डंकर्क हून लाखो ब्रिटीश - फ़्रेंच सैनिकांची जर्मनांच्या तावडीतून झालेल्या सहीसलामत सुटकेला काल ( ४ जून ) ७० वर्षं झाली, दुसया महायुदधाच्या घटनाक्रमातील एक अत्यंत महत्वाची घटना.
१९३९ पासून फ़्रेंच आणि ब्रिट्ननं जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं. ब्रिटीश सैन्य फ़्रेंच हद्दीत तळ ठोकून बसलय आणि तिकडे जर्मन सैन्य युद्धाची कसून तयारी करतय अशी अवस्था..
१० मे ला चर्चिल पंतप्रधान झाले आणि जवळजवळ त्याच मुहूर्तावर हॉलंड,लक़्झंबर्ग आणि बेल्जियम वर जर्मनीचा हल्लाबोल झाला. ब्रिटीश सैन्य अर्डेन जंगलाकडं जर्मन सैन्याकडून काहीही विरोध न होता रवाना झालं आणि हाच एक पूर्वनियोजित सापळा होता, इकडे हजारो नाझी रणगाडॆ मित्रराष्ट्रांच्या सैनिकांची वाटच पहात होते. बेत असा की मित्रसैनिकांच्या तुकडयांना वेगवेगळं पाडून नंतर यथेच्छ सावकाश समाचार घेणे.
मध्यंतरीच्या काळात ब्रिटीश हवाइदलाचे पूल, रेल्वेलाइन्स उडवून नाझींची घोडदौड रोखायचे प्रयत्न चालू होते पण यानं जर्मन काही फ़ारसे बधत नव्हते कारण त्यांच्या कारवाइचा अतिप्रचंड वेग. मित्रसैनिकांच्या फ़ळ्या फ़ोडायला सुरूवात झालीच ...
ब्रिट्नच ७५ % सैन्य फ़्रेंच हद्दीत अड्कून पडलय आणि जर हिटलरची ब्रिटन्वर हल्ला करण्याची योजना सफ़ल झालीच तर लढायला सैन्यच नाही अशी अत्यंत आणीबाणीची परिस्तिथी पंतप्रधान्पद हाती घेतल्यावर पहिल्या आठवड्यांतच चर्चिल समोर आ वासून उभी ठाकली.जर जर्मनीनं फ़्रान्सची बंदरं ताब्यात घेतली तर समुद्रकिनायावरून सैन्याची सुटका करायच्या आपत्कालीन योजनेवर इकडे लंडन मध्ये १४ तारखेपासूनच पर्यायी उपाययोजनांवर तर्क वितर्क चालू झाले, व्हाइस एड्मिरल रामसेंच्या नेतृत्वाखाली ह्या योजनेला आकार द्यायला चालू झाला, अर्थातच वेळ खूप कमी. समुद्रकिनार्यावरून सैन्याची सुटका करायची हा एकमेव मार्ग पण समुद्रकिनार्याजवळ उथळ पाण्यात युद्धनौका नेणं तेही वरून बॉम्बफेक होत असताना पराकोटीच अशक्य होत. जनतेला सगळ्या वैयक्तिक मालकीच्या नावांची ची माहिती सरकारजमा करायच आवाहन केलं गेलं.
याचदरम्यान जनरल गोर्ट ( फ्रेंच हद्दीतल्या ब्रिटीश फौजेचे कमांडर ) ना फ़्रेंचांनी मोर्चा दक्षिणेकडे वळविण्याची विनंती केली पण ह्यात पूर्ण मित्रसैन्य जर्मन फ़ौजांनी वेढलं जाउन घात होण्याची दाट शक्यता होती आणि म्हणून जनरल गोर्टनी आपल्या सैन्याला २३ मे ला डंकर्क कडे मोर्चा वळ्वायची आज्ञा दिली आणि चर्चिल कडे तत्काळ मदतीची मागणी केली, चर्चिलचा माघार घ्यायला जोरदार विरोध होता पण जनरल गोर्ट् वास्तवाची जाणीव करून देउन निर्णयावर ठाम राहिला ...
पण हा परतीचा प्रवास अत्यंत अवघड होउन बसला, ब्रिटीश वायुदळ जर्मन सैन्याला कूच करायला अवघड जावं म्हणून पूल, रेल्वेलाइन उडवत होते पण आता त्यामुळं मित्रसैनिकांचा मागं येण्याचा मार्ग अजूनच खडतर झाला.
जर्मन वायुदळाची मात्र प्रचंड बॉम्बफेक चालू होती, आणि डंकर्क कडे जाण्याचा मार्ग तासागणिक दुष्कर होत चालला. पण २४ मे ला हिटलरनी नाझींच्या घोडदौडीला लगाम घातला आणि थांबायला सांगितलं( हा एक कलाटणी देणारा क्षण आणि वादाचा मुद्दा ).
