधिकच वाढेल असे वाटते. हां, काम शेअर होऊ शकेल हे खरे.

>>>>कथेत मुलगी आणि तिचा नवरा यांच्यात या परिस्थितीबाबत काय अंडरस्टँडिंग आहे हे कळत नाही.

>>ते महत्त्वाचं वाटलं नाही म्हणून भर दिलेला नाही.

कथेच्या लेखिकेस ते स्वातंत्र्य आहेच पण मुलीलाच अढी आहे की तिच्या नवर्‍याच्या अ‍ॅटिट्यूडमुळे ती दूर आहे असा विचार करता आला असता.

नितिन थत्ते

विसुनाना's picture

9 Jun 2010 - 11:43 am | विसुनाना

कथा घट्ट बांधणीची आणि ओघवती आहे. मूळ विषयापासून भरकटत नाही. शिवाय -संजोपरावांनी उल्लेखलेल्या 'नाक में दम' (=तोंडाला फेस/नाकी नऊ) वाक्प्रचाराव्यतिरिक्त -उत्तम (मराठी ) भाषेत आहे.
यामुळे कथा आवडली.

तरीही विषय जुना आहे आणि पात्रे अपेक्षितच वागतात, यामुळे कथा अत्युत्कृष्ट आहे असे म्हणत नाही.लेखिका याहून नव्या विषयांवर निश्चितच लिहू शकेल.

प्रियाली's picture

9 Jun 2010 - 5:09 pm | प्रियाली

तरीही विषय जुना आहे आणि पात्रे अपेक्षितच वागतात, यामुळे कथा अत्युत्कृष्ट आहे असे म्हणत नाही.लेखिका याहून नव्या विषयांवर निश्चितच लिहू शकेल.

कथा आवडल्याबद्दल धन्यवाद. कथा अत्युत्कृष्ट ठरावी असे मनात आणून लिहिलेली नाही त्यामुळे ती तशी ठरावी/ ठरेल अशा अटकळी लिहिताना मनात आल्या नव्हत्या. लेखिका याहून नव्या विषयांवर लिहू शकेल ही आशा दाखवल्याबद्दल विशेष धन्यवाद. नवे विषय कोणते असतात तेही कळले तर बरे होईल. खरडवहीची दारे उघडी आहेतच. :)

अवांतरः

संजोपरावांनी उल्लेखलेल्या 'नाक में दम' (=तोंडाला फेस/नाकी नऊ) वाक्प्रचाराव्यतिरिक्त -उत्तम (मराठी ) भाषेत आहे.

तोंडाला फेस/ नाकी नऊ आणि नाकात दम यांच्या अर्थछटांमध्ये फरक असल्यास खुलासा आवडेल. सदर वाक्प्रचार मिसळपावाखेरीज इसकाळ, म.टा., लोकसत्ता, लोकप्रभा, उपक्रम वगैरे वरही आला आहे. (दुवा: येथे.) म्हणजे तो मराठी भाषेने स्वीकारला आहे असे म्हणता यावे का? मराठीला जर नवनवीन अर्थछटेचे शब्द इतर भाषांतून मिळाले तर वापरण्यास "श्रेष्ठींची" ना नसेल असे समजते. असो. विषय अवांतर असल्याने यावर वेगळी चर्चा सुरु करता येईल.

सन्जोप राव's picture

9 Jun 2010 - 7:04 pm | सन्जोप राव

सदर वाक्प्रचार मिसळपावाखेरीज इसकाळ, म.टा., लोकसत्ता, लोकप्रभा, उपक्रम वगैरे वरही आला आहे. (दुवा: येथे.) म्हणजे तो मराठी भाषेने स्वीकारला आहे असे म्हणता यावे का?
हा हा, म्हणायचे तर काहीही म्हणता येईल. सदर कथा हे मराठी साहित्यविश्वातले एक कोरीव लेणे आहे, असेही म्हणता येईल. बोलणार्‍याचे तोंड आणि टंकणार्‍याचा हात कोण धरणार? 'छापणारे काय, द्याल ते छापतील!'
कुणी एखादा शब्दप्रयोग वापरला म्हणून तो बरोबर कसा होतो हे कळले नाही. लोक एनीवेज म्हणतात, बॅकसाईड म्हणतात (मागच्या बाजूला या अर्थी) , काय वाट्टेल ते म्हणतात, म्हणजे ते सगळे बरोबर होते असे लेखिकेला म्हणायचे आहे काय? आणि उपक्रम हे काही अन्नशुद्धी करणारे तूप नाही. उपक्रमावर एखादा शब्दप्रयोग कुणीतरी वापरला म्हणून तो बरोबरच असला पाहिजे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न बाकी आवडला.
मराठीला जर नवनवीन अर्थछटेचे शब्द इतर भाषांतून मिळाले तर वापरण्यास "श्रेष्ठींची" ना नसेल असे समजते
यातील वक्रोक्ति दुबळी असल्याने सोडून देऊ. पण भाषा बदलते ती नैसर्गिकपणे. इतरभाषिक शब्द बलात्काराने भाषेत घातले तर नुसतेच धेडगुजरी काहीतरी होते. भाषा कशी बदलत नाही बघू हा चंग बांधून असे मुद्दाम बेतून, रचून काहीतरी करणे हास्यास्पद आहे.
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह

