मित्रहो,
लहानपणी ऐकलेली एक मोरोपंतांची आर्या मला अर्धवट माहीत आहे, आणि नेहेमी मनात रुंजी घालत असते. कोणाला ती पूर्ण येत असेल तर जरूर सांगावे.
ती अशी - देवा परमसमर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा, शरण तुला मी आलो, लीन तु़झ्या ठेवितो पदी माथा. तू सागर करुणेचा, देवा .....
पुढे काय?
मोरोपंतांची आर्या कुठे वाचता येण्यासारखी आंतरजालावर उपलब्ध आहे का?
शशिधर
प्रतिक्रिया
7 Jun 2010 - 9:07 pm | मस्त कलंदर
प्रातःकाळी शयनावरुनि उठावे | सदा शुची व्हावे |
ध्यावे देवाते मग कर जोडुनिया | तयास विनवावे ||१||
देवा परमसमर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा|
आलो शरण मी तुला दीन तुझ्या ठेवितो पदी माथा ||२||
सृष्टी-स्थित-लय कर्ता देवा आहेस तू जगत्भर्ता |
निजदास दुःखहर्ता नाही कोणीच बा तुझ्या वरुता ||३||
ही पंचमहाभूते देवा तू आणिली या जगामाजी |
अद्भुत सृष्टी निर्मुनी त्वा आम्हास केले असे राजी ||४||
देवा! अनादि ब्रह्मांडाचा धनीच तू आहे |
निज शक्तिनेच सारे विश्वहि व्यापुनि एकला राहे ||५||
वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||६||
गणराज सरस्वतीन् रविशुक्र बृहस्पतीन्
पंचैतान् संस्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवृत्तये ||७||
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||८||
इथे मिळाली ही:
http://sugeechedivas.blogspot.com/
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
7 Jun 2010 - 9:26 pm | शशिधर केळकर
धन्यवाद मस्त कलंदर! हीच असणार!
8 Jun 2010 - 7:44 am | युयुत्सु
तो शर गरधर रविधर पविधर स्मरारि सायकसा|
पार्थ भुजांतरी शिरला वल्लिकामाजी नाग नायकसा||
आणखी एक अर्धवट आठवते
भुलला धर्म द्युतिला धृतिला मतिला तिच्या तथा स्तुतीला
-------------------------------- म्हणे तथास्तु तिला
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
8 Jun 2010 - 6:40 pm | शशिधर केळकर
पुन्हा वाचताना वाटले, की कदाचित मस्त कलंदर नी दिलेले श्लोक हे वेगवेगळे असावेत.त्यातला एकच श्लोक मोरोपंतांचा असावा. ती काही मोरोपंतांची संपूर्ण रचना नसावी. कोणी यावर अधिक सांगू शकेल का?
शशिधर
8 Jun 2010 - 6:47 pm | कानडाऊ योगेशु
मोरोपंतांना मराठीतले आद्यकवी म्हणतात असे शिकलो होतो.
त्यानुसार व त्यांचा काळ संत ज्ञानेश्वरांच्या आधीचा असल्याने तुम्ही आणि म.क ने उल्लेख केल्लेल्या आर्यांतील भाषा ही फार आधुनिक वाटते.
युयुत्सींनी दिलेल्या आर्यातील भाषा मात्र ऐतिहासिक मराठी वाटते.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
9 Jun 2010 - 2:06 pm | शशिधर केळकर
योगेश, तुमचे म्हणणे पटण्यासारखे आहे.
ही आर्या नसली, किंवा मोरोपंतांची रचना नसली, तरी ही पूर्ण रचना मिळावी अशी इच्छा जरूर आहे.
गोनीदांच्या 'मृण्मयी' या कादम्बरीत 'देवा परमसमर्था' चा ओझरता उल्लेख आला आहे.
माझी अशी समजूत आहे, की ही रचना बर्यापैकी जुनी असावी.
जुन्या पिढीतील कोणाला यावर काही सुचवता येईल का?
शशिधर
10 Jun 2010 - 3:33 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे.
मोरोपंत म्हणजे मोरोपंत पराडकर. हे उत्तर पेशवाई काळात हयात होते. मूळचे बारामतीचे. रामजोशींच्या चरित्रात यांचा उल्लेख येतो.
"राधासुता तुझा धर्म"वाले मोरोपंत हेच.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
9 Jun 2010 - 2:36 pm | नील_गंधार
त्याच प्रकारे,
दोन्ही ओळित सर्व अक्षरे सारखी आहेत परंतु शब्द भिन्न असलेली मोरोपंतांची एक आर्या आहे. ती कोणाला माहिती आहे का?
असल्यास इथे जरूर द्यावी.
नील.
9 Jun 2010 - 5:03 pm | युयुत्सु
आठवणीतील कविता - भाग २ मध्ये पान ३०-१-२ वर मोरोपंतांच्या आर्या आहेत. इमेल पाठवलेत तर स्कॅन करुन पाठवेन.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
9 Jun 2010 - 6:06 pm | युयुत्सु
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
9 Jun 2010 - 6:14 pm | शशिधर केळकर
धन्यवाद युयुत्सु,
अर्थातच यात मला हवे असलेले श्लोक नसल्यामुळे, माझा शोध पुन्हा सुरू करायला लागणार! असो. मोरोपंतांची आर्या सहजासहजी मिळाल्याचेही समाधान मोठे आहे.
5 Oct 2010 - 11:49 pm | स्वरराज
मोरोपंतांची आर्या
सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो ।
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो ।
दडो मुरडिता हटाने अडो ।
वियोग घडता रडो मन भवच्चरित्री जडो ॥१॥
न निश्चय कधी ढळो कुजनविघ्नबाधा टळो ।
न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो ।
स्वतत्त्व हृदयां कळो दुरभिमान सारा गळो ।
न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो ॥२॥
http://swarjoshi.blogspot.com/
http://swarjoshi.blogspot.com/