या सगळ्या भानगडीत ब्रिटीश संसदेत आपण हिटलरशी बोलणी करून हे सगळ मिटवून घेउ असा सूरही दिसायला लागला, पण चर्चिलन व्हाइस ऎड्मिरल रामसे ना त्यांची योजना कार्यरत करायची प्रवानगी दिली, पुढच्या ३ दिवसांत जनतेच्या मालकीच्या (हौशी, लाइफ बोट्स, मासेमारीच्या नावा ) नावा ताब्यात घेउन त्यावरील अनावश्यक असं सगळं सामान काढून घेतल गेलं ( तितके जास्त सैनिक वाचतील म्हणून), योजना ४५००० सैनिकांची सुट्का समुद्रकिनायावरून छोट्या नावांतून खोल पाण्यात असणाया युद्धनौकेपर्य़ंत करणे अशी; अगदी टॅक्सी सर्व्हिस सारखी. शेकडो नावांची चाचणी घेण्यात आली आणि सुयोग्य अशा ( मच्च्छिमार बोटी, हौशी बोटी इ.) बोटी तयार करण्यात आल्या. पण सैन्यदलानं सामान्य नागरिकांना युद्धभूमीवर कायदेशिर रित्या घेउन जाता येत नाही म्हणून जागच्या जागी बोट्मालकांना नौदलात नोकरी दिली गेली. आंणि २६ मे ला, पंतप्रधानपद हाती घेतल्याच्या १६ व्या दिवशी संध्याकाळी साडेसहाला ऑपरेशन डायनॅमोचा 'आर या पार' असा चर्चिलनं श्रीगणेशा केला, नौदलाच्या नेतृत्वाखाली या छोट्या नावा सैन्याला वाचवायला रवाना झाल्या..
२ दिवसांत ४५००० जवानांची सुटका असं टार्गेट ठरलं गेल पण खाडीच्या पलीकडे साडेतीन लाखांनी अगोदरच मोर्चा डंकर्क कडे वळवला होता.सैनिकांकडं नकाशे नाहित, काही तुकड्या चुकून उलट्या दिशेकडे निघाल्या..प्रचंड गोंधळाच वातावरण पसरलं. सैनिकांजवळ्ची शस्रास्र्त जागे अभावी आणि जर्मनांच्या कामी येउ नयेत म्हणून परतीपूर्वी निकामी करण्याचे आदेश दिले गेले. दरम्यान जर्मनांनी सगळा बेत ओळ्खला आणि धुवांधार बॉम्ब्फ़ेक चालू झाली..प्रथमदर्शनी ठरवलेला मार्ग ( शॉर्ट्कट )बदलण्यात आला आणि लांबच्या मार्गान मोहिम रवाना करण्यात आली..
अन्नपाण्याविना २-३ दिवस चालून, वरून जर्मन विमानं बॉम्बिंग करतायत अशा अवस्थेत सैनिक या छोट्या बोटींची रांगेत वाट डोळ्यांत जीव आणून पहातायत, अशा वेळी शिस्त पाळली जावी म्हणून रांग मोडणार्याला जागीच गोळ्या मारण्याचे आदेश दिले गेले...
जर्मन फौजा घडोघडी पुढं सरकत होत्या, अशात अडीच लाखांवर ब्रिटीश सैनिक्म्ची सुटका झाली. यात बर्याच छोट्या नावा,वाट पहाणारे सैनिक जर्मन बाँम्ब ना बळी पडले..व्हाइअस अॅडमिरल रामसेच्या अंदाजानुसार ४ दिवसानंतर छोट्या नावा पाठवण अत्यंत अवघड होत पण फ़्रेंच सैनिकांसाठी आजून १ दिवस मोहिम चालवली आणि एकून जवळ जवळ साडेतीन लाख सैनिक सोडवले गेले. ४ जून ला पहाटे मोहिम संपली आणि सकाळी ९ ला जर्मनांनी डंकर्क ताब्यात घेतलं.
या सगळ्यात जवळजवळ ६५००० सैनिक मारले गेले, बरेच युद्धकैदी झाले, पण जे साडेतीन लाख सुटले त्यांच्या सुटकेत या छोट्या नावांचा सिंहाचा वाटा होता. बर्याच नावांनी आणि नाव चालक धारातीर्थी पडले. या सुटकेशिवाय ब्रिटनची ७५% आर्मीच सफाचट झाली होती.
सामान्य नागरिकांनी देशाच्या हाकेला ओ देउन केलेली खरी हिरोगेरी, परिस्थितीवर मात करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि निर्णयक्षमतेला आजही म्हणूनच डंकर्क स्पिरीट म्हणतात.
* सगळ्यांच्या माहितीचा इतिहास आहे पण माझी 'वन ऑफ द फेवरेट' आहे ही घटना म्हणून लिहितेय..
* संदर्भः डॉक्युमेंट्री : 'बॅटल ऑफ ब्रिटन', 'लिटील शिप्स'
चित्र : आंतरजालावरून साभार,
प्रतिक्रिया
22 Jul 2017 - 10:48 pm | पद्मावति
उत्तम लेख. कालच डंकर्क चित्रपट रीलीज झालाय. बघणार नक्कीच.
31 Jul 2017 - 6:20 pm | रघुनाथ.केरकर
पण चर्चेतुन सुधधा बरीच माहीती मिळाली.
सर्वांचे आभार
4 Oct 2021 - 2:25 am | अमरेंद्र बाहुबली
आवडला लेख