प्रियाली's picture

9 Jun 2010 - 7:14 pm | प्रियाली

म्हणायचे तर काहीही म्हणता येईल. सदर कथा हे मराठी साहित्यविश्वातले एक कोरीव लेणे आहे, असेही म्हणता येईल. बोलणार्‍याचे तोंड आणि टंकणार्‍याचा हात कोण धरणार? 'छापणारे काय, द्याल ते छापतील!'
कुणी एखादा शब्दप्रयोग वापरला म्हणून तो बरोबर कसा होतो हे कळले नाही. लोक एनीवेज म्हणतात, बॅकसाईड म्हणतात (मागच्या बाजूला या अर्थी) , काय वाट्टेल ते म्हणतात, म्हणजे ते सगळे बरोबर होते असे लेखिकेला म्हणायचे आहे काय?
उपक्रम हे काही अन्नशुद्धी करणारे तूप नाही. उपक्रमावर एखादा शब्दप्रयोग कुणीतरी वापरला म्हणून तो बरोबरच असला पाहिजे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न बाकी आवडला.

एक प्रश्न विचारला आणि मिपाखेरीज इतर दुवे दिले तर इतकी जळजळ? :) मला काहीच म्हणायचं नाही. मला एखाद्याने "मर्स" म्हटले आणि दुसर्‍याने "मर्क" म्हटले तरी फरक पडत नाही. तेव्हा, सर्व काही आपल्यालाच म्हणायचं आहे हे मुंडकं तुटलेल्या कोंबडीसारखा तडफडाट चालला आहे त्यावरून दिसते आहे.

भाषा कशी बदलत नाही बघू हा चंग बांधून असे मुद्दाम बेतून, रचून काहीतरी करणे हास्यास्पद आहे.

हाहाहा! गेट वेल सून! आपल्याकडे दुर्लक्ष करणे हाच जालिम उपाय आहे. :)

सन्जोप राव's picture

10 Jun 2010 - 6:21 am | सन्जोप राव

मला काहीच म्हणायचं नाही. मला एखाद्याने "मर्स" म्हटले आणि दुसर्‍याने "मर्क" म्हटले तरी फरक पडत नाही. तेव्हा, सर्व काही आपल्यालाच म्हणायचं आहे हे मुंडकं तुटलेल्या कोंबडीसारखा तडफडाट चालला आहे त्यावरून दिसते आहे.

आपल्याकडे दुर्लक्ष करणे हाच जालिम उपाय आहे.

हा हा. हेच तर आपल्याला जमत नाही ना! 'सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही' या आपल्या स्थितीबद्दल करुणा वाटून मन भरुन आले आहे!
उपक्रमाच्या उल्लेखाने चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या दिसतात. असे का असावे बरे? सुभाषिणीदेवी तर तिकडेही सल्लागार आहेत असे ऐकतो.

सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2010 - 7:14 pm | मुक्तसुनीत

इतरभाषिक शब्द बलात्काराने भाषेत घातले तर नुसतेच धेडगुजरी काहीतरी होते. भाषा कशी बदलत नाही बघू हा चंग बांधून असे मुद्दाम बेतून, रचून काहीतरी करणे हास्यास्पद आहे.

असहमती व्यक्त करतो. वास्तव असे आहे की , "एनीवेज" , "नाकात दम आणणे" अशी भाषा मराठी संभाषणात बोलणारे मराठी लोक अस्तित्त्वात आहेत. त्यांचा चंग भाषा बदलण्याचा आहे किंवा आपली भाषाच बरोबर किंवा उत्कृष्ट आहे असा आग्रह आहे असे मला वाटत नाही.

