मोबाइल उचलला

प्रा सुरेश खेडकर's picture
प्रा सुरेश खेडकर in जे न देखे रवी...
28 Mar 2008 - 12:19 am

मोबाइल उचलला, कानी लावियला

संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून , वेगळ्या विषयावरचे ( म्हणजे लठ्ठ बाई व दारू या व्यतिरिक्त)स्वरचित विडंबन गीत.

मोबाइल उचलला, कानी लावियला
पैसे वेचिता बहुल, सर्वा हाती आला.
इवलेसे पोर,मिरविते भारी.
तयाचा बिलू,गेला गगनावरी.
शेजारचा बंटी, असाच वाया गेला,
बाप त्याचा आईवरी,उगाचाच डाफरला.
मोबाइल उचलला, कानी लावियला
पैसे वेचिता बहुल, सर्वा हाती आला.

प्रा.सुरेश खेडकर ,नागपूर.
पाईक, "झेंडूची फुले परंपरा"

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

सुशील's picture

28 Mar 2008 - 8:27 am | सुशील

तात्या काय हे? इतके होउनही ज्ञनेश्वरांचे विडंबन इथे आहे. मलातर हा मुद्दाम केलेला वात्रटपणा वाटतो आहे.