प्रत्येक बाजाराची स्वत:ची अशी खास भाषा असते.सांकेतीक असते.रानडे रोडवर जसा *बापट भाव आहे तसा हा प्रकार.जव्हेरी लोक फार पूर्वी एक सांकेतीक भाषा वापरायचे. भाव करण्यासाठी हथ्था वापरायचे. हाताच्या खूणांनी एकमेकांना भाव सांगायचे .काही जव्हेरी बोली भाषा वापरायचे जी फक्त त्यांनाच समजायची. हे सगळं करण्याचा उद्देश असा की खरा भाव ग्राहकाला कळू नये. रत्नपारख्यांच्या राज्यात या सांकेतीक भाषेला फरच महत्व आहे.ग्राहकाची हौस आणि नड यावरच रत्नांचा भाव ठरतो.
(व्यावहारीक नजरेतून पाहीलं तर सगळी अनमोल रत्ने फेरविक्रीस घेऊन गेलं तर कवडी मोलाची असतात. एखादे रत्न खरेदी करणे म्हणजे अनोळखी व्यक्तीला उधार पैसे देण्यासारखे आहे. परतीचा मार्ग नाही.याला अर्थात काही सन्मान्य अपवाद आहेत.)
आता थोडी ओळख जव्हेर्यांच्या सांकेतीक भाषेची.
एक महत्वाचा मुद्दा असा की ही भाषा आता कोणीही वापरत नाही.
आधुनीक साधनांनी त्याची आवश्यकता संपवून टाकली आहे.
रंजकता हा एकच मुद्दा.
एक = कणी
दोन = मेली
तीन = एकवई
चार = एरण
पाच= मूळ
सहा = बेड
सात = समार
आठ = थाल
नऊ =बन
दहा = दाही
पंचवीस = सळीसूत किंवा पान
पन्नास = मूळदाही
पंचावन्न = मूळमूळ
सत्तर =समार दाही
पंचाहत्तर = तीन पान
शंभर = कणी सो
हजार = बडा घर.
एक उदाहरण म्हणून ही यादी दिली आहे .
याचा वापर कसा करायचा यासाठी एक नमुना.
एकवई_एरणदाही अदिती म्हणजे ३_१४ अदिती.
ही सगळी माहीती मला बरीच पुस्तके वाचल्यावर आणि काही माहीती व्यापार्यांकडून मिळत गेली.
बरीचशी मराठीतली माहीती १९४०-४१ दरम्यान प्रकाशीत झालेल्या लघुरत्न परीक्षा रत्न प्रदीप खंड ह्या पुस्तकांतून मिळाली.
या पुस्तकाची आवृत्ती आत कुठेच मिळत नाही.
वर दिलेली सांकेतीक भाषा वामन हरी पेठे यांनी रत्न प्रदीप खंडाच्या लेखकाला लिहीण्यास बरीच मदत केल्याचा उल्लेख आहे .
पण आमच्या सारख्या संतांना ह्या रत्न संपत्तीचा काय उपयोग ?
झूठा माणिक मोतीया री झूठी जगमग जोति ।
झूठा सब आभूखणा री सांची पिया जी री पोती ।
झूठा पाट पटंबरा रे झूठा दखणी चीर *।
सांची पियाजी री गुदडी जामे निर्मल रहै सरीर ।
*या लेखाचे शिर्षक मीरेच्या हे री मै तो दरद दिवाणी या पदातून घेतले आहे.पूर्ण ओळ अशी आहे .
जौहरी की गत जौहरी जाणे की जिण जौहर होय.
*दखणी चीर = दख्खनी साडी =दक्षीणी साडी हा संदर्भ सोळाव्या शतकातला आहे.
बापट भाव = सांगीतलेल्या भावाचा अर्धा भाव.
प्रतिक्रिया
29 May 2010 - 12:54 am | मुक्तसुनीत
प्रस्तुत लिखाण एकदम बापट दोनशे नंबरी सोन्याचे ! :-)
रामदास, या रानडे रोडवरील परिभाषेची एटमॉलॉजी समजली तर कृपया सांगा ! काय सांगाल तेव्हढे बापट देईन ;-)
29 May 2010 - 3:41 am | मिसळभोक्ता
काय सांगाल तेव्हढे बापट देईन
मुसुशेठ, आम्हाला वाटले, की तुमचे बापट प्रॉडक्शन थांबले असेल.
तुम्ही तर अजूनही फॉर्मात आहात.
असो, रामदास ह्या माणसाविषयी आदर होताच, वृद्धिंगत झाला.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
29 May 2010 - 1:16 am | रामदास
रानडे रोडवर खरेदी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातली जनता येते. भावात चलाखी करून माल विकणे हा रानडे रोडचा धंदा.आता बिस्मील्ला बिल्डींग ते खांडके बिल्डींग आणि गोखले रोड उत्तर -दक्षीणेचा कोकणस्थ ब्राह्मण वृंद रानडे रोडला फसणार नाही पण इतर ग्राहकांसमोर भाव पडायला नको म्हणून फेरीवाले खरी देण्याची किंमत बापट भावात सांगायचे. एकदा बापट भाव सांगीतला की घासाघीस नाही.