प्रस्तुत वाङ्मयप्रकार कथेच्या अंगाने जाणारा आहे असा माझा समज आहे. हा अग्रलेख नव्हे , विचारप्रवर्तन करणारा मुद्देसूद लेखही नव्हे ( कथेच्या साराने विचारांचे प्रवर्तन होते हा मुद्दा निराळा.) तर अशा ललित लिखाणात उपरोक्त वाक्प्रयोग उपरे नाहीत असे मला वाटते.

माझ्या उपरोक्त असहमतीबरोबर बलात्कारादि शब्दांचे असोसिएशन वापरल्याबद्दलचा खेदही व्यक्त करतो.

सन्जोप राव's picture

10 Jun 2010 - 3:59 pm | सन्जोप राव

मुसुराव, साहित्याचा प्रकार कोणताही असो, शुद्ध आणि बरोबर लिहिण्याचा आग्रह असलाच पाहिजे यावर तुमची सहमती गृहित धरतो. मिपावर तो नाही, म्हणून 'असले मराठी मिपावर चालत असावे' असे माझे मूळ वाक्य होते. राहता राहिला प्रश्न 'बलात्कार' या शब्दाचा. बळाने केलेली कोणतीही गोष्ट असा या शब्दाचा अर्थ आहे. बलात्कार या शब्दाचा जबरी संभोग हा एकच अर्थ नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या अमात्यांना पाठवलेल्या एका पत्रात प्रजेची झाडेझुडपे सरण म्हणून लष्कराला हवी असतील, तर ती त्यांच्या(प्रजेच्या) संमतीने, जबरदस्ती न करता आणि योग्य तो मोबदला देऊन घ्यावीत असे लिहिले आहे. 'बलात्कार सर्वथा न करावा' असे महाराज लिहितात. 'बलात्कार' या शब्दाला ओंगळ लैंगिक अर्थ चिकटला आहे तो मराठीचे भ्रष्टीकरण झाल्यानंतरच. भाषाशुचितेच्या माझ्या आग्रहाचे समर्थन करणारेच हे आणखी एक उदाहरण म्हणावे.

सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह

मुक्तसुनीत's picture

10 Jun 2010 - 5:12 pm | मुक्तसुनीत

वी अग्री टू डिसॅग्री.

रामपुरी's picture

10 Jun 2010 - 3:08 am | रामपुरी

हा प्रतिसाद सगळ्यात जास्त आवडला. प्राज्ञ मराठीसाठी इसकाळ, म.टा., लोकसत्ता, लोकप्रभा यांची साक्ष म्हणजे.......... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) गेल्या १०००० वर्षात असला विनोद ऐकला नव्हता.

प्रियाली's picture

10 Jun 2010 - 4:46 am | प्रियाली

ललित लेखनासाठी प्राज्ञ मराठी लागते हा जोकही इथे कोणी ऐकला नसणार. फिट्टमफाट. =))

रामपुरी's picture

10 Jun 2010 - 8:08 pm | रामपुरी

म्हणजे हे वर जे काही लिहिलय त्याला ललित लेखन म्हणतात तर. आम्हाला तर लघुकथेचा भास झाला. असो जे काही असेल ते... पण ललित लेखनासाठी काय किंवा कथेसाठी काय "धेडगुजरीच" मराठी वापरावी लागते हे नवीन ज्ञान मिळाल्याने डोळे अंमळ पाणावले..
पुढच्या धेडगुजरी "ललित" (=)) =))) लेखनासाठी शुभेच्छा...

स्वाती२'s picture

9 Jun 2010 - 3:58 pm | स्वाती२

कथा आवडली. स्ट्रोकमुळे परावलंबी झालेल्या माणसाची शुश्रुषा करणे हे सोपे काम नाही. गड्या ऐवजी नर्स ठेवायला हवी होती. काही वेळा २-३ नर्सेस ठेवायला लागतात. बाकी बाल्कनीत रवानगी वगैरे क्रूरपणा मी ही पाहिलाय. अशा वेळी बरेचदा आजूबाजूच्या लोकांनी बघ्याची भूमीका न घेता 'नाक खुपसल्यास' लाजेकाजेने का होईना पण लोकं जरा बरी वागायला लागतात.

अवलिया's picture

9 Jun 2010 - 5:11 pm | अवलिया

कथा आवडली. :)

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2010 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

कथा आवडली.
प्रेषक अवलिया ( बुध, 06/09/2010 - 17:11) .
कथा आवडली.

आता खुद्द नानालाच कथा आवडल्यावर आमच्या मताची किंमत ती काय ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रियाली's picture

9 Jun 2010 - 5:17 pm | प्रियाली

कथेला प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद.

गड्याऐवजी नर्स ठेवायला हवी होती असा अनेकांचा कल दिसला. ठीक आहे. गोष्टच आहे. गड्याऐवजी नर्स असे वाचावे. :) पण नर्स ठेवली म्हणून ती नानांची आवश्यक काळजी घेईलच असे नाही किंवा घरात दुसरे कोणी नसताना त्यांना एकटे ठेवून स्वतःची चार कामे उरकून येईल अशी शंका घेता येईलच.

नानांचा स्वभाव हेकट असता/ नसता, अंजूच्या मनात अढी असती/ नसती तरीही नानांची अशी अवस्था होण्याची शक्यता आहे. मूळ मुद्दा असा आहे आणि तो फक्त बेसनलाडूने मांडला आहे की वृद्धावस्थेत तुमचा जोडीदार तुमची काळजी घेईल (मग ते प्रेमाखातर असो,सवयीखातर असो किंवा लोकलज्जेस्तव) तशी काळजी इतर घेतीलच असे नाही. :)

केशवसुमार's picture

9 Jun 2010 - 7:59 pm | केशवसुमार

माझ्या मते..
१. आपले आईवडील आपल्याशी कसे वागले ह्यावर आपण त्यांच्याशी कसे वागावे हे पटत नाही.. आपण आपले कर्तंव्य योग्य रितीने पार पाडावे..
२. उतार वयातील आपली व्यवस्था आपली आपण करून ठेवणे लोकांवर विसंबून न राहाणे हे योग्य..
ह्या अर्थी अंजू, अमित आणि नाना या तिघांचे ही चुकले असेच म्हणेन..

शेवटी कुठली ही ठेव ही सुरक्षित नसतेच.. कुठेतरी बरीक अक्षरात तळटिप असतेच..परतवा हा बाजार/परिस्थितीवर आवलंबून आहे..

रुपे बदलत आलेला आहे. पण मूळ गाभा - वृद्धावस्थेतल्या मातापित्यांची काळजी कोणी घ्यायची - हा तसाच आहे.
म्हातारपण एका दिवसात येत नाही. मुला-मुलींना आकांक्षांचे पंख लावून उडवताना किंवा त्यावेळची एक जबाबदारी उरकून टाकायची म्हणून उरकताना पुढे काय दिवस येणार आहेत ह्याचे संपूर्ण भान येणे कोणालाच शक्य नाही परंतु आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असलो तर जे काही घडते आहे त्यासंबंधी आपल्या मुलांशी बोलू तर नक्कीच शकतो. परिस्थितीवश होणारे डावे-उजवे, अन्याय ह्यांना वेळीच वाचा फुटली तर निदान मनात आढी बसणे बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते.
वरती बेसनलाडू म्हणतो तसे वृद्धव्यक्तींनी पुढच्या पिढीला ओझे बनणे हे टाळावे. हे ओझे बर्‍याच प्रमाणात मानसिक असते. तुम्हीच आमचे केले पाहिजे हे कदाचित आधीच्या पिढ्यात चालून गेले असेल पण आता ते कितपत व्यवहार्य आहे? सारासार विचाराने काही तोडगे काढता येऊ शकतात का? ह्याचा विचार व्हायला हवा.
राहता राहिली नानांच्या स्वभावाची बाजू - ते अगदी ममताळू असते तरी असेच होऊ शकले असते. कारण बदलत्या काळात लांब जावे लागणे हा पुढल्या पिढीसमोर असलेल्या पर्यायांचा परिपाक असतो त्याने मूळ प्रश्न पुन्हा वर येतोच त्याचा स्वभावाशी फारसा संबंध नाही. फक्त स्वभाव चांगला असता तर अंजूच्या मनात आढी बसली नसती आणि ती कदाचित वरचेवर भारतात येत राहिली असती. त्याने प्रश्नाची सल, तीव्रता काहीशी सुसह्य होऊ शकली असती इतकेच.