पण कोण विचारतो आता बापटभाव ? सगळे बापट -लेले गेले परदेशी .
29 May 2010 - 1:29 am | मुक्तसुनीत
गुरुमाऊली ! आगाध आहे लीला तुमची ;-)
मला किमान २५ वर्षे माहिती असलेल्या या वाक्प्रचाराचा अर्थ आज कळला. या न्यायाने केव्हातरी रिलेटीव्हीटीचा अर्थ किंवा अमुक आय्डी म्हणजे अमुकच का असल्या अत्यंत गहन गोष्टींचा अर्थसुद्धा केव्हातरी समजावा अशी आशा करायला हरकत नाही !
29 May 2010 - 3:45 am | नंदन
साष्टांग प्रणिपात कबूल करावा :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 May 2010 - 5:34 am | बेसनलाडू
(नतमस्तक)बेसनलाडू
29 May 2010 - 8:46 pm | घाटावरचे भट
असेच म्हणतो
29 May 2010 - 2:23 am | चित्रा
भारी माहिती. वर्षानुवर्षे दादरला रानडे रोडवर फिरले, पण असली सांकेतिक भाषा असेल असे कधीही कळले नाही.
मस्त लेख.
29 May 2010 - 2:35 am | प्राजु
अरे वा! सहीच आहे..
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
29 May 2010 - 4:07 am | Nile
'जव्हेरीबाजाराची' गमतीदार शब्द-ओळख आवडली.
-Nile
29 May 2010 - 5:08 am | दिनेश५७
तुम्ही म्हणजे, ``रंगुनि रंगात सार्या, रंग माझा वेगळा"....
क्या बात है!!
29 May 2010 - 5:59 am | सहज
लेख छानच. आता थोडी ४ पैशे बापटगिरी ;-)
१) पुन्हा एकदा ही भाषा सांकेतीक नेमकी कुठली, राजस्थानी/मारवाडी का पूर्ण खेळातली??
२) पुण्यातल्या रसोई डायनिंग हॉल मधे कुठलाही पदार्थ मागीतला की वाढपी असेच १, २, ३ ,४.. नंबर एकमेकांना सांगायचे ते आठवले.
३) आमच्या सारख्या संतांना ह्या रत्न संपत्तीचा काय उपयोग ??
अधे मधे डाव विस्कटला की हे वाक्य येते की
प्रचंड उपभोग घेताना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी की
फक्त भाषणात?
कारण घर्/मठ इ झाडताना हिरे, मोती आले तरी ते कचर्याबरोबर फेकलेले कधी ऐकले नाही आहे.
>व्यावहारीक नजरेतून पाहीलं तर सगळी अनमोल रत्ने फेरविक्रीस घेऊन गेलं तर कवडी मोलाची असतात.
जौहरी की गत जौहरी जाणे. :-)
29 May 2010 - 10:01 am | jaypal
मान गये उस्ताद !!! ये ही तो है जौहरी कि पारखी नजर
![dfdf](http://supercomputing.fnal.gov/SC2008/presentations/Snort/Image/magnifying-glass.gif)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
29 May 2010 - 5:28 pm | दत्ता काळे
तुमच्या लेखातून नवनवीन माहिती कळते आहे. धन्यवाद.
29 May 2010 - 5:40 pm | अमोल खरे
काहितरी नवीन व रोचक माहिती कळते. काय सॉल्लिड वाचन आणि कसले जबरदस्त कॉन्टॅक्ट आहेत तुमचे......ग्रेट.
29 May 2010 - 6:54 pm | संजा
माहीती पुर्ण व मनोरंजक लेख. आवडला.
शंका.
१. हिर्याची रिसेल व्हल्यू कशी काढतात.
रिसेल : पुन्हा विक्री.
संजा
'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'
29 May 2010 - 8:59 pm | अरुंधती
मस्त माहिती आणि आकड्यांची परिभाषा रंजकच! ते आकडे ज्या भाषेत सांगितले जातात ती भाषा कोणती किंवा ते शब्द कोणत्या भाषेतून आले हे सांगू शकाल का? त्या शब्दांमागचा इतिहास किंवा टिप्पणी कळली तर अजून मजा येईल.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
29 May 2010 - 10:48 pm | संजय अभ्यंकर
एकच आयडी घेऊन वावरणार्या नव्या रामदासाने हे लिहिले आहे.
एका माणसाला इतक्या क्षेत्रांची माहीती असणे शक्य नाही.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
30 May 2010 - 12:16 am | मी-सौरभ
-----
सौरभ (अनुमोदक) :)
30 May 2010 - 1:17 am | धनंजय
नवनवीन माहितीचे जवाहिर