कथा अतिशय ओघवती आणि बांधीव झाली आहे. कथेचा फोकस अजिबात हलला नाही. (नाहीतर काही काही कथा वाचताना नाकात दम येतो! ;)
(आमच्या ओळखीतले एक कुटुंब जवळजवळ ह्याच परिस्थितीतून सध्या जात आहे. आई आजारी आहे पण वडील मुलाला सांगताहेत मी ठीक असेतो तू इकडे कायमसाठी येऊ नकोस. कामासाठी बाई, शुश्रुषेसाठी नर्स बघताहेत पण लांबून काळजी कुरतडत राहतेच. सुनेची अवस्था बिकट आहे. दोन लहान मुले असल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आहे. मानसिक आधाराची अशावेळी फार गरज असते. आमच्याशी येऊन बोलत असतात, आम्ही आमच्यापरीने काळजी कमी करायचे उपाय करत असतो.)

चतुरंग

इंटरनेटस्नेही's picture

9 Jun 2010 - 8:45 pm | इंटरनेटस्नेही

@ प्रियाली ताई
आई-वडिलांनीही मुलांना प्रेम समप्रमाणात द्यायला हवे. या कथेत, नानांचा समप्रमाणात प्रेम देण्याचा उद्देश नव्हता असे मी म्हणणार नाही परंतु समीकरण समप्रमाणावर सुटले असेही म्हणता येत नाही.

सहमत...

हे समीकरण निदान समप्रमाणात सुटावे या साठीच मी नमुद करेन की तुलनात्मकरित्या सबळ असलेल्या अंजुनेच आधी मदत देवु करणे जरुरी आहे.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

जरी आपल्या आइ-वडीलांचं काही चुकलं, तरी आपण त्यानां असं दूर करणंतरी मला पटण्याजोगे नाही.. कारण ते जे काही करतात ते आपल्यासाठीच.. म्हणून कर्तव्यकठोर होउन त्यानां संभाळण्यात काय गैर आहे..इथे मात्र हे मुलासाठी लागू आहे.

जागु's picture

10 Jun 2010 - 1:04 pm | जागु

प्रियाली हल्ली ७०% घरात हीच परिस्थिती आहे.

राजेश घासकडवी's picture

10 Jun 2010 - 5:36 pm | राजेश घासकडवी

लेखन ओघवतं झालेलं आहे. कथावस्तूचा आराखडा उत्तम मांडला आहे. पण त्यात व्यक्तिरेखा प्रातिनिधिक स्वरूप सोडून हाडामासाची माणसं होत नाहीत. एकंदरीत लेखनशैली वरून ती लेखिकेची मर्यादा असण्यापेक्षा, मिपावर लिहिताना काहीशी कृत्रिम शब्दमर्यादा स्वत:वरच घालून घेतल्यामुळे ते झालं असावं असं वाटलं. प्रसंगांविषयी त्रयस्थपणे माहिती देण्याऐवजी प्रियालींनी ही कथा काही ठळक संवाद, प्रसंगातून रंगवावी असं वाटतं.

या कथेला, कथेत अमुक व्हायला हवं, तमुक व्यक्तीचा दोष आहे असे प्रतिसाद वाचून अंमळ गंमत वाटली. ही कथा आहे, 'असं असताना मी नक्की काय करू ग ताई?' असा ताईचा सल्ला कॉलमला विचारलेला प्रश्न नाही. हिरवेपणाचा संबंध नक्की कसा आला तेही कळत नाही. अमेरिका ऐवजी दिल्ली लिहिलं तरी कथावस्तूत काहीही फरक पडत नाही.

प्रियाली's picture

10 Jun 2010 - 5:42 pm | प्रियाली

'असं असताना मी नक्की काय करू ग ताई?' असा ताईचा सल्ला कॉलमला विचारलेला प्रश्न नाही.

:) दुसर्‍यांच्या घरातले प्रश्न सोडवणे सोप्पं असतं. ;)

नाना बेरके's picture

10 Jun 2010 - 5:40 pm | नाना बेरके

विचार करायला लावणारा लेख.

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

दत्ता काळे's picture

10 Jun 2010 - 6:18 pm | दत्ता काळे

काही विषयांचे लिखाण त्रयस्थपणे वाचता येत नाही. ह्या लेखाबाबतीत तसे झाले.

शानबा५१२'s picture

11 Jun 2010 - 9:52 am | शानबा५१२

अहो तुम्ही लेखाखाली 'क्रमशा:' अस लिहायला विसरलात की काय???

आता बोलु नका की हे एवढच आहे...........सुर सापडला होता पण शेंडा नाहीये कथेला!